Friday, August 7, 2026
Home Blog Page 624

बारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

0
बारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

फलटण  :- महादेवनगर, फलटणजवळ बारामतीवरून फलटणला येणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आगीची घटना घडल्यावर चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

ही घटना फलटणपासून जवळ असलेल्या महादेवनगर येथे घडली. एसटी महामंडळाने या घटनेची दखल घेतली असून बसच्या तांत्रिक दोषांबाबत चौकशी सुरू आहे.

बारामतीत कोयता गॅंगविरोधात पोलिसांची कठोर कारवाई: चार आरोपींना येरवडा कारागृहात रवानगी

0
बारामतीत कोयता गॅंगविरोधात पोलिसांची कठोर कारवाई: चार आरोपींना येरवडा कारागृहात रवानगी

बारामती :- बारामती शहरात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना थेट येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी या कारवाईचा प्रस्ताव पाठवून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आरोपींची नावे व कारवाई

यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप, आदित्य राजू मांढरे (सर्व रा. अमराई, बारामती) आणि अनिकेत केशवकुमार नामदास (रा. दीपनगर, भवानीनगर, इंदापूर) या आरोपींनी कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कडक कारवाई करत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

टवाळखोरांना कडक इशारा

पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावर शस्त्रे दाखवणारे किंवा दहशत निर्माण करणारे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची माहिती किंवा फोटो मिळाल्यास शक्ती क्रमांक 9209394917 वर पाठवावे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नागरिकांचे सहकार्य आवश्यक

जागरूक नागरिक, पालक, शिक्षकांनी शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणारे, चौकाचौकात टवाळखोरी करणारे किंवा उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या युवकांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

पोलिसांची ठाम भूमिका:
बारामती शहरात अशा प्रकारच्या टवाळखोरांवर ही पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.

संपर्कासाठी:
शक्ती क्रमांक: 9209394917
पोलीस निरीक्षक: विलास नाळे

HDFC आणि SBI च्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ऐकून म्हणाल FD च करायला हवी!

0
HDFC आणि SBI च्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ऐकून म्हणाल FD च करायला हवी!


HDFC SBI FD rate: घरातील मोठी मंडळी आजही आपले पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवतात. बॅंकेत पैसे सुरक्षित राहतात. तसेच गरजेच्या वेळी एफडी मोडता येते. त्यामुळे जुन्या ग्राहकांचा कल एफडी गुंतवणूकीकडे असतो. पण एफडीवरील व्याजदर खूप कमी असतो. बहुतांश बॅंका 6 टक्क्यांच्या आतच एफडीवर व्याज देतात. त्यामुळे पैसे वाढवू इच्छित असलेले तरुण ग्राहक एफडी गुंतवणूकीऐवजी एसआयपी, म्युच्यूअल फंड गुंतणुकीकडे वळलेला दिसतोय. पण आता एफडी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

तुम्हीदेखील मुदत ठेवींमध्ये (FD) गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. देशातील सर्वात मोठ्या 2 बँकांनी ग्राहकांना एफडीवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. भविष्यात आणखी काही बॅंक यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या बॅंका? यामुळे कोणत्या ग्राहकांना होणार फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

SBI आणि सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने काही ठेवीदारांना गुड न्यूज दिली आहे. एसबीआयने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची नवीन कॅटेगरी सुरू केली आहे. या कॅटेगरीतील ठेवीदारांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा 10 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळणार आहे. एचडीएफसी बँकेने बल्क डिपॉझिट्सवरील परताव्यात 5 ते 10 बेस पॉइंट्सने सुधारणा केली आहे.

ग्राहकांना एफडी गुंतवणूकीवर चांगले रिटर्न्स मिळवून देण्यासाठी एसबीआयनेदेखील आपली नवीन स्किम अपडेट केली आहे. यामाध्यमातून 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यांच्या एफडीवर जास्त व्याज दिले जाणार आहे. यासाठी एसबीआय बँकेने त्यांच्या योजनेची पुनर्रचना देखील केली आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक त्यांच्या बचतीचे उद्दिष्ट ठरवू शकतात आणि त्यानुसार आवर्ती ठेवींसाठी साइन अप करू शकतात. 

डिसेंबरच्या मध्यापर्यंत बँक ठेवी आणि बँक कर्ज 11.5% च्या समान गतीने वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे. विकासाला चालना देण्यासाठी धोरणात्मक दरात कपात करण्याची मागणी आरबीआयकडे केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे.  

इतर बँकाही व्याज वाढवणार?

एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे व्याजदर वाढवल्यानंतर इतर बँकाही आपल्या एफडी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.एचडीएफसी बँकेने इतर बँकांच्या बरोबरीने व्याजदरात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी व्यवसाय डेटा जाहीर करणारी पहिली मोठी बँक ही बँक ऑफ बडोदा आहे. त्याचे ग्लोबल ॲडव्हान्सेस 11.7% आणि ग्लोबल डिपॉझिट्स 11.8% ने वाढले आहेत.





Source link

Aaradhya Video : अचानक विमानतळावर उड्या मारताना दिसली आराध्या, नेमकं काय झालं?

0
Aaradhya Video : अचानक विमानतळावर उड्या मारताना दिसली आराध्या, नेमकं काय झालं?


गेल्या वर्षी अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होते. मात्र, या कपलने या चर्चांवर प्रतिक्रिया देणे टाळले. तरीही अनेकांनी अभिषेकने ऐश्वर्याला फसवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आराध्याच्या वाढदिवशी हे कपल एकत्र दिसले. त्यानंतर एक-दोन ठिकाणी त्यांनी एकत्र हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. आता सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकची लेक आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या विमानतळावर उडी मारताना दिसत आहे.



Source link

वारसांना न्याय: फलटण नगरपरिषदेत नियुक्तीपत्र वाटपाने रखडलेला प्रश्न मार्गी

0
वारसांना न्याय: फलटण नगरपरिषदेत नियुक्तीपत्र वाटपाने रखडलेला प्रश्न मार्गी

फलटण | नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना न्याय देत रखडलेला प्रश्न मार्गी

फलटण नगरपरिषदेत अनेक दिवस रखडलेला सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. मंगळवारी आयोजित समारंभात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांतून या वारसांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अजय माळवे, सुधीर अहिवळे, भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा, व जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले उपस्थित होते.

मान्यवरांचे विचार

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आज नियुक्तीपत्र वाटपामुळे कामगार कुटुंबांना न्याय मिळाल्याचा आनंद आहे.”
आमदार सचिन पाटील म्हणाले, “कामगार कुटुंबांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे. या यशामुळे वारसांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे.”

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

0
प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात


Samruddhi Expressway : राज्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी एक्सप्रेसवेचे  काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.  या द्रुतगती महामार्गाला ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. नागपूर ते नाशिकमधील इगतपुरी हे अंतर ६२५ किलोमीटर असून येथील काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर  मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या काही तासांवर येणार आहे. पूर्वी नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी  १६ तास लागत होते. हा प्रवास आता  ८ तासांवर येणार आहे.



Source link

श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025: शेतकरी हितासाठी

0
श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025: शेतकरी हितासाठी

फलटण |2 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्षस्थान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भूषवले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादनाने झाली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापना व पार्श्वभूमीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

कृषी प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व कृषी यासारख्या आधुनिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली गेली. महाविद्यालयातील प्राचार्यांनी मान्यवरांचा परिचय व त्यांच्या योगदानाचा आढावा दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह व चांदीच्या तलवारीने करण्यात आला.

प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान:
ऊस उत्पादक चंद्रकांत बेलदार, द्राक्ष उत्पादक हिंदुराव सूळ, भाजीपाला उत्पादक बाबुराव गायकवाड, दूध उत्पादक सौ. स्वाती पवार, डाळिंब उत्पादक चंद्रकांत आहिरेकर यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन:
डॉ. पाटील यांनी डिजिटल एग्रीकल्चर, गटशेती आधारित उपक्रम व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच, प्रिसिजन एग्रीकल्चर आणि शेतकरी-विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.

रामराजे नाईक निंबाळकर यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन:
आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी हवामान बदल, जागतिक तापमानवाढ व आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात इंटरनॅशनल लायन्स क्लब, श्रीराम सहकारी साखर कारखाना व अन्य मान्यवरांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्रा. ए. आर. ससाने, श्रेया गायकवाड व तनिष्का दौंडकर यांनी केले, तर प्रा. ए. पी. रणवरे यांनी आभार प्रदर्शन केले.

कृषी प्रदर्शनाने फलटण व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा नवदिशा दाखवली आहे.

Shocking! टॉप ३ मध्ये समजली जाणारी स्पर्धक बिग बॉसमधून आउट, चाहत्यांनाही धक्का

0
Shocking! टॉप ३ मध्ये समजली जाणारी स्पर्धक बिग बॉसमधून आउट, चाहत्यांनाही धक्का


Bigg Boss 18 Elimination In Marathi: आता बिग बॉस सीझन 18 चा सीजन फिनालेकडे येत आहे. शोमध्ये सर्व स्पर्धकांच्या नजरा ट्रॉफीवर खिळल्या आहेत. शो या टप्प्यावर आल्यानंतर कोणालाही बाहेर पडायचे नसते. मात्र, आता दर आठवड्याला कुणाला तरी या शोचा निरोप घ्यावा लागणार आहे, कारण या शोचा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे.



Source link

DA Hike 2025: सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना किती मिळणार महागाई भत्ता? कधी होणार घोषणा?

0
DA Hike 2025: सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना किती मिळणार महागाई भत्ता? कधी होणार घोषणा?



DA Hike 2025:  महागाई भत्ता नेमका कसा मोजला जातो? तो कधी जाहीर केला जाऊ शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 



Source link

भारतीय लष्कराने बदलले धोरण! आता गुणवत्तेच्या आधारे मिळणार प्रमोशन; कधी आणि आणि कोणत्या पदांसाठी होणार नियम लागू?

0
भारतीय लष्कराने बदलले धोरण! आता गुणवत्तेच्या आधारे मिळणार प्रमोशन; कधी आणि आणि कोणत्या पदांसाठी होणार नियम लागू?


Indian Army Promotion : भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पद्धतीत आता काही बदल केले आहेत. यापुढे सर्व लेफ्टनंट जनरलची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार करण्यात येणार आहे. हा नवा नियम ३१ मार्चपासून लागू होणार असून गुणवत्तेवर आधारित निवडीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा नवा बदल लागू केला जाणार आहे.  या नव्या व्यवस्थेमुळे भारतीय लष्कराला इंटिग्रेटेड थिएटर कमांडमध्ये काम करण्यासाठी लेफ्टनंट जनरलच्या निवडीसाठी मदत होणार आहे.



Source link