Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यस्तरीय 'दर्पण' पुरस्कार वितरण सोहळा 6 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात

राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा 6 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात

पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग): महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण सोमवार, 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर असणार आहेत.

कार्यक्रमात रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये प्रमुख उपस्थित राहणार असून संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी असतील. ही माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुरस्कार वितरण आणि सन्माननीय व्यक्तींची नावे

यंदा 32 व्या वर्षी, प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कार सोहळ्यात 2024 सालातील नामांकित पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै. पुण्यनगरी, पुणे)

दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा)

नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै. दिव्यमराठी, श्रीरामपूर)

सौ. विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, साप्ताहिक धनसंतोष, कोरेगाव, जि. सातारा)

अॅड. रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै. गंधवार्ता, फलटण)

यशवंत भिमराव खलाटे-पाटील (प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, फलटण)

विशेष पुरस्कार

आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ‘दर्पण’ पुरस्कार:
श्रीमती शोभना कांबळे (वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, रत्नागिरी)

ज्येष्ठ पत्रकार ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार:
डॉ. प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, सातारा)

‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण’ साहित्यिक पुरस्कार:
निर्मलकुमार सूर्यवंशी (हडसणी, ता. हदगाव, जि. नांदेड)

कार्यक्रमाचे आवाहन

पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय आणि पत्रकार प्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, आणि सुधाकर जांभेकर यांनी केले आहे.

बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

कार्यक्रमादरम्यान ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात येईल.

कार्यक्रम ठिकाण

स्थळ: ‘दर्पण’ सभागृह, पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
वेळ: सोमवार, 6 जानेवारी 2025, सकाळी 10:30

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments