Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ : गोविंद मिल्क, मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्सचा...

ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ : गोविंद मिल्क, मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्सचा मध्य प्रदेशातील गुंतवणुकीचा अंदाज

पुणे | पुण्यात आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ च्या विशेष संवाद सत्रात गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स या कंपन्यांनी मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी शोधल्या. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. जयसिंह मारवाह यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सोबत झाली.

दुग्ध आणि रसायन उद्योगातील मोठ्या संधींवर चर्चा

मध्य प्रदेश देशातील तिसऱ्या क्रमांकाचे ९-१०% दूध उत्पादन करणारे राज्य आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असून, शेतकऱ्यांना पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या सुविधा देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कंपनीने गुंतवणुकीसाठी संधींचा अभ्यास केला.

रसायन, औषधनिर्मिती, पेट्रोकेमिकल्स आणि प्लास्टिक उद्योगांसाठी मध्य प्रदेश हे उत्तम पर्यावरण असलेले राज्य आहे. मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स यांसारख्या कंपन्यांनी राज्यातील उत्पादन युनिट्सच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी चर्चा केली.

मध्य प्रदेशातील उद्योगवाढीला गती देण्याचा संकल्प

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले,
“मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. दुग्ध उत्पादन, रसायन उद्योग आणि अन्य क्षेत्रांत सकारात्मक धोरणे असल्याने गुंतवणुकीस उत्तम संधी आहे.”

IIEBM च्या विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी २५-३०% विद्यार्थी मध्य प्रदेशातून पुण्यात व्यवस्थापन शिक्षणासाठी येतात, ही बाबही उल्लेखनीय असल्याचे डॉ. जयसिंह मारवाह यांनी सांगितले. गोविंद मिल्क कंपनी समाजाच्या विकासास चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देईल, असा विश्वासही निंबाळकर यांनी व्यक्त केला.

CII अधिकाऱ्यांचे विशेष आभार

यावेळी CII पुणे ऑफिसचे उपसंचालक प्रसाद बच्छाव, उपसंचालक विशाल लाल आणि कार्यकारी खुशाल बोरघरे यांच्या योगदानाबद्दल संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments