Saturday, August 1, 2026
Home Blog Page 552

कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव

0


Guillain-Barré Syndrome outbreak : पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीनंतर आता साताऱ्यात सुद्धा जीबीएसचा शिरकाव झाला आहे. सातारसह कराडमध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर दोन रुग्ण साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर एक रुग्ण कराडमध्ये उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे..

बीएस आजारामुळे आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला

दुसरीकडे, जीबीएस महाराष्ट्रात सर्वदूर होत चालला आहे. या जीबीएस आजारामुळे आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर या संशयित आजाराने मृतांची संख्या दोन झाली आहे. बुधवारी (29 जानेवारी) येथे जीबीएसची 16 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 29 जानेवारीपर्यंत GBS च्या 127 संशयित रुग्णांची ओळख पटली आहे, ज्यात 2 संशयित मृत्यूंचा समावेश आहे. यापैकी 72 रुग्णांमध्ये जीबीएसची पुष्टी झाली आहे. 23 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील, 73 रुग्ण पीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील, 13 पिंपरी चिंचवड महापालिकेतील, 9 पुणे ग्रामीण आणि 9 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. बाधितांपैकी 20 जण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जीबीएसची लक्षणे दिसू लागल्यास घाबरू नका आणि वेळेवर उपचार करता यावेत यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने मंगळवारी केले. अशी लक्षणे दिसल्यास उपचारात दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर या आजाराची लक्षणे दिसल्यास प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचा सल्लाही सरकारने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारीही अनेक ठिकाणी जीबीएसचे रुग्ण दिसले. यापैकी सात रुग्ण पुणे महापालिकेतील, एक रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिकेचा आणि एक रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील आहे.
आतापर्यंत, एकूण 127 संशयित GBS रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 मरण पावले आहेत. हे पाहता लोकांमध्ये अनेक प्रकारची चिंता निर्माण होत आहे, मात्र अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन सरकार सातत्याने करत आहे. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड

0
गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड


Ladki Bahin Yojana scam news : महायुतीला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. मात्र, या योजनेचे अनेक घोटाळे आता पुढे येऊ लागले आहेत. अनेकांनी बोगस लाभार्थी होत या योजनेचा फायदा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे, गावात मुस्लिम महिला नसतांना त्यांच्या नावाने काही परराज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

अमेरिकेचा सीरियावर भीषण हवाई हल्ला! हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी सलाह अल जाबीर ठार

0
अमेरिकेचा सीरियावर भीषण हवाई हल्ला! हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी सलाह अल जाबीर ठार


US Attack on Syria : अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी वायव्य सीरियात भीषण हवाई हल्ले केले. या  हवाई हल्ल्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी मोहम्मद सलाह अल-जबीर हा ठार झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला. जबीर अल कायदाशी संलग्न असलेल्या हुरास अल-दीन नावाच्या गटाशी संबंधित होता.



Source link

सोलापूर नियोजन भवनमध्ये पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

0
सोलापूर नियोजन भवनमध्ये पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

सोलापूर, 30 जानेवारी: सोलापूर जिल्ह्यातील नियोजन भवन इमारतीत पालकमंत्री कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज फीत कापून केले. उद्घाटनानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी:

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रथमच भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना, विविध शाखांचे कामकाज आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यांची माहिती दिली. तसेच, नव्याने तयार केलेल्या अभ्यागत कक्षाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली.

यावेळी महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित होते.

Maharashtra Election News LIVE January 31, 2025: आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं

0
Maharashtra Election News LIVE January 31, 2025: आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं


Maharashtra Election 2024 News LIVE: आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं

Maharashtra Election 2024 News LIVE: आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 31 Jan 202512:47 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं

  • Navi Mumbai Accident: नवी मुंबईत चार वर्षाच्या मुलीला पिकअपने चिरडल्याची घटना घडली.


Read the full story here

Fri, 31 Jan 202509:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात

  • Soldier Chandrakant Kale Martyred : भारतीय लष्कराचे जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) हे कर्तव्यावर असताना बुधवारी शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.


Read the full story here

Fri, 31 Jan 202507:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली

  • Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा पिंपळे गुरव रहिवासी आहे. 


Read the full story here

Fri, 31 Jan 202505:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने वार करून केली हत्या

  • Pune Crime news : पुण्यात कोथरूड येथे चार अल्पवयीन मुलांनी त्यांच्या मित्राची कोयत्याने वार करून हत्या केली आहे.


Read the full story here

Fri, 31 Jan 202504:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम

  • Rvindra Dhangekar on the way to join Shivsena : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटात इनकमिंग वाढलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शिवसेचे ६ बडे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.


Read the full story here

Fri, 31 Jan 202503:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड

  • Ladki Bahin Yojana : परराज्यातील काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं उघडं झालं आहे. यासाठी एक मोठ रॅकेट काम करत असल्याचा प्रकार देखील उघकडीस आला आहे.


Read the full story here

Fri, 31 Jan 202501:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ब्रेक अप झाल्याने प्रियकरांची सटकली! रागाच्या भरात थेट प्रेयसीच्या दोन गाड्या पेटवल्या; पुण्यातील रामवाडी येथील प्रकार

  • Pune Crime News : पुण्यात एका प्रेयकराने ब्रेकअप झाल्याने रागाच्या भरात प्रेयसीच्या गाड्या पेटवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


Read the full story here





Source link

ब्रेक अप झाल्याने प्रियकरांची सटकली! रागाच्या भरात थेट प्रेयसीच्या दोन गाड्या पेटवल्या; पुण्यातील रामवाडी येथील प्रकार

0
ब्रेक अप झाल्याने प्रियकरांची सटकली! रागाच्या भरात थेट प्रेयसीच्या दोन गाड्या पेटवल्या; पुण्यातील रामवाडी येथील प्रकार


Pune Crime News : पुण्यातील राम टेकडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी बोलत नसल्याने व तिने ब्रेकअप केल्याने रागाच्या भरात एकाने तिच्या दोन गाड्यांवर पेट्रोल ओतून त्या पेटवून दिल्या आहेत. ही घटना पुण्यातील रामवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

चाळीस लाख द्या; MPSC चा पेपर मिळणार परीक्षेच्या दोन दिवस आधी! विद्यार्थ्यांना आलेल्या फोनकॉलमुळे उडाली खळबळ

0
चाळीस लाख द्या; MPSC चा पेपर मिळणार परीक्षेच्या दोन दिवस आधी! विद्यार्थ्यांना आलेल्या फोनकॉलमुळे उडाली खळबळ


काय आहे घटना ?

नागपूरमधील एका कन्सलटंसीने अनेक मुलांना फोन करून आमिष दाखवले आहे. याचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. काही विद्यार्थ्यांना एका कन्सलटंसीकडून फोन आल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी त्यांनी ४० लाख रुपयांची मागणी केली असल्याचं देखील पुढं आलं आहे. कॉल आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तुम्ही ‘गट ब’च्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या साठी एक खास ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी तुम्हाला देऊ. मात्र, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपली मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. काही विद्यार्थ्यांनी हे कॉल रेकॉर्ड केले आहेत. तसेच यात संबंधीत विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा केली असून समोरच्या व्यक्तिने मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले.



Source link

पुण्यातील गहुंजे परिसरात रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना! वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद तर काही सुरू, वाचा

0
पुण्यातील गहुंजे परिसरात रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना! वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद तर काही सुरू, वाचा


Pune Gahunje traffic Update : पुण्यात आज गहूंजे येथील क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान, चौथा टी २० क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात पुणेकर क्रिकेट प्रेमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील होणारी गर्दी लक्षात घेता गहुंजे परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद तर काही मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच व्हीव्हीआयपी / व्हीआयपी / इतर अत्यावश्यक सेवा असा वाहनाचा पास असलेल्या वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येत आहे.



Source link

Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित

0
Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित


Buldhana Viral News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि  विचित्र घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचं  डॉक्टरांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला ही  सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिची सोनोग्राफी केल्यावर ही घटना उघकडीस आली.  



Source link

मोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला

0
मोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला


Chembur Metro construction collapses : चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा मोठा भाग हा शेजारी असलेल्या रहिवासी सोसायटीवर कोसळला आहे. लोखंडी सळयांचा मोठा सांगाडा या इमारतीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र, सोसायटीचे काही नुकसान झाले आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. सध्या कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



Source link