
Goa News : गोव्यात एक विचित्र दुर्घटना घडली आहे. पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Source link

Goa News : गोव्यात एक विचित्र दुर्घटना घडली आहे. पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Source link

UP Crime: गेलेला माणूस येईल म्हणून शोरुमवाले वाट पाहत राहिले. पण त्यांना शेवटपर्यंत वाट पाहतच राहावी लागली.
Source link

BJP President : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड १० ते २० फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा दिल्ली निवडणुकीपर्यंत भाजपचे अध्यक्ष राहणार आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांचा पक्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. मात्र, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

Tik Tok Ban USA : भारतानंतर आता अमेरिकेने चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. या बाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या बंदीमुले अमेरिकेतील नागरिक या लोकप्रिय शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याच्या कायद्याला मंजुरी दिली.

IIT Baba in Mahakumbh: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 मोठ्या उत्साहात सुरु आहे. देशभरातील साधुसंत येथे कुंभ स्नानासाठी आले आहेत. या महाकुंभ दरम्यान अनेक साधुंनी आपले लक्ष वेधून घेतले. त्यात आयआयटी बाबा सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. त्यांचे खूप व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत. गेल्या काही दिवसांपासून आयआयटी बाबा विविध माध्यम वाहिन्यांना मुलाखती देत आहेत. मोठ्या पगाराच्या नोकरीचा त्याग करुन त्यांनी अध्यात्माचा मार्ग का निवडला? याबद्दल ते सांगत आहेत. दरम्यान जुना आखाडाकडून आलेल्या एका विधानामुळे आयाआयटी बाबा अडचणीत आले आले आहेत.
जुना आखाड्याने आयआयटी बाबांची ‘हकालपट्टी’ केली असल्याची बातमी समोर आली आहे. हकालपट्टीचे कारण काय होते हे अद्याप कोणालाही माहिती नव्हते. पण आता जूना आखाड्याचे सचिव महंत डॉ. कर्णपुरी महाराज यांनी पहिल्यांदाच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
जूना आखाड्याचे सचिव महंत डॉ. करणपुरी महाराज यांनीआयआयटी बाबाबद्दल वक्तव्य केले आहे. आयआयटी बाबा आखाड्याचे नव्हते. ते खूप उद्धट होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबून जेवत असत, असे महंत डॉ. करणपुरी यांनी म्हटले. आयआयटी बाबा टीव्हीवर कुठेही काहीतरी बोलायचे. ते खूप वाईट माणूस असून त्यांना मारहाण करून बाहेर हाकलून लावले जायचे. ते आखाड्याची बदनामी करत होते, असेही ते पुढे म्हणाले.
आपण अनेक गुरुंकडे वेगवेगळ्या विद्या शिकलो, त्यामुळे माझे अनेक गुरु आहेत, असे आयआयटी बाबाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते. पण जुना आखाडाकडून आयआयटी बाबाचे हे विधानही खोडून काढण्यात आले. आयआयटी बाबा येथे फिरत फिरत आले होते, ते कोणाच्या माध्यमातून रिंगणात आले नव्हते. तसेच, ते कोणाचेही शिष्य नव्हते असे डॉ. करणपुरी यांनी म्हटलंय. आयआयटी बाबा चुकीच्या गोष्टी बोलत होते आणि त्यांनी ऐकलेल्या एखाद्याचे नाव वापरायचे असेही ते म्हणाले. सोमेश्वर पुरी यांचे नाव आयाआयटी बाबा सांगतात. पण सोमेश्वर पुरी यांच्या निधनाला 20 वर्षे झाली आहेत. मग आयआयटी बाबा त्यांचे शिष्य कसे असू शकतात? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुळात आयआयटी बाबा आखाड्याचा भाग कधी झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही. कोणाचे तरी नाव सांगून ते इकडे तिकडे पडून राहायचे. कधी याच्या तंबूत तर कधी त्यांच्या तंबूत आणि खाण्यापिण्यानंतर ते पळून जायचे, असेही त्यांनी सांगितले.
आयआयटी बाबा बराच काळ इथे नव्हते. जेव्हा सर्वांना कळले तेव्हा त्यांना येऊ दिले नाही. त्याला कोणी जवळ बसू दिले नाही, तसेच अन्नही दिले नाही. उलट हाकलून लावले. काही दिवसांपूर्वी त्यांना हाकलून लावण्यात आले होते. कोणीही त्याच्याशी संवाद साधत नाही किंवा कोणीही त्यांना आपल्याजवळ बसू देत नाही, असेही त्यांनी सांगितले.
आयआयटी बाबांच्या या कृतींमुळे आखाड्यात प्रचंड संताप आहे. ज्यांच्याकडे आखाड्याची ओळख आहे, अशा लोकांचा आखाडा आदर करतो. या व्यक्तीने अनेक दिवसांपासून त्याचे सत्य लोकांपासून लपवून ठेवले आहे. जे पूर्णपणे चुकीचे असल्याचे आखाड्याच्या सचिवांनी म्हटले आहे.

Morocco to cull 3 million stray dogs : फिफा वर्ल्डकप २०३० चे यजमानपद मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल भुषवणार आहेत. या स्पर्धेपूर्वी मोरोक्को सरकारने एक मोठी आणि विचित्र घोषणा केली आहे. या निर्णयावर आता जगभरातून टीका होत आहे. खरं तर, मोरोक्कोने फिफा विश्वचषकाआधी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची योजना जाहीर केली आहे.

Jammu Kashmir Children Mysterious Deaths: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका रहस्यमय आजाराने कहर केला आहे, डिसेंबर २०२४ च्या सुरुवातीपासून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३८ जणांना त्याची लागण झाली आहे. इतकंच नव्हे तर गावांगावात भूत-प्रेत आणि जादूटोण्याच्या अफवादेखील रंगू लागल्या आहेत. या आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी एसआयटीचे पथकाची नेमणूक करावी आणि तपासाला सुरुवात केली जात आहे. या एसआयटीच्या पथकात पोलिस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारीदेखील आहेत. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांनी शुक्रवारी जम्मूच्या शालामार रुग्णालयाचा दौरा करत पीडित कुटुंबीयासोबत चर्चा केली.
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू कशामुळं होत आहेत. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राजौरी गावातील बडाल गावांत आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येत आहे. तपास यंत्रणांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणी जाणूनबुजून असा प्रकार करत असेल तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी आरोग्य आणि पोलिस विभाग यांना राजौरी जिल्ह्यातील बदहाल गावात झालेल्या रहस्यमय मृत्यूंची चौकशी व्हावी असे आदेश दिले आहेत. गावातील स्थितींवर चर्चा करण्यासाठी एका उच्चस्तरिय बैठकदेखील बोलवण्यात आली होती. आत्तापर्यंत प्रभावीत ठिकाणी 3 हजाराहून अधिक रहिवाशांच्या घरी जावून सर्वेक्षण केले आहे. यावेळी पाणी, जेवण आणि अन्य साहित्यांचे नमुने घेण्यात आले असून त्याची तपासणी होणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, भारतीय सैन्य आता या भागात तैनात करण्यात आले आहे, जे स्थानिक रहिवाशांना अन्न, पाणी आणि निवारा यासारख्या आवश्यक वस्तू पुरवत आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी या गावातील मृत्यू हे न्यूरोटॉक्सिनमुळे झाले आहेत. राजौरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) प्राचार्य डॉ. ए.एस. भाटिया आणि बुधलचे आमदार जावेद इक्बाल चौधरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली.
मृतांमध्ये काही लक्षणे समान दिसून आली आहेत. डॉ. भाटिया म्हणाले की, सर्व मृतांमध्ये मेंदूला सूज येणे किंवा एडेमा ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. त्यांनी बाधित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली. केरी येथील डोंगराळ भागात झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २६) आणि पायलट सुमल नेपाळी (वय २६) यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली.

Manu Bhaker: मनू भाकर यांच्या आजीचे नाव सावित्री देवी आणि मामाचे नाव युद्धवीर होते.
Source link

Raigad Guardian Minister Issue: पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात मोठा राडा झाला आहे. रायगडचे पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे भरत गोगवले आग्रही होते. मात्र, त्यांची निवड न करता रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगवले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी काल मुंबई गोवा मार्गवर जमत टायर पेटवले. तसेच हा मार्ग रोखून धरला. यामुळे मार्गवार वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.