Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 598

Video : सैफला भेटायला एकत्र गेले अर्जुन-मलायका! ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ म्हणत लोकांनी उडवली खिल्ली

0
Video : सैफला भेटायला एकत्र गेले अर्जुन-मलायका! ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ म्हणत लोकांनी उडवली खिल्ली


Malaika And Arjun Visit Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र लीलावती हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने सेलेब्स त्याला भेटण्यासाठी येत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका यांना हॉस्पिटलमधून एकत्र येताना पाहून दोघांचे चाहते सोशल मीडियावर अंदाज बांधत आहेत की, कदाचित दोघांचे पॅचअप झाले असावे. तर, काही लोक त्यांच्या या नात्याला आता काय नाव द्यायचे, असे विचारात आहेत. 



Source link

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेमुळे लाही! ऐन हिवाळ्यात उकाडा वाढला; दिवसभर कसे असेल हवामान? IMD चा अलर्ट

0
Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेमुळे लाही! ऐन हिवाळ्यात उकाडा वाढला; दिवसभर कसे असेल हवामान? IMD चा अलर्ट


Maharashtra IMD Weather Update : राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होणार असून उकाडा वाढणार आहे. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून थंडी गायब झाली आहे. सकाळी आणि रात्री वगळता दिवसभर उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर पंखे आणि एसी सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. पुढील काही दिवस उष्णता वाढण्याची शक्यता आहे. 



Source link

Entertainment News in Marathi Live: Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!

0
Entertainment News in Marathi Live: Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!


Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!

Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 20 Jan 202501:41 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!

  • Bigg Boss 18 Winner Name : ‘बिग बॉस १८’चा फिनाले करणवीर मेहराने जिंकला आहे. बिग बॉसच्या घरचा लाडका स्पर्धक विवियन डिसेना उपविजेता ठरला.


Read the full story here





Source link

Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!

0
Entertainment News in Marathi Live: Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’च्या लाडक्या विवियन डिसेनाला मागे टाकत करणवीर मेहराने जिंकली ट्रॉफी!


Who Is Bigg Boss 18 Winner : स्पर्धक अभिनेता करणवीर मेहरा याने ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले जिंकून ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. करणवीरने विवियन डिसेनाला मागे टाकत बिग बॉस १८चे विजेतेपद पटकावले आहे. करणवीर मेहराने ५० लाख रुपयांचे रोख बक्षीसही जिंकले. या विजयामुळे करणवीरचे चाहते आणि कुटुंबीय खूप खूश होते. ‘बिग बॉस १८’च्या आधी करणवीर मेहरा याने गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी’चा किताबही जिंकला होता. यावेळेस आपण बिग बॉसची ट्रॉफीही घरी घेऊन जाणार असल्याचं त्याने शोच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं.



Source link

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

0
महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील


Donald Trump Net Worth:  डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.  संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचं वातावरण आहे. ट्रम्प यांच्या शपतविधीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्षपदी निवड झाल्यापासून  ट्रम्प यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील विविध देशांमध्ये ट्रम्प यांची मालमत्ता आहे. भारतातही ट्रम्प यांच्यानावर आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे.   महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे.  मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. जाणून घेऊया ट्रम्प यांची भारतात कुठे कुठे संपत्ती आहे. .. 

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 7,100 कोटी रुपये) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ट्रम्प टॉवर असतील अशी  देखील चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबध आणकी चांगले होणार आहेत. 

भारतात अनेक नवीन प्रकल्पांमध्ये ट्रम्प गुंतवणूक करणार आहेत. नोएडा, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक टॉवर, कार्यालयीन इमारती, व्हिला तसेच गोल्फ कोर्स यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मुंबईत ट्रम्प टॉवरचे लाँचिंग झाले. यावेळी ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती ट्रिप ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिली. 
भारतात असलेल्या चार टॉवरची किंमत 7500 कोटी रुपये

सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत. 30 लाख स्क्वेअर फूटाच्या या टॉवरमध्ये 800 आलिशान निवासी सदनिका आहेत. त्यांची किंमत 6 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चार प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात एक ट्रम्प टॉवर आहे. तेथेही एक नवीन कॉम्पलेक्स बांधले जाणार आहे. यात निवासी टॉवरसह, ऑफिस स्पेस, असणार आहेत. याशिवाय नोएडा, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये ट्रम्प ब्रँडेड गोल्फ कोर्स आणि व्हिला बांधण्याची योजना आहे.

 





Source link

Kho Kho World Cup Final : भारतानं खो-खो वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा

0
Kho Kho World Cup Final : भारतानं खो-खो वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा


India vs Nepal Mens Kho Kho Final : खो-खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले.



Source link

महिला प्राध्यापकांना मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांपर्यंत रजा, UGC चा महत्वाचा निर्णय!

0
महिला प्राध्यापकांना मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांपर्यंत रजा, UGC चा महत्वाचा निर्णय!


Female Professors Leave: महिला प्राध्यापकांच्या सुट्टीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार महिला प्राध्यापकांना आता 2 वर्षांपर्यंत बालसंगोपन रजा घेता येणार आहे. महिला काम करत असलेल्या उच्च शैक्षणिक संस्था रजा नाकारु शकणार नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) UGC नियमन 2025 मध्ये बालसंगोपनाची तरतूद समाविष्ट केली आहे. 

जर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेने नियमांचे पालन केले नाही तर संस्थेवर बंदी घातली जाऊ शकते. अनेकदा महिला प्राध्यापक त्यांच्या संगोपनाची रजा दिली जात नसल्याची तक्रार करतात. या समस्या लक्षात घेत यूजीसीने नवीन नियमांमध्ये याचा समावेश केला आहे.जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर आयोग संबंधित उच्च शैक्षणिक संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करू शकतो, असे यूजीसी नियम 2025 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. यामध्ये कोणत्याही पदवी कार्यक्रमात प्रवेशावर बंदी, दंड, संबंधित अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करणे, संबंधित संस्थेवर बंदी घालणे इत्यादींचा समावेश आहे.

युजीसीकडून 3 विद्यापीठांवर बंदी 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राजस्थानमधील 3 विद्यापीठांना पुढील 5 वर्षांसाठी पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यास बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यापीठांमधील पदव्या नियमित शिकवण्यावर तडजोड करण्यात आली. चुरू येथील ओपीजेएस विद्यापीठ, अलवर येथील सनराइज युनिव्हर्सिटी आणि झुनझुनू येथील सिंघानिया युनिव्हर्सिटीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

सहायक प्राध्यापक पदासाठी NET ची गरज नाही

यूजीसीने जारी केलेल्या ड्राफ्टनुसार, किमान 55 टक्के गुणांसह मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी (एमटेक) मध्ये पीजी डिग्री असलेल्यांना थेट सहायक प्राध्यापक भरतीची परवानगी मिळणार आहे. यासाठी त्यांना नेट क्वालिफाइड होण्याची आवश्यकता नसेल. उमेदवारांना त्यांच्या सर्वोच्च शैक्षणिक कौशल्याच्या आधारे शिकवण्याची परवानगी देण्यासाठी UGC द्वारे नियम तयार केले जात आहेत. यानुसार आता कोणत्याही विषयात यूजी आणि पीजीचे शिक्षण घेतलेले पण पीएचडी किंवा नेट विषय असलेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. उदाहरणार्थ, रसायनशास्त्रात पीएचडी असलेला उमेदवार, गणितात बॅचलर पदवी आणि भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार रसायनशास्त्र शिकवण्यासाठी पात्र आहे. त्याचप्रमाणे यूजी, पीजी व्यतिरिक्त इतर विषयात त्यांची पहिली राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नेटसाठी अर्हता प्राप्त करु शकतात.

कुलगुरूंसाठी नवे नियम 

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी उमेदवाराला 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक नाही. संबंधित क्षेत्रात 10 वर्षे काम केलेले आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले क्षेत्रतज्ज्ञ या पदासाठी पात्र असतील, तर आतापर्यंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ आवश्यक होता.

नेट आणि पीएचडी विषयांमधून करू शकता अर्ज 

नेट विषयांमध्येही सूट देण्यासाठी यूजीसीने मसुदा तयार केला आहे. म्हणजे नेट परीक्षेचा विषय जरी यूजी आणि पीजीपेक्षा वेगळा असला तरी संबंधित विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचा पीएचडी विषय यूजी आणि पीजी विषयांपेक्षा वेगळा असेल तर ते पीएचडी विषयांमधून प्राध्यापक होऊ शकतात. यासाठी यूजी आणि पीजीमध्ये संबंधित विषय अनिवार्य असणार नाहीत, असे  यूजीसीने तयार केलेल्या मसुद्यात म्हटले आहे. 





Source link

Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता मालामाल होणार! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, प्राईज मनी किती? पाहा

0
Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता मालामाल होणार! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, प्राईज मनी किती? पाहा


Bigg Boss 18 Finale : टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ चा आज ग्रँड फिनाले आहे. शोच्या अंतिम फेरीत ६ स्पर्धक पोहोचले आहेत. विवियन डिसेना, ईशा सिंह, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा हे फिनालेमध्ये दिसणार आहेत.



Source link

Kho Kho World Cup : प्रियांका इंगळेच्या संघानं इतिहास घडवला, भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला

0
Kho Kho World Cup : प्रियांका इंगळेच्या संघानं इतिहास घडवला, भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला


Kho Kho World Cup 2025 : भारताच्या महिला संघाने खो-खो वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० असा पराभव करून इतिहास घडवला. सुरुवातीपासूनच भारतीय महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला थक्क केले. प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपदावर कब्जा केला.



Source link

VIDEO : हायस्कूलमध्ये शिक्षक-शिक्षिकेने केला मर्यादा पार, ‘ओयो’ ला लाजवेल असे अश्लिल कृत्य CCTVत कैद

0
VIDEO : हायस्कूलमध्ये शिक्षक-शिक्षिकेने केला मर्यादा पार, ‘ओयो’ ला लाजवेल असे अश्लिल कृत्य CCTVत कैद



Viral Video :  एका शाळेतील महिला शिक्षक आणि शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील त्यांचे अश्लिल कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात. 



Source link