Sunday, August 2, 2026
Home Blog Page 553

Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित

0
Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित


Buldhana Viral News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि  विचित्र घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचं  डॉक्टरांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला ही  सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिची सोनोग्राफी केल्यावर ही घटना उघकडीस आली.  



Source link

मोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला

0
मोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला


Chembur Metro construction collapses : चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा मोठा भाग हा शेजारी असलेल्या रहिवासी सोसायटीवर कोसळला आहे. लोखंडी सळयांचा मोठा सांगाडा या इमारतीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र, सोसायटीचे काही नुकसान झाले आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. सध्या कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



Source link

‘अनेक महिने अंतराळात अडकलेली’ सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल

0
‘अनेक महिने अंतराळात अडकलेली’ सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल


Sunita Williams News: नासाच्या दोन अंतराळवीरांनी तब्बल आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून एकत्र बाहेर पडताना गुरुवारी आपला पहिला स्पेसवॉक केला. भारतीय वंशाच्या कमांडर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर आणि व्हेंटमधून बाहेर पडल्यानंतर एखादी व्यक्ति ही जिवंत राहू शकते की नाही ? याचा शोध घेण्यासाठी स्थानकाच्या देखभालीचे काम आणि बाहेरील भाग स्वच्छ करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. हे दोघेही गेल्या वर्षी जूनपासून अंतराळात स्थानकात अडकून पडले आहे.



Source link

जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?

0
जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?



Jain Community : जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? जाणून घेऊया जैन धर्मीयांची जीवशैली. तसेच त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य.



Source link

Viral Video: मुंबईत तरुणाचा भटक्या कुत्र्यावर बलात्कार, बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवरील संतापजनक प्रकार

0
Viral Video: मुंबईत तरुणाचा भटक्या कुत्र्यावर बलात्कार, बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवरील संतापजनक प्रकार


Mumbai News: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका तरुणाने भटक्या कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित तरुणाचे क्रूर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.



Source link

भारतातील एकमेव रेल्वे स्थानक जिथे प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन थांबता पण या स्टेशनला नावचं नाही; प्रवासी तिकीट कसे घेतात?

0
भारतातील एकमेव रेल्वे स्थानक जिथे प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन थांबता पण या स्टेशनला नावचं नाही; प्रवासी तिकीट कसे घेतात?



भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे जे नाव नसतानाही पूर्णपणे कार्यरत आहे. या रेल्वे स्थानकाला नाव का नाही यामागची कहाणी खूपच रंजक आहे. 



Source link

लोणंद शहरातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम; व्यापाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन होणार

0
लोणंद शहरातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम; व्यापाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन होणार

लोणंद : लोणंद शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या समस्येमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. या पार्श्वभूमीवर तात्पुरता पर्याय म्हणून लोणंद-सातारा, लोणंद-शिरवळ, लोणंद-खंडाळा या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर एसटी स्टँड समोरील जागा व बाजार तळ येथे लहान व्यावसायिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

लोणंद नगरपंचायतीच्या कार्यालयात वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी, व्यापारी आणि मान्यवरांची बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षा मधुमती गालिये, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, सचिन शेळके, भरत शेळके, शिवाजीराव शेळके-पाटील, रवींद्र क्षीरसागर, पीडब्ल्यूडी शाखा अभियंता शिवाजी रेड्डी, एमएसईबीचे उपअभियंता तसेच स्थानिक व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले की, लोणंद शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपंचायत, महसूल प्रशासन, एनएचआय, पीडब्ल्यूडी, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. शिरवळ, सातारा आणि खंडाळा रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे हटवण्यात येतील. तसेच एसटी स्टँडसमोरील जागा आणि बाजारतळ येथे लहान व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून एनएचआयच्या वतीने रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने केले जाणार आहे.

शहरात पार्किंगची योग्य सोय करण्यासाठी गणेश मंदिरासमोर व इतर शासकीय जागांवर व्यवस्था करण्यात येईल. शिरवळ चौक आणि एसटी स्टँड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

यावेळी पीएसआय विशाल करम म्हणाले की, वाहतूक कोंडीसाठी तात्पुरता उपाय म्हणून अहिल्यादेवी चौकातील तीनही रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांचे नियोजन करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी गुरुवारी बाजारात ट्रान्सपोर्ट मालाची वाहतूक टाळावी. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेस कोणीही विरोध करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, राहुल घाडगे, हर्षवर्धन विके-पाटील, संदीप शेळके, असगर इनामदार, बंटी खरात, सागर गारत, गणेश गळके, लक्ष्मण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

0
प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं


Lover Burnt Girlfriend Alive: उत्तर प्रदेशातील प्रतापगडातून खळबळजनक घटना घडली आहे. कोहंडोर परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, संबंधित तरुण गंभीररित्या भाजला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.



Source link

एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

0
एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल


Mahakumbh Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील करोडो लोक हजेरी लावत आहेत. महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत एक साधू तरुणाच्या थोबाडीत लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याच्यावर कमेंट करत आहेत. काहीजण यामागील कारण विचारत असता, काहीजण त्यांनीयोग्य केल्याचं सांगत आहेत. 

महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “भाईने बाबांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक कानाखाली मिळाली”. 

रिपोर्टनुसार, बाबाने ज्या तरुणाला कानाखाली मारली आहे तो एक युट्यूबर आहे. तो हवेत हात उचलून महाकाल गिरी बाबाची नक्कल करत कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करत होता. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली असून काहींनी साधूने तरुणाला कानाखाली लावून अगदी योग्य केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. एकाने लिहिलं आहे की, “कानाखाली का मारली?”. तर एका युजरने लिहिलं आहे की, “बाबांनी एकदम योग्य केलं. हे लोक जे सेल्फी आणि रीलच्या नशेत आहेत ते असाच त्रास देत राहतात. ते आपल्या कॅमेऱ्यांसह प्रत्येक ठिकाणी घुसतात. त्यांना मारलंच पाहिजे”. तिसऱ्याने लिहिलं आहे की, ‘तो ज्या योग्यतेचा होता, तेच मिळालं’.

कथित यूट्यूबरला थप्पड मारणारी व्यक्ती म्हणजे महाकाल गिरी बाबा आहेत ज्यांनी आपला संकल्प दाखवण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून एक हात वर ठेवला आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या महाकाल गिरी बाबा यांनी गायींचे रक्षण आणि धर्माचे रक्षण करण्याची आजीवन प्रतिज्ञा घेतली आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे हातावरची नखे खूप वाढली आहेत, पण तपश्चर्या करताना नखे ​​कापली जात नाहीत. या साधनेमुळे लोक त्यांना हठयोगी म्हणू लागले आहेत.





Source link

केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर

0
केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर


Kedarnath Temple : हिमालय पवर्ताच्या कुशीच उंचीवर असलेले केदारनाथ मंदिर हे देशातील सर्वात पवित्र शिव मंदिरांपैकी एक आहे. हे प्राचीन मंदिर 1200 वर्षांहून अधिक जुने आहे.  केदारनाथ मंदिर नेमकं कधी बांधले कोणाला माहीत नाही. केदारनाथ मंदिराबाबतचे हे सर्वात मोठं रहस्य अद्याप उलगडलेले नाही. ऐतिहासिक ग्रंथ आणि दंतकथांमध्ये त्याच्या बांधकामाबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताच ठोस पुरावा नाही.  महाभारतातील पांडवांनी हे मंदिर बांधले अशी देखील अख्यायिका आहे. तर, याचा जीर्णोद्धार आदि शंकराचार्यांनी केला असे अनेकजण मानतात. भारतातील हे रहस्यमयी मंदिर थेट विज्ञानाला चॅलेंज देते. जाणून घेऊया या मंदिराविषयची न उलगडलेली रहस्य.

समुद्रसपाटीपासून 11,755 फूट (3,583 मीटर) उंचीवर असलेले केदरनाथ मंदिर वास्तुकलेचा अद्भूत चमत्कार देखील मानले जाते. हे मंदिर मोठमोठ्या दगडी गोट्यांनी बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामात कुठेही सिमेंट किंवा कोणत्याही आधुनिक जॉईनिंग केमिकल वापर करण्यात आलेला नाही.  या मंदिराचे बांधकाम इतके भक्कम आहे की भीषण भूकंप, हिमवर्षाव आणि नैसर्गिक आपत्तींचा देखील या मंदिरावर काहीच परिणाम झालेला नाही. हे मंदिर शतकानुशतके तसेच भक्कम स्थितीत आहे. या मंदिराच्या भिंतींवर करण्यात आलेले सुंदर नक्षीकाम आजही त्याची भव्यता दर्शवते.

2013 च्या पुरात केदारनाथ मंदिर चमत्कारिकरित्या वाचले

2013 मध्ये उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला होता. या विनाशकारी पुरात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता.  या नैसर्गिक आपत्तीत मंदिराच्या आजूबाजूच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही.  केदारनाथ मंदिर या महाप्रलयातही सुरक्षित राहिले. मंदिरामागे ‘भीमशिला’ नावाचा मोठा दगड विसावायला आला होता, असे मानले जाते. या दगडानेच पुराचे पाणी मंदिरापासून दूर वळवले. स्थानिक याला भगवान शकंराचा चमत्कार मानतात. 

पंच केदारमधील प्रमुख ठिकाणे

केदारनाथ मंदिर हे पंच केदार नावाच्या पाच पवित्र शिवमंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धानंतर, पांडव त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शिवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले. त्यांच्यापासून वाचण्यासाठी भगवान शिवाने बैलाचे (नंदी) रूप धारण केले आणि ते पृथ्वीवर बुडाले. त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले. केदारनाथ येथे कुबड, तुंगनाथ येथे हात, रुद्रनाथ येथे चेहरा, मध्यमहेश्वर येथे नाभी आणि कल्पेश्वर येथे केस. या पाच मंदिरांना मिळून पंच केदार म्हणतात.

केदारनाथ मंदिराचा प्रवास अतिशय कठिण आहे. कारण हे मंदिर वर्षातील  फक्त सहा महिने म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान भाविकांसाठी खुले असते. प्रचंड थंडी आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात हे मंदिर बंद असते. यावेळी, भगवान केदारनाथची मूर्ती उखीमठ येथे आणली जाते जिथे त्यांची पूजा केली जाते.





Source link