Friday, August 7, 2026
Home Blog Page 625

बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज

0
बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज


RRB Group D Eligibility Criteria: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी (लेव्हल -१) पदांच्या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत. नव्या निकषांनुसार आता दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुद्धा  ग्रुप डी पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ग्रुप डी भरतीसाठी आयटीआय डिप्लोमा यापुढे अनिवार्य राहणार नाही. यापूर्वी तांत्रिक विभागांसाठी अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगकडून (एनसीव्हीटी) एनएसी किंवा आयटीआय डिप्लोमा असणे अनिवार्य होते. नॅक किंवा आयटीआय पदविका नसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नव्हते.



Source link

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

0
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक


Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे. या घटनेनंतर आता या हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुलेस व सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.



Source link

साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या! मिरा रोडच्या शांती सेंटरमधील धक्कादायक घटना

0
साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या! मिरा रोडच्या शांती सेंटरमधील धक्कादायक घटना


Mumbai Mira Road Murder : मुंबईत मीरा रोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शांती शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री १० च्या दरम्यान, एका व्यापाऱ्याची दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घनतेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



Source link

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ज्यो बायडन यांच्या पत्नीला १७ लाख रुपये किमतीचा हिरा भेट; ऑडिटमधून स्पष्ट

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ज्यो बायडन यांच्या पत्नीला १७ लाख रुपये किमतीचा हिरा भेट; ऑडिटमधून स्पष्ट


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना २०२३ मध्ये परदेशी नेत्यांकडून असंख्य भेटवस्तू मिळाल्या. मात्र या सर्व भेटवस्तूंपैकी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला २० हजार डॉलर्स किमतीचा हिऱ्याची गिफ्ट ही सर्वात महागडी गिफ्ट ठरले आहे. 



Source link

भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध

0
भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध


India China Ladakh Issue: भारत आणी चीनमध्ये सुरु असणारा सीमावाद कैक वर्षांपासून धुमसत असून, कमीजास्त प्रमाणात त्याच्या झळा पोहोचतच असतात. मागील काही दिवसांपासून या संघर्षाची ठिणगी शांत होते ना होते तोच पुन्हा एकदा भडका उडाला आहे आणि कारण आहे चीननं केलेली आणखी एक कुरापत. 

चीनमधील होटन प्रीफेक्चर क्षेत्रामध्ये शेजारी राष्ट्रानं दोन नव्या काऊंटींची घोषणा केली असून, याविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं कठोर शब्दांत विरोध दर्शवला आहे. भारतानं मांडलेल्या भूमिकेनुसार ज्या भागांना जोडून चीनच्या या काऊंटी स्थापित केल्या जाणार आहेत त्यामध्ये लडाखही येत असल्यानं हा विरोध केला जात आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्चे रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारीच देशातील माध्यमांना संबोधित करत चीनच्या कृत्याचा कडाडून विरोध केला. ‘चीनच्या होटन प्रांतातील दोन नव्या काऊंटीच्या स्थापनेविषयीची घोषणा आम्ही पाहिली. या कथित काऊंटीच्या अधिकार क्षेत्रातील काही भाग केंद्रशासित लडाखमध्येही येत आहे. त्यामुळं भारतीय सीमाभागात या चीनच्या अवैध अस्तित्वाला कधीच स्वीकारलं जाणार नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

नव्या प्रदेशांमुळं भारताच्या या भागांवर असणाऱ्या अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही. सोबतच चीनच्या बळजबरीनं करण्यात आलेल्या या कृत्याला वैधही मानहृलं जाणार नाही. समोर आलेल्या वृत्तांनंतर आम्ही चीनच्या या कुरापतीचा विरोध करतो, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं थेट शब्दांत सांगण्यात आलं. 

लडाखच्या पूर्वक्षेत्रातील सीमावादावर एकिकडे करारांच्या माध्यमातून तोडगा काढला जात असतानाच दुसरीकडे चीनकडून पुन्हा येथील भूभागावर वक्रदृष्टी ठेवत तो काबीज करण्यासाठीची धडपड सुरू असल्यामुळं आता पुन्हा तणावाच्या परिस्थितीनं डोकं वर काढलं आहे. 

पूर्व लडाखमध्ये नेमकी काय स्थिती? 

भारतीय नकाशाचा अभ्यास केल्यास देशाच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखमध्ये पूर्वेकडील भागात असणाऱ्या डेमचोक, डेपसांग या सीमाभागांतून दोन्ही देशांनी आपलं सैन्य 21 ऑक्टोबर रोजी मागे घेतलं. सदर सीमावादावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चर्चाही झाली. ज्यामध्ये कैलास मानससरोवर यात्रा, नद्यांसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण या आणि अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधत शांततेच्या मार्गानं तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. पण, चीन काही केल्या कुरापती करतच असल्यानं अखेर परराष्ट्र मंत्रालयालाही जाहीरपणे कठोर भूमिका घ्यावी लागत असल्याचं स्पष्ट होत आहे. 





Source link

धक्कादायक! दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण करत केली हत्या

0
धक्कादायक! दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण करत केली हत्या


Delhi Murder : दाजीने चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला लोखंडी रॉडने मरण करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील आनंद विहार भागात ही घटना घडली आहे. चिकन खाण्यास नकार दिल्याने मेहुण्याने दाजीला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.



Source link

Maharashtra Weather update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट

0
Maharashtra Weather update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका; दिवसा उष्णता तर रात्री गारठा, IMD ने दिला अलर्ट


Maharashtra Weather update : राज्यात थंडी पुन्हा वाढली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. पुण्यासह, सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.



Source link

बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा: दिव्यांग हक्कांसाठी आंदोलनाची तयारी

0
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा: दिव्यांग हक्कांसाठी आंदोलनाची तयारी

फलटण :माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर राहून दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटणार नसल्याची खंत व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा सादर केला.

दिव्यांगांच्या समस्यांसाठी आंदोलनाची तयारी
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाने अद्याप कार्यक्षमतेने काम केलेले नाही. दिव्यांगांसाठी पुरेशी पदभरती नाही, जिल्हा स्तरावर कार्यालये नाहीत, मानधन वेळेवर मिळत नाही, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 5% निधीही खर्च होत नाही.

दिव्यांगांवर होणारी बेईमानी सहनशील नाही
राजीनाम्याच्या पत्रात बच्चू कडू यांनी म्हटले की, “या पदावर राहून काहीच करता येत नसेल तर दिव्यांग बांधवांसोबत बेईमानी होईल. मला ती शक्य नाही.” त्यांनी त्यांच्या सुरक्षाही काढून टाकण्याची विनंती केली आहे.

राजीनाम्यानंतर आंदोलनाची तयारी
राजीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी मोठे आंदोलन उभे करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे दिव्यांग समुदायाकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा 6 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात

0
राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा 6 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात

पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग): महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण सोमवार, 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर असणार आहेत.

कार्यक्रमात रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये प्रमुख उपस्थित राहणार असून संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी असतील. ही माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुरस्कार वितरण आणि सन्माननीय व्यक्तींची नावे

यंदा 32 व्या वर्षी, प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कार सोहळ्यात 2024 सालातील नामांकित पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै. पुण्यनगरी, पुणे)

दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा)

नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै. दिव्यमराठी, श्रीरामपूर)

सौ. विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, साप्ताहिक धनसंतोष, कोरेगाव, जि. सातारा)

अॅड. रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै. गंधवार्ता, फलटण)

यशवंत भिमराव खलाटे-पाटील (प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, फलटण)

विशेष पुरस्कार

आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ‘दर्पण’ पुरस्कार:
श्रीमती शोभना कांबळे (वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, रत्नागिरी)

ज्येष्ठ पत्रकार ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार:
डॉ. प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, सातारा)

‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण’ साहित्यिक पुरस्कार:
निर्मलकुमार सूर्यवंशी (हडसणी, ता. हदगाव, जि. नांदेड)

कार्यक्रमाचे आवाहन

पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय आणि पत्रकार प्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, आणि सुधाकर जांभेकर यांनी केले आहे.

बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

कार्यक्रमादरम्यान ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात येईल.

कार्यक्रम ठिकाण

स्थळ: ‘दर्पण’ सभागृह, पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
वेळ: सोमवार, 6 जानेवारी 2025, सकाळी 10:30

पालकांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुले बनवू शकणार नाहीत सोशल मीडिया अकाउंट; काय आहेत नवीन नियम?

0
पालकांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुले बनवू शकणार नाहीत सोशल मीडिया अकाउंट; काय आहेत नवीन नियम?


सरकारने बहुप्रतीक्षित डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. यात इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसंदर्भात विविध नियमांचा उल्लेख आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा उल्लेख नाही. संसदेने सुमारे १४ महिन्यांपूर्वी डिजिटल डेटा संरक्षण विधेयक २०२३ मंजूर केले. त्यानंतर नियमावलीचा मसुदा जारी करण्यात आला आहे.



Source link