Monday, August 3, 2026
Home Blog Page 563

Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा ‘हे’ क्राईम-थ्रिलर चित्रपट!

0
Crime Thriller Movies : रात्रीची झोप उडेल, होईल अंगाचा थरकाप! एकदा तरी नक्की बघा ‘हे’ क्राईम-थ्रिलर चित्रपट!


Crime Thriller Movies On OTT : आपल्यापैकी अनेकजण वीकेंडला बाहेर न जाता, घरातच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीच्या वेब सीरिज बघतात. जर, तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘या’ क्राईम-थ्रिलर सीरिज सहज पाहू शकता. हे सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट मनाला धक्का देतात आणि विचार करायला भाग पाडतात. तुम्हालाही या शैलीतील चित्रपट पहायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.



Source link

पुढील तीस वर्षांचा विचार करून कोरेगावात दर्जेदार रस्त्यांची कामे करा; अजित पवार यांचे निर्देश

0


मुंबई: कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी दिले. तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा- अजित पवार

कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे.

मात्र ही कामे करताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. हे रस्ते दर्जेदार व मजबूत करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे. कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट व त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 रेडे घाट मार्गाबाबत ही मोठा निर्णय 

फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधणे, कोरेगाव येथे उड्डाणपूल बांधणे, वडूथ व वाढे पूलाची पुनर्बांधणी करणे, माहुली (ता. सातारा) येथे नवीन पूल बांधणे, ल्हासुर्णे पुलाची उंची वाढविणे, तळगंगा नदीवर पूलाचे काम मार्गी लावणे, कोरेगाव शहराजवळील रेल्वे स्टेशनजवळील पूलाची उंची वाढविणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसह विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; कारण सर्वांनाच विचार करायला लावणारं, म्हणाले ‘आम्हाला ठार…’

0
महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; कारण सर्वांनाच विचार करायला लावणारं, म्हणाले ‘आम्हाला ठार…’


मध्य प्रदेशात महाकुंभमेळ्यासाठी निघालेल्या विशेष ट्रेनवर प्रवाशांकडून दगडफेक करण्यात आली आहे. ही ट्रेन झाशी ते प्रयागराज दरम्यान प्रवास करत होती. हरपालपूर रेल्वे स्थानावर तिच्यावर प्रवाशांकडून दगडफेक झाली. झालं असं की, जेव्हा ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिचे दरवाजे आतून बंद असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. दरवाजे उघडले जात नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनवर तुफान दगडफेक केली. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रवासी ट्रेनच्या दरवाजावर दगडफेक करुन काचा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. 

एका व्हिडीओत प्रवासी सांगताना ऐकू येत आहे की, रात्री 8 वाजता ट्रेन झाशी येथून प्रयागराजसाठी रवाना झाली होती. “ट्रेन हरपालपूर येथे पोहोचली आणि तिच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांनी ट्रेनचं नुकसान केलं. दगड आतमध्ये फेकण्यात आले. त्यांनी प्रवाशांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये लहान मुलं आणि महिला होत्या,” असं प्रवासी सांगत आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासाठी (Mahakumbh) विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामुळे देशभरातील भाविक येथे गर्दी करत आहेत. 

रिपोर्टनुसार, अनेक प्रवासी हरपालपूर स्थानकावर ट्रेनची वाट पाहत थांबले होते. झाशी येथून दोन तासांचा हा प्रवास होता. पण ट्रेन आल्यानंतर दरवाजे बंद असल्याने त्यांना आत जाता येत नव्हतं. यामुळे संतापलेले प्रवासी हिंसा करु लागले आणि डब्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यांनी ट्रेनच्या दरवाजाच्या काचाही फोडल्या. ज्यामुळे आत असलेले प्रवासी घाबरले होते. 

हरपालपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पुष्पक शर्मा म्हणाले की, पहाटे 2 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर काही लोकांनी दगडफेक केली. रेल्वेचे प्रवक्ते मनोज सिंह म्हणाले की, प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांचा जमाव प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होता. ट्रेन आली आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजे बंद असल्याचे आढळले. ते संतप्त झाले आणि गोंधळ उडाला. रेल्वे पोलिसांनी लवकरच घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले आणि त्यांना प्रवासासाठी पाठवले.

“प्रयागराजला सुरळीत प्रवास करण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करू इच्छितो. यासाठी आम्ही विशेष गाड्या चालवत आहोत,” असे ते म्हणाले.





Source link

Viral News : वाघाच्या मूत्राने बरा होईल आजार; नव्या व्यवसायाबद्दल ऐकताच भडकले लोक!

0
Viral News : वाघाच्या मूत्राने बरा होईल आजार; नव्या व्यवसायाबद्दल ऐकताच भडकले लोक!



Tiger Urine Sell News: जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या मूत्राची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.



Source link

Devoleena Bhattacharjee: देवोलीना भट्टाचार्जीने केलं मुलाचं बारसं, हिंदू-मुस्लीम नाही तर केली ‘या’ नावाची निवड

0
Devoleena Bhattacharjee: देवोलीना भट्टाचार्जीने केलं मुलाचं बारसं, हिंदू-मुस्लीम नाही तर केली ‘या’ नावाची निवड


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आणि शाहनवाज नवाजुद्दीन सिद्दीकी नुकतेच एका मुलाचे आई-वडील झाले आहेत. देवोलीनाने अद्याप आपल्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच देवोलीनाने सोशल मीडियावर बाळाच्या बारश्याचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने लेकाचे नाव काय ठेवले याविषयी देखील माहिती दिली आहे.



Source link

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर

0
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर


Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज सोन्याच्या दर वाढीवर ब्रेक लागला आहे. सोनं वायदे बाजारात 80 हजारांच्या खाली पोहोचले आहे. सराफा बाजारातही आठ दिवसांपासून सोन्याच्या तेजीवर ब्रेक लागला आहे. मात्र, MCXवर सोन्याची झळाळी कायम आहे. 

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. तर, चांदीच्या दरातही आज 167 रुपयांची झळाळी पाहायला मिळाली. चांदी 90,390 रुपये प्रति किलोग्रॅम वर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय दरावर घडणाऱ्या घडामोडींमुळं सोन्याची किंमत आज घसरली आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. मात्र आता सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 81,930 रुपयांवर पोहोचले आहे. तसंच, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 75,100 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 61,450 रुपयांवर स्थिरावले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  75,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81,930 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,450रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,510 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,193 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,145 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   60,080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   65,544 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    49,160 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 75,100 रुपये
24 कॅरेट- 81,930 रुपये
18 कॅरेट-  61,450रुपये





Source link

Pori Tujha Mukhda : बहरतंय प्रेमी युगुलांमधील प्रेम, नव्या कोऱ्या ‘पोरी तुझा मुखडा’ गाण्याचा धुमाकूळ!

0
Pori Tujha Mukhda : बहरतंय प्रेमी युगुलांमधील प्रेम, नव्या कोऱ्या ‘पोरी तुझा मुखडा’ गाण्याचा धुमाकूळ!


Romantic Marathi Song : निक शिंदे आणि रोमँटिक गाणी याचं एक चांगलं समीकरण तयार झालं आहे. ‘पोरी तुझा मुखडा’ हे गाणं त्याच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असून, नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.



Source link

बाबा सिद्दीकी खून प्रकरणात ट्विस्ट; झिशान सिद्दीकी यांनी जबाबात उल्लेख केलेल्या डायरीत भाजपच्या मोहित कंबोजसह अनेक नावं

0
बाबा सिद्दीकी खून प्रकरणात ट्विस्ट; झिशान सिद्दीकी यांनी जबाबात उल्लेख केलेल्या डायरीत भाजपच्या मोहित कंबोजसह अनेक नावं


Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी जबाबाबत बाबा सिद्दीकी यांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. त्यात भाजपचे मोहित कंबोज यांचे नाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हत्या झाली त्या दिवशी त्यांचे मोहित कंबोज यांच्याशी चॅटींग झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.  



Source link

सैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘एका महिलेने…’

0
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘एका महिलेने…’



Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपीसोबत तिचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. 



Source link

Viral Video: कोण आहे पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मी? मुनव्वर फारुकीसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

0
Viral Video: कोण आहे पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मी? मुनव्वर फारुकीसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल!


Who Is Kinza Hashmi : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मी आणि ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकी यांच्या काहींनी फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी ते दोघे एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असावेत, असे कयास बांधले होते. चाहत्यांचा हा कयास खरा ठरला आहे. दोघे एकत्र प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. या दरम्यान त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता, या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.



Source link