Monday, August 3, 2026
Home Blog Page 583

RRB 2025 News : रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ३२००० हून जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

0
RRB 2025 News : रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ३२००० हून जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज


Railway Jobs News in Marathi : रेल्वे भरती बोर्डानं आजपासून ३२ हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ ही आहे. याशिवाय २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ या अर्ज शुल्क भरून नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.



Source link

Republic Day: कर्तव्य परेडची तिकीट किती रुपये? कसं करायचं ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या!

0
Republic Day: कर्तव्य परेडची तिकीट किती रुपये? कसं करायचं ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या!


Republic day kartvya path Booking: 26 जानेवारी रोजी आपण 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. शाळा, कॉलेज, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदन केले जाईल. अशावेळी सर्वांच्या नजरा कर्तव्यपथावर होणाऱ्या कार्यक्रमावर आहे. या दिवशी होणाऱ्या परेडमध्ये देशभक्ती, संस्कृती आणि एकतेची भावना पाहायला मिळते. हा सोहळा पाहणे म्हणजे भारतीयांसाठी एक पर्वणीच असते. ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहायचाय, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृह विभागाने तिकीट बुकींग सोपी केली आहे. 76 व्या प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे तिकीट बुकींग करण्याची सुविधा आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येकजण या कार्यक्रमाचा भाग होऊ शकता. 

ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट बुकींग कशी करायची? याची सोपी पद्धत जाणून घेऊया. पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग बनू शकता. 

ऑनलाइन तिकीट बुकींग कशी करायची? 

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://aamantran.mod.gov.in/login वर जा. येथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील. प्रजासत्ताक दिन किंवा आकर्षक बीटिंग रिट्रीट यापैकी तुम्हाला ज्यात सहभागी व्हायचे असले तो एक पर्याय निवडा. आता व्हेरिफिकेशनसाठी ओळखपत्र आणि मोबाईल नंबर टाका. आता आपले तिकीट निवडा आणि पेमेंट करा. तुमची ऑनलाइन रिपब्लिक परेड डेची तिकीट बुकींग प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. 

ऑफलाइन तिकीट बुकींग कशी करायची? 

7 जानेवारीपासून ऑफलाइन तिकीट बुकींग सुरु झाली आहे. जी 25 जानेवारीपर्यंत सुरु राहीलं. प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी बनवण्यात आलेल्या आऊटलेट्सवर तिकीट बुकींग करावी लागेल. येताना स्वत:सोबत एक फोटो आणि आयडी कार्ड (आधार, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) आणावे. आऊटलेट्सवर जाऊन तुमची कॅटेगरी निवडा. रिझर्व्ह सीट्सची तिकीट 500 रुपये, अनारक्षित सीट्सची तिकिट 100 रुपये आणि किमान दृश्यांची तिकीट 20 रुपये आहे. तुम्ही यातील कोणतेही एक तिकीट घेऊन पेमेंट रिसिप्ट घ्या. यानंतर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होऊ शकता.  

तुम्ही एका वेळेस 4 तिकीट्स खरेदी करु शकता. आमंत्रण अॅपवरुनदेखील तुम्ही तिकीट बुकींग करु शकता. तुमच्या मोबाईलवर आमंत्रण अॅप डाऊनलोड करा आणि त्याद्वारे तिकीट बुकींग करा. आयओएएस आणि अॅण्ड्रॉइड दोन्हीकडे हे उपलब्ध आहे.

प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण कुठे पाहणार?

प्रजासत्ताक दिनाची परेड आणि चित्ररथ सादरीकरण पाहण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी तिकीट विक्री खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण तुम्ही ही परेड घरबसल्या पाहू शकता. जगभरातील भारतीयांना ही परेड पाहता यावी यासाठी प्रसारमाध्यमांवरून यांचे थेट प्रक्षेपण केले जाते. भारताचे राष्ट्रीय प्रसारणकर्ता असलेल्या दूरदर्शन (Doordarshan) वाहिनीवर या संपूर्ण परेडचे थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येईल. दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरूनही आपण परेडचे थेट प्रक्षेपण पाहू शकतो. दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवरूनदेखील परेडचे थेट प्रसारण केले जाते. दूरदर्शनसोबत आकाशवाणीच्या अधिकृत रेडिओ वाहिनींवर याचे थेट प्रसारण ऐकता येणार आहे.





Source link

Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी

0
Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी


चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना तक्रारदाराला तीन महिन्यांत ३ लाख ७२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरूंगावास होणार आहे.



Source link

पत्नीची हत्या केल्यानंतर तुकडे केले, नंतर प्रेशर कुकरमध्ये टाकून तीन दिवस….; पोलीसही चक्रावले

0
पत्नीची हत्या केल्यानंतर तुकडे केले, नंतर प्रेशर कुकरमध्ये टाकून तीन दिवस….; पोलीसही चक्रावले



Hyderabad Murder: हैदराबादमध्ये एका पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन नंतर ते प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. यानंतर त्याने ते एका तळ्यात टाकून दिले अशी कबुली दिली आहे. 
 



Source link

Indian Railways: प्रत्येक ट्रेनच्या मागे असणार ‘X’ चं चिन्ह वंदे भारतच्या मागे का नसतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल

0
Indian Railways: प्रत्येक ट्रेनच्या मागे असणार ‘X’ चं चिन्ह वंदे भारतच्या मागे का नसतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल



Indian Railway Interesting Facts: काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे रुळांवर उतरवली होती. वंदे भारत ही सेमी हाईस्पीड ट्रेन असून यात प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा आहेत. 



Source link

Mahakumbh 2025 : मोनालिसासोबतच्या एका फोटोसाठी जबरदस्ती टेंटमध्ये घुसले अन्…

0
Mahakumbh 2025 : मोनालिसासोबतच्या एका फोटोसाठी जबरदस्ती टेंटमध्ये घुसले अन्…



Mahakumbh 2025 Monalisa : महाकुंभ 2025 मधील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोकप्रियता मिळालेल्या मोनालिसाच्या टेन्टमध्ये जबरदस्ती घुसले अन्…



Source link

भारतीय कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला जायला हवं? ते काम मंत्रालयातूनही होऊ शकतं; काँग्रेसनं यादीच दिली!

0
भारतीय कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला जायला हवं? ते काम मंत्रालयातूनही होऊ शकतं; काँग्रेसनं यादीच दिली!


Congress on Davos Tour : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिष्टमंडळाच्या दावोस दौऱ्यावरच काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलं आहे. ‘महाराष्ट्रात मुख्यालयं असलेल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जायची काय गरज आहे,’ असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.



Source link

पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ

0
पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ


Pune Kharadi Crime : पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किरकोळ कारणातून हत्या करण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. खराडी येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पाच वर्षांच्या मुलासमोर पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने व्हिडिओ काढत अनेक गंभीर आरोप देखील केले आहे.  हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना बुधवारी (दि २२) पहाटेच्या सुमारास रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.



Source link

Filmy Kissa : २०२४ ची ‘महाडिझास्टर’ फिल्म! सुपरस्टारचा लेक मुख्य भूमिकेत असूनही कुणीच पाहिला नाही चित्रपट!

0
Filmy Kissa : २०२४ ची ‘महाडिझास्टर’ फिल्म! सुपरस्टारचा लेक मुख्य भूमिकेत असूनही कुणीच पाहिला नाही चित्रपट!


Bollywood Filmy Kissa : २०२४ मध्ये अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मैदान’, ‘खेल खेल में’, ‘कंगुवा’, ‘इंडियन २’ यांसारख्या चित्रपटांची जादू चालली नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाचे नाव सांगणार आहोत, ज्याची कमाई ऐकून तुम्हालाही हसू येईल.



Source link

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव

0
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये दहशत! तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव


Donald Trump Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माने नागरिकत्व देण्याच्या निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतल्याने गरोदर महिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्व तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी या महिला दवाखान्यात धाव घेत आहेत. अमेरिकेचा नवा कायदा हा २० फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे हा कायदा लागू होण्यापूर्वी अनेक गरोदर महिलांना बाळाला जन्म द्यायचा आहे.  ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अनेक अमेरिकन नागरिकांचा या निर्णयाला विरोध असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.



Source link