Monday, August 3, 2026
Home Blog Page 579

Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?

0
Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?


Suspense Thriller Movie Binge Watch : गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘महाराजा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विजय सेतुपती यांच्या या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुफान गाजला होता. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक ब्लॉकबस्टर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट घेऊन आलो आहोत. अडीच तासांचा हा चित्रपट पाहताना तुम्हीही तुमच्या जागेवरून उठणे देखील विसराल. हा चित्रपट ‘महाराजा’लाही टक्कर देणारा आहे. इतकंच नाही तर, या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुमच्या डोक्याचा नक्कीच भुगा करेल.



Source link

पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात

0
पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात


Rape case in Pimpri Chinchwad: पुण्यात पिंपरी चिंचवड येथील रावेत परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी दारू पिऊन बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ट्रूथ अँड डेअर खेळत हा अत्याचार केला आहे. पीडितेवर अत्याचार सुरू असताना अचानक पीडितेच्या नातेवाईकांना फोन लागला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.



Source link

Thane Accident : ठाण्यात हिट अँड रनच्या घटनेने घेतला समाज सेविकेचा जीव, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू

0
Thane Accident : ठाण्यात हिट अँड रनच्या घटनेने घेतला समाज सेविकेचा जीव, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू


Thane Accident : ठाण्यात हीट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशाच एका घटनेत एका समाजसेविकेचा मृत्यू झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे असे त्यांचे नाव असून गुरुवारी त्या सकाळी फिरायला गेल्या असतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखणी झाला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.



Source link

Viral News: पतींच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी एकमेकींशी थाटला संसार, लग्नाचा फोटो व्हायरल

0
Viral News: पतींच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी एकमेकींशी थाटला संसार, लग्नाचा फोटो व्हायरल


Uttar Pradesh Deoria Viral News: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे दोन महिलांच्या लग्नाचे प्रकरण आता चर्चेत आले आहे. पतींच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून दोन महिलांनी एकमेकांशी लग्न केले. दोन्ही महिलांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघींनी आपल्या पतीला सोडून एकमेकींशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.



Source link

‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार

0
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार


Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. न्यूरोलॉजिकल आजाराचा प्रकार असलेल्या या आजाराचे तब्बल ६७ रुग्ण पुण्यात आढळले आहे. यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून पुण्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच बाधित रुग्णांचा देखील शोध घेतला जात आहे. दरम्यान, हा आजार होण्यास कारणीभूत ठरणारा जीवाणू तपासणीत आढळला आहे. 



Source link

Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?

0
Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?


Bank News : नोकरीच्या ठिकाणी कार्यालयीन आठवडा नमका किती दिवसांचा असावा यावरून अनेक मतभेद पाहायला मिळाले आहेत. विविध उद्योजक किंवा संस्था आणि अगदी कर्मचाऱ्यांनीही यावर आली मतं नोंदवली असून, या मतमतांतराच्या चर्चांनी कायमच लक्ष वेधण्याचं काम केलं आहे. इतकं, की आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा आणि आठवडासुद्धा बदलणार का? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नव्या निकषांच्या आधारे काम सुरू झाल्यास बँकांना सरसकट सर्व आठवड्यांमध्ये शनिवार रविवारी रजा दिली जाणार असून, कर्मचाऱ्यांना बँकांच्या शाखेमध्ये दर दिवशी 40 मिनिटं अधिक थांबून काम करावं लागणार आहे. सध्याच्या घडीला देशभरातील बँकांना पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी कार्यरत रहावं लागत असून, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मात्र बँकांचं कामकाज बंद असतं. दरम्यान पाच दिवसांच्या कार्यालयीन आठवड्याच्या मुद्द्यावरून बँक कर्मचारी संघटना आणि रिझर्व्ह बँक यांच्या सरकारशी अनेकदा चर्चाही झाल्या आहेत. तेव्हा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या मुद्द्यावर केंद्राकडून कोणता मोठा निर्णय घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अर्थसंकल्पानंतर लागू होणार बदल? 

अर्थसंकल्पानंतर देशात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू होणार असून, शासनाकडे सातत्यानं महिन्याच्या 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्यांची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावर कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यामध्ये एकमत झालं असलं तरीही सध्या हे संपूर्ण प्रकरण सरकार आणि आरबीआयकडे विचाराधीन असल्याचं म्हटलं जात आहे. 

अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आठवड्यामध्ये दर दिवशी 40 मिनिटं जास्त काम करावं लागणार आहे. ज्यामुळं बँक शाखा सकाळी 9.45 वाजता सुरू होतील. सध्या बँका सामान्यांसाठी 10 वाजता सुरू केल्या जातात. पण, या निर्णयानंतर मात्र ही वेळ बदलेल. तर, ज्या बँका सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतात त्याच बँका हा निर्णय लागू झाल्यास 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे आता बँकांच्या कार्यालयीन आठवडा आणि वेळांसंदर्भात केंद्र शासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 





Source link

Republic Day 2025 : 76 की 77? यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन

0
Republic Day 2025 : 76 की 77? यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन


Republic Day 2025 : देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे असंख्य भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाचा दिवस. हा तोच दिवस जेव्हा भारत देश जगभरात प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाला. देशभरात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर लष्कराच्या भव्य पथसंचलनाचं आयोजनही करण्यात येतं. जिथं भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांचा उत्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. 

सलामी मंचावरील मान्यवरांना सलामी देत हे पथसंचलन पुढे जातं. अनेक शालेय विद्यार्थ्यांपासून देशविदेशातील आमंत्रितांची या सोहळ्यामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. 26 जानेवारी हा दिवस, एका सुवर्णक्षणाची आठवण आहे. जेव्हा 1950 मध्ये याच दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आलं होतं. हे तेच संविधान आहे, ज्यामुळं भारत एक स्वयंपूर्ण, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून देशाला विशेष दर्जा मिळवून देतं. हा तोच दिवस आहे, जो कायमच एक नागरिक म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्यांप्रती जागरुकता अबाधित ठेवतो. 

यंदा देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन? 

प्रजासत्ताक दिन देशभरात दरवर्षी साजरा केला जातो. पण, यंदा नेमका कितवा प्रजासत्ताक दिन? हा प्रश्न मात्र सातत्यानं अनेकांच्या मनात घर करत असतो. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? 

26 जानेवारी 1950 रोजी भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. ज्यामुळं 2025 मध्ये भारत देश 26 जानेवारी या दिवशी देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, कारण 1950 पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली होती. अनेकांचाच असा समज आहे की, 1947 मध्येच भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र ठरला गोता. पण, तसं नसून 1950 या वर्षात देश प्रजासत्ताक ठरला होता. 

 

15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला होता. पण, तेव्हा मात्र हा देश प्रजासत्ताक राष्ट्र नसून एक राष्ट्रमंडळ देश होता. देशाच्या संविधान निर्मितीसाठी साधारण अडीच वर्षांचा काळावधी लागला. अखेर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि देशाला प्रजासत्ताक हा दर्जा मिळाला. ज्यामुळं 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 





Source link

भंडाऱ्या जवळ जवाहरनगर येथील ऑर्डंनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट! ५ कामगार ठार, बचावकार्य सुरू

0
भंडाऱ्या जवळ जवाहरनगर येथील ऑर्डंनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट! ५ कामगार ठार, बचावकार्य सुरू


Bhandara ordinance factory Blast : भंडाऱ्या जवळील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात सकाळी ११ वाजता भीषण स्फोट झाला आहे. यात ५ कामगार ठार झाले आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. या घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नेमका हा स्फोट कसा झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.



Source link

Sky Force Review : भारत-पाक युद्धाचा थरार, अक्षयचा शानदार परफॉर्मन्स! कसा आहे ‘स्काय फोर्स’? वाचा

0
Sky Force Review : भारत-पाक युद्धाचा थरार, अक्षयचा शानदार परफॉर्मन्स! कसा आहे ‘स्काय फोर्स’? वाचा


Sky Force Review : अक्षय कुमार, वीर पहारिया आणि सारा अली खान यांचा ‘स्काय फोर्स रिव्ह्यू’ हा चित्रपट आला आहे. तुम्हीही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर रिव्ह्यू वाचा.



Source link

Novak Djokovic : जोकोविचनं सेमी फायनल अर्ध्यातच सोडली, अलेक्झांडर झ्वेरेव्ह ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

0
Novak Djokovic : जोकोविचनं सेमी फायनल अर्ध्यातच सोडली, अलेक्झांडर झ्वेरेव्ह ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये


सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधून बाहेर पडला आहे. जोकोविचने दुखापतीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी) विरुद्धचा उपांत्य सामना अर्ध्यावर सोडला.



Source link