Saturday, August 1, 2026
Home Blog Page 551

मागासवर्गीयांवरील वाढते अन्याय-अत्याचार: महाराष्ट्रातील अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी कागदावरच!

0
मागासवर्गीयांवरील वाढते अन्याय-अत्याचार: महाराष्ट्रातील अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी कागदावरच!

मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले, पण अॅट्रॉसिटी कायदा कागदावरच!

सोलापूर: मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि दलित-आदिवासी समाजावर अन्याय-अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहेत. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये गणना होत असून, मागील पाच वर्षांत मातंग, बौद्ध, चर्मकार, होलार समाजासह अन्य दलित समाजांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

तालुकास्तरावरील परिस्थिती तर दूरच, पण राज्यस्तरीय समित्यादेखील कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. अॅट्रॉसिटी कायदा हा मागासवर्गीयांसाठी संरक्षण कवच मानला जातो, मात्र त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे.

अॅट्रॉसिटी अॅक्टची अंमलबजावणी ढिसाळ

अनुसूचित जाती आणि नवबौद्धांवर अन्याय करणाऱ्यांवर जरब बसावा, यासाठी अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करण्यात आला. प्रारंभी या कायद्याला समाजात भीती होती आणि प्रशासनाकडूनही प्रभावी अंमलबजावणी केली जात होती. मात्र, आता त्यात ढिसाळपणा आल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात २०२२ मध्ये अॅट्रॉसिटी नियंत्रण व दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या नियमांनुसार वर्षातून दोन वेळा बैठका होणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात एकदाही बैठक झाली नाही.

नोडल ऑफिसर नेमला, पण बैठकच नाही!

अॅट्रॉसिटी अॅक्टच्या नियमानुसार मंत्रालय स्तरावर प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणे गरजेचे होते. या नियुक्तीसाठी झालेल्या पाठपुराव्यानंतर हर्षदीप कांबळे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात समितीच्या बैठका घेण्यात आल्या नाहीत.

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २४ जुलै २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयाद्वारे या समितीची पुनर्रचना केली.

महत्त्वाच्या लोकांचा समावेश, पण निष्क्रिय समिती

या समितीत मुख्यमंत्री अध्यक्ष असून, उपमुख्यमंत्री आणि चार लोकसभा सदस्य डॉ. हिना गावित, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे आणि अशोक नेते यांचा समावेश करण्यात आला. तसेच आमदार बालाजी किणीकर, मंगेश कुडाळकर, ज्ञानराज चौगुले, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, लताबाई सोनवणे, अशोक उईके, सुनील कांबळे, डॉ. देवराज होळी, नमिता मुंदडा यांच्यासह १२ आमदार सदस्य म्हणून नेमले गेले.

याशिवाय मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे संचालक आणि उपसंचालक, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव अशा २५ सदस्यांचा समावेश आहे.

मात्र, एवढ्या महत्त्वाच्या समितीची अद्याप एकही बैठक पार पडलेली नाही. मुख्यमंत्री किंवा समितीतील लोकसभा-विधानसभा सदस्यांनीदेखील बैठक घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही.

अॅट्रॉसिटी निधी प्रलंबित, पीडितांना दिलासा कधी?

राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रत्येकी ३-४ कोटी रुपये निधी वाटप होणे अपेक्षित आहे. सध्या सुमारे ९० ते १०० कोटी रुपयांचा निधी शासन स्तरावर प्रलंबित आहे. ही समिती कार्यरत झाल्यास हा निधी जिल्हानिहाय वितरित होऊन पीडितांना मदत मिळण्यास चालना मिळेल, असे लहुजी शक्ती सेनेचे प. म. सरचिटणीस देविदास कसबे यांनी स्पष्ट केले.

बैठका कधी होणार? समिती कार्यरत कधी होणार?

काशीराम पावरा आणि नामदेव ससाने यांसह १२ आमदार समितीचे सदस्य असूनही, बैठक होण्याच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेतला गेला नाही. यात काही सदस्य पुन्हा निवडून आले असले तरी काही सदस्य पराभूत झाले आहेत. त्यामुळे समितीच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विभागाने त्वरित पावले उचलून या समितीला सक्रिय करावे आणि मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता समाजातून जोर धरू लागली आहे.

लग्नाच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक! फलटण ग्रामीण पोलिसांची पाच जणांवर कारवाई

0
लग्नाच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक! फलटण ग्रामीण पोलिसांची पाच जणांवर कारवाई

फलटण – लग्न जुळवण्याच्या बहाण्याने 44 वर्षीय शेतकऱ्याची सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणुकीची संपूर्ण कथा:

शेतकरी असलेल्या फिर्यादीला विवाह जुळवण्यात अडचणी येत होत्या. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत पुण्यातील छाया साठे आणि जयश्री दत्तू शिंदे या महिलांनी त्यांची साथीदार दिपाली प्रभू जाणे हिचे लग्न फिर्यादीशी लावून दिले. मात्र, दिपाली विवाहित असल्याचे लग्नानंतर काही दिवसांनी उघड झाले. या बदल्यात आरोपींनी फिर्यादीकडून पावणेतीन लाख रुपये उकळले.

याबाबत फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर आरोपींनी आणखी एका मुलीचा प्रस्ताव देत दीड लाख रुपयांची मागणी केली. दि. 27 जानेवारी रोजी फलटण एसटी स्टँडवर नवरी मुलगी आणण्याच्या बहाण्याने शशिकला जाधव, गजानन डाखोरे, सुमित्रा डाखोरे आणि गोकुळ लोंढे हे खोटे नातेवाईक बनून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांची वेळीच कारवाई

फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी त्वरित फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत पाच आरोपींना अटक केली.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत असून, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Priyanka Chopra : ‘तिला एकदम लहान पँटी द्या’; प्रियांका चोप्राला आलेला कास्टिंग काऊचचा घाणेरडा अनुभव!

0
Priyanka Chopra : ‘तिला एकदम लहान पँटी द्या’; प्रियांका चोप्राला आलेला कास्टिंग काऊचचा घाणेरडा अनुभव!


Priyanka Chopra Casting Couch Experience : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मजल मारत तिने बराच मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, या प्रवासात तिचा आत्मविश्वास मोडण्याचा प्रयत्न करणारे लोकही तिला भरपूर भेटले. खुद्द प्रियांकाने एका कार्यक्रमात याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्रियांकाने कास्टिंग काऊचचा अनुभव देखील शेअर केला.



Source link

Pune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने वार करून केली हत्या

0
Pune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने वार करून केली हत्या


Pune Kothrud murder news : पुण्यात कोथरूड येथे एका तरूणांवर काही अल्पवयीन मुलांनी हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना आशिष गार्डन समोर बुधवारी घडली होती. राहुल जाधव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.



Source link

अर्थसंकल्पापूर्वीच महागाईचा झटका, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; वाचा आजचा भाव

0
अर्थसंकल्पापूर्वीच महागाईचा झटका, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; वाचा आजचा भाव


Gold Price Today: उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज सोन्याने विक्रमी दर गाठला आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजार आणि सराफा बाजारात सोनं रेकॉर्ड हायवर पोहोचलं आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

आज सकाळी 10च्या सुमारास वायदे बाजारात सोनं 147 रुपयांच्या तेजीसह 81,870 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. तर, यापूर्वी सोनं 82,200 रुपयांवर पोहोचले होते. त्याचवेळी चांदी 294 रुपयांवी वाढून 93,740 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. सोनं-चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढ हे मजबूत जागतिक कल असल्याचे सांगितलं जात आहे. 

सराफा बाजारादेखील आज सोन्याचे भाव वधारले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,310 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 84,330 रुपयांवर स्थिरावली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली असून 77,300 रुपयांवर प्रतितोळा दर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 980 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 63,250 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  77,300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  84,330 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  63,250रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,730 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,433 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,325 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   61,840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   67,464 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    50,600 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 77,300 रुपये
24 कॅरेट- 84,330 रुपये
18 कॅरेट- 63,250रुपये





Source link

Swara Bhasker : स्वरा भास्कर असं काय म्हणाली की तिचं एक्स अकाऊंट झालं सस्पेंड? जाणून घ्या

0
Swara Bhasker : स्वरा भास्कर असं काय म्हणाली की तिचं एक्स अकाऊंट झालं सस्पेंड? जाणून घ्या


Swara Bhasker X Account : अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चित्रपटाशी संबंधित मुद्दा असो किंवा देशाशी संबंधित कोणताही मुद्दा असो, ती आपले मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण आता स्वराचं ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असून, यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापली आहे. यामागे तिचीच एक पोस्ट कारणीभूत ठरली आहे. 



Source link

Fact Check: प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार? योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर

0
Fact Check: प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार? योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर


Government Scheme: इंटरनेटवरून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही वेळा चुकीचे अपडेट्स मिळण्याचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या नावाखाली लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक घरातील एका सदस्याला नोकरी देणार, असा दावा एका पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अन्यथा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.



Source link

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम

0
काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम


पुण्यातील हे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाचे हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर, ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीचे ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमेश्वरचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने, नवी मुंबईतील कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.



Source link

Entertainment News in Marathi Live: Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा

0
Entertainment News in Marathi Live: Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा


Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; 'अशी' झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा

Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 31 Jan 202503:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा

  • Preity Zinta Birthday Special : प्रीतीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय फार हुशारीने घेतला नाही, पण एका नाण्याच्या जोरावर तिने अभिनयाच्या दुनियेत आपलं करिअर घडवायचं ठरवलं.


Read the full story here





Source link

Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा

0
Entertainment News in Marathi Live: Preity Zinta Birthday : एका नाण्याने बदललेलं प्रीती झिंटाचं नशीब; ‘अशी’ झाली बॉलिवूड एंट्री! वाचा भन्नाट किस्सा


Preity Zinta Birthday Special : प्रीतीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय फार हुशारीने घेतला नाही, पण एका नाण्याच्या जोरावर तिने अभिनयाच्या दुनियेत आपलं करिअर घडवायचं ठरवलं.



Source link