Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशPre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी...

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

[ad_1]

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचं काही दिवसांपूर्वीच प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये धुमधडाक्यात पार पडलं होतं. आता पुन्हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं आणखी एक प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीची प्री-वेडिंग पार्टी ही इटली आणि फ्रान्स दरम्यान क्रूजवर आयोजित करण्यात आलीये. या पार्टीमध्ये बॉलिवूड तसेच अनेक दिग्गज देखील हजेरी लावतील. मात्र, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी या दोघांच्या प्रेमाची गोष्ट खूप खास आहे. जाणून घ्या कशी झाली दोघांची पहिली ओळख.

काही मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. एवढंच नव्हे तर कॉलेजमध्येही या दोघांची मैत्री कायम होती. मात्र, काही रिपोर्ट्सचा असा दावा आहे की, 2022 मध्ये या दोघांचा रोका करण्यात आला. तेव्हा कुटुंबियांनी सांगितलं की, अनंत-राधिका गेल्या काही वर्षांपासून या दोघांची ओळख जास्त झाली. ही ओळख लहानपणापासूनची असो किंवा अगदी काही वर्षांपूर्वीची पण या दोघांचा बाँड कायमच स्ट्राँग राहिला आहे. 

प्रत्येकाला असं वाटतं की, असाच जीवनसाथी प्रत्येकाला मिळावा. कारण या दोघांनी एकमेकांना पावलो पावली साथ दिली आहे. वेळ चांगली असो किंवा वाईट पण हे दोघं जोडीदार म्हणून एकमेकांच्या कायम सोबत होते. अनंत अंबानी यांच्या जीवनात राधिका मर्चंटची साथ कायमच एक उत्तम उदाहरण ठरली आहे.

एका मुलाखती दरम्यान अनंत अंबानी यांनी आपल्या ओबेसिटीबद्दल सांगितलं होतं. यामुळेच त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्या कठीण प्रसंगी राधिका मर्चंटची साथ अतिशय महत्त्वाची ठरली आहे. राधिका आणि अनंत या दोघांची जोडी एक सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे. राधिकाला तर लग्नापूर्वीच 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. 

राधिकाने वाढवली हिम्मत
 
अनंत अंबानी यांनी हे देखील सांगितलं की, अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावूनही कधीच कुटुंबियांनी मी आजारी असल्याच भासवलं नाही. यासोबतच राधिकाने अनंत अंबानीला दिलेली साथ ही कायमच कौतुकास्पद आहे. यामुळे अनंत अंबानी यांची हिम्मत वाढली. घरातील व्यक्तींनी कायमच सांगितलं की, कधीच हिम्मत हरू नको कायम लढत राहा. तुमच्यापेक्षा अनेक लोक आरोग्याच्या समस्या सहन करत आहेत. त्यामुळे तू आपल्या परिस्थितीसाठी कृतज्ञ राहा. 

राधिका माझ्या आयुष्यातील राणी 

प्रत्येक मुलाला वाटतं की, आपली जोडीदारही एखाद्या राणीप्रमाणे असावी. अनंत अंबानी यांची ही इच्छा तेव्हा पूर्ण झाली जेव्हा ते राधिकाला भेटले. अनंत यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांना लग्न करायचं नव्हतं. संपूर्ण आयुष्यभर प्राण्यांची सेवा करायची होती. पण जेव्हा अनंत अंबानी यांची राधिकाशी भेट झाली तेव्हा त्यांना आलं की, राधिकाला देखील ऍनिमल लवर असून प्राण्यांची काळजी घेते. एवढंच नव्हे तर अनंत अंबानी म्हणाले होते की, राधिका जीवनात आल्यामुळे त्यांना आपण खूप लकी असल्याचं जाणवत आहे. ती माझ्या स्वप्नांची राणी आहे, असं अनंत सांगतात. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments