Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 82

मी महापालिका बोलतेय…: बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं

0
मी महापालिका बोलतेय…:  बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं


  • Marathi News
  • Opinion
  • Balasaheb’s Mountain Voice Resonated And… The First Sambhajinagar Municipal Corporation Election Changed The Politics Of The Entire State.

संजय वरकड- साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो, मातांनो आणि भगिनींनो…’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहाडी आवाजातील हे शब्द मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खच्चून भरलेल्या मैदानात घुमले अन् टाळ्या, शिट्ट्यांनी वातावरण भारून गेलं…

ही आहे शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रवेशाची अन् शहराच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा पोत बदलून टाकणारी गोष्ट…

१९८८ मध्ये मनपा निवडणूक जाहीर झाली तेव्हा शहरातील तुरळक लोकांनाच शिवसेना हे नाव माहिती होतं. पक्षावर निवडणूक लढवण्याची वेळ अचानक आली. स्थानिक नेत्यांच्या मदतीसाठी मुंबईहून मधुकर सरपोतदार, विलास भानुशाली शहरात आले. त्यांनी वेगवेगळ्या भागात बैठकांना सुरुवात केली. बैठकांनाही फारसे लोक येत नसत. निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी वाॅर्ड सभा किंवा कॉर्नर मीटिंग घेतल्या. त्याचा थोडाफार फायदा होऊ लागला. प्रखर हिंदुत्व आणि मुस्लिमांना कडवा विरोध हे या प्रचाराचे सूत्र. मग काय, तरुण पोरं पाहता पाहता ‘जय महाराष्ट्र’ करू लागली. तिकीटवाटपाला सुरुवात झाली तेव्हा फारशी स्पर्धाही नव्हती. शिवसेनेचे तिकीट घेण्यास कुणी धजावत नव्हतं. तत्कालीन जिल्हाप्रमुख सुभाष पाटील, शहराध्यक्ष रमेश आमराव, परशुराम वाखुरे यांच्यासह मोजकेच पदाधिकारी शिवसेनेचे काम करत. सुरुवातीच्या काळातच चंद्रकांत खैरेही त्यांच्यासोबत आले.

मुंबईच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या तेव्हाचा प्रसंग तर खूपच रंजक आहे. सिल्लेखाना वाॅर्डातून कुणीही उमेदवारी मागितली नव्हती. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी सहज विचारलं, ‘इथून कुणीच नाही का?,’ तेव्हा गांधीनगरचे इच्छुक सुग्रीव रिडलॉन म्हणाले, ‘साहेब मी लढतो दोन्ही वाॅर्डातून…’ त्यावर सर्वच हसायला लागले. त्यांना हेही माहिती नव्हतं की दोन्ही ठिकाणी जिंकल्यास एका ठिकाणचा राजीनामा द्यावाच लागतो. नंतर ते खासगीत म्हणाले,‘लढने को कोई नहीं है इसलिए बोला. वैसे भी कहा चून के आयेंगे…’

प्रचाराच्या धडाक्यामुळं शिवसेनेचं नाव आता घरोघरी पोहोचलं, पण वाॅर्ड मीटिंगपुरतं वातावरण तापायचं आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती. नंतर जाहीर झालं, आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा विचार’ ऐकण्यासाठी या सभेला येण्याचं आवाहन झालं. यामुळं वातावरण बदलायला लागलं. बाळासाहेबांची विक्रमी गर्दी खेचणारी सभा झाली. त्यांच्या कडव्या शब्दांनी सभा भारावली. त्या एका भाषणानं केवळ संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं.



Source link

School Holidays: 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार शाळा, 25 डिसेंबरपासून सुरु होणार सुट्ट्या!

0
School Holidays: 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार शाळा, 25 डिसेंबरपासून सुरु होणार सुट्ट्या!


School Holidays: शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने शाळांना मोठ्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. 25 डिसंबर म्हणजे ख्रिसमसच्या दिवसापासून शाळा बंद होणार आहेत आणि त्या पुन्हा 5 जानेवारीनंतरच सुरू होतील. म्हणजे जवळपास 12 दिवसांच्या या सुट्ट्या मुलांना खूप मजा करण्याची संधी देणार आहेत. हा कालावधी थंडीच्या वातावरणात येत असल्याने घरात आराम करणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सव

या सुट्ट्या ख्रिसमसच्या सणापासून सुरू होत असल्याने मुलांना सांताक्लॉजची भेटवस्तू, केक, ख्रिसमस ट्री सजवणे अशा गोष्टींचा आनंद घेता येईल. त्यानंतर नवीन वर्षाची वाढदिवसाची पार्टी, फटाके, मित्रमैत्रिणींना भेटणे असे कार्यक्रम करता येतील. शाळा बंद असल्याने पालकांनाही मुलांसोबत जास्त वेळ घालवता येईल. हा काळ कुटुंबाला एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा असतो.

थंडीत आराम आणि मजा

डिसेंबर-जानेवारी हा थंडीचा मोसम असतो. सकाळी दाट धुके, थंडगार हवा यामुळे शाळेत जाणे कठीण जाते. त्यामुळे सरकारने किंवा शिक्षण विभागाने मुलांच्या आरोग्याचा विचार करून सुट्ट्या वाढवल्या आहेत. या काळात मुले घरात गरम कपडे घालून, चहा-कॉफी पिऊन, टीव्ही पाहून किंवा पुस्तके वाचून वेळ घालवू शकतात. काही मुले गावी आजी-आजोबांकडे जाऊन सुट्टी एन्जॉय करता येणार आहे.

पालकांसाठीची जबाबदारी 

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण थांबता कामा नये, असे पालकांनी लक्षात ठेवावे. सुट्टीत थोडाफार अभ्यास घेणे, नवीन गोष्टी शिकणे किंवा खेळणे याचा समतोल साधता येईल. पालकांना ही सुट्टी मुलांसोबत फिरायला जाण्याची, त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची चांगली संधी आहे. घरातूनच मुलांना नवीन कौशल्ये शिकवता येतील, जसे की स्वयंपाक, चित्रकला किंवा खेळ खेळता येणार आहे.

सुट्टी संपल्यानंतरची तयारी

5 जानेवारीनंतर शाळा सुरू होईल तेव्हा मुले उत्साहाने शाळेत परततील. या सुट्टीत आराम केल्याने त्यांचा अभ्यासातही नवा जोम येईल. पालकांनी मुलांना सुट्टी संपण्यापूर्वी अभ्यासाची सवय लावावी आणि नव्या वर्षातील शाळेच्या दिनचर्येसाठी तयार करावे. एकूणच या सुट्ट्या मुलांसाठी आनंदाची आणि पालकांसाठी कुटुंबाला जवळ आणणारी ठरणार आहेत. या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. तसेच शाळाकडूंन तुम्हाला सुट्ट्यांसंदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात येते. त्यामुळे शाळेच्या नोटीसकडे लक्ष देणे आवश्यक आहे.





Source link

भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

0



भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम



Source link

राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचे?

0


सातारा : राज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) घवघवीत यश मिळालं असून भाजपने 129 नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे 2 ते 5 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. मात्र, भाजपच्या (BJP) एका उमेदवाराने तब्बल 42 हजारांहून अधिक मताधिक्य घेतलं आहे. कागलमधील सविता माने ह्या राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. मात्र, साताऱ्यात (Satara) दोन्ही राजेंची ताकद मिळाल्याने सातारा नगरपालिकेतील भाजप उमेदवार अमोल मोहिते हे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. 

कोल्हापुरातील कागलमध्ये हसन मुश्रीफ अन् समरजीत घाटगे यांच्या शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांना 14,789 मतं मिळाली आहेत. तर, त्यांच्याविरोधातील शिवसेना उमेदवार युगेंधरा घाटगे यांना 7,199 मतं मिळाली आहेत. सविता माने यांना 7590 मताधिक्य मिळाल्याने त्या कदाचित दुसऱ्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवार आहेत. मात्र, भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी 42,032 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे.

नगराध्यक्षपदाचा नवा रेकॉर्ड

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव. त्यामुळे, सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिष्मा दिसून आला. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे मतदान झालं आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी यापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत 42 हजार 32 मतांनी विजयी मिळवला आहे. तर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळाले आहेत. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच विजयी झाले आहेत. 

फलटणमध्येही भाजपचे कमळ खुलले

साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध सर्वश्रूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिंदेसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उभे होते. मात्र, फलटण नगरपरिषदेमध्ये कमळ फुलले आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला धक्का बसला असून रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहे. 

वाईमध्ये सातारा 

वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी झाले आहेत. मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखडे विजयी झाल्या आहेत.

पाचगणी, सातारा

पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार पुरस्कृत ) उमेदवार दिलिप बगाडे दोन मतानी विजयी झाले आहेत.
फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवला आहे. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले आहेत.

मेढा नगरपंचायत भाजप उमेदवार विजयी 
रहिमतपूर नगरपरिषद भाजप उमेदवार विजयी
म्हसवड नगरपरिषद भाजप विजयी 
वाई नगरपरिषद भाजप विजयी 
मलकापूर नगरपरिषद भाजप विजयी..

आणखी वाचा



Source link

साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी

0


सातारा : राज्यातील मिनी विधानसभा असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या (Election) निकालात यंदा अनेक मनोरंजक घडामोडी घडल्या आहेत. त्यात, प्रत्येक निवडणूक लढवणाऱ्या अभिजीत बिचुकलेंच्या (Abhijit bichukale) मतांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बिचुकलेंनी कमाल केली असून 4 थ्या क्रमांकाचे मतं घेतली आहेत. तर, अपक्षांमध्ये 2772 मतांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत अपक्षांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आणि एकूण तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शरद काटकर यांना 3900 मतं मिळाली आहेत. 

विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना बारामती विधानसभा मतदारसंघात केवळ 68 मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली, तर त्याच विधानसभा निवडणुकीत ते सातारा-जावळी मतदारसंघातूनही निवडणुकीसाठी उभारले होते, तिथे अभिजीत बिचुकले यांना 529 मतं मिळाली होती. मात्र, आता बिचुकलेंनी विधानसभा निवडणुकांच्या मतांचा रेकॉर्ड मोडत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा विक्रम केला आहे. अभिजीत बिचुकले यांना नगराध्यक्षपदासाठी 2772 मतं मिळाली असून त्यांचे डिपॉजिटही जप्त झाले आहेत.  

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव. त्यामुळे, सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिष्मा दिसून आला. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना 57 हजार 587 एवढे मतदान झालं आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मतदान पडले. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी यापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत 42 हजार 32 मतांनी विजयी मिळवला आहे. तर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळाले आहेत. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. 

अभिजीत बिचुकलेंना 2772 मतं

कवी मनाचे नेते आणि अगदी राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे अभिजीत बिचुकले यांना 2 हजार 772 मते मिळाली आहेत. येथील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 54,815 मतांनी अभिजीत बिचकुले यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा

भाजपचा इतिहासातील सर्वांत मोठा विजय; निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, आकडेवारीच दिली

आणखी वाचा



Source link

साताऱ्यात राजेंना मोठा धक्का; फलटण नगरपरिषदेमध्ये फुललं कमळ, पाचगणी, महाबळेश्वरमध्ये दादांच्या

0


सातारा: साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध सर्वश्रूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता फलटण नगरपालिकेच्या (Satara Nagarpalika Election) निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिंदेसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उभे होते. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, फलटण नगरपरिषदेमध्ये कमळ फुलले आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला धक्का बसला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहे. (Satara Nagarpalika Election)

Satara Nagarpalika Election: वाई, सातारा 

वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी झाले आहेत. मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखडे विजयी झाल्या आहेत.

Satara Nagarpalika Election: पाचगणी, सातारा

पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार पुरस्कृत ) उमेदवार दिलिप बगाडे दोन मतानी विजयी झाले आहेत.
फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवला आहे. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले आहेत.

Satara Nagarpalika Election: साताऱ्यात भाजपचा गुलाल कुठे 

मेढा नगरपंचायत भाजप उमेदवार विजयी 
रहिमतपूर नगरपरिषद भाजप उमेदवार विजयी
म्हसवड नगरपरिषद भाजप विजयी 
वाई नगरपरिषद भाजप विजयी.. 
मलकापूर नगरपरिषद भाजप विजयी..

साताऱ्यात दोन्ही राजेंना धक्का बसला आहे. तीन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. असून एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. साताऱ्यात अपक्ष उमेदवारानं विजय मिळवलाय. प्रभाग क्रमांक ३ मध्ये मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांचा विजय झालाय. तर प्रभाक एक मध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना धक्का देत अपक्ष उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळलाय. प्रभाग एक मधून अपक्ष उमेदवार शंकर किर्दत विजयी झाले आहेत.

आणखी वाचा



Source link

कु.गौरी लक्ष्मण महानवर हीचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक

0
कु.गौरी लक्ष्मण महानवर हीचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक


बिजवडी : कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी कु. गौरी लक्ष्मण महानवर (इयत्ता सातवी ‘ब’) हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. गौरी हिने आपल्या विषयाची सखोल मांडणी, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व प्रभावी विचारांमुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
कु. गौरीच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासू वृत्ती तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सर्व स्कुल कमिटी सदस्य, जनरल बॉडी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच सर्व विद्यार्थी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. गौरीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही वक्तृत्व, अभिव्यक्ती आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची शिखरे गाठो, हीच विद्यालयाच्या वतीने सदिच्छा.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन

0


Shalinitai Patil Passes Away : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन (Shalinitai Patil passes away) झालं आहे. वृधापकाळाने त्यांच निधन झाल आहे. वयाच्या 94 व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्या माहिममधे राहत होत्या. राहत्या घरीच त्यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या

गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या. त्या मुंबईतील माहिन इथं राहत होत्या. तिथेच आज त्यांचं निध झालं आहे.त्यांच्यावर कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून दुख: व्यक्त केले जात आहे. 

शालिनाताई पाटील कोण होत्या ?

शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि चर्चेचा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1990 मध्ये जनता दलातून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते.

शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा.” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

महत्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: एक जीव वाचवणे संपूर्ण मानवता वाचवण्यासारखे

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  एक जीव वाचवणे संपूर्ण मानवता वाचवण्यासारखे


16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या रविवारी तो कबाब खात होता तेव्हाच गोळीबाराचा आवाज ऐकून लोक इकडे-तिकडे धावू लागले. तो कबाब तिथेच सोडून गोळ्यांच्या दिशेने धावला. ऑस्ट्रेलियातील बाँडी शूटिंगची घटना भयावह होती, परंतु या घटनेने सामान्य लोकांचे शौर्यही दाखवून दिले. यामध्ये एक होते पंजाबी-शीख, भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक अमनदीपसिंह बोला. त्यांनी पोलिसांच्या गोळीने जखमी झालेल्या एका शूटरला अडखळताना पाहिले आणि ते त्याच्यावर तुटून पडले. ऑस्ट्रेलियात पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या बोला यांनी हल्लेखोर साजिद अकरमची बंदूक लाथ मारून दूर फेकली. त्याला जमिनीवर दाबून धरले आणि हातांनी घट्ट पकडले, जेणेकरून तो दुसरे कोणतेही शस्त्र वापरू शकणार नाही. ३४ वर्षांचे बोला हे केवळ एक पादचारी होते. ते गोळीबाराच्या ठिकाणापासून बरेच दूर होते, तरीही ते तिथे गेले जिथे अज्ञात हल्लेखोर गोळ्या झाडत होते आणि जे काही करता येईल ते त्यांनी केले.

या ठिकाणापासून दूर, केवळ एक दिवसापूर्वी शनिवारी आणखी एका ३४ वर्षीय भारतीयाला वाचवणारे कुणीही नव्हते. विशेष म्हणजे, त्यांनी रस्त्यावर गाडी सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक लोकांची मदत केली होती. पेशाने मेकॅनिक असलेल्या या व्यक्तीच्या छातीत रात्री ३.३० वाजता तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांची पत्नी रूपा यांनी वेळ न घालवता त्यांना स्कूटरवरून जवळच्या रुग्णालयात नेले. तातडीने उपचार मिळतील अशी आशा होती, पण मदत मिळाली नाही. कोणताही डॉक्टर उपलब्ध नाही, असे सांगून त्यांना रुग्णालयातून परत पाठवण्यात आले. जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात ईसीजी केला असता त्यांची सर्वात मोठी भीती खरी ठरली- तिचे पती व्यंकटरमण यांच्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे होती. पुन्हा एकदा, ना कोणते आपत्कालीन उपचार मिळाले, ना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. त्यांना फक्त तिसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. घबराट वाढत होती, कोणतीही मदत दिसत नव्हती, अशा वेळी त्यांनी जे शक्य होते तेच केले. ते पुन्हा स्कूटरवर बसले आणि पुढच्या रुग्णालयाकडे निघाले. साधारण ४.२१ वाजता व्यंकटरमण यांनी पुन्हा छाती धरली. स्कूटर डगमगली आणि दोघेही रस्त्यावर पडले. दोघेही जखमी झाले. घाबरलेली रूपा सावरून पतीकडे धावली, जे श्वास घेण्यासाठी धडपडत होते. त्यानंतर त्या रात्रीचा कदाचित सर्वात क्रूर क्षण आला. रूपा हात हलवत, गयावया करत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांकडे थांबण्याची भीक मागत होती, जेणेकरून कुणीतरी थांबेल आणि तिच्या पतीला रुग्णालयात पोहोचवेल. पण एकामागून एक वाहने जात राहिली आणि कुणीही मदतीसाठी थांबले नाही. रस्त्यावर पडलेले व्यंकटरमण एकेका श्वासासाठी झुंज देत होते. एकेक मौल्यवान क्षण निघून जात होता. अखेर एक पादचारी त्यांच्याजवळ थांबला. लवकरच व्यंकटरमण यांची बहीणही तिथे पोहोचली आणि गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी सात मिनिटांनंतर एक कार थांबली. तोपर्यंत व्यंकटरमण बेशुद्ध झाले होते. बहिणीने सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, पण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशी निर्दयी घटना कुठे घडू शकते, असा विचार तुम्ही करत असाल? तर हे बंगळुरूमध्ये घडले. आपल्या देशातील लोक ऑस्ट्रेलियासारख्या दूरच्या देशात जीव वाचवू शकतात, पण डोळ्यांसमोर तडफडणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचवू शकले नाहीत. अशी घटना घडू शकते यावर तुमचा विश्वास बसत नाहीये? दुर्दैवाने हे सर्व- रूपाने केलेली मदतीची याचना, रस्त्यावर पडलेले तिचे पती आणि पादचाऱ्यांची अनास्था – जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ट्रॅफिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. व्यंकटरमण यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. नक्कीच, कुणाचे प्राण वाचवणे हे मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान मानले जाते. हे काम कधी तातडीने दाखवलेल्या शौर्यामुळे, कधी गरजवंताला वैद्यकीय सेवा दिल्यामुळे तर कधी परोपकारासारख्या कामांमुळे पूर्ण होते.

तुमच्या मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link

मिठी मारल्यावर शरीरात काय बदल होतात? कोणत्या अवयावात मोठा बदल जाणवतो, समजून घ्या

0
मिठी मारल्यावर शरीरात काय बदल होतात? कोणत्या अवयावात मोठा बदल जाणवतो, समजून घ्या


आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनला आहे. कामाचा ताण, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि भविष्याबद्दलच्या चिंता या सर्व गोष्टी मानसिक थकवा निर्माण करतात. अशा परिस्थितीत, आपण अनेकदा कठोर उपाय शोधतो. तथापि, एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत आपल्या बोटांच्या टोकावर आहे: आपल्या जोडीदाराला मिठी मारणे. हो, एक प्रामाणिक आणि प्रेमळ मिठी केवळ नातेसंबंध मजबूत करत नाही तर तणाव देखील कमी करते. आचार्य मनीष असेही मानतात की मिठी मारणे हृदय आणि मन दोघांसाठीही फायदेशीर आहे.

Add Zee News as a Preferred Source

मिठी मारल्याने काय होतं? 

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारता तेव्हा शरीर ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन सोडते, ज्याला प्रेम संप्रेरक असेही म्हणतात. हा हार्मोन तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल कमी करतो, ज्यामुळे मनाला शांती मिळते आणि तुम्हाला अधिक सुरक्षित आणि आरामदायी वाटते. कठीण दिवसानंतरची मिठी शब्दांशिवाय बरेच काही सांगते.

मानसिक आरोग्याशी काय संबंध? 

मिठी मारणे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. ते चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला मिठी मारतो तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे नाही आहात. या भावनिक आधारामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचारांवर मात करण्यास मदत होते.

नात्यात काय बदल होतो?

तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने नात्यातील जवळीक वाढते. ते प्रेम, आपलेपणा आणि समजूतदारपणा वाढवते. कधीकधी, जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा मिठी खूप काही बोलून जाते. नियमित मिठी मारल्याने परस्पर विश्वास वाढतो आणि किरकोळ गैरसमज देखील दूर होण्यास मदत होते.

शरीरात काय बदल होतात?

संशोधनातून असे दिसून आले आहे की मिठी मारल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. शिवाय, वाढलेली विश्रांती झोपेची गुणवत्ता सुधारते.

मिठी किती काळ असावी?

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की किमान 20 सेकंदांची मिठी मारणे सर्वात फायदेशीर आहे. कामावर जाण्यापूर्वी किंवा दिवसाच्या शेवटी ही सवय लावा. हे छोटे पाऊल तुमच्या जीवनशैलीत आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल आणू शकते.





Source link