Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रसोलापूर नियोजन भवनमध्ये पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर नियोजन भवनमध्ये पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

सोलापूर, 30 जानेवारी: सोलापूर जिल्ह्यातील नियोजन भवन इमारतीत पालकमंत्री कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज फीत कापून केले. उद्घाटनानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी:

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रथमच भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना, विविध शाखांचे कामकाज आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यांची माहिती दिली. तसेच, नव्याने तयार केलेल्या अभ्यागत कक्षाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली.

यावेळी महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments