प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

0
4
प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

अकलूज | प्रतिनिधी.  अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील तथा नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १० मधील विविध भागांमध्ये वाढलेल्या धोकादायक झाडांची आणि झाडांच्या फांद्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कर्तव्यदक्ष नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी झाडांच्या वाढलेल्या फांद्या तसेच काही धोकादायक झाडांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत नगरसेविका मनिषाताई तिकोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच धोकादायक झाडे हटविण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रस्ते, स्वच्छता, पथदिवे तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची नोंद घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या.

नगरसेविका मनिषाताई तिकोटे या सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.