Sunday, August 30, 2026
Homeफलटणएमटीएस ऑलिम्पियाडमध्ये मोरे भगिनींचे घवघवीत यशआरोहीला राज्य गुणवत्ता यादीत ३२वा, अपेक्षाला ४८वा...

एमटीएस ऑलिम्पियाडमध्ये मोरे भगिनींचे घवघवीत यशआरोहीला राज्य गुणवत्ता यादीत ३२वा, अपेक्षाला ४८वा क्रमांक; दोघींनाही सुवर्णपदक

फलटण : महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या एमटीएस ऑलिम्पियाडमध्ये फलटण येथील व्हिजन अकॅडमीच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी आरोही रामचंद्र मोरे आणि अपेक्षा रामचंद्र मोरे या भगिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दोघींनीही सुवर्णपदक पटकावत आपल्या शाळेसह फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.
आरोही रामचंद्र मोरे हिने या परीक्षेत ३०० पैकी २३६ गुण मिळवत ७९ टक्के गुण संपादन केले. तिने राज्य गुणवत्ता यादीत ३२वा क्रमांक, जिल्हा गुणवत्ता यादीत ३रा क्रमांक तसेच केंद्र गुणवत्ता यादीत ३रा क्रमांक मिळविला.
तर तिची बहीण अपेक्षा रामचंद्र मोरे हिने ३०० पैकी २०४ गुण म्हणजेच ६८ टक्के गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. अपेक्षाने राज्य गुणवत्ता यादीत ४८वा क्रमांक, जिल्हा गुणवत्ता यादीत ५वा क्रमांक आणि केंद्र गुणवत्ता यादीत ५वा क्रमांक मिळविला.
विशेष म्हणजे, एकाच कुटुंबातील या दोन्ही भगिनींनी राज्य, जिल्हा आणि केंद्र पातळीवरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. त्यांच्या या यशामुळे व्हिजन अकॅडमी, फलटणच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आरोही व अपेक्षा यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, अभ्यासातील शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्रपरिवार, BBM Family, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी पदाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मोरे भगिनींचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments