Friday, July 31, 2026
Home Blog Page 542

इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडने उडवली मजा! अपमान सहन न झाल्याने प्रेयसिने सुपारी देऊन केली हत्या

0
इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडने उडवली मजा! अपमान सहन न झाल्याने प्रेयसिने सुपारी देऊन केली हत्या


Viral News : कोलोरॅडोमध्ये एका तरुणीला  प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हत्येचे कारण देखील धक्कादायक आहे. प्रियकराने प्रेयसीने इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून टीची मज्जा उडवली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन त्याची हत्या केली. आरोपी हा तरुणीला बस प्रवासात भेटला होता. यावेळी तिने त्याला प्रियकराला मारण्याची सुपारी दिली.  



Source link

ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले

0
ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले


ISRO News : इस्रोच्या १०० व्या रॉकेट मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी प्रक्षेपित करणाऱ्या आलेल्या उपग्रहात रविवारी तांत्रिक बिघाड झाला आहे.  भारताची नेव्हीगेशन यंत्रणा मजबूत करणारा २२५० किलो वजनाचा हा उपग्रह नेव्हिगेशन विथ इंडियन नक्षत्र अर्थात एनएव्हीआयसी मालिकेतील उपग्रहाचे थ्रस्टरने अचानक काम करणं बंद केलं आहे.  



Source link

कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह

0
कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह


kolkata rg kar medical college : कोलकात्यामधील  आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी २० वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या खोलीत गळफास घेऊन मृतावस्थेत आढळली.  या मुलीची आई इथे डॉक्टर म्हणून काम करते. तिचे वडील, मुंबईत राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही प्रसाद हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती तिच्या खोलीत एकटीच होती.



Source link

Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

0
Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू


Pune GBS Outbreak: पुण्यात जीबीएस आजारामुळे नागरिकांची चिंता वाढली असून रुग्णांची रोज वाढत आहे. पुण्यात रविवारी जीबीएसचे १० रुग्ण आढळले असून, यामुळे रुग्णांची संख्या ही १५८ झाली आहे. राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या १५८ पेक्षा जास्त झाली आहे. यातील २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पुण्यात ५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: इंदीवर : हिंदी शिकवताना बनले मोठे गीतकार

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  इंदीवर : हिंदी शिकवताना बनले मोठे गीतकार


रूमी जाफरी10 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

गीतकारांविषयीच्या या मालिकेत प्रसिद्ध गीतकार इंदीवरजी यांच्याबद्दल लिहिल्याशिवाय ही शृंखला पूर्ण होणार नाही. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज इंदीवरजी यांच्याविषयी…

इंदीवरजींसोबत माझे घनिष्ट संबंध होते. त्यांच्या सहवासात मी बराच काळ घालवला. त्यांनी स्वत:बद्दलच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, फिल्म इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला काम मिळत नव्हते. कारण मी हिंदीचा कवी आणि लेखक होतो. तेव्हा इंडस्ट्रीत उर्दूचा बोलबाला होता. मी उर्दू शिकण्यासाठी मेहनत घेऊ लागलो. काही सिनेमे मिळाले; पण यश लाभले नाही. १९४६ मध्ये ‘नमक’, १९४७ मध्ये ‘काला बाजार’, ‘इम्तिहान’, ‘आहुती’ असे सिनेमे आले, मात्र काही लाभ झाला नाही. नंतर १९५१ मध्ये आलेल्या ‘मल्हार’मधील “बड़े अरमान से रखा है बलम तेरी कसम..’ हे माझे गाणे सुपरहिट झाले.

तथापि, हे गाणे हिट होऊनही मला यश मिळाले नाही. पुढे नवे काम मिळाले नाही. ‘शीशम”, ‘दाना पानी’, ‘डाकू की लडकी’ असे थोडेफार छोटे-मोठे सिनेमे मिळाले, पण स्ट्रगल सुरूच राहिला. खर्च भागवणे अवघड होऊ लागले होते. त्यावेळी मुंबईमध्ये मराठी, गुजराथी, इंग्रजी, उर्दू आणि अगदी फारशीचेही शिक्षक मिळायचे, पण हिंदी शिकवणारे फारसे मिळत नसत. अशातच व्ही. शांताराम हे एका नव्या नायकाला लॉँच करण्याच्या तयारीत होते. त्याचे संवाद हिंदीत असल्याने त्याला ही भाषा शिकवायची होती. त्यामुळे ते हिंदी शिकवणाऱ्याचा शोध घेत असताना कुणीतरी माझे नाव त्यांना सुचवले. मी भेटायला गेल्यावर त्यांनी त्या अभिनेत्याची ओळख करुन दिली आणि आपण यांना लॉँच करत आहोत, तुम्ही त्यांना हिंदी शिकवा, असे सांगितले. मी त्या अभिनेत्याला हिंदी शिकवू लागलो, त्यामुळे मला थोडेफार पैसे मिळू लागले. पण, सिनेमांसाठी गाणी लिहिणे हीच माझी आवड आणि ध्येयही होते. त्यामुळे माझे त्यासाठी प्रयत्न सुरूच होते. ज्या अभिनेत्याला मी हिंदी शिकवत होतो, त्याचे नाव होते जितेंद्र आणि तो सिनेमा होता ‘गीत गाया पत्थरों ने’. ही गोष्ट जितेंद्र कधीही विसरले नाहीत, त्यांनी मला सदैव साथ दिली. सुपरस्टार झाल्यावरही त्यांचा हाच प्रयत्न असायचा की त्यांच्यासाठी मीच गाणी लिहावीत. असो. हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिण्याची माझी धडपड सुरूच होती. १९६३ मध्ये बाबूभाई मिस्त्रींनी लक्ष्मीकांत प्यारेलाल या नव्या संगीत दिग्दर्शकांना ब्रेक दिला. त्या सिनेमातील बहुतांश गाणी असद भोपाली साहेब आणि फारुख कैसर यांची होती. पण, मलाही एक गाणे मिळाले. मी विचार केला, उर्दूतील शब्द वापरुन असे मस्त, रोमँटिक गाणे लिहायचे की आपण इतर शायरांच्या बरोबरीचे आहोत, असे सर्वांना वाटले पाहिजे. मी लिहिलेले गाणे हिट झाले. त्याचे बोल होते.. ‘रोशन तुम्हीं से दुनिया, रोशन तुम्हीं जहां की, फूलों में पलने वाली रानी हो गुलिस्तां की..’ हे गाणे खूप गाजले. पण, त्यावेळी इंडस्ट्रीत साहिर लुधियानवी, शकील बदायूनी, राजा मेहंदी अली खां, मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी असे अनेक दिग्गज शायर होते. त्यामुळे माझ्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नव्हते. पुढे १९६५ मध्ये मला ‘हिमालय की गोद में’साठी एक गाणे मिळाले. त्याचे बोल होते.. ‘एक तू न मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है..’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले, पण करिअरमध्ये फार काही घडले नाही.

नंतर १९६८ मध्ये ‘सरस्वतीचंद्र’ प्रदर्शित झाला. त्यातील सगळी गाणी सुपर-डुपर हिट झाली.. “चंदन सा बदन चंचल चितवन’, ‘फूल तुम्हे भेजा है खत में’, “मैं तो भूल चली बाबुल का देस..’ या गाण्यांना देशभरातील लोकांनी डोक्यावर घेतले. तेव्हा कुठे माझा स्ट्रगल संपला. एव्हाना आनंद बक्षींचीही एन्ट्री झाली होती. आता काम मिळवण्यापेक्षाही अशा मोठ्या गीतकारांहून चांगली गाणी लिहिण्याची माझी धडपड सुरू होती. ‘सरस्वतीचंद्र’नंतर ‘सुहागरात’ आणि पाठोपाठ ‘अनोखी रात’ हे सिनेमे आले. या दोन्हींतील गाणी सुपरहिट झाली. ‘अनोखी रात’मधील ‘ओह रे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में..’ ऐकून साहिर आणि मजरूह साहेब मला म्हणाले, तुम्ही आता शायरीसोबत फिलॉसॉफीही लिहिताय. यापेक्षा आणखी मोठी शाबासकी काय असू शकते?

इंदीवरजींना १९७६ मध्ये ‘अमानुष’ सिनेमासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यावरुन मला नीरजजींचा एक शेर आठवतोय…

समय ने जब भी अंधेरों से दोस्ती की है, जला के अपना ही घर, हमने रोशनी की है…

इंदीवरजींची अनेक गाणी मलाही आवडायची. त्यामुळे मी एकदा त्यांना विचारले की, “चंदा चले, चले रे तारा’, “जब कोई बात बिगड़ जाए..’ अशी इतकी चांगली गाणी लिहिल्यावरही तुम्हाला.. ‘एक आंख मारु तो रास्ता रुक जाए..’, ‘ओ ताकि ओ ताकि..’ अशी गाणी लिहिण्याची काय गरज होती? त्यावर ते म्हणाले की, बेटा, तू कार्टर रोडवरच्या माझ्या या फ्लॅटमध्ये येतोस, खिडकीच्या बाहेरचा समुद्र पाहतोस. म्हणतोस, वा! इंदीवरजी तुम्ही स्टार आहात. तुमचे घर किती चांगले आहे, गाडी काय भारी आहे. पण, या सगळ्या गोष्टी अशाप्रकारच्या गाण्यांमुळेच होऊ शकल्या. माझे काम आहे, निर्मात्याला हवे तसे लिहून देणे.

इंदीवरजींनी फिरोज खान यांच्यासाठी गाणे लिहिले होते.. “आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए..’ या गाण्याने त्यावेळी साऱ्या देशभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर मनोजकुमार यांनी इंदीवरजींची साथ सोडली नाही. त्यांनी ‘उपकार’ आणि ‘पूरब और पश्चिम’ची गाणी त्यांच्याकडून लिहून घेतली. आज इंदीवरजींच्या आठवणीत ‘पूरब और पश्चिम’मधील हे गाणे ऐका…

है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

बारामती पुलाजवळ भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती पुलाजवळ भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: बारामती चौक पुलाजवळ आज (2 फेब्रुवारी 2025) दुपारी 2:45 वाजता झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयित वाहनाचा शोध घेत आहेत.

मृत ट्रकचालकाचे नाव मुस्ताक जमाल खान (वय 37, रा. फिरोजपूर, ता. मेवात, हरियाणा) असे आहे. तो बारामतीकडून फलटणकडे येत असताना अपघात घडला. मुस्ताक खान आपल्या ताब्यातील लेलँड कंपनीच्या ट्रक (क्र. NL.01 AH.7903) मध्ये वेस्पा कंपनीच्या मोटारसायकली घेऊन गोव्याकडे निघाला होता. बारामती पुलाजवळ ट्रकच्या उजव्या बाजूने डोकावून पाहताना समोरून येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर अज्ञात पिकअप चालकाने घटनास्थळी न थांबता गाडी घेऊन फरार झाला. या प्रकरणी खलील इसाक खान (रा. हरियाणा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकअप चालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2025 अन्वये भा.दं.सं. कलम 106(1), 281, 125(a), 125(b), मोटार वाहन कायदा कलम 134(a), 134(b), 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत असून, अपघातग्रस्त परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच, संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी बीट अंमलदारांसोबत तपास सुरु आहे.

यशवंत नलावडे
पोलीस निरीक्षक (गुन्हे)
फलटण शहर पोलीस ठाणे

अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत

0
अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत


Premanand Maharaj Bathing Rules : अंघोळ हे आपल्या रोजच्या दिनचर्येतील महत्वाचे काम आहे. अंघोळ केल्याने फक्त शरीरच स्वच्छ होत नाही तर मन देखील प्रसन्न होते. यामुळेच उत्तम शारीरीक आणि मानसिक स्वस्थ्यासाठी रोज अंघोळ करणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, अंघोळ करताना आपण अनेक चुका करतो. या चुका आपल्या लक्षातही येत नाहीत.   आंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे हे अनेक लोकांना माहित नाही.  प्रेमानंद महाराजांनी स्नानाची शास्त्रीय पद्धत सांगितली आहे. जाणून घेऊया ही पद्धत.

प्रेमानंद महाराज यांच्या म्हणण्यानुसार अंघोळीसाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करावा. थंड पाण्याने अंघोळ केल्याने अनेक प्रकारच्या विकारांपासून आराम मिळतो.  आंघोळ करताना सर्व प्रथम नाभीत पाणी ओतले पाहिजे. यानंतर संपूर्ण शरीरावर पाणी ओतले पाहिजे. ब्रह्मचर्य पाळणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे स्नान करणे योग्य मानले जाते असे प्रेमानंद महाराज सांगतात.

शास्त्रीयदृष्ट्या हा आंघोळीचा योग्य मार्ग मानला जातो असे प्रेमानंद महाराजांचे म्हणणे आहे. अंगावर साबण-सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही. तेलामुळे शरीराला घाण चिकटते यामुळे रोज चिखलाने शरीर धुतले तर शरीर घाण होत नाही असे  प्रेमानंद महाराज सांगतात. जे लोक ब्रह्मचर्य पाळतात त्यांनी आपले केस रेठा किंवा अशा कोणत्याही नैसर्गिक आणि पवित्र वस्तूने धुवावेत असा सल्ला प्रेमानंद महाराज देतात.

शास्त्रानुसार स्नानाचे चार प्रकार आहेत. सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ऋषीस्नान म्हणतात. ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हणतात. तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये स्नानाला देवस्नान म्हणतात. सूर्योदयानंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान म्हणतात. गृहस्थांसाठी ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे योग्य मानले जाते. असे केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वच्छ राहते.

आंघोळ करताना मंत्रांचा जप केल्याने केवळ मनच नाही तर शरीरही शुद्ध होते. आंघोळ करताना फक्त ओंकार (ओम) चा जप करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासोबत तू – ओम गंगे च यमुने चैवा गोदावरी सरस्वती. तुम्ही नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु या मंत्राचाही जप करू शकता असे प्रेमानंद महाराज सांगतात.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. )





Source link

वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुले भिडली; मोठ्याने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा दिला सल्ला

0
वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुले भिडली;  मोठ्याने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा दिला सल्ला


मध्य प्रदेशात वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुलांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे.  दोन्ही मुलांना वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते. दोघांचेही आपापले दावे होते. दरम्यान, वडिलांचा मृतदेह तसाच पडून राहिला. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र चितेला अग्नी कोणी द्यायचा यावरून वाद निर्माण झाला व ग्रामस्थ व नातेवाईक ताटकळत उभे राहिले.



Source link

मुलगी कधी मोठी होऊ नये, नेहमी लहानच दिसावी; आई-वडिलांनी वयाच्या १६ वर्षापर्यंत पोटभर जेवण दिलं नाही

0
मुलगी कधी मोठी होऊ नये, नेहमी लहानच दिसावी; आई-वडिलांनी वयाच्या १६ वर्षापर्यंत पोटभर जेवण दिलं नाही


ऑस्ट्रेलियात आई-वडिलांना मुलीवर अत्याचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना नेहमी तिला सडपातळ ठेवायचे होते. आपली मुलगी कधीही मोठी होऊ नये, अशी ही त्यांची इच्छा होती.  तिला नेहमी लहान मुलीसारखं बघायचं होतं. त्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिचे खाणे-पिणे खूपच कमी केले.  तिचा आहारही अतिशय काटेकोर ठेवण्यात आला होता. दोषी आढळलेले दाम्पत्य पर्थ शहरातील आहे. आपल्या मुलीला पुरेसे पोषण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुलगी १६ वर्षांची झाली तरी तिचे वजन फक्त २७ किलो होते.



Source link

बहुविद्याशाखीय संशोधनातूनच सामाजिक प्रश्नांना शाश्वत उत्तरे – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

0
बहुविद्याशाखीय संशोधनातूनच सामाजिक प्रश्नांना शाश्वत उत्तरे – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी | साहस Times
म्हसवड: “संशोधन केवळ विशिष्ट विषयापुरते मर्यादित न राहता ते आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय झाले तर जागतिक पातळीवरील अनेक गंभीर प्रश्न सोडवता येऊ शकतात,” असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे आयोजित ‘Transforming Research Trends in Multidisciplinary Context’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी म्हसवडसारख्या दुष्काळग्रस्त भागात प्रथमच आयोजित झालेल्या या संशोधनपर परिषदेस मुक्तकंठाने गौरवले. “संशोधकांनी आपल्या परिसरातील समस्यांवर आधारित संशोधन करावे आणि त्याद्वारे समाजोपयोगी उपाय शोधावेत. अशा नाविन्यपूर्ण संशोधनांना फलटण एज्युकेशन सोसायटीचा नेहमीच पाठिंबा असेल,” असेही त्यांनी नमूद केले.

परिषदेचे बीज भाषण सायलिसबरी विद्यापीठ (USA) चे विजिटिंग प्रोफेसर डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी केले. “संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता स्थानिक पातळीवरून सुरू होणारे संशोधन अधिक प्रभावी ठरते,” असे ते म्हणाले. त्यांनी संशोधनाच्या तीन महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला –

  1. सामान्य लोकांसाठी उपयुक्तता
  2. जीवनमान सुधारणा
  3. फक्त पेटंटपुरते मर्यादित न ठेवणे

प्रथम सत्रात अल क़ायस ओपन युनिव्हर्सिटी, पॅलेस्टीन येथील प्रा. डॉ. मुंथर मोहम्मद इब्राहिम झ्यौद यांनी डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांमधील संशोधनाच्या नवीन संधींबद्दल मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्रात डॉ. ब्याबालोला सॅम्युएल (नायजेरिया) यांनी जागतिक पातळीवरील पर्यावरणीय संकटे, हवामान बदल, जंगलतोड यांसारख्या प्रश्नांवर शाश्वत विकासच एकमेव उपाय असल्याचे ठामपणे सांगितले.

परिषदेच्या अखेरच्या सत्रात भारतभरातून आलेल्या २०० शोधनिबंधांपैकी ५० निवडक शोधनिबंध सादर करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय मदने (मुधोजी महाविद्यालय, फलटण) होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवेंद्र रणवरे यांनी केले, तर प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी महाविद्यालयातील विविध प्रगतीबाबत माहिती दिली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे मा. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवकांनी मेहनत घेतली.