Monday, August 3, 2026
Home Blog Page 562

Viral Video: रुळ ओलांडताना ‘ती’ एक चूक नडली; फक्त 2 सेकंदांसाठी विद्यार्थिनीने गमावला जीव

0
Viral Video: रुळ ओलांडताना ‘ती’ एक चूक नडली; फक्त 2 सेकंदांसाठी विद्यार्थिनीने गमावला जीव


Viral Video: भारतात जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडणं सर्रासपणे सुरु असतं. कधी वेळ वाचवण्याच्या हेतूने तर कधी स्टंटबाजी करण्याच्या नादात हा प्रयत्न करत आपला जीव धोक्यात घातला जातो. पण यामुळे आपण फक्त आपला नाही तर इतर प्रवाशांचा जीवही धोक्यात घालत असल्याची जाणीव त्यांना नसते. नुकतीच उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे. मालगाडी जात असल्याने रेल्वे फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याच्या नादात एका विद्यार्थिनीने जीव गमावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मालिपूर रेल्वे स्थानकात एका मुलीने रुळ ओलांडताना जीव गमावला आहे. सीसीटीव्हीत अंगावर काटा आणणारी ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, फक्त काही सेकंदाच्या अंतराने मुलगी एक्स्प्रेसच्या खाली येते आणि आपला जीव गमावते. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मालगाडी जाणार असल्याने रेल्वे फाटक बंद होतं. यावेळी बाईक, कार फाटकाच्या आधी थांबलेल्या होत्या. याचदरम्यान एक विद्यार्थिनी फाटकाखालून वाकत घाईत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करते. पण ती रुळ ओलांडत असताना काही सेकंदाचा उशीर होतो आणि आपला जीव गमावते. ती काही हालचाल करण्याआधीच मालगाडी तिला उडवते. धडक इतकी जबरदस्त असते की तिचा जागीच मृत्यू होतो. 

रेल्वे क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. मुलीला मालगाडीने उडवल्याचं पाहिल्यानंतर तिथे उपस्थित सर्वांनाच धक्का बसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यातील काहींनी मुलगी मालगाडी पाहिल्यानंतर जाणुनबुजून थांबली असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे ही दुर्घटना नसून आत्महत्या आहे असा काहींचा अंदाज आहे. 

रेल्वे प्रशासन वारंवार रेल्वे रुळ ओलांडणं धोकादायक आहे असा इशारा देत असतं. ही घटना रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास काय होऊ शकतं याची आठवण करुन देत आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

अशाच एका घटनेत, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी रेल्वे रुळ ओलांडताना गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने धडक देऊन 16वर्षीय वैष्णवी रावल हिचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी इअरफोन लावल्यामुळे विद्यार्थिनीला जवळून येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. 





Source link

डिझेल संपलं, ट्रेन मध्येच बंद पडली; प्रवाशांनी चार तास राडा घातल्यानंतर स्टेशन मास्तरने अशी केली सोय

0
डिझेल संपलं, ट्रेन मध्येच बंद पडली; प्रवाशांनी चार तास राडा घातल्यानंतर स्टेशन मास्तरने अशी केली सोय



 डिझेल संपल्याने ट्रेन बंद पडल्याचे कधी ऐकले देखील नसेल. मात्र, प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. डिझेल संपल्यामुळे ट्रेन चार तास ठप्प झाली. 
 



Source link

काय आहे DeepSeek? ठरू शकते चीनचे नशीब पालटवणारे सिक्रेट अस्त्र, दुसऱ्यांना टेन्शन देणारे ट्रम्पही तणावात

0
काय आहे DeepSeek? ठरू शकते चीनचे नशीब पालटवणारे सिक्रेट अस्त्र, दुसऱ्यांना टेन्शन देणारे ट्रम्पही तणावात


Deepseek : ॲपल आणि गुगल ॲप स्टोअरवर चॅटबॉट उपलब्ध झाल्याने चॅटबॉटची व्याप्ती आणखी वाढली आहे. डीपसीकचे “एआय असिस्टंट” आयफोन स्टोअरवर सर्वात जास्त डाऊनलोड केलेले विनामूल्य ॲप्लिकेशन बनले आहे.



Source link

Alka Kubal : सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा…

0
Alka Kubal : सडपातळ असलेल्या अलका कुबल यांचं वजन अचानक ११० किलो कसं झालं? वाचा किस्सा…


Alka Kubal Tragic Memories : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल. आपल्या अभिनयाने आणि निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अलका कुबल यांनी मराठी सिनेमाला दिलेलं योगदान अद्वितीय आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून, त्यांनी निर्मात्या म्हणूनही खूप मोठे योगदान दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूरमध्ये दोन मल्टिप्लेक्स बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या अलका कुबल यांचा हा उपक्रम मराठी सिनेमा क्षेत्राला मोठा योगदान देणारा ठरला आहे. यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन होणार आहे.



Source link

तारीख पे तारीख..! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख

0
तारीख पे तारीख..! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख


गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता वाटत होती. मात्र उन्हाळ्यात तरी या होणार का, याबाबत सवाल उपस्थित होत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षांपासून तिथे लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू असून दरवेळी पुढची तारीख मिळत असल्याने निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत.



Source link

Filmy Nostalgia : बजेट होतं ६ कोटी अन् केलेली छप्परफाड कमाई! सलमान-ममता कुलकर्णीचा चित्रपट पाहिलात?

0
Filmy Nostalgia : बजेट होतं ६ कोटी अन् केलेली छप्परफाड कमाई! सलमान-ममता कुलकर्णीचा चित्रपट पाहिलात?


Bollywood Nostalgia Kissa : एखादा बॉलिवूड चित्रपट बनवला जातो, तेव्हा त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. निर्माते आपले कोट्यवधी रुपये चित्रपटांवर लावतात, मात्र काहीवेळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. तर, काही चित्रपट निर्माते कमी बजेटमध्येही चित्रपट बनवून प्रचंड नफा कमावतात. सध्याच्या काळात शाहरुख खान ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देत आहे. परंतु, सलमानचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. पण, आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि शाहरुख खानच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो केवळ ६ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने निर्मात्यांना रेकॉर्डब्रेक नफा कमावून दिला होता. त्यांचा हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.



Source link

IIT गुवाहाटीचं नवीन संशोधन; नॅनोक्रिस्टल्सच्या सहाय्याने दिसतील शरीरातील घातक टॉक्सिन

0
IIT गुवाहाटीचं नवीन संशोधन; नॅनोक्रिस्टल्सच्या सहाय्याने दिसतील शरीरातील घातक टॉक्सिन



IIT गुवाहाटी येथे नवीन नॅनो क्रिस्टल्स विकसित करण्यात आले आहेत. यांच्या सहाय्याने शरीरातील घातक धातूंचा शोध लावता येणार आहे. 



Source link

Sonu Nigam : पद्म पुरस्कारांवर नाराज सोनू निगम! थेट चार मोठ्या गायकांची नावं घेत म्हणाला…

0
Sonu Nigam : पद्म पुरस्कारांवर नाराज सोनू निगम! थेट चार मोठ्या गायकांची नावं घेत म्हणाला…


Sonu Nigam Viral Video : बॉलिवूड गायक सोनू निगम आपले मत लोकांसमोर अतिशय मोकळेपणाने आणि बेधडकपणे मांडतो. आता पुन्हा एकदा सोनू निगम याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम याने पद्म पुरस्कार २०२५ बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, किशोर कुमार, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या मोठ्या गायकांना आतापर्यंत पद्म पुरस्कार का मिळालेला नाही? याशिवाय सोनू निगमने या प्रकरणावर आणखी बरीच वक्तव्य केली आहेत.



Source link

Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

0
Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?


Local Body Election In Maharashtra Supreme Court Case: अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) प्रलंबित निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली.  कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.  25 फेब्रुवारी 2025 ला पुढील सुनावणी होणार आहे.  यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.  राज्य सरकार आणि आहे कोर्टाला सागितलं की हा विषय पूर्ण झाला आहे. कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत. 5 फेब्रुवारी सुरुवातीला कोर्ट म्हणाल होत मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत. त्यामुळं आता कोर्टाने 25 फेब्रुवारी तारीख दिली आहे. तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितल की मी तासाभरात माझं मत मांडतो. मात्र, आज कोर्टाला जास्त वेळ नसल्याने पुढील तारीख पडली आहे. 92 नगरपालिका मधे ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल. पुढील सुनावणी नंतर प्रशासक राज्य बाजूला होऊन निवडणुका होतील. पंजाब केसाचा देखील दाखला आम्ही आज सुनावणीवेळी दिला अशी माहिती ॲड देवदत्त पालोदकर यांनी दिली. 

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत आज फैसला येण्याची शक्यता  वर्तवली जात होती. सुप्रीम कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत निर्णय देण्याची शक्यता होती. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण  प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सुप्रिम कोर्टात याबाबत सुनावणी झाली. त्यामुळे 2 वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त लागणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.  त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. 

मागच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे ॲड देवदत्त पालोदकर व ॲड अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे. राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यामध्ये अनेक याचिका व अर्ज सादर करण्यात आले असल्याचे सांगितले.
त्यानंतर ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना तसेच राज्य शासनाने निर्गमित केलेले अध्यादेश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी सादर झालेल्या याचीका, त्यात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश विचारात घेऊन याचिकाकर्ते, राज्यशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणे आवश्यक आहे, ज्यायोगे प्रकरणात पुढील तारखेस योग्य ते निर्देश देता येतील असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्याला सर्व वकिलांनी सहमती दर्शविली. 

सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरण दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘डायरेक्शन्स‘ साठी ठेवण्याचे तसेच तोपर्यंत ‘जैसे थे‘ आदेश कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. 2021 साली राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती. राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका तसेच 13 नगरपंचायती संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती. मात्र 4 ऑगस्ट 2022 रोजीच्या अध्यादेशान्वये सदस्य संख्येत करण्यात आलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली होती. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.





Source link

Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा ‘हे’ क्राईम-थ्रिलर चित्रपट!

0
Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा ‘हे’ क्राईम-थ्रिलर चित्रपट!


Crime Thriller Movies On OTT : आपल्यापैकी अनेकजण वीकेंडला बाहेर न जाता, घरातच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीच्या वेब सीरिज बघतात. जर, तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘या’ क्राईम-थ्रिलर सीरिज सहज पाहू शकता. हे सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट मनाला धक्का देतात आणि विचार करायला भाग पाडतात. तुम्हालाही या शैलीतील चित्रपट पहायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.



Source link