Sunday, August 2, 2026
Home Blog Page 559

रामराजेंची राष्ट्रवादी बैठकीत विशेष उपस्थिती – फलटणच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण!

0
रामराजेंची राष्ट्रवादी बैठकीत विशेष उपस्थिती – फलटणच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण!

मुंबई | – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची साप्ताहिक बैठक 28 जानेवारी रोजी देवगिरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीत अजित पवार यांनी प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. स्थानिक पातळीवरील समस्या आणि अडीअडचणी समजून घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित मंत्र्यांना दिले.

बैठकीतील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे माजी सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर यांची उपस्थिती. विशेष म्हणजे, ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शेजारील आसनावर होते. या उपस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात, विशेषतः फलटण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी, रामराजेंच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या बैठकीतील त्यांची भूमिका पाहता, आगामी काळात ते राष्ट्रवादीत अधिक सक्रिय होतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये रामराजेंच्या राष्ट्रवादीतील स्थानाबाबत निश्चितता नसल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निर्णयाकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.

कबड्डी… कबड्डी… प्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून थरार; स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची व्यावसायिक स्पर्धा रंगणार

0
कबड्डी… कबड्डी… प्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून थरार; स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची व्यावसायिक स्पर्धा रंगणार


कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्याआधी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान-सन्मान मिळवून देण्यात ८१ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा कायम राखत मंडळानं यंदाही विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानगर पालिका, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, एमपीएमसी पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट असे बलाढ्य संघ उतरणार आहेत. चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर या संघांमध्ये चुरस रंगणार आहे.



Source link

Takkal Virus : बुलढाण्यातील ‘टक्कल व्हायरस’ ग्रस्त रुग्णांना पुन्हा येऊ लागले केस! नेमकं काय झालं? वाचा

0
Takkal Virus : बुलढाण्यातील ‘टक्कल व्हायरस’ ग्रस्त रुग्णांना पुन्हा येऊ लागले केस! नेमकं काय झालं? वाचा


Buldhana Takkal Virus : बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसने तब्बल ११ गावांचं टेंशन वाढलं होतं. शेगाव परिसरातील गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरची केस अचानक गळू लागली होती. डोक्याला खाज येऊन केसगळती होऊन टक्कल पडत होते. तब्बल २०० पेक्षा अधिक नागरिकांना टक्कल पडलं होतं. यामुळे गावात केंद्रीय पथक देखील झालं होत. आता गेस गेलेल्यांना पुन्हा केसं येऊ लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.



Source link

Marathi Serial : जान्हवी-जयंतच्या लग्नाची लगबग; आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्याची तयारी! मालिकेत दिसणार महासंगम

0
Marathi Serial : जान्हवी-जयंतच्या लग्नाची लगबग; आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्याची तयारी! मालिकेत दिसणार महासंगम


Marathi Serial Bhavya Mangalkarya : मराठी टेलिव्हिजनचा हा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजनची खास मेजवानी घेऊन येणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. या भव्य मंगलकार्यासाठी दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब एकत्र येत आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चार चांद लावायला तयार झाले आहेत. भव्य मंगलकार्य म्हटलं म्हणजे हे कार्य पार पडण्यासाठी स्थळही तितकच भव्य हवं. तेव्हा पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर हे भव्य मंगलकार्य खऱ्या अर्थाने आलिशान महालात पार पडणार आहे.



Source link

खळबळजनक! पुण्यात विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली १०० रुपयांची सुपारी

0
खळबळजनक! पुण्यात विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली १०० रुपयांची सुपारी



Pune Crime : पुण्यात एका मोठ्या शाळेत विद्यार्थिनीचा बलात्कार व तिचा खून करण्यासाठी एका दुसऱ्या विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  



Source link

Don 3 : रणवीर सिंहच्या ‘डॉन ३’मध्ये कोण बनणार खलनायक? समोर आलं प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव!

0
Don 3 : रणवीर सिंहच्या ‘डॉन ३’मध्ये कोण बनणार खलनायक? समोर आलं प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव!


Don 3 Villain Character : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची ‘डॉन ३’साठी निवड झाली, तेव्हा चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या फ्रँचायझीच्या सिक्वेलची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. यानंतर या चित्रपटात व्हिलन अर्थात खलनायक कोण सकरणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. पण, जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा रणवीर सिंह आता यात शाहरुख खानची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले होते. २ वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची घोषणा झाली होती, पण या चित्रपटाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पण आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, जे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवणार आहे.



Source link

Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

0
Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?


Nayanthara Dhanush Documentary Clash : अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील एक वाद मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला होता. यात आता धनुषने विजय मिळवला आहे. धनुषने दाखल केलेल्या कॉपीराईट प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. धनुषने दावा केला होता की त्याच्या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप नयनताराच्या माहितीपटात परवानगीशिवाय वापरली गेली होती.



Source link

Navi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात! दोन रिक्षा व कारच्या धडकेत रिक्षा चालक ठार

0
Navi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात! दोन रिक्षा व कारच्या धडकेत रिक्षा चालक ठार


Sion-Panvel Road Accident : मुंबईत आपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. एक भरधाव कार जुईनगर येथील स्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकली. यात दोन रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.



Source link

Entertainment News in Marathi Live: Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

0
Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?


Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 29 Jan 202506:36 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

  • Nayanthara Dhanush Clash : मद्रास हायकोर्टाने धनुष आणि नयनतारा यांच्या वादात नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली आहे. नयनताराच्या माहितीपटात धनुषच्या एका चित्रपटाशी संबंधित काही फुटेज वापरले गेले होते. यासंदर्भात त्याने नयनताराविरुद्ध केस दाखल केली होती. 


Read the full story here

Wed, 29 Jan 202505:56 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

  • Boney Kapoor Kissa : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने नुकत्याच आपल्या व्लॉगमध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला. बोनी हेलिकॉप्टरचा रिक्षा म्हणून कसा वापर करत होते, हे सांगितले.


Read the full story here





Source link

हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

0
हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं


Farah Khan, Boney Kapoor : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आपल्या व्लॉगमधून खूप अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने बोनी कपूर आणि त्यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत एक व्लॉग शूट केला. यावेळी फराह खानने बोनी कपूर यांची मुलगी खुशीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे. त्या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बोनी कपूर हेलिकॉप्टरचा वापर रिक्षा आणि डंझो डिलिव्हरी अॅप म्हणून कसे करत होते, याचा किस्सा तिने संगितला.



Source link