
Punha Kartavya Aahe TV Serial : विशाखाने आकाश आणि वसुंधराला संपवण्याचा निर्धार केला आहे. आता वसुंधराला हा प्लॅन कळेल का आणि ती यातून आकाश आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकेल का?

Punha Kartavya Aahe TV Serial : विशाखाने आकाश आणि वसुंधराला संपवण्याचा निर्धार केला आहे. आता वसुंधराला हा प्लॅन कळेल का आणि ती यातून आकाश आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकेल का?

Budget 2025 Income Tax Expectations: बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा असतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. टॅक्समध्ये किती सुट मिळते याकडे सर्वांचे लक्ष असते. विशेषतः नोकरदार आणि मध्यमवर्गीय आयकर कपातीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. यंदाच्या बजेटनंतर 10 लाख रुपयांपर्यंतची इनकम टॅक्स फ्री होऊ शकते. मात्र, हे कसं काय शक्य आहे? जाणून घेऊया बजेटचे गणित.
यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा नाहीत. अर्थमंत्री जुनी करप्रणाली रद्द करण्याची घोषणा करु शकतात. नव्या करप्रणालीतील टॅक्समध्ये अधित सूट देऊ शकतात. करात कपात करुन अर्थमंत्री करदात्यांना भेट देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.
नव्या कर प्रणालीचा अधिक करदात्यांना मोठा फायदा होऊ शकतो. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून आयकर कमी करण्यावरही चर्चा सुरू आहे. यावेळी अर्थमंत्री अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅब बदलून आयकरात दिलासा देतील, अशी अपेक्षा करदात्यांकडून केली जात आहे. अर्थसंकल्पात कर सवलतीची घोषणा झाल्यास याचा मोठा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे.
दरम्यान बचतीची एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर वाचवता येवू शकतो. अर्थसंकल्पात करात सवलत मिळाली नाही तरी 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न या बचत पद्धतींद्वारे करमुक्त करता येऊ शकते. सध्याच्या कर प्रणालीमध्ये दोन प्रकारच्या कर व्यवस्था आहेत. जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था. जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंत आणि नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. यानंतरच्या उत्पन्नावर वेगवेगळ्या स्लॅबमध्ये कर आकारला जातो, परंतु असे बरेच मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने आयकर दायित्व कमी करू शकता किंवा शून्य देखील करू शकता. वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असले तरी ते पूर्णपणे टॅक्स फ्री होऊ शकते.
जुन्या कर प्रणालीमध्ये, वैयक्तिक बचतीसाठी कर सवलत उपलब्ध आहे, तर नवीन प्रणालीमध्ये, अशी वजावट उपलब्ध नाही. नव्या करप्रणालीत फक्त 75 हजार रुपयांची कर सवलत आहे. 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर जुन्या करांतर्गत कर भरल्यास, 50 हजार रुपयांची सूट मिळते. 80C अंतर्गत ज्यामध्ये PPF, EPF, SSY, NCS इत्यादी बचत योजनांचा समावेश आहे. 1.50 लाख रुपयांची वजावट किंवा करमुक्त उत्पन्न उपलब्ध आहे.
80D अंतर्गत, आरोग्य विमा प्रीमियमवर 25 हजार रुपयांची बचत होते. 80TTA अंतर्गत, बचत बँक खात्यात मिळालेल्या व्याजावर 10,000 रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. 24(b) अंतर्गत, गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. 80CCD(1B) अंतर्गत, NPS मध्ये अतिरिक्त योगदानावर 65 हजार रुपयांची वजावट आहे. सर्व गोष्टी एकत्र केल्या तर वार्षिक उत्पन्न एकूण 5 लाख रुपयांनी कमी करता येवू शकते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये असेल, ज्यावर जुन्या कर प्रणालीनुसार आयकराची गणना केली जाऊ शकते.
2.50 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर जवळपास 12500 रुपये असतो. आता आयकराच्या कलम 87A अंतर्गत प्रत्येक करदात्याला 12500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशाप्रकारे 10 लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री करता येवू शकते. आयकर नियमांनुसार, कलम 87A अंतर्गत सूट फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे.

Anjali Damania on Dhananjay munde resignation : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे त्यांना दिले होते. त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधाबाबतची माहितीही अजित पवारांना दिली होती. त्यानंतर या भेटीबाबत अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आपण केवळ ४ दिवस थांबणार आहोत. त्यानंतर मोठे आंदोलन सुरु करणार असल्याचे तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

Govinda Wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. कुठल्याही विषयावर बोलायला ती कधीच मागेपुढे पाहत नाही. आता सुनीता म्हणाली की, तिला गोविंदाबद्दल अधिक असुरक्षितता वाटत आहे, कारण आता अभिनेत्याकडे काम नाही, त्यामुळे आता त्याच्याकडे अफेअर करण्यासाठी बराच वेळ आहे. सुनीता म्हणाली की, तिला आता स्वतःसाठी नवीन करिअर करायचे आहे.

Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्याकडे आलेले चित्रपट नाकारतात आणि टेक चित्रपट पुढे जाऊन तूफान हिट होतात. अनेक बड्या कलाकारांसोबत देखील असं घडतं. असंच काहीस बॉलिवूडच्या एका चित्रपटासोबत घडलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, या तिन्ही कलाकारांनी हा चित्रपट नाकारला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इतका गाजला की, आजही लोक तो आवडीने पाहतात.

Santosh Deshmukh case : दिल्ली दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत असेल की, मी राजीनामा द्यावा तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.

Ethanol Price News : सी-ग्रेड गुळापासून काढल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं आज घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळं सरकारच्या इंधन मिश्रण कार्यक्रमाला मदत होणार असून शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणार आहे.

Indian Railway: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीच्या लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण विचार करतो की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. पण, या रेल्वेसाठी जे रुळांचं जाळं पसरलेलं आहे ते बनवण्यासाठी किती खर्च लागतो हे तुम्हाला महित आहे का? जाणून घ्या एक किलोमीटर एवढा रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठीचा खर्च.
भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे प्रणाली आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. देशभरात रेल्वे नेटवर्क वेगाने विस्तारीत होत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रेल्वे ट्रॅक (पटरी) टाकण्यासाठी किती खर्च येतो? हा खर्च तुम्ही विचार करु शकणार नाही एवढा जास्त असतो.
भारतात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या भारतीय रेल्वे दररोज सुमारे 13,000 गाड्या चालवते आणि त्याद्वारे लाखो प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही देशातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संस्था आहे. देशातील बहुतांश भाग रेल्वेच्या माध्यमातूनच जोडले गेले आहेत.
भारतात एकूण रेल्वे मार्गाची लांबी 1 लाख 26 हजार 366 किलोमीटर आहे, त्यापैकी रनिंग ट्रॅक 99 हजार 235 किमी लांब आहे. देशभरात 8 हजार 800 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक रेल्वे मार्ग असलेले राज्य असून, तिथे 9 लक्ष 7 हजार 745 किमी लांब रेल्वे मार्ग आहे.
रेल्वे ट्रॅक टाकण्याचा खर्च तो ज्या भागात टाकला जातो त्यावर अवलंबून असतो. माळरान आणि समतल भागात एक किलोमीटर रेल्वे पटरी टाकण्यासाठी सुमारे 10 ते 12 कोटी रुपये खर्च येतो. मात्र, डोंगराळ आणि अवघड भागांमध्ये हा खर्च जास्त होतो.
जर आपण हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (जसे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प) बघितला, तर त्यासाठी एक किलोमीटर पटरी टाकण्याचा खर्च 100 ते 140 कोटी रुपये पर्यंत होतो. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, पूल आणि अन्य सुविधा यांचा समावेश असतो.
हे ही वाचा: भारतात ‘या’ राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला तर हजारोंच्या दंडासहीत होते कारावासाची शिक्षा
भारतीय रेल्वे सतत रेल्वेचे जाळे विस्तारत आहे आणि नव्या प्रकल्पांवर भर देत आहे. काळांतराने आणखी वेगवान आणि आधुनिक रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे भारतातील प्रवासी अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद रेल्वे प्रवासाचा आनंद घेऊ शकतील

Comrade Govind Pansare Murder Case :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे कायम अतिशय चवदार आणि अनोखे पदार्थ बनवताना दिसतात. या शोच्या माध्यमातून अनेक सेलेब्स तुम्हाला एकत्र स्वयंपाक करताना दिसणार आहेत. यावेळी शोमध्ये दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, अनुपमा शोमधील गौरव खन्ना, मिस्टर फैजू, निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी आणि इतर काही प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या सेलिब्रिटींशी शोसाठी तगडे मानधन देखील घेतले आहे.