Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशNPS Rule Change: खासगी कर्मचाऱ्यांकडे येणार मोठी रक्कम; NPS नियमांमध्ये झालाय मोठा...

NPS Rule Change: खासगी कर्मचाऱ्यांकडे येणार मोठी रक्कम; NPS नियमांमध्ये झालाय मोठा बदल!

[ad_1]

NPS Rule Change: निवृत्तीनंतर सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स देणारी योजना शोधत असाल तर एनपीएस हा चांगला पर्याय मानला जातो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एनपीएस आपल्या योजनेत वेळोवेळी बदल करत असते. असाच एक मोठा बदल एनपीएसकडून करण्यात आलाय. ज्याचा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) महत्त्वाचे बदल झाले आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजेच PFRDA ने हे बदल केले असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पैशांची सोय अधिक सुलभ झाली आहे. आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा रकमेतून मोठा भाग एकरकमी काढता येईल. हे नियम मुख्यतः खासगी क्षेत्र आणि सर्व नागरिक मॉडेल अंतर्गत येणाऱ्या सदस्यांना लागू आहेत.

एकरकमी रक्कम काढण्याची मर्यादा 

आता निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 80 टक्के भाग एकरकमी काढता येईल. फक्त 20 टक्के भाग अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावा लागेल, ज्यामुळे दरमहा पेन्शन मिळेल. पूर्वी ही मर्यादा 60 टक्के एकरकमी आणि 40 टक्के अॅन्युइटी होती. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात निवृत्तीनंतर अधिक रोख रक्कम येते. जी वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. असे असले तरी अॅन्युइटीचा भाग कायम ठेवल्याने भविष्यात नियमित महिन्याची पेन्शन सुरू राहते.

कमी रकमेसाठी 

जर NPS खात्यात जमा रक्कम 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर पूर्ण रक्कम एकरकमी काढता येईल. यात वार्षिकी खरेदी बंधनकारक नाही. 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या रकमेसाठी कमाल 6 लाख रुपये एकरकमी काढता येतील, तर उर्वरित भाग वार्षिकी किंवा 6 वर्षांत हळूहळू काढता येईल. 12 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी 80-20 चा नियम लागू होईल. छोट्या बचती असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांना यामध्ये अॅन्यूटीची सक्ती नसेल.

लॉक-इन कालावधी

पूर्वी खासगी क्षेत्रातील सदस्यांना खाते उघडल्यापासून किमान 5 वर्षे थांबावे लागत होते. आता हा लॉक-इन कालावधी पूर्णपणे काढून टाकला आहे. यामुळे गरज पडल्यास आधीच पैशांची सोय करता येते. ही सुट खासगी क्षेत्र आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आहे; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुने नियम कायम आहेत.

फायदे काय?

या बदलामुळे NPS  अधिक आकर्षक बनणार आहे. निवृत्तीनंतर मोठी रक्कम हातात येईल, तसेच अॅन्यूटीमुळे नियमित उत्पन्नाची हमी आणि दोन्हींचा समतोल साधण्यात आला आहे. खासगी नोकरीत वारंवार बदल होत असल्याने ही लवचिकता कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच परदेशात स्थायिक होऊन भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना पूर्ण रक्कम एकरकमी काढता येणार आहे.

नियम कधीपासून?

हे नियम मुख्यतः खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट NPS आणि सर्व नागरिक मॉडेलमधील सदस्यांना लागू आहेत. डिसेंबर 2025 मध्ये अधिसूचित झालेले हे बदल त्वरित लागू करण्यात आले आहेत. NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आपल्या खात्याची माहिती नियमित तपासावी असा सल्ला देण्यात आलाय.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments