Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 83

रोज 10 किमी चालणं आणि जास्त वेळ उभं राहणं, जास्त फायदा कशात आहे?

0
रोज 10 किमी चालणं आणि जास्त वेळ उभं राहणं, जास्त फायदा कशात आहे?


आजच्या धावपळीच्या जीवनात, चालणे, उभे राहणे आणि ताणतणाव हे आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनले आहेत. लोक तंदुरुस्त राहण्यासाठी तासनतास चालतात आणि कामासाठी बराच वेळ उभे राहणे आवश्यक असते. आपण अनेकदा असे गृहीत धरतो की आपण जितके जास्त चालतो तितके चांगले, परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. जास्त चालणे, जास्त वेळ उभे राहणे आणि सतत ताणतणाव शरीराला हळूहळू हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच या सवयींचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Add Zee News as a Preferred Source

जास्त वेळ उभे राहण्याचे काय परिणाम होतात?

जास्त वेळ उभे राहिल्याने पायांना सूज, पाठदुखी आणि नसा ताणल्या जाऊ शकतात. याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि थकवा येतो. अनेकांना त्यांच्या पायांमध्ये मुंग्या येणे देखील जाणवते.

जास्त चालण्यामुळे कोणते आजार होतात? 

जास्त चालण्यामुळे प्रथम पाय आणि गुडघ्यांवर परिणाम होतो. जास्त वेळ चालल्याने गुडघेदुखी, टाचांना सूज येणे आणि स्नायूंचा ताण येऊ शकतो. अनेकांना प्लांटार फॅसिटायटिस सारख्या समस्या येतात, ज्यामुळे टाचेखाली तीव्र वेदना होतात. जर शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर सांध्यांची जळजळ देखील वाढू शकते.

जास्त चालण्याचे तोटे काय आहेत?

जास्त चालण्यामुळे शरीर थकव्यापासून बरे होऊ शकत नाही. यामुळे पाय जड आणि कडक होऊ शकतात आणि कधीकधी पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते. शरीर सतत जास्त काम करत असल्याने काही लोकांना झोपेच्या समस्या देखील वाढतात.

चालण्याने कोणते आजार बरे होतात? 

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने चालल्यास अनेक फायदे होतात. दररोज हलके ते मध्यम चालणे वजन नियंत्रित करण्यास, रक्तदाब संतुलित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित चालणे देखील फायदेशीर मानले जाते.

जास्त ताणामुळे कोणते आजार होतात? 

सतत ताणामुळे डोकेदुखी, निद्रानाश, आम्लता आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त ताणामुळे दीर्घकाळात हृदयरोग आणि नैराश्य देखील येऊ शकते.





Source link

चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक; कसा होतो परिणाम? ऐकून बसेल धक्का!

0
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक; कसा होतो परिणाम? ऐकून बसेल धक्का!


Tea Biscuit Combination: सकाळी उठल्या-उठल्या बहुतांश लोकांना चहा लागतो. जोपर्यंत चहा पीत नाहीत तोपर्यंत अनेकांचा दिवस सुरु होत नाही.काहीजण तर मोठा कप भरुन चहा पितात. सोबत बिस्किटाचा भलामोठा पुडाही फस्त करतात. सकाळी चहा-बिस्कीट हे कॉम्बिनेशन ठरलेलंच असतं. यावर कडी म्हणजे काहीजण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तीन वेळा चहात बिस्कीट बुडवून खातात. तुम्हाला चहात बुडवून बिस्कीट खाण्यात काही गैर वाटत नसेल. पण चहात बिस्कीटं बुडवून खाणं आरोग्याला हितकारक नसल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. 

Add Zee News as a Preferred Source

भारतात सकाळ-संध्याकाळ चहासोबत बिस्किटे बुडवून खाणे ही अनेकांची आवडती सवय आहे. ही जोडी खूपच लोकप्रिय असली तरी आरोग्य तज्ज्ञांच्या मते ती धोकादायक ठरू शकते. बिस्किटांमध्ये रिफाइंड मैदा, जास्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. चहासोबत खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. याशिवाय पचन बिघडते, बद्धकोष्ठता येते आणि दात खराब होतात. रिकाम्या पोटी ही सवय आणखी हानिकारक ठरते. 

चहा आणि बिस्कीट एकत्र खाण्याचे परिणाम

चहा हा स्वतःच कॅफिनयुक्त असतो,त्यासोबत साखरयुक्त बिस्कीट खाल्ल्यास शरीरात साखरेची पातळी वाढते. थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. तसंच चहातील टॅनिन घटक आणि बिस्कीटातील प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा एकत्रित परिणाम पचनावर होतो. बिस्किटांमध्ये जास्त कॅलरी, मैदा आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे चरबी वाढते आणि वजन वाढते. रिफाइंड पीठ आणि फायबरच्या कमतरतेमुळे गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या उद्भवते. काही बिस्किटांमध्ये पाम ऑइल वापरलं जातं सोडियममुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

सकाळी उठल्या-उठल्या तुम्हीही चहामध्ये बिस्किट बुडवून खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अती धोकादायक ठरू शकतं, सकाळी-सकाळी तुम्ही आजारांना निमंत्रण देतात, त्यामुळे चहासोबत बिस्किट खाणं टाळून त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकतात.

फक्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटी होऊ शकते, त्यामुळे चहासोबत काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र, चहासोबत बिस्कीट खाणं हे शरिरासाठी अपायकारक आहे, त्यामुळे तुम्ही चहासोबत बिस्कीट न खाता हेल्दी स्नॅक खाऊ शकतात, जेणेकरून तुमच्या शरीरावर याचा परिणाम होणार नाही, आणि तुमचं आरोग्य तुम्ही निरोगी ठेवू शकतातबिस्किटांऐवजी बदाम, फळे किंवा होल ग्रेन स्नॅक्स घ्या. ही सवय बदलल्यास आरोग्य चांगले राहील, असे . तज्ज्ञ सुचवतात.





Source link

NPS Rule Change: खासगी कर्मचाऱ्यांकडे येणार मोठी रक्कम; NPS नियमांमध्ये झालाय मोठा बदल!

0
NPS Rule Change: खासगी कर्मचाऱ्यांकडे येणार मोठी रक्कम; NPS नियमांमध्ये झालाय मोठा बदल!


NPS Rule Change: निवृत्तीनंतर सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स देणारी योजना शोधत असाल तर एनपीएस हा चांगला पर्याय मानला जातो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एनपीएस आपल्या योजनेत वेळोवेळी बदल करत असते. असाच एक मोठा बदल एनपीएसकडून करण्यात आलाय. ज्याचा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) महत्त्वाचे बदल झाले आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजेच PFRDA ने हे बदल केले असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पैशांची सोय अधिक सुलभ झाली आहे. आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा रकमेतून मोठा भाग एकरकमी काढता येईल. हे नियम मुख्यतः खासगी क्षेत्र आणि सर्व नागरिक मॉडेल अंतर्गत येणाऱ्या सदस्यांना लागू आहेत.

एकरकमी रक्कम काढण्याची मर्यादा 

आता निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 80 टक्के भाग एकरकमी काढता येईल. फक्त 20 टक्के भाग अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावा लागेल, ज्यामुळे दरमहा पेन्शन मिळेल. पूर्वी ही मर्यादा 60 टक्के एकरकमी आणि 40 टक्के अॅन्युइटी होती. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात निवृत्तीनंतर अधिक रोख रक्कम येते. जी वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. असे असले तरी अॅन्युइटीचा भाग कायम ठेवल्याने भविष्यात नियमित महिन्याची पेन्शन सुरू राहते.

कमी रकमेसाठी 

जर NPS खात्यात जमा रक्कम 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर पूर्ण रक्कम एकरकमी काढता येईल. यात वार्षिकी खरेदी बंधनकारक नाही. 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या रकमेसाठी कमाल 6 लाख रुपये एकरकमी काढता येतील, तर उर्वरित भाग वार्षिकी किंवा 6 वर्षांत हळूहळू काढता येईल. 12 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी 80-20 चा नियम लागू होईल. छोट्या बचती असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांना यामध्ये अॅन्यूटीची सक्ती नसेल.

लॉक-इन कालावधी

पूर्वी खासगी क्षेत्रातील सदस्यांना खाते उघडल्यापासून किमान 5 वर्षे थांबावे लागत होते. आता हा लॉक-इन कालावधी पूर्णपणे काढून टाकला आहे. यामुळे गरज पडल्यास आधीच पैशांची सोय करता येते. ही सुट खासगी क्षेत्र आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आहे; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुने नियम कायम आहेत.

फायदे काय?

या बदलामुळे NPS  अधिक आकर्षक बनणार आहे. निवृत्तीनंतर मोठी रक्कम हातात येईल, तसेच अॅन्यूटीमुळे नियमित उत्पन्नाची हमी आणि दोन्हींचा समतोल साधण्यात आला आहे. खासगी नोकरीत वारंवार बदल होत असल्याने ही लवचिकता कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच परदेशात स्थायिक होऊन भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना पूर्ण रक्कम एकरकमी काढता येणार आहे.

नियम कधीपासून?

हे नियम मुख्यतः खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट NPS आणि सर्व नागरिक मॉडेलमधील सदस्यांना लागू आहेत. डिसेंबर 2025 मध्ये अधिसूचित झालेले हे बदल त्वरित लागू करण्यात आले आहेत. NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आपल्या खात्याची माहिती नियमित तपासावी असा सल्ला देण्यात आलाय.





Source link

सावरी ड्रग्ज प्रकरण! एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करा, ठाकरेंच्या खासदाराची अमित शाहंकडे मागणी

0


Arvand Sawant : सातारा (Satara) जिल्ह्यातील सावरी गावात असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे भाऊ प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvand Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहलं आहे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे. संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. 

 चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन बाजूला करावे, अरविंद सावंतांची मागणी

धरणाजवळ असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी व्हावी. तसेच चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन बाजूला करावे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. या प्रकरणाकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहाल आणि न्याय व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई कराल, असा विश्वास असल्याचा उल्लेख अरविंद सावंत यांनी पत्रात केला आहे.  

अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला? 

दरम्यान, या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला? इतक्या मोठ्या प्रमाणावरील अमली पदार्थांची हालचाल असताना सातारा पोलीस यंत्रणेला याची माहिती कशी नव्हती? जर माहिती होती, तर राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का? असे सवाल या पत्रात अरविंद सावंत यांनी उपस्थित केले आहेत. 

पत्रात नेमके काय म्हटले आहे?

सातारा जिल्ह्यातील सावरि गावात छापा टाकण्यात आला, जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे 45 किलो एमडी अमली पदार्थ (अंदाजे 145 कोटी किमतीचे) जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. ही बाब आणखी गंभीर ठरते कारण हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या 1200 मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून, अशा प्रवेशमार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. तसेच संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठ्या जलसाठ्याच्या ठराविक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सखोल तपासणीस पात्र आहे असा उल्लेख अरविंद सावंत यांनी पत्रात केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde Drugs: एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टपासून जवळच 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा



Source link

सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण, म्हणाले, ‘मी पोलिसांचं अभि

0


Devendra Fadnavis on Satara drugs case: साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. याप्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Satara Drugs Case)

साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भातही मोघम भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा, अटक वॉरंट याबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही.

Sushma Andhare: मुख्यमंत्र्यांनी स्वत: न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करु नये, सुषमा अंधारेंचा पलटवार

माननीय मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते, त्यांनी असा खोटा कळवळा दाखवू नये. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी किती कळवळा आहे, त्यांना संपवण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत, हे सांगायला त्यांनी मला भाग पाडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना संविधानाचा आदर आहे की नाही, हे सांगावे. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे, कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्या ठायी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करु नये. तुम्ही न्यायाधीश असाल तर सगळी न्यायालयं बंद करा आणि तुमच्या कार्यालयाबाहेर पाटी लावून ठेवा, इथे क्लीन चिट मिळतील. एकनाथ शिंदेंचा याप्रकरणात संबंध आहे, असे माझे म्हणणे नाही. मी प्रकाश शिंदे यांच्याबद्दल बोलते. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो. प्रकाश शिंदे तपास प्रभावित करु शकतात. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून लांब राहावे, ही माझी मागणी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.  

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टपासून जवळच 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: सनस्क्रीन लावण्यापूर्वी हे समजून घ्या

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  सनस्क्रीन लावण्यापूर्वी हे समजून घ्या


काही सेकंदांपूर्वी

  • कॉपी लिंक

जयपूरमधील एका मोकळ्या मैदानात गुरुवारी २० ते ४० वयोगटातील तरुण कडक उन्हापासून बचावासाठी सावली शोधत होते. डिसेंबरमध्ये असा सूर्यप्रकाश असामान्य होता. अमेरिकेत राहणारे भारतीय सोनल माथूर आणि सागर अग्रवाल यांच्या लग्नात ते पाहुणे होते आणि उष्णतेमुळे अस्वस्थ होते. ते त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेत होते. त्यावरून मला जाणवले की केवळ लग्न किंवा विशेष प्रसंगापुरती त्वचेची काळजी घ्यायला हवी असे मानणारे ते भारतीय नसल्याचे मला वाटले. ते त्यांच्या आई किंवा पत्नींकडून उत्पादने उधार घेण्यावरही विश्वास ठेवत नव्हते. ते आमच्या पिढीपेक्षा वेगळे होते. आमची पिढी साबण आणि शेव्हिंग क्रीमपुरती मर्यादित होती. ही नवीन पिढी क्लिंझर्स, सनस्क्रीन, सीरम आणि टार्गेटेड ट्रीटमेंटचा वापर करते. रुपेरी पडद्यावरील हीरोप्रमाणे त्वचेचा रंग कसा ठेवावा हे त्यांना चांगले ठाऊक आहे.

त्यांच्यामुळे मला सुमारे ८० वर्षांपूर्वीची कहाणी आठवली. एका तरुणीने पियानो वाजवण्याची तयारी केली. स्वयंघोषित टॉमबॉय तिच्या आईने तिच्या चेहऱ्यावर क्रीम, ब्लश आणि पावडर लावले. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिचे संपूर्ण रूप बदलले होते. सौंदर्यप्रसाधनांच्या परिवर्तनीय शक्तीचा त्यांनी प्रथम अनुभव घेतला. त्यामुळे त्यांना सौंदर्यात आयुष्यभर रस निर्माण झाला. ती मुलगी सिमोन टाटा (नी डुनाेयर) होती. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे वाढलेल्या सिमोनचे १९५५ मध्ये नवल टाटाशी लग्न झाले. नंतर ती लॅक्मे कंपनीची प्रेरक शक्ती बनली. पंतप्रधान नेहरूंच्या आग्रहावरून सुरू झालेली लॅक्मे ही टाटांची कंपनी होती. नेहरूंनी पाहिले की भारतीय महिला आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांवर जास्त अवलंबून होत्या. त्यामुळे परकीय चलन कमी होत होते. या उत्पादनाचे नाव फ्रेंच ऑपेरा लॅक्मेवरून घेतले गेले. भारतातील प्रत्येक घरात लॅक्मे आणणाऱ्या सिमोन टाटा यांचे गेल्या महिन्यात वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.

सिमोनचे मार्केटिंग प्रयत्न आता भारतीय पुरुषांच्या स्किन केअरला अपग्रेड करत आहेत. लग्नात कडक उन्हापासून त्यांच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी सावली शोधणारे तरुण हे मान्य करतात की केवळ केसगळतीसाठी किंवा लग्नासारख्या विशेष प्रसंगी स्किन क्लिनिकमध्ये जाण्याचा काळ संपला आहे. ते म्हणाले, आता तरुणांना कॉलेज सोडताच स्किन केअर, मुरुमांवरील उपचार, पिगमेंटेशन सोल्युशन्स आणि सनस्क्रीनबद्दल चौकशी करताना पाहिले जाऊ शकते. या वृत्तपत्रात व्यवसाय संपादक म्हणून मी पाहिले आहे की या बदलामुळे या क्षेत्रात गुंतवणूकदारांची आवड वाढत आहे. त्यामुळे मोठ्या एफएमसीजी कंपन्यांकडून खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे. या तरुणांकडून मी सनस्क्रीनबद्दल काही गोष्टी शिकलो. या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

१. ऋतू कोणताही असो. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. २. सनस्क्रीन कालबाह्य होते. ते तीन वर्षांपर्यंत वापरले जाऊ शकते. ३. बाहेर काढताना सनस्क्रीन सावलीत ठेवा किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा. ४. तुम्ही जास्त काळ बाहेर राहण्याची योजना आखत असाल तर एसपीएफ ३० किंवा त्याहून अधिक असलेले वापरा. ५. सामान्यपणे दर दोन तासांनी ते पुन्हा लावावे. तुम्ही वॉटरप्रूफ किंवा वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीन वापरत असलात तरी पोहल्यानंतर किंवा जास्त घाम आल्यानंतर ते पुन्हा लावा.

कल्पना करा. आपल्याला पुरुषांकडून अशा टिप्स मिळत आहेत. आपण पाहत असलेला बदल केवळ पुरुषांच्या मानसिकतेत नाही तर परिणामकारकता, रसायनशास्त्र आणि शिक्षणावर सखोल लक्ष केंद्रित करण्यातदेखील आहे. कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही अशा वर्तनाची सुरुवातीची चिन्हे दिसत आहेत यात आश्चर्य नाही. पुरुष आता गेल्या वर्षीपेक्षा जवळपास १००% जास्त सौंदर्य उत्पादने खरेदी करत आहेत.

तुमच्या मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link

अचानक भूक लागणं बंद झालं, डॉक्टरांना तपासात सापडलं धक्कादायक कारण; समोर आलेलं कारण तुम्हालाही थक्क करेल

0
अचानक भूक लागणं बंद झालं, डॉक्टरांना तपासात सापडलं धक्कादायक कारण; समोर आलेलं कारण तुम्हालाही थक्क करेल


युकेमधील ट्यूनब्रिज वेल्समध्ये राहणारी 58 वर्षीय महिला अ‍ॅनी डी’अथ एक सामान्य, निरोगी जीवन जगत होती. जानेवारीमध्ये एके दिवशी तिला जाणवले की तिला भूक लागत नाही. वजन कमी करण्याचे प्रयत्न नव्हता तरी देखील शरीरात हा बदल का होतोय? असा प्रश्न या महिलेला पडला. अचानक भूक न लागणे ही समस्या वाढू लागली. अ‍ॅनीने हे तणावामुळे होत असल्याचा समज केला. आपल्यापैकी बरेच जण असंच करतात. पण जेव्हा आठवडे परिस्थिती सुधारली नाही, तेव्हा तिच्या मुलीने डॉक्टरांना भेटण्याचा आग्रह धरला. हा निर्णय तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Add Zee News as a Preferred Source

अल्ट्रासाऊंडमध्ये भयानक सत्य उघड 

फेब्रुवारीमध्ये, डॉक्टरांनी अ‍ॅनीला अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला. अहवालाने सर्वांना धक्का दिला. अ‍ॅनीच्या स्वादुपिंडात एक गाठ आढळली. पुढील तपासणीत असे दिसून आले की ते स्वादुपिंडाचा कर्करोग आहे – एक कर्करोग जो अनेकदा उशिरा आढळतो. अ‍ॅनीच्या मते, “मला असे वाटले की माझे जग संपले आहे. मी आयुष्यभर निरोगी आहे, आजारपणामुळे कधीही एकही दिवस सुट्टी घेतली नाही.”

वेदनादायक केमोथेरपी प्रवास

मार्चमध्ये अनेक स्कॅन आणि एंडोस्कोपीनंतर, डॉक्टरांनी ताबडतोब केमोथेरपी सुरू केली. तिच्या छातीत पोर्ट-ए-कॅथ घालण्यात आला, ज्यावर औषधे दिली गेली. तिला दर आठवड्याला दिवसभर रुग्णालयात राहावे लागले. अ‍ॅनी म्हणते की हा कालावधी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया ही एकमेव संधी आहे; अन्यथा, हा रोग फक्त नियंत्रणात ठेवता येतो.

परदेशात आशा वाढली 

ट्यूमरचे गुंतागुंतीचे स्वरूप पाहता, ब्रिटिश डॉक्टरांनी शस्त्रक्रिया खूप धोकादायक मानली आणि ती प्रश्नच सोडून दिली. ही बातमी अ‍ॅनी आणि तिच्या कुटुंबासाठी धक्कादायक होती, परंतु आशा गमावली नाही. लिस्बनमधील बोटन-चॅम्पलिमॉड पॅनक्रियाटिक कॅन्सर सेंटरमधील प्रसिद्ध सर्जन प्रोफेसर मार्कस बुचलर यांच्याशी झालेल्या सल्ल्याने एक नवीन मार्ग उघडला. व्हिडिओ कॉलद्वारे, डॉक्टरांनी पुष्टी केली की योग्य केमोथेरपीनंतर शस्त्रक्रिया शक्य आहे.

महागडी शस्त्रक्रिया आता शेवटचा उपाय

डॉक्टरांच्या मते, ट्यूमर मार्कर एका विशिष्ट पातळीपर्यंत खाली येताच, अ‍ॅनीला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी लिस्बनला नेले पाहिजे. समस्या अशी आहे की संपूर्ण उपचार अत्यंत महाग आहेत. अ‍ॅनी ज्या शाळेत १५ वर्षांपासून अध्यापन सहाय्यक म्हणून काम करत आहे, तिथे तिच्या सहकाऱ्यांनी निधी संकलन मोहीम सुरू केली आहे. उपचार, शस्त्रक्रिया आणि प्रवास खर्चासाठी २५,००० पौंड उभारण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यापैकी १७,५०० पौंड आतापर्यंत उभारले गेले आहेत.

अचानक भूक न लागणे 

ही गोष्ट फक्त एका महिलेबद्दल नाही, तर हजारो लोकांबद्दल आहे जे भूक न लागणे, थकवा किंवा सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. स्वादुपिंडाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये, सुरुवातीची लक्षणे जीवनरक्षक सिद्ध होऊ शकतात. अ‍ॅनी डी’अथची कथा आपल्याला शिकवते की शरीरात होणारे छोटे बदल देखील गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. वेळेवर निदान, योग्य माहिती आणि आशा – या तीन गोष्टी जीव वाचवू शकतात. भूक न लागणे क्षुल्लक वाटू शकते, परंतु कधीकधी ते जीवन आणि मृत्यूमधील फरक दर्शवू शकते.





Source link

लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय, खबरदार

0
लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय, खबरदार


महेश बागल झी २४ तास मुंबई : पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांच्या हाती जेवताना मोबाईल देत असाल तर सावधान. जेवताना मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानं त्यांच्यात लठ्ठपणाची लक्षणं आढळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढंच नाहीतर सतत रिल्स पाहणा-या मुलांना मानसिक आजार जडल्याच्याही घटना समोर आल्यात. त्यामुळं मुलांच्या हाती मोबाईल देऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांच्या सापळ्यात अडकवू नका.

Add Zee News as a Preferred Source

जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देणारे पालक तुम्ही नेहमी पाहत असाल. जेवताना तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देत असाल तर पालकांनो तुम्ही मुलांचं भवितव्य धोक्यात टाकताय… कारण लहान मुलांच्या हाती जेवताना मोबाईल दिल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम मुलांच्या शरिरावर होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. पहिली आणि मोठी गंभीर समस्या म्हणजे मोबाईल पाहत जेवणारी मुलं लठ्ठ होत असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे .

मोबाईलमुळे काय होते?

मुलांना जेवणाचा आनंद घेता येत नाही
डोळे, नाक, जीभ या इंद्रियांना जेवणाचा स्वाद मिळत नाही
जबरदस्तीनं काहीतरी खाल्ल्यासारखं होतं
जेवणाची परिपूर्ण अनुभूती मुलांना मिळत नाही

मोबाईल पाहत असताना जेवताना मुलांना आपण काय खातो याची कल्पना नसते. शिवाय जेवढी भूक आहे त्या पेक्षा जास्त अन्न पोटात जातं. काही मुलं तर मोबाईल पाहायला मिळतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त जेवतात. साहजिकच त्याचे गंभीर परिणाम मुलांमध्ये पाहायला मिळतात.

मुलांना साखर देण्याचं प्रमाणही वाढलंय. गोड पदार्थ देणं मुलांना टाळाच. शिवाय चॉकलेटही देणं टाळलेलं बरं असं डॉक्टर सांगतात. मुलांच्या आहारात साखर असावी पण ती फळांच्या रुपात असावी, खजुराच्या रुपात असावी असंही तज्ज्ञ सांगतात.. मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण वाढल्यास त्याचे साईड इफेक्ट भयंकर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

लहान मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडंही लक्ष द्या. लहान मुलांना रिल्सच्या नादाला लावून पालक त्यांना भयानक मानसिक स्थितीत लोटत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात… लहान मुलं रिल्सच्या माध्यमातून मुलांना अभासी जगात लोटतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. वेळप्रसंगी मुलं मानसिक रोगाच्या विळख्यातही सापडण्याची शक्यता असते.

 पालकांनीच आता मुलांच्या मोबाईलमुक्तीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. एक चळवळ उभी केली पाहिजे. एका पालकानं दुस-या पालकाचं प्रबोधन केलं पाहिजे.

कटाक्षाने टाळाल 

लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका
मुलांना रिल्स पाहू देऊ नका
रिल्स अभासी असतात हे त्यांना पटवून सांगा
जेवणातल्या पदार्थांच्या रस,गंधाची जाणीव करुन द्या

मुलाच्या हाती मोबाईल दिला म्हणजे हुश्श सुटलो बुवा… असं अनेक पालकांना वाटतं…मुलांची किरकिर नको म्हणून पालक मोबाईल देतात. तुम्हाला एका क्षणाचा निवांतपणा मिळत असला तरी तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देऊन तुमच्या भावी पिढीशी खेळताय. त्य़ामुळं राहा खबरदार.





Source link

बीडमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख कोणी केलं? ज्योती वाघमार

0


Susham Andhare Vs Jyoti Waghmare: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्जचा साठा सापडल्याचा सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांचा आरोप धादांत खोटा आहे. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांनी हे रिसॉर्ट आपण भाड्याने चालवायला दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बदनाम करण्यासाठी सुषमा अंधारे या चिखलफेक करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला भीक घालणार नाही. ‘बदनामी करने का हक है तुम्हे, क्योकि बराबरी करने की औकाद नही है तुम्हारी’, एवढेच मला सांगायचे आहे. एकनाथ शिंदे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहून तुमच्या पोटात दुखत आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली. त्या गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)

यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले. बीडचा ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे आणि सुषमा अंधारे यांच्यात काय संबंध आहेत, याचे स्पष्टीकरण आपण द्यावे. रत्नाकर शिंदे याच्या कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला, त्यामध्ये मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. सुषमा अंधारे यांच्या पुढाकाराने रत्नाकर शिंदे याचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता. त्याच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही तो जामिनावर बाहेर आला. तेव्हा कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हाप्रमुख करण्यासाठी कोणी शिफारस केली होती, याचे उत्तर सुषमा अंधारे यांनी द्यावे, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले. 

अंजली दमानिया यांनी कला केंद्रावर टाकण्या आलेल्या पोलीस छाप्याबाबतचा एक स्क्रीनशॉट मध्यंतरी शेअर केला होता. त्यामध्ये असलेल्या आरोपींची नावे ही सत्वशीला बाबासाहेब अंधारे, आदित्य अंधारे, मयूर अंधारे अशी होती. या सगळ्यांच सुषमा अंधारे यांच्याशी काय कनेक्शन आहे? बीडच्या या कला केंद्रात नाचणाऱ्या अनेक मुलींची आडनावं अंधारे आहेत. त्यामुळे या कला केंद्राच्या छमछमशी तुमचा काय संबंध आहे? तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे रत्नाकर शिंदेची शिफारस का करता, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी विचारला.

Sushma Andhare news: ज्योती वाघमारेंकडून सुषमा अंधारेंचा शूर्पणखा म्हणून उल्लेख, वाद पेटणार?

ज्योती वाघमारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, कालपासून एका शूर्पणखेने जो गोंधळ माजवला आहे. रामायणातही राम आणि लक्ष्मणावर शूर्पणखेने खोटे आरोप केले. त्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी कॅमेऱ्याचा फोकस स्वत:वर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर धादांत खोटे आरोप केले आहेत. शाकाहारी लोक भाजीपाल्यावर जगतात, मांसाहारी लोक इतर काही खातात पण कॅमेराजीवी लोकांना दोन-तीन दिवस कॅमेऱ्यावर ते दिसले नाही की, ते काहीतरी फालतू आरोप करतात. सुषमा अंधारे यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले आहेत. 

धाड सावरी गावात पडली, पत्रा शेडमध्ये ड्रग्ज सापडले. तिकडे रिसॉर्ट आहे, रिसॉर्टचा आणि पत्रा शेडचा संबंध नाही. ती जागा गोविंद शिरकर यांच्या मालकीची होती, ओंकार डिगे याठिकाणी काम करत होता. ड्रग्ज पत्रा शेडमध्ये सापडले होते. रिसॉर्ट आणि पत्रा शेडचा संबंध नाही, हे सुषमा अंधारे यांनीच सांगितले होते, याकडे ज्योती वाघमारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले, म्हणाल्या, ते हॉटेल… 

आणखी वाचा



Source link

हादरवणारा Video; देवदर्शनाला निघालेल्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; थेट दरीत कोसळली… तिघे जागीच ठार

0
हादरवणारा Video; देवदर्शनाला निघालेल्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; थेट दरीत कोसळली… तिघे जागीच ठार


Kainchi Dham mahindra scorpio Road Accident : पर्यटन आणि देवदर्शनाच्या निमित्तानं सध्या अनेक मंडळी विविध राज्यांमध्ये, गिरीस्थानांवर आणि देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्रांच्या दिशेनं रवाना होत आहेत. अशाच एका अनेकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तीर्थस्थळी निघालेल्या भाविकांना वाटेतच मृत्यूनं गाठल्याचं मन विचलित करणारं वृत्त नुकतंच समोर आलं. ज्यामध्ये रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू ओढावला.

Add Zee News as a Preferred Source

कुठं घडला हा भीषण अपघात? 

उत्तराखंडमधील प्रसिद्ध अशा कैंची धामच्या दिशेनं निघालं असता बुधवार (18 डिसेंबर 2025) भाविकांच्या वाहनाचा भयावह अपघात झाला. पिलीभीत इथून कैंची धामसाठी रवाना झालेल्या या भाविकांच्या कारचा अल्मोडा- भवाली राष्ट्रीय महामार्गावरील निगलाट इथं भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्यानंतर कार थेट खोल दरीत कोसळली आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक स्वरुपात समोर आली. 

अपघाताचा घटनाक्रम धडकी भरवणारा… 

बरेली येथील पिलीभीत क्षेत्रातून काही भाविक महिंद्रा स्कॉर्पिओ या कारनं कैंची धामच्या दर्शनासाठी निघाले होते. पण, भवाली–अल्मोड़ा राष्ट्रीय महामार्गावर निगलाट इथं एकाएकी वाहनचालकानं वाहनावरील नियंत्रण गमावलं आणि त्यामुळं कार रस्त्यावरून थेट दरीत कोसळली. ही दरी अतिशय खोल असल्यामुळं कार अचतिप्रचंड वेगानं खालच्या दिशेनं कोसळली. आदळत गेल्यामुळं तिचा चुराडा झाला. ज्यामध्ये स्कॉर्पिओतील सर्व प्रवासी गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ज्यानंतर तातडीनं पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं दरीत कोसळलेली कार आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढलं. ज्यानंतर प्रथमोपचारासाठी जखमींना भवाली येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

पोलिसांच्या माहितीनुसार एकूण 8 जण या कारनं प्रवास करत होते. ज्यामध्ये ऋषी पटेल (7) पुत्र राहुल पटेल निवासी बरेली एयरपोर्ट, एयरफोर्स पीलीभीत रोड इज्जतनगर, स्वाती (20) पुत्री भूपराम, अक्षय (20) पुत्र चंदन सिंह पटेल, ज्योती (25), करण (25), जितेंद्र आणि राहुल पटेल (35) गंगा देवी (56), बृजेश कुमारी (26), राहुल पटेल आणि नँन्सी गंगवार (24) अशी प्रवाशांची नावं समोर आली आहेत. 

अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की रुग्णालयात पोहोचण्याआधीच घटनास्थळी गंगा देवी, नँन्सी गंगवार आणि बृजेश कुमारी यांचा मृत्यू ओढावला होता. तर, उर्वरित पाच प्रवाशांना प्रथमोपचारानंतर हल्द्वानी येथील अद्ययावत रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळं पुन्हा एकदा पर्वतीय भागांमध्ये वळणवाटांवरून प्रवास करत असताना सर्व सुरक्षेची तरतूद करत सावधगिरीनंच प्रवास करण्याचा सल्ला यंत्रणांनी दिला. 





Source link