Sunday, August 2, 2026
Home Blog Page 557

काय आहे संगम नोज? महाकुंभात तेथे जाण्यासाठी का होती चढाओढ; अमृत स्नानाशी आहे कनेक्शन

0
काय आहे संगम नोज? महाकुंभात तेथे जाण्यासाठी का होती चढाओढ; अमृत स्नानाशी आहे कनेक्शन


आखाड्यांचा काय संबंध?

कुंभ, महाकुंभ, मकर संक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावस्या, शाही स्नान किंवा इतर पवित्र गंगास्नान या प्रसंगी संगम नोजवर गंगा स्नान करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे तेथील संगम नाकापर्यंत जाण्यासाठी आखाड्याचा मार्ग तयार करून बॅरिकेड्स लावले जातात. या मार्गावर सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. साधू-संत या मार्गावरून जाऊन अमृतस्नान करतात. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मेळा प्रशासनाने तेथे त्रिवेणी रस्ताही बांधला होता, मात्र मोठ्या गर्दीमुळे बॅरिकेड्स तोडून चेंगराचेंगरी झाली.



Source link

MHADA Housing Scheme : ‘म्हाडा’च्या माध्यमातून २ वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार – एकनाथ शिंदे

0
MHADA Housing Scheme : ‘म्हाडा’च्या माध्यमातून २ वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार – एकनाथ शिंदे


MHADA Housing Scheme  २०२५ : सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 



Source link

GBS Outbreak : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
GBS Outbreak : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


Guillain Barre Syndrome:  जी बी सिंड्रोमने पुण्यासह राज्यभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुण्याबरोबरच नागपूर, सोलापूर, कोल्हापुरातही जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. आज पुण्यात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात एका ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यात आज (२९ जानेवारी) नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.



Source link

महाकुंभात आतापर्यंत २० कोटी भाविकांना केले गंगास्नान, कशी होते गणना; जाणून घ्या सर्व पद्धती

0
महाकुंभात आतापर्यंत २० कोटी भाविकांना केले गंगास्नान, कशी होते गणना; जाणून घ्या सर्व पद्धती


Mahakumbh Prayagraj : प्रयागराज महाकुंभात आतापर्यंत २० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र गंगा स्नान केले आहे. बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी १० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने बुधवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, आतापर्यंत ५.७१ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली आहे, तर २८ जानेवारीपर्यंत एकूण आकडा १९.७४ कोटी झाला आहे.



Source link

शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या ‘मी तर फक्त…’

0
शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या ‘मी तर फक्त…’


Viral Video: पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अप्लाइड सायकॉलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या कथितपणे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसत आहेत. व्हिडीओत प्रोफेसर एखाद्या नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे. तसंच गळ्यात हार असून, विद्यार्थी भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. 

व्हिडीओच्या व्यतिरिक्त एक हस्तलिखित ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’देखील व्हायरल झालं आहे. यामध्ये तीन साक्षीदारांसह विद्यार्थी आणि शिक्षिकेचेही सही आहे. ही घटना समोर आल्यानंतर युनिव्हर्सिटीने कारवाई केली असून, शिक्षिकेला सुट्टीवर पाठवलं आहे. 

शिक्षिकने मांडली आपली बाजू

वाद निर्माण झाल्यानंतर शिक्षिकेने आपली बाजू मांडली आहे. हे लग्न नव्हतं, तर फ्रेशर्स पाटीसाठी बसवण्यात आलेलं एक नाटक होतं असा दावा डॉक्टर पायल बॅनर्जीने केला आहे. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने लीक झाला असून, आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे. 

डॉक्टर पायल बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, हे फक्त एक नाटक होतं, जे चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी जाणुनबुजन हे व्हायरल केलं आहे. मी त्या विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. 

युनिव्हर्सिटीचं नेमकं काय म्हणणं आहे?

युनिव्हर्सिटीचे कार्यवाहक कुलपती तपस चक्रवर्ती यांनी ही घटना स्विकारली जाऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. तसंच याप्रकरणी तपास समिती गठीत करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर हा फक्त एका प्रोजेक्टचा भाग होता तर मग विभागाध्यक्षाला सुट्टीवर का पाठवण्यात आलं?

शिक्षक संघटनेने दाखल केली तक्रार

युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर सुशांतो काय यांनीही डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा दावा फेटाळून लावला आहे. शिक्षकांच्या समितीनेही याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तपास समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. 





Source link

कित्येक महिने ती बसली नाही की झोपली नाही, चालायलाही विसरली; अंतराळात अडकून पडलेली सुनीता विल्यम्स आता कशी आहे?

0
कित्येक महिने ती बसली नाही की झोपली नाही, चालायलाही विसरली; अंतराळात अडकून पडलेली सुनीता विल्यम्स आता कशी आहे?


Sunita Williams News : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या सात महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकून पडल्या आहेत. ती जून २०२३ मध्ये अंतराळवीर बुच विल्मोरसोबत आठ दिवसांसाठी आयएसएसमध्ये पोहोचली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिच्या परतीला उशीर झाला. नासा आणि एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स दोन्ही अंतराळवीरांच्या सुखरूप परतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, सुनीता विल्यम्सने तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे सांगितले. ती म्हणाली की ती कित्येक महिन्यांपासून चाललेली नाही, बसलेली नाही किंवा झोपलेली नाही. “मला चालायचेही आठवत नाही.



Source link

पुणे हादरलं ! एकाच दिवसात ७ जणांनी संपवले जीवन, ६ जणांचा गळफास तर एकाची इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी

0
पुणे हादरलं ! एकाच दिवसात ७ जणांनी संपवले जीवन, ६ जणांचा गळफास तर एकाची इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी


एकाच दिवशी सात जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड हादरलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व आत्महत्या झाल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी एकाच दिवशी सात जणांनी आपले आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. यातील ६ जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले तर एकाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यूला कवटाळले. 



Source link

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर

0
Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर


Maha Kumbh Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती या भव्य धार्मिक मेळाव्याच्या सुरक्षेची देखरेख करणाऱ्या पोलिस प्रमुखांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. मृतांमधील 25 जणांची ओळख पटली, इतर 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच 60 जण जखमी असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. 

चेंगराचेंगरी झाल्यानंतर स्थानिक रिपोर्ट आणि प्रयागराजमधील नागरिकांकडून मृतांच्या आकड्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात होते. यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. यानंतर अखेर प्रशासनाने अधिकृतपणे मृतांचा आकडा जाहीर केला आहे. 

महाकुंभमेळा प्रशासनाचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, काही भाविक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी काही भाविक झोपलेले होते जे चिरडले गेले. डीआयजी म्हणाले की तिथे कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल नव्हता. जखमींच्या माहितीसाठी 1920 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

प्रयागराज महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 90 जण जखमी झाले होते, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे अशी माहिती मेळा प्रशासनाने पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्नाटकातील चार आणि गुजरातमधील एका भाविकाचीही ओळख पटली आहे.

नेमकं काय घडलं? 

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली.

यंदाच्या वर्षी फक्त 2 अमृत स्नान? 

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आखाडा परिषदेनं मोठा निर्णय घेत यंदाच्या वर्षी फक्त दोन अमृत स्नानं असतील असं स्पष्ट केलं होतं. यापैकी पहिलं अमृत स्नान 14 जानेवारी रोजी पार पडलं असून, दुसरं अमृत स्नान 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंतमीचा पार पडणार आहे. पण नंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

महाकुंभ मेळ्याच क्षमतेहून अधिक गर्दी झाल्यामुळं संगमावर येऊन पवित्र स्नान करण्याचा आग्रह सोडत जिथं गंगा आहे तिथं हे स्नान करावं असं आवाहन महाकुंभमेळ्यातील महंतांनी केलं आहे.  





Source link

Budget 2025:1 फेब्रुवारीला येणार देशाचा बजेट, Share Market खुले राहणार की बंद?

0
Budget 2025:1 फेब्रुवारीला येणार देशाचा बजेट, Share Market खुले राहणार की बंद?


Share Market Update For 1st Feb: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर मार्केटवर होताना आपण पाहिले असेल. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही शेअर्सच्या किंमती उसळी घेतात तर काही शेअर्सच्या किंमती कोसळतात. भारतीय शेअर मार्केटमध्ये आपल्याला याचे परिणाम दिसतात. यावेळचा अर्थसंकल्प सादर होत असताना 1 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. शेअर मार्केट सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारी बंद असतो. अशावेळी अर्थसंकल्प जाहीर होत असताना शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबद्दल जाणून घेऊया. 

1 फेब्रुवारीसंदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी शेअर बाजार सुरु होईल आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत खुला राहील, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. 

शनिवारी केव्हा खुलणार शेअर बाजार? 

सर्वसाधारणपणे शेअर बाजार आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवारी बंद राहतो. पण काही खास दिवशी खुला राहतो. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट असल्याने शेअर बाजार सुरु राहील, असे एनएससीने म्हटलंय. 

त्याचप्रमाणे याआधी 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला तेव्हा शनिवार होता.  त्या दिवशी बाजार खुला होता. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी बाजार सुरू होण्यापूर्वी ज्यांना ट्रेडींग करायचे आहे त्यांच्यासाठी बाजार सकाळी 9 वाजल्यापासून खुला राहील.

एका नोटिफिकेशननुसार, बीएसई निर्देशांकाची गणना 1 फेब्रुवारी 2025 (शनिवार) रोजी देखील केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मुळे एक्सचेंजने हा दिवस विशेष ट्रेडींग दिवस म्हणून घोषित केला आहे. नियमित व्यवहार वेळेत बाजार खुला राहील. याबद्दल अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.

ब्लॉक डील मीटिंग-1 सकाळी 8.45 ते 9 दरम्यान असेल. विशेष प्री-ओपन सत्र (आयपीओ आणि सूचीबद्ध सिक्युरिटीजसाठी): सकाळी 9 ते 9.45 दरम्यान असेल. कॉल ऑक्शन इलक्विड सेशन (प्रत्येकी 1 तासाचे 6 सेशन) सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन दरम्यान असेल.  ब्लॉक डील मीटिंग-2 दुपारी 2.5 ते 2.20 दरम्यान असेल. पोस्ट क्लोजिंग सेशन दुपारी 3.40 ते 4 वाजेपर्यंत असेल. ट्रेड मॉड‍िफ‍िकेशन कट ऑफ टाइम संध्याकाळी सव्वा चारपर्यंत असणार आहे.





Source link

मॅजिस्ट्रेटच्या इच्छेसाठी श्रीदेवीला जबरदस्ती कोर्टात बोलावलं गेलं; प्रसिद्ध वकिलाचा धक्कादायक खुलासा

0
मॅजिस्ट्रेटच्या इच्छेसाठी श्रीदेवीला जबरदस्ती कोर्टात बोलावलं गेलं; प्रसिद्ध वकिलाचा धक्कादायक खुलासा


ज्येष्ठ वकील मजीद मेमन यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. दरम्यान, त्यांनी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचा देखील किस्सा सांगितला आहे. एका प्रकरणात मॅजिस्ट्रेटला श्रीदेवीला भेटायचे असल्याने जबरदस्तीने कोर्टात बोलावले होते. सलमान आणि शाहरूखशी संबंधित प्रकरणावरही मजीद मेमन यांनी वक्तव्य केले.



Source link