Monday, August 3, 2026
Home Blog Page 560

विनापरवाना विहीर खुदाईप्रकरणी कारवाईची मागणी; संरक्षण भिंतीला तडे

0
विनापरवाना विहीर खुदाईप्रकरणी कारवाईची मागणी; संरक्षण भिंतीला तडे

फलटण: वाठार निंबाळकर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाणी साठवण टाकीजवळ एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या संगनमताने विनापरवाना विहीर खुदाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या ठिकाणी विहीर खोदण्यास निर्बंध असूनही भूजल अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्याने कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय फोकलेनच्या साहाय्याने विहीर खोदली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, या अनधिकृत विहिरीमुळे पाणी साठवण टाकीच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले असून, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने विहीर बुजवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फलटण तालुक्यात अशा प्रकारे भूजल अधिनियमाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत विहिरी खोदल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भूजल पातळी खालावत असून भविष्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्नान कुठे करायचं माहीत नव्हतं! अचानक गर्दी अनियंत्रित झाली आणि…; प्रत्यक्षदर्शी भाविकानं सांगितलं नेमकं काय घडलं?

0
स्नान कुठे करायचं माहीत नव्हतं! अचानक गर्दी अनियंत्रित झाली आणि…; प्रत्यक्षदर्शी भाविकानं सांगितलं नेमकं काय घडलं?


Maha Kumbh Stampede : मौनी अमावास्येला स्नानासाठी जमलेल्या गर्दीत बुधवारी महाकुंभादरम्यान, बुधवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर काही नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच जखमींवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी झाली या बाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.   



Source link

Viral News : ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला

0
Viral News : ड्युटीवर असताना झोपी गेला! जेवणाच्या भांड्यात लघवी केली! संतापलेल्या पोलिसांनी श्वानाचा बोनस रोखला


Viral News : चायना पोलिसांसाठी काम करणाऱ्या एका श्वानाबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तसेच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.  साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचा श्वान हा त्याच्या ड्यूटीदरम्यान झोपलेल्या अवस्थेत आढळला. एवढेच नाही तर त्याने त्याच्या जेवणाच्या भांड्यात लघवी देखील होती. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याचा बोनस रोखला आहे. 



Source link

Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

0
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट


Maharashtra IMD Weather Update: राज्यात तापमानात अनेक चढ उतार पहायाल मिळत आहे. राज्यातून थंडी ओसरली आहे. जानेवारी महिना संपत आला असून अनेक जिल्ह्यात थंडी कमी झालेली आहे. असे असले तरी सकाळ-संध्याकाळ वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दोन नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले असून ते धडकणार आहेत. त्यामुळे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात याच परिमाण होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम दिसणार तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link

आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा! कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे योगी आदित्यनाथ यांना निर्देश

0
आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा! कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे योगी आदित्यनाथ यांना निर्देश


Mahakumbh stampede : कुंभमेळ्यात आज  मौनी अमावस्या साजरी होत असताना संगमावर बुधवारी पहाटे १ वाजता  चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १५ भविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयागराज येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. 



Source link

सिद्धिविनायक मंदिरात लागू होणार ड्रेसकोड! ‘या’ प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्यास मंदिर प्रशासनाची बंदी

0
सिद्धिविनायक मंदिरात लागू होणार ड्रेसकोड! ‘या’ प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्यास मंदिर प्रशासनाची बंदी


Siddhivinayak Temple Dress Code : मुंबईतील प्रसिद्ध व गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यामुळे मंदिरात अर्धवट आणि तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. 



Source link

Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन

0
Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन


Mahakumbh Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सध्या महाकुंभ मेळा सुरू असल्यामुळं हा भाग उपस्थितांनी दुमदुमला आहे. देशविदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविकांनी प्रयागराज गाठलेलं आहे. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घडली. मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली आणि प्रयागराज इथं भयंकर चेंगराचेंगरी होत एकच गोंधळ माजला. 

चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती, की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल होत यंत्रणांनीही इथं धाव घेतली. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. 

मौनी अमावस्येनिमित्त इथं येणारी गर्दी अनपेक्षित प्रमाणात वाढल्यामुळं प्रशासनानं अनेकांनाच प्रयागराज इथून माघारी पाठवलं. या संपूर्ण घटनेमुळं बुधवार 29 जानेवारी रोजी, मौनी अमावस्येनिमित्त होणारं पवित्र अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय महाकुंभमधील सर्व 13 आखाड्यांच्या वतीनं घेण्यात आला. 

पहाटेच्या वेळी अचानकच गर्दी वाढली आणि… 

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली, आरडाओरडा, किंकाळ्या आणि भीतीच्या वातावरणात ही परिस्थिती आणखी जास्त चिघळली. 

गर्दीचा एकंदर आढावा घेत परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अखेर आखाड्यांच्या वतीनं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडा परिषदेचे महामंत्री हरि गिरी यांच्या माहितीनुसार अनिश्चित काळासाठी हे अमृत स्नान रद्द करत भाविकांच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता इथं बचावकार्याला वेग आला या दुर्घटनेत काही मृत्यू आणि शेकडो जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

 





Source link

Maharashtra Election News LIVE January 29, 2025: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

0
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट


Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 29 Jan 202502:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला असून याचे परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर दक्षिणेकडील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Read the full story here

Wed, 29 Jan 202501:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सिद्धिविनायक मंदिरात लागू होणार ड्रेसकोड! ‘या’ प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्यास मंदिर प्रशासनाची बंदी

  • Siddhivinayak Temple Dress Code : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून ड्रेसकोड लागू होणार आहे. स्कर्ट किंवा लहान अर्धवट कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.


Read the full story here

Wed, 29 Jan 202512:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! काहींच्या मृत्यूची शक्यता आखाडा परिषदेचा शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय

  • Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान  चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेनंतर  आखाड्यांचे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यांचे नागा साधू संतांसोबत शाही स्नान करतात.


Read the full story here





Source link

MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली..! पुणे मंडळ म्हाडाच्या ३६६२ सदनिकांसाठी बुधवारी सोडत

0
MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली..! पुणे मंडळ म्हाडाच्या ३६६२ सदनिकांसाठी बुधवारी सोडत


पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे,पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधवारी (२९ जानेवारी) सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.



Source link

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर SMS द्वारे दिसणार

0
MHADA Lottery 2025: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर SMS द्वारे दिसणार


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे २,१४७ सदनिका आणि ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्ज  अनामत रक्कमेसह आले आहेत. 



Source link