Tuesday, August 11, 2026
Homeफलटणसाहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव...

साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६ फलटण. यांच्या वतीने अभिवादन.

फलटणमध्ये लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून पुष्पहार अर्पण

फलटण प्रतिनिधी :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६, फलटण यांच्या वतीने साहित्यसम्राट, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि बहुजन समाजासाठीच्या योगदानाला आदरांजली वाहिली.

यावेळी भीम जयंती समिती, फलटण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसह समाजप्रबोधनपर सुविचार असलेला आकर्षक शुभेच्छा बॅनर उभारण्यात आला. या बॅनरद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या साहित्याने व शाहिरीने वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला दिलेली प्रेरणा आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या विचारांचे जतन व प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमात आदर्श अहिवळे, शशीकांत अहिवळे, सूजल गायकवाड, अनिकेत अहिवळे, विराज घोडके, संघर्ष अहिवळे, प्रेम अहिवळे, स्वप्निल काकडे, संघराज अहिवळे, अमर अहिवळे, संघकारा अहिवळे, साहिल अहिवळे, संविधान काकडे, देवराज अहिवळे तसेच समितीचे अध्यक्ष हरिश काकडे, आप्पा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व भीम जयंती समितीच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत, महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार अशाच पद्धतीने सातत्याने व्हावा,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments