Tuesday, September 15, 2026
HomeUncategorizedकोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नसंघटन विस्तार, निवडणूक आढावा,...

कोळकी विहार येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नसंघटन विस्तार, निवडणूक आढावा, संविधान संरक्षणाचा निर्धार व आगामी निवडणुकीची तयारी

फलटण : दिनांक 22 डिसेंबर 2025 (सोमवार) रोजी सकाळी 11.00 वाजता बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी, फलटण येथे
वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष सन्माननीय रामदास कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महावीर भालेराव व कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयुष्मान रामदास कांबळे साहेब यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सामाजिक न्याय, समता व संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरला. या बैठकीत गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उभारणे, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमधील कामगिरीचा सविस्तर आढावा, तसेच आगामी महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी येणाऱ्या काळात श्रद्धेय ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व ताकदीनिशी निवडणुका लढवून राजकीय सत्ता हस्तगत करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करणे याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाड्या-वस्त्या व गावागावांत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस रामदासजी कांबळे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व), सुभाष गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष), विजय लोंढे (उपाध्यक्ष), ॲड. तेजस मोरे (सचिव), निकाळजे सर, कांबळे सर, संदीपभाऊ काकडे (फलटण तालुका अध्यक्ष), अजित कांबळे, सुमित मोरे, उमेश कांबळे (फलटण शहर अध्यक्ष), युवराज भोसले (माण तालुका अध्यक्ष), चित्राताई गायकवाड (महिला जिल्हा उपाध्यक्ष) सचिव अरविंद आढाव, शाहू, फुले, आंबेडकर विद्वद्य विचारधारा चे अशोक भोसले, कांता काकडे, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे सचिव सुनिल कदम उपस्थिती होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments