Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगसम्यक संबुध्दांची भारतीय शिल्पकलेतून आढळून न येणारे शिल्प.

सम्यक संबुध्दांची भारतीय शिल्पकलेतून आढळून न येणारे शिल्प.

फलटण :पोलोनारूवा हे श्रीलंकेतील दुसरे जुने शहर आहे या ठिकाणी “गल विहार” मुळ नाव “उत्तररामाच्या” किंवा ग्रेट मॉनेस्ट्री संबोधल्या जाणाऱ्या ठिकाणांवर सम्यक संबुध्दांची चार शिल्प आहेत.
पोलोनारूवा हे प्राचीन पोलोनारूवा राज्याचे प्राचीन राजधानीचे ठिकाण असून इ स बाराव्या शतकात ( ११५३ – ११८६ ) होऊन गेलेल्या राजे पराक्रमबाहू पहिले यांनी वसवल्याचा श्रीलंकेचा इतिहासात नोंद आहे, राजे पराक्रमबाहू पहिले यांनी आपल्या राज्य शासनाच्या काळात बांधलेल्या शंभर बौध्द मंदीराच्या/ विहारांच्या पैकी गल विहार किंवा उत्तररामा विहाराला पर्यटकांकडून सर्वात जास्त भेट दिले जाणारे ठिकाण आहे.

उत्तररामा विहार हे श्रीलंकेतील अनुराधापूरच्या शिल्प शैली पैक्षा आपल्या स्वतंत्र शिल्प शैलीसाठी प्रसिद्ध आहे, ग्रॅनाईटच्या खडकात निर्माण केलेल्या चार शिल्पांच्या करता खूप प्रसिद्ध आहे , ध्यानस्थ मुद्रेतील दोन महापरिनिर्वाणमुद्रेतील एक व एक उभे शिल्प इथे आहे , त्यापैकीच उभ्या अवस्थेतील सम्यक संबुध्दाचे शिल्प हे विद्वानात चर्चेचा विषय ठरली आहे.
विद्वानात दोन मतप्रवाह आहेत काही विद्वानांच्या मते हे शिल्प सम्यक संबुध्दांचे नसून त्यांचे सहकारी भंते आनंद यांचे आहे तर काही विद्वानांच्या मते ही सम्यक संबुध्दांची आहे. भंते आनंद यांचे शिल्प म्हणणार्‍या विद्वानांच्या मते हे शिल्प ज्या शिल्पा शेजारी आहे ते सम्यक संबुध्द यांच्या महापरिनिर्वाणामुद्रेतील शिल्पाच्या शेजारीच असल्याने भंते आनंद सम्यक संबुध्दांना महापरिनिर्वाण अवस्थेत पाहून दुःखी होत आहेत, पण प्रत्येक शिल्पासाठी स्वतंत्र पूजेचे संकुल/ खोली असल्याने ( तसे बांधकामाचे अवशेष देखील आहेत ) या म्हणण्याला तथ्य उरत नाही, तर दुसरे मत आहे ही सम्यक संबुध्दांची ही कमळ पुष्पावर थोडीशी मागे झुकलेली दोन्ही पंजे आपल्या दोन्ही बाहूंवर स्थिरावलेली “पर दु:ख दुखती” मुद्रेतील हे शिल्प आहे ( इतरांचे दुःख पाहून दु:खीत झालेली ), तर एक मतप्रवाह असा ही आहे की सम्यक संबुध्दांना ज्या बोध्दी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली त्याच्याकडे ते कृतज्ञतापूर्वक पाहत आहेत.

सिंहली शिल्पकलेतून क्वचितच अढळून येणारी व भारतीय शिल्पकलेतून आढळून न येणारी ही “पर दुःख दुःखती” मुद्रेतील पोलोनारूवा इथल्या उत्तररामा विहारातील शिल्प मात्र आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरली आहे.

सूरज रतन जगताप

   लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments