Monday, August 3, 2026
Home Blog Page 561

डॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये देऊन सोडून दिले

0
डॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये देऊन सोडून दिले


कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील एका रुग्णालयात काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील (४५) यांचे शनिवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या भावाकडे सहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, काही तासांनंतर डॉक्टरांना घरी जाण्यासाठी ३०० रुपये देऊन सोडून देण्यात आले.



Source link

ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ : गोविंद मिल्क, मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्सचा मध्य प्रदेशातील गुंतवणुकीचा अंदाज

0
ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ : गोविंद मिल्क, मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्सचा मध्य प्रदेशातील गुंतवणुकीचा अंदाज

पुणे | पुण्यात आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ च्या विशेष संवाद सत्रात गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स या कंपन्यांनी मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी शोधल्या. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. जयसिंह मारवाह यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सोबत झाली.

दुग्ध आणि रसायन उद्योगातील मोठ्या संधींवर चर्चा

मध्य प्रदेश देशातील तिसऱ्या क्रमांकाचे ९-१०% दूध उत्पादन करणारे राज्य आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असून, शेतकऱ्यांना पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या सुविधा देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कंपनीने गुंतवणुकीसाठी संधींचा अभ्यास केला.

रसायन, औषधनिर्मिती, पेट्रोकेमिकल्स आणि प्लास्टिक उद्योगांसाठी मध्य प्रदेश हे उत्तम पर्यावरण असलेले राज्य आहे. मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स यांसारख्या कंपन्यांनी राज्यातील उत्पादन युनिट्सच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी चर्चा केली.

मध्य प्रदेशातील उद्योगवाढीला गती देण्याचा संकल्प

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले,
“मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. दुग्ध उत्पादन, रसायन उद्योग आणि अन्य क्षेत्रांत सकारात्मक धोरणे असल्याने गुंतवणुकीस उत्तम संधी आहे.”

IIEBM च्या विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी २५-३०% विद्यार्थी मध्य प्रदेशातून पुण्यात व्यवस्थापन शिक्षणासाठी येतात, ही बाबही उल्लेखनीय असल्याचे डॉ. जयसिंह मारवाह यांनी सांगितले. गोविंद मिल्क कंपनी समाजाच्या विकासास चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देईल, असा विश्वासही निंबाळकर यांनी व्यक्त केला.

CII अधिकाऱ्यांचे विशेष आभार

यावेळी CII पुणे ऑफिसचे उपसंचालक प्रसाद बच्छाव, उपसंचालक विशाल लाल आणि कार्यकारी खुशाल बोरघरे यांच्या योगदानाबद्दल संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष आभार मानले.

Pandharpur Temple : नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा निर्णय!

0
Pandharpur Temple : नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा निर्णय!


Pandharpur Temple Visit : आषाढी-कार्तिकी वारीसोबतच अन्य एकदशी तसेच सदासुदीला पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही पंढरपूर मंदिर भाविकांची गजबजून गेलेले असते. विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शन करून आपल्या संसाराची देवाच्या आशिर्वादाने सुरुवात करत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातही नवविवाहित जोडप्यांची गर्दी होत असते. देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा मोठा  निर्णय घेतला आहे.



Source link

सातारा जिल्ह्यासाठी 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट

0
सातारा जिल्ह्यासाठी 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट

सातारा, दि. 27: जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली. या बैठकीत शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राज्यभरात 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

यामध्ये जावली 2,579, कराड 6,541, खंडाळा 1,833, खटाव 4,598, कोरेगाव 4,146, महाबळेश्वर 1,118, माण 3,254, पाटण 9,279, फलटण 3,928, सातारा 5,956 आणि वाई 2,190 अशा घरकुलांचे नियोजन करण्यात आले आहे.

गृह निर्माणासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांचा समावेश असून, यासाठी ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग यांच्या समन्वयातून अंदाजे 1,58,730 रुपये प्रति घरकुल देण्यात येणार आहेत. प्राप्त उद्दिष्टांनुसार तातडीने मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरीत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले की, “लाभार्थ्यांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि गैरप्रकार टाळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयांमध्ये आवश्यक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” तसेच, पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना 500 चौ. फुटांपर्यंतच्या घरकुलासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

या बैठकीस खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील आदी उपस्थित होते.

धक्कादायक..! माझी गर्लफ्रेंड का पटवली? वादावादीत कल्याणमध्ये परप्रांतीयाने महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर घातली थार!

0
धक्कादायक..! माझी गर्लफ्रेंड का पटवली? वादावादीत  कल्याणमध्ये परप्रांतीयाने महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर घातली थार!


कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  विशेष म्हणजे थार अंगावर घालणारा तरुण परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. परप्रांतीयांच्या दादागिरीच्या घटना एकामागे एक बाहेर येत असतानाच पुन्हा एक घटना घडल्याने मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

समान नागरी कायद्याची उत्तराखंडमधून सुरुवात, जाणून घ्या त्याबद्दल महत्वाच्या गोष्टी आणि विरोध करण्याची कारणे

0
समान नागरी कायद्याची उत्तराखंडमधून सुरुवात, जाणून घ्या त्याबद्दल महत्वाच्या गोष्टी आणि विरोध करण्याची कारणे


UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा सोमवारपासून (२७ जानेवारी २०२५) लागू झाल्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घोषणा केली. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपच्या अनिवार्य ऑनलाइन नोंदणीसाठी एक पोर्टल सुरू करून यूसीसीची अधिकृत सुरुवात करण्यात आली.



Source link

Cyber fraud news: नवी मुंबईकरांनो सावधान, सायबर फ्रॉडमुळे शहरातील नागरिकांनी गमावले तब्बल ४४० कोटी रुपये!

0
Cyber fraud news: नवी मुंबईकरांनो सावधान, सायबर फ्रॉडमुळे शहरातील नागरिकांनी गमावले तब्बल ४४० कोटी रुपये!


दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत असून वर्षभराच्या काळात नवी मुंबईतील नागरिकांना तब्बल ४४० कोटी रुपये गमवावे लागले आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०२४ या वर्षभरातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १५० कोटी ९७ लाख रुपयांची नागरिकांची सायबर फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४१ कोटी ३२ लाख रुपये गोठविण्यात आले असून ६ कोटी ९२ लाख रुपये वसूल करून तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीसीआरपी) पोर्टलवर २९६.७१ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी २७.५३ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत.



Source link

काय आहे शत्रू मालमत्ता कायदा? पाकिस्तान युद्धाशी संबंध; केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत

0
काय आहे शत्रू मालमत्ता कायदा? पाकिस्तान युद्धाशी संबंध; केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत


What Is Enemy Property Act : केंद्र सरकार १९६८ च्या शत्रू मालमत्ता कायद्यात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधेयक आणून सरकार हा कायदा बदलू शकते. या बदलांनंतर शत्रू मालमत्तेची मालकी थेट केंद्र सरकारच्या हातात येणार आहे. त्यानंतर या मालमत्तांचा वापर जनहितासाठी केला जाऊ शकतो. सैफ अली खानची १५,००० कोटींची संपत्तीही २०१५ मध्ये शत्रूच्या मालमत्तेच्या कक्षेत आणण्यात आली होती. ही मालमत्ता वाचविण्यासाठी नवाब कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.



Source link

Mahakumbh Viral Video: एअर होस्टेसची लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी बनण्यासाठी तरुणी पोहचली महाकुंभात!

0
Mahakumbh Viral Video: एअर होस्टेसची लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी बनण्यासाठी तरुणी पोहचली महाकुंभात!


Kumbh Melamnhvb Viral News: व्हायरल गर्ल मोनालिसानंतर महाकुंभातील आणखी एक तरुणी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या तरुणीने साध्वी बनण्यासाठी चक्क एअर होस्टेसची लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारली, असा दावा केला जात आहे. मनाला समाधान मिळेल, अशाच गोष्टी करायला पाहिजेत, असा सल्ला देखील या तरुणीने दिला.



Source link

‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

0
‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान


नागपूरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी तिने इंटरनेटवर ‘मृत्यूनंतर काय होते’ याचा शोध घेतला होता. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका खासगी शाळेत बारावीत शिकणारी ही मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील नागपुरातील रिझर्व्ह बँकेत प्रादेशिक संचालक पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा इंटरनेटवर मृत्यू आणि परदेशी संस्कृतीबद्दल सर्च करत असे.



Source link