Monday, August 3, 2026
Home Blog Page 582

Pimpri Chinchwad: प्रियकराच्या नेहमीच्या त्रासाला वैतागली, मित्रांच्या सहाय्याने त्याचा काढला कायमचा काटा

0
Pimpri Chinchwad: प्रियकराच्या नेहमीच्या त्रासाला वैतागली, मित्रांच्या सहाय्याने त्याचा काढला कायमचा काटा



Girl kills Boyfriend In Pimpri Chinchwad: प्रियकराच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून प्रेयसीने मित्रांच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढला.



Source link

Yek Number Movie: घरबसल्या ‘येक नंबर’ सिनेमा पाहायचा आहे? वाचा कधी आणि कुठे पाहाता येणार

0
Yek Number Movie: घरबसल्या ‘येक नंबर’ सिनेमा पाहायचा आहे? वाचा कधी आणि कुठे पाहाता येणार


‘येक नंबर’ हा मराठी चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा चांगलाच चर्चेत होता. तेजस्विनी पंडीत मुख्य भूमिकेत असणारा हा सिनेमा भलताच गाजला होता. एका कट्टर कार्यकर्त्याच्या निष्ठा, संघर्ष, आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहण्याची संधी मिळाली नाही आता त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर होणार आहे. कधी आणि कुठे हा सिनेमा पाहायला मिळणार? चला जाणून घेऊया…



Source link

Novak Djokovic : जोकोचविचची संघर्षकथा, एकेकाळी दूध-ब्रेडसाठी रांगेत उभं राहायचा, आज सर्वात यशस्वी टेनिसपटू बनला

0
Novak Djokovic : जोकोचविचची संघर्षकथा, एकेकाळी दूध-ब्रेडसाठी रांगेत उभं राहायचा, आज सर्वात यशस्वी टेनिसपटू बनला



Novak Djokovic Story : जोकोविचचा जन्म २२ मे १९८७ रोजी सर्बियामध्ये झाला. त्याने २००३ मध्ये आपल्या प्रोफेशनल टेनिस कारकिर्दीला सुरुवात केली.



Source link

WEF 2025: राज्यातील ३ लाख लोकांना नोकऱ्या मिळणार, रिलायन्सचा महाराष्ट्र सरकारशी करार, फडणवीसांची माहिती

0
WEF 2025: राज्यातील ३ लाख लोकांना नोकऱ्या मिळणार, रिलायन्सचा महाराष्ट्र सरकारशी करार, फडणवीसांची माहिती


Maharashtra Job: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात नवीन ऊर्जा, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन पॉवर आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमध्ये ३,०५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीदरम्यान ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्स ग्रुपच्या वतीने अनंत अंबानी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. यामुळे राज्यातील तीन लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.



Source link

Student Suicide: वर्गातून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

0
Student Suicide: वर्गातून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर


AP Student Suicide News: आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील नारायणा महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. वर्गाच्या वेळेत घडलेली ही धक्कादायक घटना महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली.



Source link

Republic Day 2025: 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये नेमका फरक काय? झेंडा फडकावण्याची पद्धतही वेगळी

0
Republic Day 2025: 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये नेमका फरक काय? झेंडा फडकावण्याची पद्धतही वेगळी


26 January and 15 August Difference: प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्वाचे दिवस आहेत. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी हे दिवस साजरे केले जातात. भारत यावर्षी 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल, जो रविवारी येत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, ज्यामुळे भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आधी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करतील. परंपरेनुसार, दोन्ही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. या दोन दिवस साजरे करण्याच्या पद्धतीमधील काही फरक आणि त्यांचे महत्त्व समजून घ्या.

प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाले त्या दिवसाची आठवण करून देतो. भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारतातील दोन सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, जो ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर प्रजासत्ताक दिन 26  जानेवारी रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या आणि 1950  मध्ये देशाचे प्रजासत्ताकात रूपांतर झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

ध्वज कसा फडकवायचा?

परंपरेनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, 14 ऑगस्ट रोजी, भारताचे राष्ट्रपती दूरदर्शनवरून ‘राष्ट्राला संबोधित’ करतात. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी सकाळी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि त्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित करतात.

याउलट, प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात परेड असते, ज्यामध्ये राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. या कार्यक्रमात भारताचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या परेड आणि हवाई शोचे प्रदर्शन केले जाते.

पुरस्कार आणि सन्मान

समाज आणि राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. तर, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर देशाच्या कामगिरी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर भाषण देतात.

कार्यक्रमातील फरक

प्रजासत्ताक दिनी शाळा आणि महाविद्यालये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. इंडिया गेटवर एका विशेष समारंभात शहीदांना सन्मानित केले जाते आणि दूरदर्शनवर देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात. तर, स्वातंत्र्यदिनात भारताच्या लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन केले जाते. 





Source link

Mpox Virus: देशासमोर नवं संकट! दुबईहून परतलेल्या व्यक्तीची एमपॉक्स चाचणी पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

0
Mpox Virus: देशासमोर नवं संकट! दुबईहून परतलेल्या व्यक्तीची एमपॉक्स चाचणी पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल


Mpox Virus Outbreak: देशातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. नुकताच दुबईहून परतलेल्या बेंगळुरू येथील एका व्यक्तीची एमपॉक्स विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्याला मंकीपॉक्स म्हणून ओळखली जात होते. या ४० वर्षीय रुग्णावर सध्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कर्नाटकातील या वर्षातील हा पहिलाच एमपॉक्स रुग्ण आहे. त्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.



Source link

Chhaava Trailer : ‘हिंदवी’ शब्द वगळला, छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखवले! ‘छावा’वर नेटकरी संतापले

0
Chhaava Trailer : ‘हिंदवी’ शब्द वगळला, छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखवले! ‘छावा’वर नेटकरी संतापले


Chhaava Trailer Reaction : ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर खळबळ उडाली, तर इतिहासप्रेमींकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.



Source link

Mona Lisa : काही लोक जबरदस्तीनं माझ्या तंबूत घुसले आणि…; कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन

0
Mona Lisa : काही लोक जबरदस्तीनं माझ्या तंबूत घुसले आणि…; कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन


मोनालिसा दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काही तरुण तिच्या तंबूत घुसले आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करू लागले, असा तिने आरोप केला आहे. त्या तरुणांनी मोनालिसाला सांगितले की, तुझ्या वडिलांनी आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी पाठवले आहे, असे सांगितले. पण तिने स्पष्ट नकार दिला. तेवढ्यात मोनालिसाचे वडील तिथे पोहोचले आणि त्या तरुणांना तुम्ही आत कसे घुसले, असा जाब विचारला. तिने आपल्या वडिलांना विचारले की, तुम्ही यांना पाठवले होते का? तर त्यांनी नाही असे उत्तर दिले. यामुळे माझ्या भावाने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला असता तरुणांनी त्याला मारहाण केली. आता मला भिती वाटते की, येथे कोणी तर नाही ना? कोणी काही करणार नाही. इथे लाईट नाही, काहीच नाही, तरीही लोक जबरदस्तीने तंबूत घुसतात, अशी भिती तिने व्यक्त केली.



Source link

आयफोन व अँड्रॉइड फोनमध्ये वेगवेगळे भाडे कसे? ओला आणि उबरला केंद्र सरकारने पाठवली नोटीस

0
आयफोन व अँड्रॉइड फोनमध्ये वेगवेगळे भाडे कसे? ओला आणि उबरला केंद्र सरकारने पाठवली नोटीस


Ola and Uber fare issue :  आयफोन आणि अँड्रॉइड फोन धारकांना ओला आणि उबेर वेगवेगळे भाडे आकारारन भेदभाव करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपन्या करत असलेल्या या भेदभावामुळे केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना नोटिस पाठवली असून या बाबत जाब विचारला आहे. 



Source link