Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 81

Gas Geyser Safety : बाथरुममध्ये लावलेला गिझर बनू शकतो ‘सायलेंट किलर’, 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या

0
Gas Geyser Safety : बाथरुममध्ये लावलेला गिझर बनू शकतो ‘सायलेंट किलर’, 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या


तापमान कमी होत असताना, घरांमध्ये गॅस गिझरचा वापर वाढला आहे. तथापि, अलिकडच्या काळात गॅस गिझरशी संबंधित अपघातांच्या बातम्यांमुळे चिंता निर्माण झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की गॅस गिझर स्वतः धोकादायक नसतात, उलट, अयोग्यरित्या बसवणे आणि वापरल्याने धोका निर्माण होतो. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही सुरक्षितता उपाय येथे दिले आहेत:

Add Zee News as a Preferred Source

वेंटिलेशन सर्वात महत्वाचे

गॅस गिझर एलपीजी जाळून पाणी गरम करतात, ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्वलन दरम्यान, ते कार्बन मोनोऑक्साइड (CO) सोडते, जो एक अत्यंत विषारी वायू आहे. हा वायू बाथरूममध्ये सोडला तर तो घातक ठरू शकतो. बाथरूममध्ये हवेशीर नसल्यास गॅस गिझर बसवू नये याची काळजी घ्या. बाथरूममध्ये फक्त खिडकी असणे पुरेसे नाही; एक्झॉस्ट फॅन बसवणे देखील महत्त्वाचे आहे.

गिझरची उंची आणि फिटिंग

गीझर नेहमी डोळ्याच्या पातळीपेक्षा थोडा वर बसवावा जेणेकरून तुम्हाला त्याची ज्वाला दिसेल. तो कधीही इलेक्ट्रिकल स्विच किंवा प्लगच्या वर थेट बसवू नका.

बाथरूमच्या बाहेर गीझर बसवा

शक्य असल्यास, बाथरूमच्या बाहेर गीझर युनिट बसवा आणि फक्त गरम पाण्याचा पाईप आत आणा. यामुळे गॅस गळती किंवा ऑक्सिजनची कमतरता झाल्यास जीवघेण्या परिस्थिती टाळता येईल.

आंघोळीपूर्वी पाणी गरम करा

गॅस गीझर वापरण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे बादलीत पाण्याने भरणे आणि आंघोळीपूर्वी ते बंद करणे. गीझर चालू असताना लहान बाथरूममध्ये जास्त वेळ राहणे धोकादायक ठरू शकते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

बाथरूममध्ये गीझर वापरताना तुम्हाला खालील लक्षणे आढळल्यास, ताबडतोब निघून जा:

अचानक चक्कर येणे किंवा हलके डोके येणे.

मळमळ किंवा उलट्या होणे.

श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जास्त झोप येणे.

डोळे खाजणे.





Source link

वयाच्या पस्तीशीनंतर तारुण्य कमी होत जातं? स्वीडिश शास्त्रज्ञांनी उलगडलं शरीराचं एक मोठं रहस्य!

0
वयाच्या पस्तीशीनंतर तारुण्य कमी होत जातं? स्वीडिश शास्त्रज्ञांनी उलगडलं शरीराचं एक मोठं रहस्य!


Physical fitness Peak Age:  शारीरिक तंदुरुस्ती आणि स्नायूंची ताकद 35 वयापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचते, त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. ही घसरण व्यायामाने थांबवता येत नाही, पण नक्की मंदावता येते. कधीही व्यायाम सुरू करणे उशिरा होत नाही, असे संशोधक सांगतात. स्वीडनच्या अभ्यासात यासंदर्भात खुलासा करण्यात आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटने एक संशोधन केलंय.स्वीडिश फिजिकल अॅक्टिव्हिटी अँड फिटनेस स्टडी – SPAF असे त्याचे नाव आहे. 47 वर्षांपासून शेकडो पुरुष आणि महिलांचे निरीक्षण करण्यात आले. हे लोक 16 ते 63 वयाच्या होते आणि त्यांची शारीरिक क्षमता, ताकद आणि स्नायूंची टिकाऊपणा वारंवार तपासला गेला. हा अभ्यास विशेष आहे कारण यात एकाच लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण करण्यात आले. जे आधीच्या अभ्यासांपेक्षा वेगळे आहे.

35 वर्ष वय का महत्त्वाचे?

शारीरिक तंदुरुस्ती, स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती ही सर्वोच्च पातळी साधारण 35 वर्षांपर्यंत पोहोचते. त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजे 35 हे वय एक मोठ्या बदलाचा टप्पा आहे. जिथून शरीराची कार्यक्षमता खालावायला सुरुवात होते, मग व्यायाम कितीही केला तरी हे होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

कमी होण्याची प्रक्रिया कशी?

सुरुवातीला ही प्रक्रिया कमी होणे फार हळू म्हणजे वर्षाला फक्त 0.3 ते 0.6 टक्के होते. पण वय वाढत जाताच ही गती वेगवान होते आणि नंतर 2.0 ते 2.5 टक्के प्रति वर्ष इतकी होऊ शकते. हे बदल पुरुष आणि महिलां दोघांमध्येही दिसत असल्याचे अभ्यासात म्हटलंय. व्यायाम सुरू केल्याने शारीरिक क्षमता 5 ते 10 टक्के सुधारू शकते. व्यायामाने ही कमी होण्याची प्रक्रिया पूर्ण थांबवता येत नाही, पण नक्कीच मंदावता येते. व्यायाम कधीही उशिरा सुरू करु नका. व्यायामाने शरीराच्या क्षमतेची घसरण थांबवता येत नाही, पण ती नक्की मंद करता येते, असं अभ्यासात म्हटलंय. आता 35 वे वर्ष का पीक वर्षे असते? याबद्दल संशोधक अभ्यास करत आहेत. वृद्धत्वाची प्रक्रिया वयाच्या पस्तिशीपासूनच सुरू होते पण सक्रिय जीवनशैलीने आपण तिला आव्हान देऊ शकतो. नियमित हालचाल आणि व्यायामाने निरोगी आयुष्य जास्त काळ टिकवता येते, असे संशोधन सांगते. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ कॅशेक्सिया, सार्कोपेनिया अँड मसल’ मध्ये प्रसिद्ध झालाय.





Source link

फलटणमध्ये ईडीची मोठी कारवाई : यशवंत बँकेवर पहाटे छापा, ११२ कोटींच्या कथित अपहाराची चौकशी

0
फलटणमध्ये ईडीची मोठी कारवाई : यशवंत बँकेवर पहाटे छापा, ११२ कोटींच्या कथित अपहाराची चौकशी



फलटण :- फलटण शहरात आज पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले.
प्राथमिक व खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी तपास सुरू केला. त्यानंतर पथक थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. बँकेचे कार्यालय सुरू होताच सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.
कारवाईदरम्यान बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्जप्रकरणांशी संबंधित फाईल्स तसेच डिजिटल रेकॉर्डची सखोल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, यशवंत बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच मोठी कारवाई झाली होती. या प्रकरणात बँकेच्या चेअरमनसह सुमारे ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली असून, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीत बोगस कर्जप्रकरणे उभी करणे, बनावट कागदपत्रांचा वापर, तारण न घेता कर्जवाटप, जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवणे तसेच दस्तऐवजांत फेरफार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग केल्याचे गंभीर आरोप नमूद करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यात यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व अन्य ९ जणांवर गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे.
सदर ईडीची कारवाई याच अपहारप्रकरणाच्या अनुषंगाने असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी ईडीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अधिकृत माहितीनंतरच या कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

फलटणमधील चौगुले इंडस्ट्रीजमध्ये कामगारांचा पगार थकवला; कामगार संघर्ष संघटनेचा इशारा

0
फलटणमधील चौगुले इंडस्ट्रीजमध्ये कामगारांचा पगार थकवला; कामगार संघर्ष संघटनेचा इशारा


फलटण (जि. सातारा) —फलटण येथील चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या कामगारांचा पगार कोणतेही ठोस कारण नसताना थकवून ठेवल्याचा गंभीर आरोप कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी केला आहे.
या प्रकरणी कामगार संघर्ष संघटनेकडे अनेक कामगारांनी तक्रारी दाखल केल्या असून, संबंधित कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. यामुळे कामगारांवर अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने कंपनीला दिलेल्या निवेदनात खालील कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे:
गणेश सुभाष अहिवळे – ₹12,000
रसिक रविंद्र माने – ₹12,000
देवराज राजेन बामणे – ₹10,000
अविनाश लक्ष्मण धनवट – ₹10,000
राजेश तानाजी सोनवणे – ₹7,000
गोविंद संतोष पवार – ₹5,000
सदर रक्कम कंपनीच्या हजेरी मस्टरप्रमाणे काम केलेल्या दिवसांनुसार त्वरित देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी संघटनेने केली आहे.
जर कंपनीने तात्काळ पगार अदा केला नाही, तर कामगार उप आयुक्त, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
कामगार वर्गावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, आणि कामगारांच्या हक्काचा व कष्टाचा पैसा मिळवूनच राहू, असा ठाम निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
 हेडिंग (पर्याय):
चौगुले इंडस्ट्रीजकडून कामगारांचा पगार थकवला; कामगार संघर्ष संघटनेचा कडक इशारा
फलटणमध्ये कामगारांवर अन्याय; थकीत पगार न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
कामगारांच्या हक्कांसाठी कामगार संघर्ष संघटना आक्रमक

10 मिनिटांत कंडोम, आयफोन आणि रात्री उशिरा..; भारतीयांच्या ऑनलाईन शॉपिंगची यादी पाहून डोकं गरगरेल

0
10 मिनिटांत कंडोम, आयफोन आणि रात्री उशिरा..; भारतीयांच्या ऑनलाईन शॉपिंगची यादी पाहून डोकं गरगरेल


Online Shopping India : ऑनलाईन शॉपिंग… काही वर्षांपूर्वी हा काहींच्याच सवयीचा भाग होता. आजच्या क्षणाला मात्र अनेक भारतीय या ऑनलाईन शॉपिंगच्या मदतीनं हवं तेव्हा, हवी ती गोष्ट, परवडणाऱ्या आणि सवलतीच्या दरात मिळवतात. असंख्य App, त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा यांमुळं हे साध्य होत आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फक्त कपडे, किराणा, भाजीपालाच नव्हे तर आता भारतीय चक्क सणासुदीला सोनंखरेदीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं करत आहेत. आश्चर्य वाटतंय? ही यादी बरीच मोठी आहे… पाहा… 

Add Zee News as a Preferred Source

स्विगी इन्स्टामार्टवरून कोणत्या गोष्टींना सर्वाधिक मागणी? 

‘How India Instamarted 2025’ या स्विगी इनस्टामार्टच्या अहवालातून भारतीयांनी यंदाच्या म्हणजेच 2025 या वर्षी 10 रुपयांच्या बिस्कीटापासून 5 रुपयांचा शम्पू आणि हजारोंच्या घरात येणाऱ्या अनेक वस्तूसुद्धा खरेदी केल्याचं स्पष्ट झालं. या अहवालानुसार ‘क्विक कॉमर्स’ (Quick Commerce) च्या दृष्टीनं यंदाचं वर्ष क्रांतिकारी ठरलं. 

यंदा भारतीयांनी फक्त दूध आणि वाणसामानच नव्हे तर स्मार्टफोन, लक्झरी सामान, सोनंसुद्धा 10 मिनिटांत घरापाशी मागवलं. बंगळुरूमध्ये जिथं एका सामान्य प्रिंटआऊटची मागणी होती, तिथं हैदराबादमध्ये एका व्यक्तीनं इन्स्टामार्टवरून 4.03 लाख किमतीचे आयफोन 17 मागवत या वर्षीचा ‘सिंगल कार्ट’ विक्रम रचला. कंडोम म्हणजेच निरोधसुद्धा 10 मिनिटांच मागवण्याकडे अनेक भारतीयांचा कल दिसला. 

अहवालातील आकडेवारीनुसार 2025 मध्ये दर सेकंदाला 4 पाकिटं दुधाचा खप झाला. वर्षभरासाठीचं हे प्रमाण इतकं आहे ती ऑलिम्पिकच्या आकाराचे 26000 स्विमिंग पूर भरुन जातील. यंदा चीजच्या तुलनेत पनीरची मागणी अधिक होती. तर, नाश्त्यासाठी बटर, तूप आणि बटर स्प्रेडची अधिक मागणी होती. रात्री उशिराच्या ऑर्डरमध्ये खवैय्यांनी मसाला फ्लेवर्ड चिप्स मागवले असून, 10 महत्त्वाच्या शहरांत हे Number 1 Snack ठरलं. 

सोन्याचांदीच्या वस्तूंनाही मागणी? 

या वर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये बंगळुरूतील एका ग्राहकानं 1.97 लाख रुपयांची 1 किलो चांदीची बिस्कीटं ऑर्डर केली, तर धनतेरसला इन्स्टामार्टवरून सोन्याच्या नाण्यांमधील मागणी 400 टक्क्यांनी वाढली. नोएडातील एका व्यक्तीनं 2.69 लाखांचे रोबोटीक व्हॅक्यूम आणि स्पीकर मागवले तर, मुंबईच्या एका युजरनं यावर्षी 15.16 लाखांचं सोनं इन्स्टामार्टवरून मागवलं. भारतीयांच्या या सर्व मागण्यांचा कल पाहता यंदा त्यांनी सुलभता अर्थात Convenience ला अधिक प्राधान्य दिल्याचं अहवालातून स्पष्ट झालं. 





Source link

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय

0
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय


(बिजवडी) : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी (ता. माण, जि. सातारा) येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025–26 अंतर्गत आयोजित करण्यात आलेली दोन दिवसांची शैक्षणिक सहल अत्यंत यशस्वी व ज्ञानवर्धक ठरली. गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 व शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ही सहल पार पडली.
सहलीची सुरुवात गुरुवारी पहाटे बिजवडी येथून झाली. विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतल्यानंतर गाडी पूजन करून प्रवासाला प्रारंभ करण्यात आला.

प्रवासादरम्यान वाई येथील गणपती दर्शन, महाबळेश्वर दर्शन तसेच प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यात आली. प्रतापगडावरील ऐतिहासिक महत्व, शिवकालीन इतिहास व गडांची भौगोलिक रचना याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर महाड येथे चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सामाजिक समता, मानवाधिकार व संविधान मूल्यांवर चर्चा करण्यात आली. पुढे हरिहरेश्वर दर्शन, दिवेआगर येथे मुक्काम व समुद्रकिनाऱ्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
शुक्रवारी सकाळी दिवेआगर बीच येथे समुद्रकिनाऱ्याच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण संवर्धन यावर प्रत्यक्ष निरीक्षण व चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुरुड-जंजिरा किल्ला, पाली येथील गणपती दर्शन, महड गणपती दर्शन तसेच पुणे येथे कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आली. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व कृषी विकासाबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
या संपूर्ण सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक बाबी प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतला. पर्यावरण संवर्धन, जलप्रणाली, लोकजीवन, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आनंदही मनमुराद लुटला.

या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकातील ज्ञान अधिक व्यापक झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सहशिक्षक बाबासाहेब जगताप व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहलीचे यशस्वी नियोजन व मार्गदर्शन व नियोजन केले. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पालक प्रतिनिधी, स्कुल कमिटी,सहल प्रमुख श्री. वाघ सर, श्री जगताप सर, निंबाळकर सर, अवघडे सर तसेच सर्व शिक्षक व महिला शिक्षिका यांनी उत्कृष्ट सहकार्य केले .पालक या सर्वांनी सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.

कोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नसंघटन विस्तार, निवडणूक आढावा, संविधान संरक्षणाचा निर्धार व आगामी निवडणुकीची तयारी

0
कोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नसंघटन विस्तार, निवडणूक आढावा, संविधान संरक्षणाचा निर्धार व आगामी निवडणुकीची तयारी

फलटण : दिनांक 22 डिसेंबर 2025 (सोमवार) रोजी सकाळी 11.00 वाजता बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी, फलटण येथे
वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष सन्माननीय रामदास कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महावीर भालेराव व कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयुष्मान रामदास कांबळे साहेब यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सामाजिक न्याय, समता व संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरला. या बैठकीत गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उभारणे, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमधील कामगिरीचा सविस्तर आढावा, तसेच आगामी महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी येणाऱ्या काळात श्रद्धेय ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व ताकदीनिशी निवडणुका लढवून राजकीय सत्ता हस्तगत करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करणे याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाड्या-वस्त्या व गावागावांत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस रामदासजी कांबळे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व), सुभाष गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष), विजय लोंढे (उपाध्यक्ष), ॲड. तेजस मोरे (सचिव), निकाळजे सर, कांबळे सर, संदीपभाऊ काकडे (फलटण तालुका अध्यक्ष), अजित कांबळे, सुमित मोरे, उमेश कांबळे (फलटण शहर अध्यक्ष), युवराज भोसले (माण तालुका अध्यक्ष), चित्राताई गायकवाड (महिला जिल्हा उपाध्यक्ष) सचिव अरविंद आढाव, शाहू, फुले, आंबेडकर विद्वद्य विचारधारा चे अशोक भोसले, कांता काकडे, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे सचिव सुनिल कदम उपस्थिती होते

फलटण नगर परिषद निवडणूक : ३५ वर्षांची सत्ता कोसळली, पण लोकशाही नोटांच्या ओझ्याखाली चिरडली गेली

0
फलटण नगर परिषद निवडणूक : ३५ वर्षांची सत्ता कोसळली, पण लोकशाही नोटांच्या ओझ्याखाली चिरडली गेली

फलटण नगर परिषद निवडणूक : ३५ वर्षांची सत्ता कोसळली, पण लोकशाही नोटांच्या ओझ्याखाली चिरडली गेली
फलटण : फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीने केवळ सत्ता बदल घडवून आणलेला नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकारणाचे अस्वस्थ करणारे वास्तव उघड्यावर आणले आहे. 1995 पासून तब्बल ३५ वर्षे निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाची एकहाती सत्ता अखेर संपुष्टात आली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही सत्ता उलथवून टाकण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे श्रीमंत रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा समशेर नाईक निंबाळकर यांच्याकडून झालेला पराभव हा या सत्तांतराचा निर्णायक आणि प्रतीकात्मक क्षण ठरला.
मात्र हा निकाल केवळ राजकीय विजय-पराभव म्हणून पाहणे म्हणजे वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. कारण या निवडणुकीने एक मूलभूत प्रश्न ठळकपणे उपस्थित केला आहे-
या निवडणुकीत विजय नेमका कोणाचा झाला? नेतृत्वाचा, विचारांचा, की नोटांच्या गठ्ठ्यांचा?
राजकारणातील ‘चाणक्य’ आणि दुर्लक्षित इशारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. मात्र चाणक्यत्व म्हणजे केवळ दीर्घकाळ सत्ता टिकवणे नव्हे, तर बदलती स्थिती ओळखून वेळेत निर्णय घेणे होय. आपल्या गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात जात असताना त्याकडे दुर्लक्ष करणे, हेच त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करण्याऐवजी आपल्या जवळच्या बगलबच्चांचे हित अधिक जपले गेले. ज्यांना नगराध्यक्षपद, विविध सत्तास्थाने, समित्यांची पदे, आर्थिक लाभ आणि राजकीय संरक्षण दिले गेले, त्यांनीच ऐन निवडणुकीच्या वेळी राजे गटाची साथ सोडली. सत्ता दीर्घकाळ हातात राहिल्यावर निर्माण होणारा अहंकार आणि आत्ममुग्धतेचा हा परिणाम होता.
३५ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणसाठी आदर्श, पारदर्शक आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन प्रश्नांवर आधारित विकासाचे सातत्यपूर्ण रोल मॉडेल उभे करण्यात राजे गट अपयशी ठरल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणनीती : सत्ता, संघटन आणि जमिनीवरील काम याउलट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बदलत्या राजकीय वास्तवाची अचूक नाडी ओळखली. केंद्र व राज्यातील सत्तेचा योग्य वापर करताना राजे गटातून फुटून आलेल्या नेते व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात आली. “आम्ही तुमचा अपमान करणार नाही” हा संदेश त्यांनी केवळ भाषणांतून नव्हे, तर कृतीतून दिला.
सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा-पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, दाखले, प्रशासकीय अडचणी-यावर दाखवलेली तत्परता, थेट हस्तक्षेप आणि उपलब्धता यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात त्यांच्या नेतृत्वाविषयी आत्मीयता निर्माण झाली. अचूक नियोजन, योग्य वेळी घेतलेल्या प्रचारसभा, बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे, सर्व जातीय व सामाजिक घटकांना सोबत घेण्याची सर्वसमावेशक भूमिका-या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा विजय.

पण खरा विजेता कोण?
इथून पुढे प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा ठरतो. कारण या निवडणुकीत अनेक उमेदवारांकडे विकासाचे व्हिजन होते, सामाजिक कामाचा अनुभव होता, शैक्षणिक पात्रता होती. तरीही निवडणूक जिंकण्यासाठी ते अपुरे ठरले. कारण आजच्या निवडणुकांचा निकष बदललेला आहे.
आज प्रश्न असा विचारला जातो-
तुझं चारित्र्य काय?,तुझं काम काय? तुझं व्हिजन काय? याला काहीच अर्थ नाही. तू किती खर्च करू शकतोस? यालाच महत्व आहे.
या निवडणुकीत विजय जर कुणाचा झाला असेल, तर तो प्रत्येक मतामागे ३,००० ते ५,००० रुपये मोजणाऱ्या पैशांचा झाला आहे. दारू, जेवणावळी आणि नोटांच्या बंडलांनी लोकशाहीचा गळा आवळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. मत विकणारा मतदार आणि हरलेली लोकशाही या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रक्रियेला हातभार लावणारे कोण होते, तर तेच सामान्य नागरिक. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार काही हजार रुपयांच्या बदल्यात विकला. त्यामुळे हा विजय केवळ पैशांचा नाही, तर बेरोजगारी, महागाई, आर्थिक विवंचना आणि हतबलतेत अडकलेल्या समाजव्यवस्थेचा आरसा आहे. फलटण नगर परिषदेची ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची गोष्ट नाही; ती लोकशाहीच्या सध्याच्या अधःपतनाची आणि भविष्यातील धोक्यांची गंभीर चेतावणी आहे. आज सत्ता बदलली आहे,
उद्या प्रश्न उरतो
लोकशाही वाचवायची आहे का, की ती नोटांच्या बाजारात विक्रीस काढून मोकळे व्हायचे आहे?

Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष

0


Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
नगरपालिकेचा निवडणुकीच्या निकालाचे 18 तास उलटून देखील साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे बंडखोर विजयी अपक्ष उमेदवारांचा जल्लोष सुरूच.. चार जेसीबी मधून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला आहे.. दोन्ही राजांच्या उमेदवारांचा पराभव करत खासदार उदयनराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आल्यानंतर मोठा जल्लोष करत आहेत.. हा विजय खासदार उदयनराजे भोसले यांचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांना जनतेने न्याय मिळवून दिला असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांनी म्हटले आहे. प्रभागात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असा विश्वास देखील रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांना दिला आहे..

आजच्या इतर बातम्या – 22 DEC 2025 
मुंबई महापालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचं गणित ठरलं…शिवडीसह दादरमधील दोन जागांचा तिढा सुटला, सूत्रांची माहिती…तर उद्धव ठाकरेंसोबतच्या तीन तासांच्या चर्चेनंतर नांदगावकर आणि सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला
मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न… संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश… ३ हजारांच्यावर नगरसेवक निवडून आले… देवेंद्र फडणवीसांची माहिती.. जनतेचे मानले आभार….
मुंबईतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात…तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय फडणवीस शिंदे घेणार…शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत फायनल चर्चा…भाजप मात्र १५० जागांवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती…
पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता…अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक केल्याची माहिती…दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा 



Source link

मी महापालिका बोलतेय…: बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं

0
मी महापालिका बोलतेय…:  बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं


  • Marathi News
  • Opinion
  • Balasaheb’s Mountain Voice Resonated And… The First Sambhajinagar Municipal Corporation Election Changed The Politics Of The Entire State.

संजय वरकड- साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो, मातांनो आणि भगिनींनो…’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहाडी आवाजातील हे शब्द मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खच्चून भरलेल्या मैदानात घुमले अन् टाळ्या, शिट्ट्यांनी वातावरण भारून गेलं…

ही आहे शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रवेशाची अन् शहराच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा पोत बदलून टाकणारी गोष्ट…

१९८८ मध्ये मनपा निवडणूक जाहीर झाली तेव्हा शहरातील तुरळक लोकांनाच शिवसेना हे नाव माहिती होतं. पक्षावर निवडणूक लढवण्याची वेळ अचानक आली. स्थानिक नेत्यांच्या मदतीसाठी मुंबईहून मधुकर सरपोतदार, विलास भानुशाली शहरात आले. त्यांनी वेगवेगळ्या भागात बैठकांना सुरुवात केली. बैठकांनाही फारसे लोक येत नसत. निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी वाॅर्ड सभा किंवा कॉर्नर मीटिंग घेतल्या. त्याचा थोडाफार फायदा होऊ लागला. प्रखर हिंदुत्व आणि मुस्लिमांना कडवा विरोध हे या प्रचाराचे सूत्र. मग काय, तरुण पोरं पाहता पाहता ‘जय महाराष्ट्र’ करू लागली. तिकीटवाटपाला सुरुवात झाली तेव्हा फारशी स्पर्धाही नव्हती. शिवसेनेचे तिकीट घेण्यास कुणी धजावत नव्हतं. तत्कालीन जिल्हाप्रमुख सुभाष पाटील, शहराध्यक्ष रमेश आमराव, परशुराम वाखुरे यांच्यासह मोजकेच पदाधिकारी शिवसेनेचे काम करत. सुरुवातीच्या काळातच चंद्रकांत खैरेही त्यांच्यासोबत आले.

मुंबईच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या तेव्हाचा प्रसंग तर खूपच रंजक आहे. सिल्लेखाना वाॅर्डातून कुणीही उमेदवारी मागितली नव्हती. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी सहज विचारलं, ‘इथून कुणीच नाही का?,’ तेव्हा गांधीनगरचे इच्छुक सुग्रीव रिडलॉन म्हणाले, ‘साहेब मी लढतो दोन्ही वाॅर्डातून…’ त्यावर सर्वच हसायला लागले. त्यांना हेही माहिती नव्हतं की दोन्ही ठिकाणी जिंकल्यास एका ठिकाणचा राजीनामा द्यावाच लागतो. नंतर ते खासगीत म्हणाले,‘लढने को कोई नहीं है इसलिए बोला. वैसे भी कहा चून के आयेंगे…’

प्रचाराच्या धडाक्यामुळं शिवसेनेचं नाव आता घरोघरी पोहोचलं, पण वाॅर्ड मीटिंगपुरतं वातावरण तापायचं आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती. नंतर जाहीर झालं, आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा विचार’ ऐकण्यासाठी या सभेला येण्याचं आवाहन झालं. यामुळं वातावरण बदलायला लागलं. बाळासाहेबांची विक्रमी गर्दी खेचणारी सभा झाली. त्यांच्या कडव्या शब्दांनी सभा भारावली. त्या एका भाषणानं केवळ संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं.



Source link