
Kerala Sea Surge : 2050 पर्यंत मुंबईसह भारतातील काही शहर समुद्रात बुडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी एक शहर हे आता डेंजर झोनमध्ये आले आहे.
Source link

Kerala Sea Surge : 2050 पर्यंत मुंबईसह भारतातील काही शहर समुद्रात बुडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी एक शहर हे आता डेंजर झोनमध्ये आले आहे.
Source link

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.

जिंती (ता. फलटण), दि. १४: जिंती गावात प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना घडली. प्रल्हाद मारुती रणवरे यांना सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांच्या घरासमोरील डांबरी रस्त्यावर एक प्लॅस्टिक पिशवी सापडली. या पिशवीत एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, चांदीच्या पायपट्ट्या, सहा वारी साडी आणि तंबाखूची पिशवी होती.
रणवरे कुटुंबातील प्रल्हाद रणवरे, त्यांचा मुलगा गणेश रणवरे व भावकीतील दिलीप सदाशिव रणवरे यांनी प्रामाणिकपणे ती पिशवी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून जमा केली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गहाळ वस्तूंच्या ओळखीबाबत आवाहन केले. त्यानुसार, या वस्तू रावडी खुर्द (ता. फलटण) येथील बाळकृष्ण होळकर यांच्या असल्याचे निष्पन्न झाले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रल्हाद रणवरे यांच्या हस्ते या वस्तू मूळ मालक बाळकृष्ण होळकर यांना सुपूर्द करण्यात आल्या. रणवरे कुटुंबाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, पो हवा वैभव सूर्यवंशी, म पो हवा उर्मीला पेंदाम, पो ना अमोल जगदाळे, गणेश रणवरे, दिलीप रणवरे आणि सस्तेवाडी गावचे पोलीस पाटील सस्ते उपस्थित होते.

इंफोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी आठवड्यातील 70 तास काम केलं पाहिजे असं विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा कामाच्या तासांवर भाष्य केलं आहे. कोणीही दुसऱ्या व्यक्तीवर जास्त कामाचे तास लादू नयेत आणि हे मुद्दे चर्चेसाठी नाहीत तर आत्मपरीक्षणासाठी आहेत यावर त्यांनी भर दिला आहे.
“मी हेच सांगू शकतो की, मी सकाळी 6.20 ला ऑफिसला जायचो आणि 8.30 ला घरी जात असे. हे तथ्य आहे आणि मी केलं आहे. कोणीही हे नाकारु शकत नाही आणि चुकीचं म्हणू शकत नाही. मी सलग 40 वर्षं हे केलं आहे. मला वाटतं हे काही वादाचे विषय नाहीत. त्यावर चर्चा करावी, पण वाद घालू नये. हे असे मुद्दे आहेत ज्यावर कोणीही आत्मपरीक्षण करू शकतो, ते आत्मसात करू शकतो आणि एखाद्या निष्कर्षावर येऊ शकतो आणि जे काही करायचे ते करू शकतो. कोणीही म्हणू शकत नाही की, तुम्ही ते करावे, तुम्ही ते करू नये, नाही,” असं नारायण मूर्ती यांनी मुंबईतील कार्यक्रमात म्हटलं.
78 वर्षीय नारायण मूर्ती यांनी यापूर्वी जर भारताला जागतिक स्तरावर आपली पूर्ण क्षमता साकार करायची असेल तर भारतातील तरुण कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम स्वीकारावे लागतील असं म्हटलं होतं.
ऑक्टोबर 2023 मध्ये एका पॉडकास्ट दरम्यान, नारायण मूर्ती म्हणाले होते की, “भारताची कामाची उत्पादकता जगातील सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण आपली कामाची उत्पादकता सुधारत नाही, सरकारमधील भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी करत नाही, कारण आपण सतत वाचत आहोत, मला त्याचे सत्य माहित नाही, जोपर्यंत आपण हा निर्णय घेण्यातील आपल्या नोकरशाहीतील विलंब कमी करत नाही, तोपर्यंत आपण त्या देशांशी स्पर्धा करू शकणार नाही ज्यांनी प्रचंड प्रगती केली आहे. म्हणून, माझी विनंती आहे की आपल्या तरुणांनी ‘हा माझा देश आहे. मला आठवड्यातून 70 तास काम करायचे आहे’ असं म्हणावे.” त्यांनी यावेळी दुसऱ्या महायुद्धातील जर्मन आणि जपानी लोकांची उदाहरणे दिली होती.
नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. उद्योग जगतातील एका ज्येष्ठ उद्योजकाच्या अशा टिप्पणीमुळे कर्मचाऱ्यांचे शोषण होईल आणि काम आणि जीवनातील संतुलन राखण्याची गरज आहे असं मत अनेक सोशल मीडिया युजर्सनी मांडलं होतं. अनेकांनी असे निदर्शनास आणून दिलं होतं की, कमी वेतन असलेल्या सुरुवातीच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून अशा कामाची अपेक्षा करणं अन्याय आहे. तर काहींनी कामाच्या तासांवर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असं मत मांडलं होतं.
बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘लार्सन अँड टुब्रो’ म्हणजेच ‘एल अँण्ड टी’चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी केलेल्या एका विधानामुळे ऑफिस आणि खासगी आयुष्य यांचा समतोल राखण्याचा विषय चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एसएन सुब्रमण्यन सांगत आहेत की , “मला वाईट वाटतं की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावलं तर मी अधिक आनंदी होईन, कारण मी रविवारी काम करतो.” यावेळी त्यांनी कर्मचारी घरी घालवत असलेल्या वेळेवरी टिप्पणी केली. “तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? चला, ऑफिसला जा आणि कामाला लागा,” असंही ते म्हणाले. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

फलटण: नाईकबोमवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि धनगर समाजाचे नेते माऊली कारंडे यांनी ज्येष्ठ नागरिक तुकाराम खुसपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी सरपंच निवृत्ती खुसपे, बापुराव चव्हाण, संदीप कदम, अक्षय पिसाळ, दयानंद घाडगे, सुखदेव चव्हाण यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
माऊली कारंडे यांच्या प्रवेशामुळे नाईकबोमवाडी व परिसरात भाजपची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गावाच्या विकासाला नवी दिशा:
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रसंगी बोलताना माऊली कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केले. तसेच, तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
रोजगार निर्मितीवर भर:
नाईक निंबाळकर यांनी नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. यामुळे गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय, गावातील कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकद देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या क्वार्टर फायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा ४-६,६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या या सामन्यात जोकोविचला पहिल्या सेटमध्ये ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर ३७ वर्षीय स्टार खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून सामना जिंकला.

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र तुम्ही केसांनी चोरी झाल्याची घटना ऐकलीय का? नाही ना. मात्र हरियाणातील फरिदाबादमध्ये केसांची चोरीची घटना घडली आहे.
Source link

जगातील सर्वात महान, सर्वात शक्तिशाली, सर्वात आदरणीय राष्ट्र म्हणून अमेरिका आपले हक्काचे स्थान परत मिळवेल आणि देशाला संपूर्ण जगाचे कौतुक मिळवून देईल, असे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे नेते ७८ वर्षीय ट्रम्प मजबूत नेतृत्व आणि शक्तिशाली राष्ट्राध्यक्षाची दृष्टी घेऊन व्हाईट हाऊसमध्ये परतले. इमिग्रेशन, टॅरिफ आणि ऊर्जेसह अनेक क्षेत्रात अमेरिकेची धोरणे आक्रमकपणे बदलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Neeraj Chopra Wife : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा १७ जानेवारीला विवाहबद्ध झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

अभिनेता सैफ अली खान आता पाच दिवसानंतर रुग्णालयातून घरी परतला आहे. अभिनेत्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. अभिनेत्यावर २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, सैफच्या घट्ट पकडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी आरोपीने अभिनेत्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर तो इमारतीच्या गार्डनमध्ये २ तास लपून बसला होता.