Sunday, September 13, 2026
Homeफलटणमंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर...

मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा

मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा

फलटण | प्रतिनिधी :- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फलटण येथील लक्ष्मीनगर परिसरातील सरोज व्हिला या निवासस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा जिल्हा आणि फलटण तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी मदत, दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट शिबिरांचे आयोजन तसेच गरजू रुग्णांना अधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.

यावेळी फलटण आरोग्य मंडळ संचलित लाईफ लाईन हॉस्पिटलमधील डायलिसिस सेवांच्या विस्तारासंदर्भातही चर्चा झाली. सध्या रुग्णालयात आठ डायलिसिस मशिन्स कार्यरत असून वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. फलटण व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीप्रसंगी हवेली पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती युवराज काकडे उपस्थित होते. आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय सहकार्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

भेटीदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी डॉक्टर पार्श्वनाथ राजवैद्य हेही उपस्थित होते.

फलटण आणि सातारा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अधिक सक्षम व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात विविध वैद्यकीय शिबिरे, उपचार सहाय्य योजना आणि सामाजिक आरोग्य उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments