Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 597

मॅट्रिमोनी साईटवरून ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; धक्का बसल्यानं पुण्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

0
मॅट्रिमोनी साईटवरून ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; धक्का बसल्यानं पुण्यात महिला डॉक्टरची आत्महत्या


Pune Crime news : पुण्यात मॅट्रिमोनी वेबसाईटवरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम साईटवरून अविवाहित असल्याचं भासवत डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या कडून १० लाख रुपये घेत लुबडल्याचे पुढे आले आहे. या तरुणीला हा धक्का सहन न झाल्याने तिने विष प्राशन करून जिवन संपवलं आहे. या प्रकरणी पुण्यातील बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

‘त्या’ वनस्पतीच्या मुळात असे काय होते? चोरण्याच्या प्रकरणात चार जण पोहचले तुरुंगात

0
‘त्या’ वनस्पतीच्या मुळात असे काय होते? चोरण्याच्या प्रकरणात चार जण पोहचले तुरुंगात


Salacia plant roots: ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील औषधी वनस्पती चोरीला गेल्याने चार जणांना अटक करण्यात आले आहे. असं काय होतं या वनस्पतीमध्ये, हे प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊयात. ज्या वनस्पतीच्या मुळांमुळे हे चार जा तुरुंगात गेले ती वनस्पती ही केवळ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीच नाही तर पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. चला या वनस्पतीची मुळे चोरण्याच्या धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात. 

कोणत्या वनस्पतीची मुळे चोरली?

भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील कालीभंजडिहा जंगलात रविवारी वनविभागाच्या गस्ती घालणाऱ्या पथकाने चार जणांना चोरी करताना रंगेहात पकडले. हे लोक सलासिया या महत्त्वाच्या खारफुटीच्या प्रजातीची मुळे आणि देठ जंगलातून तोडून नेत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. 

हे ही वाचा: कशी दिसायची हुस्न की मल्लिका ‘अनारकली’? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद

 

काय आहे वनस्पतीची खासियत? 

सलासियाला स्थानिक भाषेत बटारा असे म्हणतात. बटारा ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती मधुमेह आणि रक्तातील साखरेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. असे घटक या वनस्पतीच्या मुळांमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळेच त्याची मागणी वाढत असून बेकायदेशीरपणे ही वनस्पती कापण्याच्या घटना समोर येत आहेत.

पर्यावरणाची हानी करण्याचा प्रयत्न

या राष्ट्रीय उद्यानातील खारफुटीची जंगले पर्यावरण संतुलन राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ही  खारफुटीची जंगले नैसर्गिक आपत्तींपासून किनारी भागाचे संरक्षण करतात. याशिवाय जैवविविधतेचेही रक्षण करतात. अशा परिस्थितीत खारफुटीची झाडे तोडणे पर्यावरणासाठी मोठा धोका ठरू शकतो.

हे ही वाचा: रोज रात्री ‘या’ तेलाने करा पायांच्या तळव्याला मसाज, सांधेदुखीसह निद्रानाशापासून मिळेल आराम

 

कायदेशीर कारवाई आणि शिक्षा

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरक्षित वनक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचा आरोप आहे. भारतीय वन कायद्यांतर्गत या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जंगल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा: बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल

 

जंगलांच्या संरक्षणात जनतेची भूमिका

वनविभागाने स्थानिक रहिवाशांनी जंगलांच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, बेकायदेशीर कृत्यांची माहिती तातडीने अधिकाऱ्यांना द्यावी. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. 





Source link

Coldplay : ख्रिस मार्टिनने ‘जय श्रीराम’ म्हटलं, अर्थही विचारला आणि माफी मागितली! कोल्डप्लेचा व्हिडिओ व्हायरल

0
Coldplay : ख्रिस मार्टिनने ‘जय श्रीराम’ म्हटलं, अर्थही विचारला आणि माफी मागितली! कोल्डप्लेचा व्हिडिओ व्हायरल


Coldplay Chris Martin Viral Video : ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्डप्ले’ने भारतात आपला ‘म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर’ सुरू केला आहे. परदेशाव्यतिरिक्त भारतातही कोल्डप्लेची क्रेझ प्रचंड आहे. या कॉन्सर्टची तिकिटे ऑनलाइन आल्यानंतर काही मिनिटांतच विकली गेली. यावरूनच तुम्ही या गायकाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. या म्युझिक टूरची पहिली मैफल काल संध्याकाळी झाली आणि त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमधून काही व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.



Source link

इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक

0
इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक


kerala rape case :  केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत एका दलित मुलीवर तब्बल ६० जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ही तरुणी १३ वर्षांची असतांना तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून गेल्या पाच वर्षात तिच्यावरील अत्याचारांची मालिका ही सुरूच आहे. या प्रकरणी ४ पोलिस ठाण्यात ३० विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाशी संबंधित ५७  आरोपींना अटक केली आहे, असे पठाणमथिट्टा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 



Source link

Himani Mor : ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राशी लग्नगाठ बांधणारी हिमानी मोर आहे कोण?

0
Himani Mor : ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राशी लग्नगाठ बांधणारी हिमानी मोर आहे कोण?


Neeraj Chopra Weds Himani Mor : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं हिमानी मोर हिच्या सोबत एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. नीरजनं स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. नीरज चोप्राच्या लग्नाची साधी चर्चाही कुठं नसताना अचानक फोटो समोर आल्यानं हे सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. नीरजची पत्नी हिमानी मोर हिच्याबद्दल लोक माहिती घेत आहेत.



Source link

Mumbai Marathon : मुंबईची प्रदूषित हवा बेतली मॅरेथॉनपटूंच्या जिवावर! १५ स्पर्धक आयसीयूमध्ये दाखल, दोघे व्हेंटिलेटरवर

0
Mumbai Marathon : मुंबईची प्रदूषित हवा बेतली मॅरेथॉनपटूंच्या जिवावर! १५ स्पर्धक आयसीयूमध्ये दाखल, दोघे व्हेंटिलेटरवर


Mumbai Marathon News : मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ६२ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. मात्र, यातील बऱ्याच स्पर्धकांना खराब हवामानामुळे त्रास झाला. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास झाला. काही धावपटू चक्कर येऊन पडले. यातील काही जणांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. तर दोघे जण व्हेंटीलेटरवर आहेत. काल मुंबईत सीएसएमटीजवळ हवेच्या गुणवत्ता निर्देशांक हा १५० एक्युआय एवढा होता.



Source link

पराठे, पाण्याच्या बाटल्या आणि यूपीआय व्यवहार..; सैफ अली खानचा हल्लेखोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चौकशीत माहिती समोर

0
पराठे, पाण्याच्या बाटल्या आणि यूपीआय व्यवहार..; सैफ अली खानचा हल्लेखोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चौकशीत माहिती समोर


Saif Ali Khan Attack Case:  सैफ अली खानवर हल्ला करून तब्बल तीन  दिवस पोलिसांना गुंगारा देणारा हल्लेखोर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तीन दिवस जंगजंग पछाडलं.  आरोपी हा अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आणि अखेर त्याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली.  सैफवर हल्ला केल्यावर  हल्लेखोर कुठे कुठे गेला, कुठे लपून बसला आणि तो   पोलिसांच्या जाळ्यात  कसा अडकला? याचा धक्कादायक घटनाक्रम त्याच्या चौकशीतून समोर आला आहे.



Source link

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव वाढतच चालू: सोलापूर पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांच्या वर्णीत मोलाचा वाटा

0
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव वाढतच चालू: सोलापूर पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांच्या वर्णीत मोलाचा वाटा

फलटण | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर माजी खासदार निंबाळकर यांना “वाय प्लस एस्कॉर्ट” सह सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा त्यांना पक्षामध्ये महत्त्वाच्या जबाबदारीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सूचक आहे.

जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळवून देण्यात रणजितदादांचा पुढाकार
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यात आणि त्यानंतर ग्रामविकास खाते मिळवण्यासाठी रणजितदादांनी विशेष प्रयत्न केले. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची वर्णी लागण्यासाठीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताना रणजितसिंह यांना सोबत घेतच पदभार स्वीकारला. या घटनेमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे.

फलटण तालुक्यात राजे गटाची घसरण
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही रणजितदादांनी खचून न जाता लगेचच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सचिन पाटील यांना तिकीट मिळवून दिले आणि त्यांना विधानसभेत यश मिळवून दिले. फलटण तालुक्यात राजे गटाची पकड ढिली होत असून, अनेक निष्ठावंत नेते रणजितदादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.

नवीन राजकीय समीकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड
रणजितदादांच्या प्रभावामुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजे गटाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यांच्याच आशीर्वादाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर सहज विजय मिळवता येईल, असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विकासाचे राजकारण आणि मजबूत संघटन शक्ती
रणजितदादांनी लोकसभा सदस्य म्हणून फलटण तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. फलटण तालुक्यात विकासाच्या राजकारणाला नवा आयाम मिळाला आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत होत असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा मोठा प्रभाव राहील, हे निश्चित आहे.

Viral Video : कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेख बनून गेला तरुण! साधूंनी दिला चोप; व्हिडिओ झाला व्हायरल

0
Viral Video : कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेख बनून गेला तरुण! साधूंनी दिला चोप; व्हिडिओ झाला व्हायरल


Maha Kumbh 2025 Viral Video:  महाकुंभ २०२५  मध्ये अनेक बाबी  व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फुले विकणाऱ्या तरुणीचा, IIT सोडून साधू झालेल्या युवकाचा  व साध्वी झालेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुंभमेळ्याचे रील्स बनवण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी येत आहे. मात्र, एका तरुणाला रील्स तयार करणे अंगलट आले आहे. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



Source link

मासेमारी बेतली जिवावर! नांदेडमध्ये जाळ्यात पाय अडकून दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू तर दूसरा बेपत्ता

0
मासेमारी बेतली जिवावर! नांदेडमध्ये जाळ्यात पाय अडकून दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू तर दूसरा बेपत्ता


Nanded Mukhed News : नांदेडच्या मुखेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मासे पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या दोघांचा जाळ्यात पाय अडकल्याने बुडून मृत्यू झाला आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दूसरा तरुण बेपत्ता झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.



Source link