Saturday, August 1, 2026
Home Blog Page 550

‘मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्…,’ जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर

0
‘मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्…,’ जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर


केरळच्या कोची येथे एका आघाडीच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 15 जानेवारीला टोकाचं पाऊल उचललं. शाळेत वारंवार होणारी रँगिंग आणि धमक्या यांना कंटाळून त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. वारंवार होणाऱ्या अपमानाला कंटाळलेल्या विद्यार्थ्याने घरी आल्यावर आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे त्याची आई उद्ध्वस्त झाली असून, मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावली, तसंच फ्लश केल्यानंतर त्याचं डोकं टॉयलेटमध्ये बुडवलं असे आरोप केले आहेत. 

आईची न्याय देण्याची मागणी

मुलाच्या आईने थ्रिपुनिथुरा येथील हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. बाल आयोगाकडेही त्यांनी एक याचिका देखील सादर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलाने सहन केलेल्या छळाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. या याचिकेत त्याच्या मागील शाळेच्या उपप्राचार्यांकडून गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत. 

मुलाच्या आईने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मी एक दुःखी आई आहे जी माझ्या मुलासाठी न्यायासाठी लढत आहे, जो एक आनंदी, सक्रिय आणि प्रेमळ मुलगा होता. त्या दुर्दैवी दिवशी, माझा मुलगा दुपारी 2.45 वाजता शाळेतून घरी परतला आणि 3.50 वाजता, माझे जग उद्ध्वस्त झाले…”

आपल्या मुलाने टोकाचं पाऊल का उचललं हे समजून घेण्यासाठी आई आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मित्रांशी संवाद साधला, तसंच सोशल मीडियाची तपासणी केली. यानंतर त्यांना जे आढळलं त्यावरून त्याने सहन केलेल्या अत्याचाराचे हृदयद्रावक चित्र समोर आलं. आईचा दावा आहे की तिच्या मुलाला शारीरिकरित्या मारहाण करण्यात आली. त्याच्या रंगावरुन त्याला हिणवण्यात आलं. शिवीगाळ करण्यात आली आणि अकल्पनीय अपमान सहन करावा लागला. ज्यामध्ये जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेण्यात आले, टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचे डोके फ्लशिंग टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.

मुलाच्या आईने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर काही विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन केलं.  मुलाच्या मृत्यूनंतर, मित्रांनी न्यायाची मागणी करणारे एक इन्स्टाग्राम पेज सुरु केलं होतं. परंतु शाळेने दबाव आणल्यानंतर ते पेज काढून टाकण्यात आले. शाळा प्रशासन सत्य दाबण्याचा प्रयत्न करत असून हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं असल्याचं फक्त सांगत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. 

“त्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी क्रूरता थांबवली नाही,” असं दुःख मुलाच्या आईने व्यक्त केलं आहे. “जेव्हा मी शाळेच्या अधिकाऱ्यांकडे पुरावे घेऊन जबाबदारीची मागणी केली तेव्हा त्यांनी मला फक्त एवढेच सांगितले की माहिती पोलिसांना पाठवण्यात आली आहे. शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत असे मला ठामपणे वाटते,” असाही आरोप त्यांनी केला आहे. 

भावनिक आवाहन करताना त्यांनी म्हटलं आहे की, “मी माझ्या मुलासाठी न्याय मागत आहे. त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कायद्याच्या पूर्ण ताकदीला सामोरे जावे लागेल आणि माझ्या मुलासारखे इतर कोणत्याही मुलाला त्रास होऊ नये यासाठी पद्धतशीर बदल केले पाहिजेत.”

त्यांनी आपला कायद्यावर विश्वास असल्याचंही म्हटलं आहे. “मी जनतेला न्यायासाठीच्या या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन करते. फक्त माझ्या मुलासाठीच नाही तर शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण निर्माण व्हावे असं वाटणाऱ्या प्रत्येक मुलासाठी.”





Source link

महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय

0
महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय


Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयावर अनेक साधू संतांनी आक्षेप नोंदवला होता. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या निर्णयामुळे किन्नर आखाड्यात फूट पडली होती. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आता बंड पुकारलं आहे. त्यांनी लक्ष्मी यांच्या निर्णयाचा विरोध करत ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवण्यात आलं आहे. पण त्यांचा निर्णय मानण्यास अनेकांनी विरोध केला आहे. 

ऋषी अजय दास यांनी सांगितलं आहे की, ममताला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीलाही आचार्य महामंडलेश्वर पदातून मुक्त करण्यात आलं आहे. लवकरच नव्या आचार्य महामंडलेश्वरांची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत. अजय दास यांच्या मते, ज्या धर्म प्रचार-प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासह किन्नर समाजाच्या विकासाठी लक्ष्मीची नियुक्ती करण्यात आली होती, त्यावरुन त्या भरटकल्या आहेत. 

अजय दास यांच्या मते, लक्ष्मी यांनी सनातन धर्म आणि देशहित सोडून देशद्रोहाच्या खटल्यात अडकलेल्या आणि ग्लॅमर जगताशी संबंधित असलेल्या ममताला कोणत्याही धार्मिक किंवा अखाडा परंपरेचे पालन न करता थेट महामंडलेश्वर ही पदवी दिली.

यादरम्यान किन्नर आखाड्यातील एक गट लक्ष्मी आणि ममता यांच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. किन्नर आखाड्यातील माँ पवित्रा नंद गिरी म्हणाल्या आहेत की, “आम्हाला कोणालाही महत्त्व द्यायचे नाही. स्वतःपेक्षा मोठे बना, दुसऱ्यांवर चिखलफेक करून कोणीही मोठे होऊ नये. हा आखाडा कोणा एकाचा नाही. जे जसं आहे ते तसेच राहील. जगाच्या म्हणण्याने काहीही बदलत नाही. अजय दास, हे काय आहे ते तुम्ही स्वतः स्पष्ट कराल का? लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना कोणीही हटवू शकत नाही. त्या तशाच राहील. हे अनुमान चालूच राहतील. ममता कुलकर्णी, तुमचे स्वागत आहे. कोणतीही अफवा असली तरी आम्ही ती नाकारतो”.

महामंडलेश्वर होण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. प्रथम दीक्षा घ्यावी लागते, मग बराच काळ तपश्चर्या करावी लागते आणि सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. जो महामंडलेश्वर बनतो तो संन्यासी असला पाहिजे. पण ममता यांचं आयुष्य वादांनी वेढलेले आहे. तिचे ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी संबंध होते आणि दोघांनीही लग्न केले होते. दुबईमध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली विकीला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका प्रकरणात ममताच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. पण ममता म्हणते की विकीसोबतच्या तिच्या संबंध आणि लग्नाच्या चर्चा खोट्या आहेत. ममतावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप आहे.





Source link

Rapper Raftaar : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! कोण आहे त्याची ही नवरी?

0
Rapper Raftaar : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! कोण आहे त्याची ही नवरी?


कोण आहे रॅपर रफ्तार? 

रफ्तारने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात ‘धाकड’, ‘ढिशूम’, ‘ऑल ब्लॅक’, ‘बेबी मारवाके मानेगी’, ‘हसीनो का दीवाना’, ‘जानू’, ‘डान्स का शौक’, ‘जिंदा है’, ‘घना कसुटा’ यांचा समावेश आहे. त्याने ‘एमटीव्ही हसल’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘रोडीज’ यांसारख्या रिॲलिटी शोचे परीक्षणही केले आहेत. आजकाल रॅपर एमटीव्ही ‘हसल सीझन ४’ जज करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रॅपरची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.



Source link

Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

0
Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास


Viral Video : एका धक्कादायक चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात एक 16 वर्षांची मुलगी एका मुलासोबत चोरी करताना दिसतं आहे. या चोरीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले आहेत. प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात. आणि प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपण जीव द्यायला पण तयार असतो, अशी प्रेमात आपण बोलतो. मग काय बॉयफ्रेंड अडचणीत आहे, हे समजल्यावर त्या तरुणीने जे केलं ते धक्कादायक आहे. चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, ही घटना वाचून तुम्हीला धक्का बसेल. ही घटना, अहमदाबादमधील शेला भागातील आहे. 

असा घटना आली समोर…!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 29 सप्टेंबर 2024 रोजी असून अहमदाबादच्या शेला इथल्या एका अपार्टमेंटमध्ये घडली. मुलीच्या वडिलांनी कपाटात लॉकर ठेवले होते. या लॉकरमध्ये 12 बोअरची बंदूक, परवाना, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह 22 काडतुसे होती. ज्यांची एकूण किंमत 1.56 लाखांच्या घरात आहे. ते झालं असं की, वडील त्यांच्या स्कूटरची कागदपत्रे घेण्यासाठी कपाटमधील लॉकर पाहिला गेल. तर काय बघतात लॉकर गायब दिसलं. घरात कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्याची स्वतःची मुलगी आणि एक तरुण लॉकर घेऊन जाताना त्यांना दिसले.

व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण ऋतुराज सिंह चावडा असून तो कांकरिया इथलील बोर्डी मिल परिसरात राहणारा आहे. मात्र, मुलीने चोरीचा इन्कार देत ती म्हणाली की तिने फक्त दुसरा बॉक्स उचलला होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या. लॉकरमध्ये काडतुसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याने वडिलांनी बापळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज सिंगला अटक करून चौकशी सुरू केली.

चौकशीत अशी माहिती मिळाली की, तरुणी आणि ऋतुराज यांची दोन वर्षांपूर्वी नवरात्रीदरम्यान भेट झाली होती. नंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ऋतुराज हा आर्थिक संकटाशी झुंजत होता, त्यामुळे त्याने या मुलीला लॉकर चोरण्यासाठी राजी केलं. चोरी केल्यानंतर दोघांनी लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तू वसना रिव्हरफ्रंटजवळील झुडपात फेकून दिल्या. बापळ पोलीस म्हणाले की, अल्पवयीन मुलगी आणि ऋतुराज सिंह यांच्यावर काय कायदेशीर पावले उचलता येतील. अद्याप तपास सुरू असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. 





Source link

वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात

0
वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात


काळे हे शहीद झाल्याचे भारतीय लष्कराकडून गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यानंतर अवघ्या शहरावर शोककळा पसरली. जवान काळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. जवान काळे यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळपर्यंत वडूज गावात पोहोचेल, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.



Source link

अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज

0
अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज


Economic Survey 2025 of India: अर्थसंकल्प 2025 च्या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ‘इकोनॉमिक सर्व्हे 2025’ सादर केला. देशाची आर्थिक स्थिती आणि भविष्याची दिशा याचा पूर्ण आढावा यात घेतला जातो. हे सर्व्हेक्षण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत सादर केले. देशाचा विकास दर, महागाई, रोजगार, गुतंवणूक आणि इतर आर्थिक संकेंताचा आढावा घेण्यात आला. भारताअंतर्गत अर्थव्यवस्थेतीव मजबूती कायम राहील आणि महागाई कमी झालीय, असे यात सांगण्यात आले. इकोनॉमिक सर्व्हे म्हणजे नक्की काय? यावेळच्या इकोनॉमिक सर्व्हेत काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

इकोनॉमिक सर्व्हे म्हणजे काय?

अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला वार्षिक अहवाल म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. या अहवालात भारताची आर्थिक स्थिती, विकास दर, महागाई दर, निर्यात-आयात यांचे विश्लेषण करण्यात येते. मागील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी होती? आणि पुढील आर्थिक वर्षात कोणत्या दिशेने वाढ होण्याची शक्यता आहे? हे या अहवालातून सांगण्यात येते. आर्थिक सर्व्हेक्षणात सरकारी खर्च, गुंतवणूक, राजकोषीय तूट, कर संकलन आणि महागाई यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येतो. हा अहवाल आगामी अर्थसंकल्पासाठी सरकारी निर्णयांच्या दिशेवर प्रभाव पाडतो.

आर्थिक सर्व्हेक्षण का आवश्यक?

आर्थिक सर्व्हेक्षण सरकारसाठी एक रोडमॅप म्हणून काम करते. यामुळे 2025 च्या अर्थसंकल्पापूर्वी त्याचे आर्थिक मूल्यांकन मिळते. कोणत्या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करावी, कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे आणि कोणती धोरणे लागू करावीत हे ठरविण्यास सरकारला मदत होते. आर्थिक वर्षात सरकारच्या आर्थिक धोरणांचे मूल्यांकन करणे आणि देशाच्या आर्थिक विकासात या धोरणांचा किती प्रमाणात हातभार लागतोय हे दाखवणे आर्थिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे सरकारला येत्या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे समजण्यास मदत होते.

खासगी वापरात स्थिरता

आर्थिक सर्व्हेक्षणानुसार खासगी वापरात स्थिरता आली आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी योजना आणि विकासात्मक उपाययोजनांमुळे खाजगी वापर वाढत आहे, जो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत आहे.

जागतिक स्तरावर राजकीय अनिश्चितता 

जागतिक स्तरावर राजकीय अनिश्चिततेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काही जोखीमांचा सामना करावा लागू शकतो, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. असे असले तरी भारतीय धोरणकर्ते ही अनिश्चितता हाताळण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत.

जगभरात वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता

वस्तूंच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महागाई नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. यामुळे भारतातील ग्राहकांना दिलासा मिळेल आणि आयात केलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील.

हवामानातील बदलामुळे अन्नधान्य महागाई 

हवामान बदलामुळे अन्नधान्य महागाई होण्याची शक्यता आहे. विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या उत्पादनांतील किंमती वाढू शकतात. अन्नपदार्थांच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.

जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक होण्याची गरज

भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर अधिक स्पर्धात्मक होण्याची आवश्यकता आहे. जागतिक बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी भारताला आपल्या व्यावसायिक धोरणांमध्ये आणि गुंतवणुकीत आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

मध्यम मुदतीच्या विकासासाठी संरचनात्मक सुधारणा 

मध्यम मुदतीच्या विकासासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी सरकारने अशा सुधारणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्यामुळे स्थिर आणि मजबूत आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे या सर्व्हेक्षणात म्हटले आहे.

ग्रामीण भागातील मागणीत वाढ

ग्रामीण भागात मागणी वाढल्यामुळे वापरात सुधारणा होईल. यामुळे विकासाची गती वाढेल आणि ग्रामीण भागाची स्थिती सुधारेल.

पायाभूत सुविधा क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याची गरज 

विकासकामांना आणखी गती देण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. यामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत अन्नधान्य महागाई कमी 

आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत अन्नधान्य महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार या दिशेने अनेक उपाययोजनांचा विचार करत आहे.

रब्बी पिकांच्या चांगल्या उत्पादनामुळे अन्नधान्य महागाई कमी 

रब्बी पिकांच्या चांगल्या उत्पादनामुळे अन्न महागाई कमी होऊ शकते. ज्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो आणि अन्नपदार्थांच्या किमती सुधारू शकतात.





Source link

बजेटपूर्वी का सादर केला जातो Economic Survey? सोप्या शब्दात जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
बजेटपूर्वी का सादर केला जातो Economic Survey? सोप्या शब्दात जाणून घ्या संपूर्ण माहिती


Economic Survey : भारत सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. मात्र त्याच्या आधी इकॉनामिकल सर्व्हे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) हा एक सरकारी दस्ताऐवज असून वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातर्फे तयार केला जातो. यात देशाच्या अर्थव्यवस्थेचे विस्तृत विश्लेषण केले जाते. ज्यात GDP, महागाई, रोजगार, वित्तीय नुकसान सारख्या महत्वाच्या आकड्यांचा समावेश असतो. हा रिपोर्ट सरकारचं आगामी बजेट तयार करण्यासाठी मदत करते. तसेच नागरिक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांना देशाच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देते. 

आर्थिक सर्वेक्षण आणि बजेटचा काय संबंध असतो?

आर्थिक सर्वेक्षण प्रत्येकवर्षी देशाचं केंद्रीय बजेट सादर होण्याच्या एक दिवस पूर्वी सादर केलं जात. 

1. देशाच्या आर्थिक परिस्थितीची स्पष्टता : आर्थिक सर्वेक्षणाचा रिपोर्ट हा देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीचे आकलन करते जेणेकरून बजेटचे निर्णय योग्य माहितीवर आधारित असतील.
2. सामाजिक आणि आर्थिक समस्या : बेरोजगारी आणि महागाई सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या सर्वेक्षणात प्रकाश टाकण्यात आला असून, त्या अर्थसंकल्पात मांडता येऊ शकतील. 
3. धोरणं तयार करण्यात मदत : सर्वेक्षणाव्यापूर्वी यावर चर्चा होते ज्यामुळे बजेटच्या तयारीवर खूप विचार केला जातो. 
4. वित्तीय रणनीति : सर्वेक्षणातील सूचना सरकारला त्यांचे आर्थिक प्राधान्यक्रम ठरवण्यास मदत करतात.

आर्थिक सर्वेक्षणात कोणते प्रमुख मुद्दे असतात?

1.GDP वाढणे : याद्वारे देशाच्या आर्थिक प्रगतीचे आकलन केले जाते. 
2.  महागाईचा दर : वस्तू आणि सुविधांच्या किंमतींमध्ये बदल, ज्यामुळे ग्राहकांच्या कार्यशक्तीवर परिणाम होतो.
3. रोजगार आणि बेरोजगारी : नोकऱ्यांची निर्मिती आणि श्रम बाजारची स्थिती तपासली जाते. 
4. आर्थिक नुकसान : सरकारचे उत्पन्न आणि खर्चातील तफावतीचे मूल्यमापन करणे.
5. क्षेत्रीय प्रदर्शन : कृषि, उद्योग आणि सोयी सुविधांचं विश्लेषण. 
6. सामाजिक विकास : आरोग्य, शिक्षा आणि पायाभूत सुविधांची प्रगती. 
7. बाह्य घटक : जगातील व्यापार, परदेशी चलन आणि बाह्य प्रभावांचा आढावा. 

आर्थिक सर्वेक्षणाचा इतिहास : 

आर्थिक सर्वेक्षणाची सुरुवात 1950-51 मध्ये झाली होती. तर 1964 ला याला बजेटपासून वेगळं केलं गेलं. तेव्हापासून दरवर्षी अर्थ संकल्प सादर होण्याच्या एक दिवसापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. हे आता सरकारची धोरणं आणि देशाचे आर्थिक नियोजन समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तावेज बनले आहे.

आर्थिक सर्वेक्षणाची तयारी कोण करतं?

आर्थिक सर्वेक्षण हे वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातर्फे तयार केले जाते. ज्यात मुख्य आर्थिक सल्लागारच्या टीमचं मोठं योगदान असतं. या सर्वेक्षणात विविध सरकारी विभाग, शोध संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटना इत्यादींचा डेटा घेतला जातो. रिपोर्ट तयार झाल्यावर याला वित्त मंत्र्यांच्या डावरे संसदेत सादर केले जाते. यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषद घेऊन यातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करतात. 





Source link

एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? ‘या’ गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट

0
एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? ‘या’ गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट


Elone Musk nominated for the nobel peace prize : टेस्लाचे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आपले विचार स्पष्टपणे मांडणारे अशी ओळख असलेले मस्क सध्या ट्रम्प सरकारमध्ये मिळालेल्या मंत्रिपदावरूनही चर्चेत आहेत. दरम्यान, मस्क यांच्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इलॉन मस्क यांना २०२५  च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. युरोपियन संसदेचे सदस्य ब्रॅंको ग्रिम्स यांनी त्यांना हा पुरस्कार मस्क यांना देण्याची मागणी केली आहे.



Source link

Viral Video : रस्त्यावर आदिमानवाच्या अवस्थेत फिरताना दिसला प्रसिद्ध अभिनेता! तुम्ही ओळखू शकलात का?

0
Viral Video : रस्त्यावर आदिमानवाच्या अवस्थेत फिरताना दिसला प्रसिद्ध अभिनेता! तुम्ही ओळखू शकलात का?


Aamir Khan Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फाटक्या आणि विचित्र कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरताना दिसला आहे. त्याची अवस्था पाहता ही व्यक्ती शुद्धीतच नाही, असे वाटत होते. त्याचे स्वरूपही खूप विचित्र दिसत होते. जणू काही आदिमानवच रस्त्यावर फिरत आहे, असे वाटत होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रस्त्यावर विचित्र अवस्थेत फिरणारी ही व्यक्ती बॉलिवूडचा एक मोठा सुपरस्टार आहे. या व्यक्तीला बघून तुम्हाला ओळख पटली का?



Source link

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली

0
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली


Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका ३६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी असून तो २१ जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची परकष्टा केली. मात्र, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.



Source link