Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रतालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकड प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकड प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मारकड प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

इंदापूर : इंदापूर तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने राष्ट्रीयवाडी क्रीडा संकुल, लोणी देवकर येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगट व वजनगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे हनुमंत मारकड संचलित लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी येथील विद्यार्थी चि. पृथ्वीराज हनुमंत मारकड याने १९ वर्षे वयोगटातील ग्रीको-रोमन कुस्ती प्रकाराच्या ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला.

पृथ्वीराजने आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे विद्यालयासह बोराटवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पृथ्वीराजची पारगाव, ता. दौंड येथे होणाऱ्या पुढील शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतही तो उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पृथ्वीराजला क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल माजी सहकार मंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. उदयसिंह पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोजराव पाटील, प्राचार्य श्री. चंद्रकांत कोकाटे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व पालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments