Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीने व्हिडिओ शूट करून सहकाऱ्यांना पाठवला

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीने व्हिडिओ शूट करून सहकाऱ्यांना पाठवला

पुणेः चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मुलासमोरच कात्रीने वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना खराडी येथे घडली आहे. विशेष म्हणजे, आरोपी पतीने खूनानंतर व्हिडिओ शूट करून आपल्या सहकाऱ्यांना पाठवला आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.

काय आहे प्रकरण?

ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवदास तुकाराम गिते (वय 37) याला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि. 22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

शिवदास हा मूळचा बीडचा रहिवासी असून तो पुण्यातील न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. तो पत्नी ज्योती आणि त्यांच्या मुलासह खराडी येथील तुळजाभवानीनगर परिसरात राहत होता.

मागील काही दिवसांपासून गिते दांपत्यांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. बुधवारी पहाटे पाणी पिण्यासाठी उठलेल्या शिवदास आणि ज्योतीमध्ये पुन्हा वाद झाला. वादाच्या भरात शिवदासने घरातील शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रीने पत्नीच्या गळ्यावर वार केला.

खुनाचा व्हिडिओ केला शूट

खून केल्यानंतर शिवदासने पत्नीच्या मृतदेहासह एक व्हिडिओ शूट केला. त्यामध्ये त्याने पत्नीचा खून स्वतःच्या संरक्षणासाठी केल्याचा दावा केला आहे. “ती माझ्या घराची लक्ष्मी होती. मला तिला मारायचं नव्हतं. मात्र तिच्या भावांनी मला मारण्याचा प्लॅन केला होता,” असा दावा त्याने व्हिडिओमध्ये केला आहे.

शिवदास हा 2021 मध्ये न्यायालयात टंकलेखक म्हणून कामाला लागला. तीन वर्षांनंतर त्याने स्टेनोची परीक्षा दिली होती, पण त्यात तो नापास झाला. उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली होती. त्यातून त्याची पत्नी ज्योती त्याला अभ्यास करण्यासाठी सांगत असे. हीच गोष्ट वादाचा मुद्दा ठरत होती.

पोलिस तपास सुरू

पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिते दांपत्यांमध्ये कौटुंबिक वाद होते. याच वादातून ही घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments