Sunday, August 23, 2026
Homeब्लॉगपांथस्थचे राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे; छत्तीसगड (शिरपूर) आणि व्हिएतनामसाठी नोंदणी सुरू

पांथस्थचे राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे; छत्तीसगड (शिरपूर) आणि व्हिएतनामसाठी नोंदणी सुरू

सप्टेंबरमधील व्हिएतनाम अभ्यास दौऱ्यासाठी शेवटच्या पाच जागा शिल्लक; इच्छुकांनी फक्त व्हॉट्सअॅपद्वारेच संपर्क साधण्याचे आवाहन

साहस Times  प्रतिनिधी | इतिहास, पुरातत्त्व, लेणी, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या पांथस्थ संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून राज्यभरातील विविध ऐतिहासिक लेणी व वारसा स्थळांवर अभ्यास दौऱ्यांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यास दौऱ्यांना इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि वारसा अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

याच परंपरेला पुढे नेत पांथस्थतर्फे यंदा ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगड राज्यातील ऐतिहासिक शिरपूर येथे विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्त्व, प्राचीन मंदिरे, बौद्ध वारसा आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यासोबतच पांथस्थच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांच्या मालिकेत सप्टेंबर महिन्यात व्हिएतनाम देशाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यासाठी शेवटच्या पाच जागा शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हा पांथस्थचा तिसरा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा असून, इतिहास आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही दुर्मीळ संधी असल्याचे सांगण्यात आले.

या दोन्ही अभ्यास दौऱ्यांव्यतिरिक्त पांथस्थच्या माध्यमातून इतरही विविध अभ्यास दौऱ्यांचे नियोजन सुरू असून, इच्छुक सदस्यांनी दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून अथवा क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित समूहात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, जे सदस्य प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार नाहीत त्यांनी कृपया समूहात सामील होऊ नये. अनावश्यक सदस्यसंख्या वाढल्यामुळे नियोजनात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे केवळ गंभीर व इच्छुक सदस्यांनीच समूहात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच फोन कॉल न करता फक्त व्हॉट्सअॅपद्वारेच संपर्क साधावा. पांथस्थ टीमकडून योग्य वेळी इच्छुक सदस्यांशी संपर्क साधून पुढील सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments