Sunday, August 2, 2026
Home Blog Page 555

Fiscal Deficit म्हणजे काय? GDP, GST चा अर्थ काय? समजून घ्या बजेटमधल्या 10 शब्दांचे अर्थ

0
Fiscal Deficit म्हणजे काय? GDP, GST चा अर्थ काय? समजून घ्या बजेटमधल्या 10 शब्दांचे अर्थ


Top 10 Commenly Used Key Terms In Union Budget: अर्थसंकल्प म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. अनेकदा अर्थसंकल्पामधील तांत्रिक बाबी सर्वसामान्यांना समजत नाहीत. खास करुन आर्थिक गोष्टींसंदर्भातील शब्द अनेकांना कळत नाहीत. त्यामुळेच यंदाच्या म्हणजेच 2025 च्या बजेटआधी नियमितपणे अर्थसंकल्प सादर करताना, त्याचं विश्लेषण करताना वापरले जाणारे शब्द कोणते आणि त्यांचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत.

केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget)

भारतीय संविधानाच्या कलम 112 नुसार केंद्रीय अर्थसंकल्पाची व्याख्या पुढीलप्रमाणे: केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे सरकारने त्यांच्याकडील प्राप्ती आणि खर्चाचे विवरणाचा अंदाज असतो. हा अंदाज विशिष्ट वर्षासाठी वार्षिक वित्तीय विवरण म्हणून ओखळला जातो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अर्थसंकल्प हा एका विशिष्ट कालावधीसाठीची आर्थिक योजना असते. केंद्रीय अर्थसंकल्प विविध प्रकल्प आणि एजन्सींना पैशांची तरतूद, वाटप करण्याच्या सरकारच्या योजनेची रूपरेषा सादर केली जाते. भारत सरकारसाठी कर हा उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, केंद्रीय अर्थसंकल्पात करांचे दर किती असतील आणि नियमांमध्ये कोणते बदल असतील हे नमूद केलं जातं.

सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product (GDP))

सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी हा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. सकल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी हे एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व तयार वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य असते. बहुतेक देशांमध्ये, आर्थिक स्थर मोजण्यासाठी जीडीपी हे मानक आहे. जीडीपीची मोजणी वार्षिक किंवा त्रैमासिक आधारावर करता येते. भारतात, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या विभागांकडून माहिती जमा करून देशाच्या जीडीपीची गणना करते. भारत सरकार त्रैमासिक पद्धतीने जीडीपीचे आकडे जारी करतात. तर अंतिम आकडा 31 मे रोजी जारी केला जातो.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर (Direct and Indirect Taxes)

कर हा सरकारच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत असतो. भारतात दोन प्रकारचे कर आकराले जातात. एक म्हणजे प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे एखाद्या व्यक्तीने थेट सरकारला भरलेला कर. यामध्ये आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्सचा समावेश होतो. दुसरीकडे, अप्रत्यक्ष कर हा सरकारला कर देताना तो एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. अप्रत्यक्ष कराचे साधे उदाहरण सांगायचं झालं तर जीएसटीबद्दल बोलता येईल. तुम्ही एखादे उत्पादन/सेवा खरेदी करता तेव्हा, विक्रेत्याला विक्रीवर सरकारला कर भरावा लादतो. मात्र त्याला जीएसटीच्या माध्यमातून ग्राहकांकडून कराची रक्कम वसूल करण्याची परवानगी आहे. ही रक्कम शेवटी सरकारकडेच जमा केली जाते. म्हणून, विक्रेता ग्राहकांकडून कर वसूल करून, त्यांना अप्रत्यक्ष करदाता बनवतात.

नक्की वाचा >> ‘या’ 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?

वस्तू आणि सेवा कर (GST)

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर हा भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू/सेवांवर आकारला जातो. हा अप्रत्यक्ष कराचा एक प्रकार आहे जेथे ग्राहक कर भरतो, परंतु ती रक्कम व्यावसायिक आस्थापनेद्वारे सरकारला पाठविली जाते. जीएसटीमुळे सरकारच्या उत्पन्नात भर पडते.

सीमाशुल्क (Customs Duty)

जेव्हा एखादी व्यक्ती भारतात वस्तू आयात करते किंवा निर्यात करते तेव्हा सरकार व्यवहाराच्या रकमेवर कर आकारते. ही रक्कम भरण्याचा आर्थिक भार आयातदार अथवा निर्यातदारावर असताना, तो सामान्यतः ग्राहकांना भरावा लागतो. म्हणून, हा देखील अप्रत्यक्ष कराचा एक प्रकार आहे.

वित्तीय तूट (Fiscal Deficit)

फिस्कल म्हणजे सरकारचा महसूल. डेफिसीट म्हणजेच तूट याचाच अर्थ सरकारच्या महसुलामधील वित्तीय तूट! सोप्या भाषेत, म्हणजे सरकारला त्याच्या खर्चाशी संबंधित कर्ज न घेतलेल्या पावत्या (उत्पन्न) मध्ये होणारी तूट किंवा कमतरता. जर खर्च पावत्यांपेक्षा जास्त असेल (नॉन-कर्ज घेतलेले), तर एकूण खर्च आणि सरकारच्या एकूण बिगर-कर्ज पावत्यांमधील फरक म्हणजे तिची वित्तीय तूट. हे सहसा देशाच्या जीडीपीची टक्केवारी म्हणून दर्शविले जाते.

भांडवली अर्थसंकल्प (Capital Budget)

भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली रिसिप्ट्स आणि भांडवली खर्च यांचा समावेश होतो. भांडवली रिसिप्ट्समध्ये निर्गुंतवणूक, लोकांकडून घेतलेली कर्जे, विदेशी सरकारे आणि संस्थांकडून कर्जे, RBI कडून घेतलेली कर्जे, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार आणि इतर पक्षांकडून कर्जाची वसुली इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. तर भांडवली खर्चामध्ये आरोग्य सुविधा, यंत्रसामग्री, रस्ते, जमीन, इमारती इत्यादींचा विकास करण्यासाठी सरकारने केलेला खर्च आणि केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार, सरकारी कंपन्या, कॉर्पोरेशन आणि इतर पक्षांना दिलेली कर्जे यांचा समावेश होतो.

वित्तीय धोरण (Fiscal Policy)

जेव्हा एखादा देश अर्थसंकल्प जाहीर करतो तेव्हा त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर सरकारने आयकर दर बदलला तर त्याचा परिणाम लोकांच्या हातात असलेल्या खर्च करु शकणाऱ्या उत्पन्नावर होतो आणि त्यांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. याचा परिणाम व्यवसायांबरोबरच सरकारच्या कर उत्पन्नावर होतो. म्हणून, सरकार आपल्या खर्च आणि कर धोरणांचा अशाप्रकारे वापर करते ज्यामुळे ते देशाच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतील. याच धोरणात्मक निर्णयांना सरकारचे वित्तीय धोरण असं म्हणतात. अर्थसंकल्प हे सहसा वित्तीय धोरणांचे सूचक असते.

चलनविषयक धोरण (Monetary Policy)

अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह थेट अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम करतो. त्यामुळे, अपेक्षित असेलेली वाढ सुनिश्चित करण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेमधील पैशाचा पुरवठा म्हणजेच तरलतेवर लक्ष ठेवून असते. हे काम देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे केले जाते. भारतामधील बँकांची बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) म्हणून ओळखली जाते. आर्थिक धोरण म्हणजे शाश्वत विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठानियंत्रित करण्याचं काम आरबीआय करते. 

महागाई (Inflation)

चलनवाढ होत आहे हे अधोरेखित करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे. अर्थव्यवस्थेतील सामान्य किमतीच्या पातळीवर ही सतत वाढ होते. चलनाची क्षमताही कमी होते. चलनाच्या मूल्यात कालांतराने घट देखील होत असते. सोप्या भाषेत, आज तुमच्याकडे एक हजार रुपये तुम्ही ठराविक वस्तू/सेवा त्यामधून खरेदी करू शकता. तथापि, दहा वर्षांनंतर त्याच पैशांमध्ये तुम्हाला आजच्या इतक्याच वस्तू आणि सेवा मिळणार नाहीत. यालाच चलनाच्या मूल्यात होणारी घट म्हणतात.

 

 





Source link

Appraisal आणि Increment दोन्ही एकच? मोठी चुक करताय, आधी यातील फरक पाहून घ्या

0
Appraisal आणि Increment दोन्ही एकच? मोठी चुक करताय, आधी यातील फरक पाहून घ्या


Appraisal आणि Increment दोन्ही एकच? मोठी चुक करताय, आधी यातील फरक पाहून घ्या  title=

Appraisal vs Increment, Salary Hike Difference, Performance Appraisal, Increment Meaning, Salary Growth, Job Promotion, Annual Salary Review, Performance Evaluation, पगार, मराठी बातम्या, अप्रेझल, अप्रायजल, पगारवाढ, job news,





Source link

अजित पवार स्वत: आर्थिक गुन्हेगार, ते दुसऱ्यांवर काय कारवाई करणार?; संजय राऊत यांचा हल्लाबोल

0
अजित पवार स्वत: आर्थिक गुन्हेगार, ते दुसऱ्यांवर काय कारवाई करणार?; संजय राऊत यांचा हल्लाबोल


Maharashtra Politics : बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या इशाऱ्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘अजित पवार हे स्वत: आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार आहेत. ते इतरांवर काय कारवाई करणार? त्यामुळं याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही हे त्यांनी बोलूच नये,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.



Source link

राज ठाकरे यांनाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, निकालानंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता!

0
राज ठाकरे यांनाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, निकालानंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता!


Raj Thackeray on Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. काही उमेदवारांनी तर थेट पैसे भरून पुन्हा मतमोजणी करून घेतली होती. त्यानंतर आता आज राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ईव्हीएमवर देखील शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला असताना  त्यांना विधानसभा निवडणुकीत  ४३ जागा कशा मिळाल्या ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.



Source link

Video : भगवी वस्त्र परिधान करून प्रवीण तरडे पोहोचले महाकुंभात; पत्नीसोबत केलं शाही स्नान! बघाच…

0
Video : भगवी वस्त्र परिधान करून प्रवीण तरडे पोहोचले महाकुंभात; पत्नीसोबत केलं शाही स्नान! बघाच…


त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले की, ‘अद्भुत अनुभव… त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावस्या, महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश.’ आता प्रवीण तरडे यांच्या या व्हिडिओवर अनेक जण भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. तर, चाहत्यांना देखील आपल्या लाडक्या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.



Source link

सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, ‘इतक्या’ जणांना लागण

0
सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, ‘इतक्या’ जणांना लागण


GBS outbreak Sangli : पुण्यात गुलेन बॅरे सिड्रोम आजार पाय पसरत आहे.  या दुर्मिळ जीबीएस आजाराने पुण्यात  थैमान घातले आहे. पुनयानंतर  कोल्हापूरात या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता जीबीएसने  सांगलीतदेखील  शिरकाव केला आहे. सांगलीत गुरुवारी  जीबीएसबाधित ३  रुग्ण आढळून आले असून  जिल्हयातील रुग्णसंख्या ६ वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून  नागरिकांनी घाबरू नये  तसेच योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  



Source link

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला सलमानच्या ‘या’ हिट सिनेमात काम करायचं होतं, दिग्दर्शकाने का नाकारलं?

0
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला सलमानच्या ‘या’ हिट सिनेमात काम करायचं होतं, दिग्दर्शकाने का नाकारलं?


बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामधील एक सिनेमा म्हणजे ‘हम साथ साथ हैं.’ हा चित्रपट १९९९मध्ये प्रदर्शित झाला होता. ९०च्या दशकात हा सिनेमा तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात सलमानसोबत अनेक बडे स्टार्स दिसले होते. सलमान खान, मोहनीश बहल, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे यांसारखे कलाकार दिसले. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी चित्रपटाच्या कास्टिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, माधुरीला या चित्रपटात काम करायचे होते. पण काही कारणास्तव घेता आले नाही.



Source link

पीएमएलए अंतर्गत गेल्या २० वर्षांत भ्रष्टाचारी लोकांचे किती पैसे जप्त केले? ईडीने सांगितला हिशोब

0
पीएमएलए अंतर्गत गेल्या २० वर्षांत भ्रष्टाचारी लोकांचे किती पैसे जप्त केले? ईडीने सांगितला हिशोब


७,४०४ कोटी रुपये मिळवले परत 

जप्त केलेली मालमत्ता भ्रष्टाचाराचे बळी आणि बँकांसारख्या वैध दावेदारांपर्यंत पोहोचविण्यातही ईडीला २०२४ मध्ये मोठे यश मिळाले आहे. ईडीने आतापर्यंत वैध दावेदारांना व बंधितांना २२,७३७ कोटी रुपये वितरित केले आहे.  तर एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत ७,४०४ कोटी रुपये परत मिळवण्यात यश आलं आहेत. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, रोज व्हॅली चिटफंड घोटाळा, नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा आणि प्रकरणांचा यात समावेश आहे.



Source link

Viral: भर वर्गात वधूच्या वेशात आली प्राध्यापिका! विद्यार्थ्याला डोक्यावर कुंकू लावायला सांगत केलं लग्नं, व्हिडिओ व्हायरल

0
Viral: भर वर्गात वधूच्या वेशात आली प्राध्यापिका! विद्यार्थ्याला डोक्यावर कुंकू लावायला सांगत केलं लग्नं, व्हिडिओ व्हायरल


Viral News : पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठातील वर्गात वधूच्या वेशात जात  एका विद्यार्थ्याशी एका महिला प्राध्यापकाने ‘लग्न’ केलं. दोघांच्या या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र, आम्ही लग्न केलं नसून नाटक होतं. तसेच त्यांच्या विषयासंबंधी अभ्यासाचा भाग असल्याचा दावा देखील या प्राध्यापिकेने केला आहे.



Source link

Pushpa 2 Hindi OTT release: ‘पुष्पा २’ होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे पाहाता येणार सिनेमा?

0
Pushpa 2 Hindi OTT release: ‘पुष्पा २’ होणार ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कुठे पाहाता येणार सिनेमा?


अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनीत ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली होती. आता हिंदी भाषेतील सिनेमा कुठे आणि कधी पाहायला मिळणार याविषयी माहिती समोर आली आहे.



Source link