Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMalshej Ghat Landslide: माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू

Malshej Ghat Landslide: माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू

[ad_1]

राहुल भालेराव (वय, ३०) आणि त्याचा पुतण्या स्वयं (वय, ७) अशी मृतांची नावे आहेत. भालेराव कुटुंब मुंबईच्या मुलुंड येथील रहिवाशी असून ते रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते. मात्र, घाटावरून जात असताना त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. राहुल आणि स्वयंसह घरातील एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकली. मात्र, तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चे प्राण वाचवले. पण राहुल आणि स्वयं यांना ढिगाऱ्यातून बाहेर निघता आले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments