Tuesday, September 15, 2026
Homeसाताराबारामती पुलाजवळ भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती पुलाजवळ भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: बारामती चौक पुलाजवळ आज (2 फेब्रुवारी 2025) दुपारी 2:45 वाजता झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयित वाहनाचा शोध घेत आहेत.

मृत ट्रकचालकाचे नाव मुस्ताक जमाल खान (वय 37, रा. फिरोजपूर, ता. मेवात, हरियाणा) असे आहे. तो बारामतीकडून फलटणकडे येत असताना अपघात घडला. मुस्ताक खान आपल्या ताब्यातील लेलँड कंपनीच्या ट्रक (क्र. NL.01 AH.7903) मध्ये वेस्पा कंपनीच्या मोटारसायकली घेऊन गोव्याकडे निघाला होता. बारामती पुलाजवळ ट्रकच्या उजव्या बाजूने डोकावून पाहताना समोरून येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर अज्ञात पिकअप चालकाने घटनास्थळी न थांबता गाडी घेऊन फरार झाला. या प्रकरणी खलील इसाक खान (रा. हरियाणा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकअप चालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2025 अन्वये भा.दं.सं. कलम 106(1), 281, 125(a), 125(b), मोटार वाहन कायदा कलम 134(a), 134(b), 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत असून, अपघातग्रस्त परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच, संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी बीट अंमलदारांसोबत तपास सुरु आहे.

यशवंत नलावडे
पोलीस निरीक्षक (गुन्हे)
फलटण शहर पोलीस ठाणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments