Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रमहसूल लोकअदालतीत तडजोडीसाठी प्रकरणे निकाली काढण्याची संधी

महसूल लोकअदालतीत तडजोडीसाठी प्रकरणे निकाली काढण्याची संधी

माळशिरस विभागात २८ ऑक्टोबर व १६ डिसेंबर रोजी लोकअदालत; दोन्ही पक्षकारांची सहमती आवश्यक

अकलूज | प्रतिनिधी : उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये परस्पर संमतीने तडजोड करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल लोकअदालतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रक्रियेत दोन्ही पक्षकारांची परस्पर सहमती असणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीस इच्छुक आहेत, त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून महसूल लोकअदालतीचा लाभ घ्यावा.

उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलेल्या आणि तडजोडीस तयार असलेल्या दोन्ही पक्षकारांनी स्वतः किंवा आपल्या विधिज्ञामार्फत ‘प्रपत्र-अ’ (तडजोडनामा अर्ज) उपविभागीय अधिकारी कार्यालय, माळशिरस विभाग, अकलूज येथे दाखल करणे आवश्यक आहे.

अपर जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या निर्देशानुसार माळशिरस विभागासाठी महसूल लोकअदालतीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, २८ ऑक्टोबर २०२६ आणि १६ डिसेंबर २०२६ या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांनी परस्पर संमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments