Thursday, June 25, 2026
Home Blog Page 6

जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरडला भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा

0
जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरडला भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा

जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरडला भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा

बरड | प्रतिनिधी :-  आज दि. १५ जून २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, बरड येथे जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. वैशाली कांबळे यांनी सदिच्छा भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांना भेट देत उपलब्ध आरोग्य सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच केंद्राच्या एकूण कार्यपद्धतीची माहिती घेतली. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी, आवश्यक सुविधा आणि कामकाजातील अडथळ्यांविषयी विचारपूस केली.

कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या आणि मागण्या त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी आवश्यक त्या बाबी वरिष्ठ स्तरावर मांडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी अशा भेटी महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रवेशद्वाराविना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा; दोन-अडीच कोटींच्या खर्चानंतरही सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

0
प्रवेशद्वाराविना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा; दोन-अडीच कोटींच्या खर्चानंतरही सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचा कारभार सन १९८७ पासून सुरू असून आज जवळपास चार दशकांचा टप्पा पूर्ण होत आला आहे. या कालावधीत नगरपरिषदेच्या ६ ते ७ प्राथमिक शाळा स्वतःच्या सुसज्ज इमारतींमध्ये कार्यरत असून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. डिजिटल वर्ग, विद्यार्थिनींसाठी विशेष योजना तसेच स्थानिक संस्थांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काही मूलभूत सुविधांच्या बाबतीत अजूनही गंभीर त्रुटी असल्याचे चित्र समोर येत आहे.
नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा साधारण ते चांगला मानला जात असला तरी परिसरातील स्वच्छता, शाळांच्या अवतीभवती संरक्षक भिंती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालये आणि क्रीडांगणे यांसारख्या आवश्यक सुविधांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विशेषतः पाचबत्ती चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ संदर्भात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळेच्या विकासासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची चर्चा असताना आजही शाळेला मुख्य प्रवेशद्वार नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कामाचा ठेका पूर्ण होऊन ठेकेदाराला देयके अदा करण्यात आली असतानाही प्रवेशद्वाराचे काम अपूर्ण राहिले आहे. यामुळे शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यपींचा शाळा परिसरात होणारा वावर आणि त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विकासकामांमध्ये पारदर्शकता राखली जात आहे का, निधीचा योग्य वापर होत आहे का, याची चौकशी व्हावी अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे. तथापि, या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
नागरिकांनी लोकनियुक्त आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, शिक्षण विभाग तसेच विरोधी पक्षनेत्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शैक्षणिक क्रांतीची दिशा कायम ठेवायची असेल तर केवळ इमारती उभारून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही वेळेत उपलब्ध करून देणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ च्या प्रवेशद्वारासह प्रलंबित सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
– आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर

फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू; नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम

0
फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू; नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम

फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू; नागरिकांमध्ये उत्सुकता आणि

फलटण | प्रतिनिधी : महावितरण (MSEDCL) कडून फलटण शहर आणि तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. “पुढील ४८ तासांत विद्यमान वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येईल” असा संदेश अनेक ग्राहकांना प्राप्त झाल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भारत सरकारच्या १७ ऑगस्ट २०२१ च्या राजपत्र अधिसूचनेनुसार देशभरात पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत फलटण परिसरातील वीज ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची नोंद स्वयंचलितपणे आणि अधिक अचूकपणे होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग शक्य होते. तसेच ग्राहकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून दैनंदिन वीज वापर, अंदाजित बिल आणि इतर माहिती तत्काळ पाहता येणार आहे. यामुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे.

याशिवाय सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही राज्यांमध्ये स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिले वाढल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे अनेक ग्राहकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे वीज वापर अधिक अचूकपणे नोंदविला जातो. त्यामुळे पूर्वी दुर्लक्षित राहणारा वापरही बिलामध्ये दिसू शकतो. परिणामी बिल वाढल्याचा भास निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, याचा अर्थ वीजदर वाढले आहेत असे नाही.

स्मार्ट मीटरच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, मीटर बसविण्यापूर्वी महावितरणाने व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, महावितरणाने मीटर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असल्याचे स्पष्ट केले आहे. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अधिकृत ओळख तपासूनच त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, स्मार्ट मीटर ही भविष्यातील डिजिटल वीज व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेली महत्त्वाची पायरी आहे. मात्र त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरचे फायदे, मर्यादा आणि वापराची पद्धत याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी नागरिकांच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे— स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार का, की वीज बिलांबाबत नव्या चर्चांना सुरुवात होणार? याचे उत्तर येत्या काळात प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट होणार आहे.

मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा

0
मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा

मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा

फलटण | प्रतिनिधी :- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फलटण येथील लक्ष्मीनगर परिसरातील सरोज व्हिला या निवासस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा जिल्हा आणि फलटण तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी मदत, दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट शिबिरांचे आयोजन तसेच गरजू रुग्णांना अधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.

यावेळी फलटण आरोग्य मंडळ संचलित लाईफ लाईन हॉस्पिटलमधील डायलिसिस सेवांच्या विस्तारासंदर्भातही चर्चा झाली. सध्या रुग्णालयात आठ डायलिसिस मशिन्स कार्यरत असून वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. फलटण व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीप्रसंगी हवेली पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती युवराज काकडे उपस्थित होते. आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय सहकार्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

भेटीदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी डॉक्टर पार्श्वनाथ राजवैद्य हेही उपस्थित होते.

फलटण आणि सातारा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अधिक सक्षम व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात विविध वैद्यकीय शिबिरे, उपचार सहाय्य योजना आणि सामाजिक आरोग्य उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न

0
आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न

आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याची माजी कार्यकारिणी व भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांच्या वतीने आयुनि छाया राजेंद्रकुमार गायकवाड मॅडम व आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा फलटण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना कृतज्ञता गौरव मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी धम्ममित्र आयु. सतीश कांबळे म्हणाले, “हा गौरव सोहळा आपल्या संपूर्ण आयुष्याचा मोठा कालखंड शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित करणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या शिक्षणमहर्षींचा आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आता त्यांनी मनसोक्त, मनमोकळे व स्वच्छंदी जीवन जगावे. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ या उक्तीप्रमाणे मौनामध्ये मोठी शक्ती असते आणि ती विपश्यनेतून प्राप्त होते. म्हणून विपश्यना साधना करून आनंदी जीवन जगावे. भगवान बुद्धांच्या धम्मविचारांकडे जाण्यासाठी तोच एक राजमार्ग आहे.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आज आपण ज्यांचा सन्मान करीत आहोत, ती दोन्ही कुटुंबे धम्माच्या विचारांनी समाजप्रबोधनाची परंपरा जपणारी आहेत. आदरणीय छाया गायकवाड मॅडम यांना त्यांचे वडील स्वर्गीय आर. टी. रणवरे यांच्या विचारांचा वारसा लाभला असून त्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक चळवळींमध्ये कायम सक्रिय राहिल्या आहेत. तसेच आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली. अनेक विद्यार्थ्यांना घडविले, शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला व विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या दोन्ही कुटुंबांचा धम्म चळवळीतील सहभाग प्रेरणादायी असून भविष्यातही ते धम्मकार्यामध्ये सक्रिय राहतील, असा विश्वास आहे.”

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी केंद्र व राज्याच्या वतीने शुभेच्छा देताना सांगितले की, “अनेक जण सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये रमून जातात; मात्र या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीसोबतच भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मकार्यामध्ये सक्रिय योगदान दिले आहे. भविष्यातही ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेतील, याची खात्री आहे.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड सर यांनी आपल्या मनोगतात दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मविचारांच्या आधाराने करावा, धम्मकार्याशी निष्ठा कायम ठेवावी तसेच जगातील विविध बौद्ध राष्ट्रांना भेटी देत आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगावे, असे मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना शुभेच्छा देत कृतज्ञता गौरव मानपत्राचे वाचन केले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक, शैक्षणिक व धम्मकार्यामध्ये सक्रिय राहून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करावे तसेच निरोगी, सुखी व समाधानी आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना आयु. विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “या सत्काराने मी भारावून गेलो आहे. माझ्या संपूर्ण ३१ वर्षांच्या कारकिर्दीत माझी पत्नी व माझी मुले कायम माझ्या सोबत राहिली आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर जगण्याची प्रेरणा मला आयुष्यमान दादासाहेब भोसले यांच्याकडून मिळाली. आम्हीही जुन्या परंपरांमध्ये अडकलो होतो; परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही धम्म चळवळीमध्ये सक्रिय झालो. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध स्थळांना भेटी देणे, विपश्यना करणे आणि धम्म चळवळीमध्ये सक्रिय योगदान देण्याचा माझा मनोदय आहे. या सत्काराबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.”

आयुनि छाया राजेंद्रकुमार गायकवाड म्हणाल्या, “हा सत्कार माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्ही सर्वांनी इतक्या आपुलकीने व प्रेमाने आमच्या घरी येऊन केलेला हा सत्कार मनाला भावणारा आहे. तुम्ही आमच्या कुटुंबावर दाखवलेले प्रेम निश्चितच आम्हाला नवी ऊर्जा देणारे आहे. या सत्काराबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्वांसोबत धम्म चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बौद्ध पद्धतीने विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले. त्यांनी सत्कारमूर्तींच्या कुटुंबियांचे धम्म चळवळीतील योगदान अधोरेखित करत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार व प्रचार करण्यामध्ये भविष्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दोघांनाही उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, कौटुंबिक सुख-समृद्धी आणि आनंदमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप, माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड, संस्कार सचिव आयु. अमोल भोसले, माजी संघटक आयु. अमोल काकडे, माजी संघटक आयु. आनंद जगताप, धम्ममित्र विजयकुमार जगताप, धम्ममित्र सतीश कांबळे, साप्ताहिक साम्राज्य नायकचे संपादक प्रशांत सोनवणे, आयु. विकास गायकवाड (फौजी), माजी प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर मोरे, धम्ममित्र विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि साळूताई उर्फ भाग्यश्री निकाळजे, आयुनि योगिता घोरपडे तसेच इतर पदाधिकारी, धम्ममित्र, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांदूळवाडीजवळ भीषण दुर्घटना : विहिरीत पिकअप कोसळून  भाविकांचा मृत्यू; महिला व लहान मुलांचा समावेश

0
तांदूळवाडीजवळ भीषण दुर्घटना : विहिरीत पिकअप कोसळून  भाविकांचा मृत्यू; महिला व लहान मुलांचा समावेश

माळशिरस | प्रतिनिधी :  माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक श्री सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्यास अडचणी निर्माण झाल्या. अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी परिसरातील ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनास्थळी विहिरीतून वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पांथस्थच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा अभ्यास दौरा संपन्न; इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी

0
पांथस्थच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा अभ्यास दौरा संपन्न; इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी

मुंबई | प्रतिनिधी :- इतिहास, संस्कृती आणि बौद्ध स्थापत्य कलेचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने “पांथस्थ” संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अभ्यास दौरा आज (दि. १४ जून २०२६) उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. राज्याच्या विविध भागांमधून तसेच मुंबई शहरातून मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधक या दौऱ्यात सहभागी झाले होते.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये जतन करण्यात आलेल्या बौद्ध स्थापत्याशी संबंधित शिल्पकला, प्राचीन शिलालेख, ऐतिहासिक अवशेष आणि विविध सांस्कृतिक वारशांचा अभ्यास करण्याची संधी सहभागी सदस्यांना मिळाली. इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली वस्तुसंग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंची माहिती देण्यात आली. यावेळी बौद्ध संस्कृतीचा समृद्ध इतिहास, स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये आणि भारतीय वारशातील त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हा अभ्यास दौरा पूर्णपणे निशुल्क आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे विविध स्तरांतील इतिहासप्रेमींना या उपक्रमाचा लाभ घेता आला. सहभागी सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे अभ्यास दौरे भविष्यातही आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अभ्यासक, मार्गदर्शक आणि सहभागी सदस्यांचे “पांथस्थ” संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. इतिहास आणि सांस्कृतिक वारशाविषयी जनजागृती करण्यासाठी अशा अभ्यासपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

लेणी अभ्यासक

सूरज रतन जगताप

भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अकलूज शाखेचे उत्साहात उद्घाटनबहुजनांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा; मान्यवरांची उपस्थिती

0
भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अकलूज शाखेचे उत्साहात उद्घाटनबहुजनांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा; मान्यवरांची उपस्थिती

भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अकलूज शाखेचे उत्साहात उद्घाटन
बहुजनांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा; मान्यवरांची उपस्थिती

अकलूज | प्रतिनिधी :बहुजन समाजाच्या न्याय, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्या अकलूज शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. १४ जून २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अकलूज येथे आयोजित या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखेचे उद्घाटन अकलूज नगर परिषदच्या नगरसेविका मनिषाताई तिकोटे व प्रतिभाताई गायकवाड तसेच भिमराव श्रीपती लोखंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्षा स्वातीताई धाईजे, युवक अध्यक्ष अविनाश धाईजे यांच्यासह अकलूज शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास नगरसेविका मनिषाताई तिकोटे, विकास धोईजे, किरण धोईजे, नगरसेवक राहुल लोंढे, लखन गायकवाड, गणपत्ते, संदीप खंडगळे, सुनील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मोहन तिकोटे तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी वक्त्यांनी संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना समाजातील वंचित, शोषित, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
संस्थापक अध्यक्षा स्वातीताई धाईजे यांनी संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करत सामाजिक परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. युवक अध्यक्ष अविनाश धाईजे यांनी युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज व्यक्त केली.
उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते.
“बहुजनांच्या न्याय हक्कासाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अकलूज शाखेच्या उद्घाटनामुळे सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कायद्याची पदवी संपादन करून उमेश रामदास काकडे यांची यशस्वी भरारी; सामाजिक कार्याला मिळणार नवे बळ

0
कायद्याची पदवी संपादन करून उमेश रामदास काकडे यांची यशस्वी भरारी; सामाजिक कार्याला मिळणार नवे बळ


फलटण | प्रतिनिधी :- सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून जनजागृती आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे उमेश रामदास काकडे यांनी नुकतीच एलएल.बी. (Bachelor of Laws) पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशामुळे सामाजिक कार्यासोबतच न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची क्षमता अधिक बळकट होणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
उमेश काकडे हे अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन अशा विविध सामाजिक विषयांवर त्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली आहे. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांनी लोकहितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
तसेच ते तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक ऐक्य, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि न्याय यांचा प्रसार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या कार्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे.
कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर समाजातील वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार उमेश काकडे यांनी व्यक्त केला आहे. संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवा करण्याची त्यांची भूमिका अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“तुमच्यातील वैचारिक ताकद आता समाजाला न्याय देण्यासाठी आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झाली आहे. संविधानाच्या आणि कायद्याच्या मार्गाने तुमच्या हातून भविष्यात मोठे सामाजिक कार्य घडो, हीच सदिच्छा. तुमचा संघर्ष आणि यशस्वी प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
उमेश रामदास काकडे यांना एलएल.बी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या आगामी वकिली व्यवसायासह सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

काल महायुतीच्या बैठकीला उपस्थित, आज एकनाथ शिंदेंच्या भेट, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात काय

0


सातारा :  विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहे. जसंजसं मतदानाची तारीख जवळ येईल तसंतसं महायुतीला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषद उमेदवारीवरुन नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार उपस्थित असल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आम्ही सोलापूर विधानपरिषद निवडणूकित भाजपसोबत आहोत. आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आणि टोकाची कटुता येऊ नये म्हणून मी महायुतीला पाठिंबा दिला आहे.  मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही ही भूमिका घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना तो शो झाला आहे असं सांगत या प्रश्नाला बगल दिली. मतदार संघात निधीची गरज लागते त्यामुळे मी भेट घेतल्याची माहिती जानकर यांनी दिली. 

महायुतीच्या कालच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित

सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीची बैठक काल आयोजीत केली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे आणदार उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळ आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित आहेत. केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला आले नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी

 

 



Source link