Monday, August 3, 2026
Home Blog Page 581

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा इशारा, पुण्यासह राज्यात हवामानात मोठे बदल

0
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा इशारा, पुण्यासह राज्यात  हवामानात मोठे बदल


Maharashtra Weather Update :राज्यात हवामानात मोठे बदल होत आहे. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे थंडी देखील वाढत आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री कमालीची थंडी पडत आहे. तर दुपारी उन्हामुले जिवाची लाही लाही होत आहे. दरम्यान, चक्राकार वाऱ्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



Source link

जोरदार पाऊस अन्… IMD कडून हवामानाचा नवा इशारा जारी; मुंबईसह महाराष्ट्रात काय स्थिती?

0
जोरदार पाऊस अन्… IMD कडून हवामानाचा नवा इशारा जारी; मुंबईसह महाराष्ट्रात काय स्थिती?


Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे. शहरात गारठा परतताना दिसत आहे. असं असलं तरीही दुपारच्या वेळी जाणवणारा उष्मा मात्र पाठ सोडताना दिसत नाहीय.  पुढील 48 तास या भागांमध्ये हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशासह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, त्यामुळं चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. त्यातच उत्तरेकडून सातत्यानं शीतलहरींचा सुरु असणारा मारा आणि पश्चिमी झंझावातामुळं राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. 

मुंबईकरांना पुन्हा हुडहूडी 

मागील काही दिवस मुंबईतील तापमानात चढ – उतार सुरू असून, गारठा वाढला असला तरीही दिवसभराचं तापमान वाढत असल्यानं ऊन्हाचा दाह अधिक त्रासदायक ठरत आहे. शनिवार आणि रविवारी शहरातील कमाल तापमान 32 ते 33 अंशांदरम्यान राहणार असून, 16 ते 18 अंशांदरम्यान राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

आयएमडीनं दिला जोरदार पावसाचा इशारा… 

उत्तर भारताला आयएमडीनं कडाक्याच्या थंडीसह जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. तर, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या उत्तरेकडे सध्या पश्चिमी झंझावात आणि दक्षिणी वाऱ्यांमुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत असून, 24 जानेवारीनंतर ही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता असून, उत्तर प्रदेशातील पश्चिम क्षेत्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह लक्षद्वीप इथंही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात थंडीचा ऋतू सुरू असतानाच बदललेल्या हवामान प्रणालीमुळं पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालय सह हिमाचलचा काही भाह आणि पूर्व राजस्थानमध्ये दाट धुक्यासह पावसाच्या तुरळक सरींचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल, आसाम आणि लक्षद्वीपमध्ये काही भागांत मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा असल्यानं नागरिकही सतर्क आहेत. 





Source link

महायुतीत पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच, का इतकं महत्त्वाचं झालंय हे पद? पालकमंत्र्यांना कोणते असतात अधिकार?

0
महायुतीत पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच, का इतकं महत्त्वाचं झालंय हे पद? पालकमंत्र्यांना कोणते असतात अधिकार?


why is guardian minister post so important : नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने भरघोस मतांचे दान टाकत तब्बल २३५ जागांवर विजय मिळवून दिला. त्यानंतर ५ डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी झाला व नंतर हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र त्यानंतर जवळपास तीन आठवड्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाचं वाटप कसं करायचं, ह पेच महायुतीच्या नेत्यांसमोर होता. अखेर १८ जानेवारी रोजी पालकमंत्री पदाचं वाटप जाहीर झालं. त्यानंतर दोनच दिवसात दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारापासून अनेक नेत्यांनी पालकमंत्रीपदासाठी ल़ॉबिंग केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात केवळ इतकं चर्चेत नसलेलं पद आता इतकं महत्वाचं का वाटू लागलं आहे? 



Source link

Eknath Shinde: अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी आहे; एकनाथ शिंदेंची शेरोशायरीतून ठाकरेंवर टीका

0
Eknath Shinde: अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी आहे; एकनाथ शिंदेंची शेरोशायरीतून ठाकरेंवर टीका


Eknath Shinde News: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटाकडून बीकेसीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना खरी कोण आहे? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असेच यश मिळणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी आहे, अशी शायरी केली.



Source link

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीने व्हिडिओ शूट करून सहकाऱ्यांना पाठवला

0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीने व्हिडिओ शूट करून सहकाऱ्यांना पाठवला

पुणेः चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मुलासमोरच कात्रीने वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना खराडी येथे घडली आहे. विशेष म्हणजे, आरोपी पतीने खूनानंतर व्हिडिओ शूट करून आपल्या सहकाऱ्यांना पाठवला आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.

काय आहे प्रकरण?

ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवदास तुकाराम गिते (वय 37) याला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि. 22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

शिवदास हा मूळचा बीडचा रहिवासी असून तो पुण्यातील न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. तो पत्नी ज्योती आणि त्यांच्या मुलासह खराडी येथील तुळजाभवानीनगर परिसरात राहत होता.

मागील काही दिवसांपासून गिते दांपत्यांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. बुधवारी पहाटे पाणी पिण्यासाठी उठलेल्या शिवदास आणि ज्योतीमध्ये पुन्हा वाद झाला. वादाच्या भरात शिवदासने घरातील शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रीने पत्नीच्या गळ्यावर वार केला.

खुनाचा व्हिडिओ केला शूट

खून केल्यानंतर शिवदासने पत्नीच्या मृतदेहासह एक व्हिडिओ शूट केला. त्यामध्ये त्याने पत्नीचा खून स्वतःच्या संरक्षणासाठी केल्याचा दावा केला आहे. “ती माझ्या घराची लक्ष्मी होती. मला तिला मारायचं नव्हतं. मात्र तिच्या भावांनी मला मारण्याचा प्लॅन केला होता,” असा दावा त्याने व्हिडिओमध्ये केला आहे.

शिवदास हा 2021 मध्ये न्यायालयात टंकलेखक म्हणून कामाला लागला. तीन वर्षांनंतर त्याने स्टेनोची परीक्षा दिली होती, पण त्यात तो नापास झाला. उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली होती. त्यातून त्याची पत्नी ज्योती त्याला अभ्यास करण्यासाठी सांगत असे. हीच गोष्ट वादाचा मुद्दा ठरत होती.

पोलिस तपास सुरू

पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिते दांपत्यांमध्ये कौटुंबिक वाद होते. याच वादातून ही घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Uddhav Thackeray: मराठी माणसाच्या नादी लागू नका, औरंगजेबाला झुकवलं, अमित शाह किस झाड की पत्ती; उद्धव ठाकरे कडाडले!

0
Uddhav Thackeray: मराठी माणसाच्या नादी लागू नका, औरंगजेबाला झुकवलं, अमित शाह किस झाड की पत्ती; उद्धव ठाकरे कडाडले!


Shiv Sena UBT Melava 2025: ‘मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे’, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.



Source link

Eknath Shinde: महायुतीवर​​ टीका करणे थांबवा, अन्यथा तुमच्या पक्षात फक्त दोनच आमदार राहतील, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
Eknath Shinde: महायुतीवर​​ टीका करणे थांबवा, अन्यथा तुमच्या पक्षात फक्त दोनच आमदार राहतील, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा


Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा पक्षातील नेते महायुती सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि शिवसेनेवर टीका करणे थांबवले नाहीतर, त्यांच्याकडे सध्या असलेल्या २० आमदारांपैकी फक्त दोनच आमदार राहतील, असाही शिंदेंनी इशारा दिला आहे.



Source link

10th, 12th Pass Job: दहावी, बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी!

0
10th, 12th Pass Job: दहावी, बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी!


Government Job 2025: भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक नाविक जीडी / डीबी (सीजीईपीपीटी -०२/२०२५) भरती २०२५ साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार joinindiancoastguard.cdac.in. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.



Source link

Shahid Kapoor: माझ्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ नये; शाहिद कपूरने केले मुलांच्या भविष्यावर भाष्य

0
Shahid Kapoor: माझ्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ नये; शाहिद कपूरने केले मुलांच्या भविष्यावर भाष्य


बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे शाहिद कपूर. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या शाहिदला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. लवकरच शाहिद ‘देवा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याने मुलांच्या भविष्यावर वक्तव्य केले आहे. त्याने थेट मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू नये असे म्हटले आहे. शाहिद असं का म्हणाला चला जाणून घेऊया…



Source link

सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो…’

0
सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो…’



Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे. 
 



Source link