
NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४७५ जागा भरल्या जाणार आहेत.

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४७५ जागा भरल्या जाणार आहेत.

Union Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी (०१ फेब्रुवारी) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अर्थसंकल्पाशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Buisness Idea: व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल लागतं अशी ओरड आपण ऐकली असेल. पण व्यवसायासाठी मोठं भांडवल नव्हे तर एक आयडिया लागते हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवलंय. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात देशासह जगभरातून भाविक येत आहेत. येथे भाविकांची इतकी मोठी गर्दी आहे की तिथे व्यवसाय करणाऱ्यांची खूप चांगली कमाई होतेय. एका तरुणाला त्याच्या गर्लफ्रेण्डने महाकुंभ मेळ्यासाठी बिझनेस आयडिया दिली. यामुळे त्याने कमी दिवसात खूप मोठी कमाई केली.
महाकुंभमेळ्यात चहा, चाट आणि पकोडे विक्रेतेही चांगले पैसे कमवत आहेत. अलिकडेच एका मुलाने त्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईबद्दल सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्या मुलाने फक्त दातांच्या काड्या विकून काही दिवसांत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आदर्श तिवारी (@adarshtiwari20244) या इन्स्टा हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यामध्ये एक माणूस कुंभमेळ्यात दातांच्या काड्या विकताना दिसतोय. आपण कडुलिंबाचा टूथब्रश विकतोय. याला खूप चंगला प्रतिसाद मिळत असून लोक मोठ्या प्रमाणात कडुलिंबाच्या काड्या विकत घेतायत. त्यामुळे काही दिवसांत मी 30 ते 40 हजार रुपये कमावल्याचे तो व्हिडीओमध्ये सांगतोय. कधीकधी ही कमाई एका दिवसात 5 ते 6 हजार रुपये इतकी होते. तर कधीकधी कमाई 10 हजारांपर्यंतही जाते. तुम्ही जितकी जास्त मेहनत घ्याल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील, असेही तो पुढे सांगतात.
कुंभमेळ्यात एका माणसाने दातांसाठी कडुलिंबाच्या काड्या विकायला सुरुवात केली. आदर्शने त्या मुलाला विचारले की त्याला टूथस्टिक्स विकण्याची कल्पना कशी सुचली? असे विचारले. तेव्हा त्याने सांगितले की माझ्या मैत्रिणीने मला ही कल्पना सांगितले. या व्यवसायात कोणतीही गुंतवणूक नाही, टूथस्टिक्स मोफत मिळतात आणि शक्य तितके विकून पैसे कमवता येतात.माझ्या मैत्रिणीमुळेच मी इतके पैसे कमवू शकलोय, असेही तो पुढे सांगतो.
या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले, ‘मग आमची वहिनी एक उत्तम अर्थतज्ज्ञ आहे!’ दुसरा यूजर म्हणतो, ‘फक्त तिच्याशी लग्न कर, एक दिवस तुला सगळं मिळेल, गाडी, बंगला इ.’ आणखी एका युजरने म्हटले, ‘एवढ्या चांगल्या मैत्रिणीचा विश्वासघात करू नकोस!’ ‘त्या मुलाने त्याच्या मैत्रिणीचा उल्लेख केला तेव्हा तो लाजायला लागला!’ अशी कमेंटही एका युजरने केलीय.

Navi Mumbai Pick-Up Van Accident News: नवी मुंबईतील खारकोपर गावात एका पिकअप व्हॅनने चार वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली. मयत मुलगी आपल्या आईसोबत डॉक्टरांकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Salman Khan-Sanjay Dutt Movie : बॉलिवूड सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनाही आवडले होते. संजय दत्त आणि सलमान ‘चल मेरे भाई’ आणि ‘साजन’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, संजय दत्त आणि सलमान खान यांचा एक असा चित्रपट आहे, जो कधीच प्रदर्शित झाला नाही. संजय दत्त आणि सलमान खान यांच्या या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी केले होते. या चित्रपटाचे शूटिंग देखील झाले होते. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

Viral News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जगभरातून लोक येत आहेत. भाविकांसह अनेक सेलिब्रिटी आणि एन्फ्लुएंसर देखील या महाकुंभात पोहोचले आहेत. महाकुंभात पोहोचलेले बहुतेक लोक आठवण म्हणून आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट करत आहे. परंतु, महाकुंभात एका तरुणीने चक्क स्नान करण्यासाठी जातानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओत संबंधित तरुणीने अंगावर फक्त टॉवेल गुंडाळल्याचे दिसत आहे.

केरळच्या कोची येथे एका आघाडीच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 15 जानेवारीला टोकाचं पाऊल उचललं. शाळेत वारंवार होणारी रँगिंग आणि धमक्या यांना कंटाळून त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. वारंवार होणाऱ्या अपमानाला कंटाळलेल्या विद्यार्थ्याने घरी आल्यावर आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे त्याची आई उद्ध्वस्त झाली असून, मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावली, तसंच फ्लश केल्यानंतर त्याचं डोकं टॉयलेटमध्ये बुडवलं असे आरोप केले आहेत.
आईची न्याय देण्याची मागणी
मुलाच्या आईने थ्रिपुनिथुरा येथील हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. बाल आयोगाकडेही त्यांनी एक याचिका देखील सादर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलाने सहन केलेल्या छळाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. या याचिकेत त्याच्या मागील शाळेच्या उपप्राचार्यांकडून गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत.
मुलाच्या आईने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मी एक दुःखी आई आहे जी माझ्या मुलासाठी न्यायासाठी लढत आहे, जो एक आनंदी, सक्रिय आणि प्रेमळ मुलगा होता. त्या दुर्दैवी दिवशी, माझा मुलगा दुपारी 2.45 वाजता शाळेतून घरी परतला आणि 3.50 वाजता, माझे जग उद्ध्वस्त झाले…”
आपल्या मुलाने टोकाचं पाऊल का उचललं हे समजून घेण्यासाठी आई आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मित्रांशी संवाद साधला, तसंच सोशल मीडियाची तपासणी केली. यानंतर त्यांना जे आढळलं त्यावरून त्याने सहन केलेल्या अत्याचाराचे हृदयद्रावक चित्र समोर आलं. आईचा दावा आहे की तिच्या मुलाला शारीरिकरित्या मारहाण करण्यात आली. त्याच्या रंगावरुन त्याला हिणवण्यात आलं. शिवीगाळ करण्यात आली आणि अकल्पनीय अपमान सहन करावा लागला. ज्यामध्ये जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेण्यात आले, टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचे डोके फ्लशिंग टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.
मुलाच्या आईने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर काही विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन केलं. मुलाच्या मृत्यूनंतर, मित्रांनी न्यायाची मागणी करणारे एक इन्स्टाग्राम पेज सुरु केलं होतं. परंतु शाळेने दबाव आणल्यानंतर ते पेज काढून टाकण्यात आले. शाळा प्रशासन सत्य दाबण्याचा प्रयत्न करत असून हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं असल्याचं फक्त सांगत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
“त्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी क्रूरता थांबवली नाही,” असं दुःख मुलाच्या आईने व्यक्त केलं आहे. “जेव्हा मी शाळेच्या अधिकाऱ्यांकडे पुरावे घेऊन जबाबदारीची मागणी केली तेव्हा त्यांनी मला फक्त एवढेच सांगितले की माहिती पोलिसांना पाठवण्यात आली आहे. शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत असे मला ठामपणे वाटते,” असाही आरोप त्यांनी केला आहे.
भावनिक आवाहन करताना त्यांनी म्हटलं आहे की, “मी माझ्या मुलासाठी न्याय मागत आहे. त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कायद्याच्या पूर्ण ताकदीला सामोरे जावे लागेल आणि माझ्या मुलासारखे इतर कोणत्याही मुलाला त्रास होऊ नये यासाठी पद्धतशीर बदल केले पाहिजेत.”
त्यांनी आपला कायद्यावर विश्वास असल्याचंही म्हटलं आहे. “मी जनतेला न्यायासाठीच्या या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन करते. फक्त माझ्या मुलासाठीच नाही तर शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण निर्माण व्हावे असं वाटणाऱ्या प्रत्येक मुलासाठी.”

Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयावर अनेक साधू संतांनी आक्षेप नोंदवला होता. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या निर्णयामुळे किन्नर आखाड्यात फूट पडली होती. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आता बंड पुकारलं आहे. त्यांनी लक्ष्मी यांच्या निर्णयाचा विरोध करत ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवण्यात आलं आहे. पण त्यांचा निर्णय मानण्यास अनेकांनी विरोध केला आहे.
ऋषी अजय दास यांनी सांगितलं आहे की, ममताला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीलाही आचार्य महामंडलेश्वर पदातून मुक्त करण्यात आलं आहे. लवकरच नव्या आचार्य महामंडलेश्वरांची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत. अजय दास यांच्या मते, ज्या धर्म प्रचार-प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासह किन्नर समाजाच्या विकासाठी लक्ष्मीची नियुक्ती करण्यात आली होती, त्यावरुन त्या भरटकल्या आहेत.
अजय दास यांच्या मते, लक्ष्मी यांनी सनातन धर्म आणि देशहित सोडून देशद्रोहाच्या खटल्यात अडकलेल्या आणि ग्लॅमर जगताशी संबंधित असलेल्या ममताला कोणत्याही धार्मिक किंवा अखाडा परंपरेचे पालन न करता थेट महामंडलेश्वर ही पदवी दिली.
यादरम्यान किन्नर आखाड्यातील एक गट लक्ष्मी आणि ममता यांच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. किन्नर आखाड्यातील माँ पवित्रा नंद गिरी म्हणाल्या आहेत की, “आम्हाला कोणालाही महत्त्व द्यायचे नाही. स्वतःपेक्षा मोठे बना, दुसऱ्यांवर चिखलफेक करून कोणीही मोठे होऊ नये. हा आखाडा कोणा एकाचा नाही. जे जसं आहे ते तसेच राहील. जगाच्या म्हणण्याने काहीही बदलत नाही. अजय दास, हे काय आहे ते तुम्ही स्वतः स्पष्ट कराल का? लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना कोणीही हटवू शकत नाही. त्या तशाच राहील. हे अनुमान चालूच राहतील. ममता कुलकर्णी, तुमचे स्वागत आहे. कोणतीही अफवा असली तरी आम्ही ती नाकारतो”.
महामंडलेश्वर होण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. प्रथम दीक्षा घ्यावी लागते, मग बराच काळ तपश्चर्या करावी लागते आणि सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. जो महामंडलेश्वर बनतो तो संन्यासी असला पाहिजे. पण ममता यांचं आयुष्य वादांनी वेढलेले आहे. तिचे ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी संबंध होते आणि दोघांनीही लग्न केले होते. दुबईमध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली विकीला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका प्रकरणात ममताच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. पण ममता म्हणते की विकीसोबतच्या तिच्या संबंध आणि लग्नाच्या चर्चा खोट्या आहेत. ममतावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप आहे.

रफ्तारने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात ‘धाकड’, ‘ढिशूम’, ‘ऑल ब्लॅक’, ‘बेबी मारवाके मानेगी’, ‘हसीनो का दीवाना’, ‘जानू’, ‘डान्स का शौक’, ‘जिंदा है’, ‘घना कसुटा’ यांचा समावेश आहे. त्याने ‘एमटीव्ही हसल’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘रोडीज’ यांसारख्या रिॲलिटी शोचे परीक्षणही केले आहेत. आजकाल रॅपर एमटीव्ही ‘हसल सीझन ४’ जज करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रॅपरची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.

Viral Video : एका धक्कादायक चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात एक 16 वर्षांची मुलगी एका मुलासोबत चोरी करताना दिसतं आहे. या चोरीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले आहेत. प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात. आणि प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपण जीव द्यायला पण तयार असतो, अशी प्रेमात आपण बोलतो. मग काय बॉयफ्रेंड अडचणीत आहे, हे समजल्यावर त्या तरुणीने जे केलं ते धक्कादायक आहे. चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, ही घटना वाचून तुम्हीला धक्का बसेल. ही घटना, अहमदाबादमधील शेला भागातील आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 29 सप्टेंबर 2024 रोजी असून अहमदाबादच्या शेला इथल्या एका अपार्टमेंटमध्ये घडली. मुलीच्या वडिलांनी कपाटात लॉकर ठेवले होते. या लॉकरमध्ये 12 बोअरची बंदूक, परवाना, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह 22 काडतुसे होती. ज्यांची एकूण किंमत 1.56 लाखांच्या घरात आहे. ते झालं असं की, वडील त्यांच्या स्कूटरची कागदपत्रे घेण्यासाठी कपाटमधील लॉकर पाहिला गेल. तर काय बघतात लॉकर गायब दिसलं. घरात कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्याची स्वतःची मुलगी आणि एक तरुण लॉकर घेऊन जाताना त्यांना दिसले.
व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण ऋतुराज सिंह चावडा असून तो कांकरिया इथलील बोर्डी मिल परिसरात राहणारा आहे. मात्र, मुलीने चोरीचा इन्कार देत ती म्हणाली की तिने फक्त दुसरा बॉक्स उचलला होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या. लॉकरमध्ये काडतुसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याने वडिलांनी बापळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज सिंगला अटक करून चौकशी सुरू केली.
#WATCH | Gujarat: 16-Year-Old Caught Stealing Locker From Her Own House In Shela, Ahmedabad After Being Influenced By Boyfriend#GujaratiNews #Ahmedabad #India pic.twitter.com/m9o0NbeuVs
— Free Press Journal (@fpjindia) January 30, 2025
चौकशीत अशी माहिती मिळाली की, तरुणी आणि ऋतुराज यांची दोन वर्षांपूर्वी नवरात्रीदरम्यान भेट झाली होती. नंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ऋतुराज हा आर्थिक संकटाशी झुंजत होता, त्यामुळे त्याने या मुलीला लॉकर चोरण्यासाठी राजी केलं. चोरी केल्यानंतर दोघांनी लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तू वसना रिव्हरफ्रंटजवळील झुडपात फेकून दिल्या. बापळ पोलीस म्हणाले की, अल्पवयीन मुलगी आणि ऋतुराज सिंह यांच्यावर काय कायदेशीर पावले उचलता येतील. अद्याप तपास सुरू असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.