Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशSaulos Chilima | मलावीचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमांचे विमान कोसळले; चिलिमांसह विमानातील सर्वांचा...

Saulos Chilima | मलावीचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमांचे विमान कोसळले; चिलिमांसह विमानातील सर्वांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मलावीचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमांचे विमान कोसळले; चिलिमांसह विमानातील सर्वांचा मृत्यू

मलावीचे राष्ट्रपती लाझारस चकवेरा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा, माजी प्रथम महिला शानिले जिम्बीरी आणि इतर आठ जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले.

लिलोंगवे : मलावीचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा (Saulos Chilima) यांना घेऊन जाणारे लष्करी विमान ब्लांटायरजवळ कोसळले. या विमान अपघातात चिलिमा आणि इतर नऊ जणांचा मृत्यू झाला. बेपत्ता विमान मंगळवारी शोध मोहिमेनंतर चिकांगवा जंगलात सापडले. यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मलावीचे राष्ट्रपती लाझारस चकवेरा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा, माजी प्रथम महिला शानिले जिम्बीरी आणि इतर आठ जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. ही घटना सोमवारी घडली. दक्षिण आफ्रिकन देशाची राजधानी लिलोंग्वे येथून या विमानाने उड्डाण केले होते. सुमारे 45 मिनिटांनी ते राजधानीपासून 370 किलोमीटर अंतरावर असलेल्या मझुझू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र, तत्पूर्वीच हे विमान कोसळले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments