Friday, July 31, 2026
Home Blog Page 543

Maharahstra Kesari : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडचा सलग दुसऱ्यांदा पराभव

0
Maharahstra Kesari : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडचा सलग दुसऱ्यांदा पराभव


महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेचा अंतिम सामना आज (२ फेब्रुवारी) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि ६७ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.



Source link

Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

0
Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी


Vishwa Marathi Sahitya Sammelan Pune : पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन आज पार पडले. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं. राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे,असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. ‘अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो,पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कारच असतो’,असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.



Source link

भारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि…

0
भारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि…


Worlds Largest Private Residence Laxmi Vilas Palace:  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील अँटीलिया हे निवासस्थान जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. जवळपास 15 हजार कोटी रुपये इतकी किंमत असलेल्या अँटीलिया पेक्षा भव्य दिव्य असे जगातील सर्वात मोठं घर गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती असलेला  भारतातील सर्वात मोठा राजमहल  2,43,93,60,00,000 कोटींचा आहे. पर्यटकांना या राजमहलात फिरता येते. 

लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खासगी घर आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे  लंडनमधील बकिंघम पॅलेसपेक्षा चार पट मोठे आहे. या पॅलेसची भव्यता पाहून सगळे चाट पडतात. जितका हा पॅलेस भव्य आहे तितकाच तो अलिशान देखील आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोदाचे राज घराने गायकवाड कुटुंबाचे निवासस्थान आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी सन 1890 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस बांधला होता. सध्या महाराज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी महारानी राधिका राजे गायकवाड यांचे कुटुंब या पॅलेसमध्ये राहत आहे. मराठा साम्राज्याच्या वैभव कसे होते याची झलक या राजवाड्यात पहायाल मिळते.  एकेकाळी गायकवाड कुटुंबाने बडोदावर राज्य केले होते. या पॅलेसची मालकी समरजीत सिंह गायकवाड यांच्याकडे आहे. समरजीत सिंह यांच्या कुटुंबियांची संपत्ती 20 हजार कोटींच्या आसपास आहे. 2002 साली त्यांचा विवाह राजकुमारी राधिकाराजे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.

भव्य दिव्य पॅलेस 

 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस विस्तारलेला आहे. जगातील सर्वात महागडे घर असलेल्या ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसही याच्यापेक्षा आकारेने लहान आहे.  बकिंगहॅम पॅलेसचा विस्तार हा केवळ 8,28,821 स्क्वेअर फूट इतका आहे. तर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे आलिशान घर आहे. मात्र, अँटेलिया हाऊस देखील फक्त 48,780 स्क्वेअर फूट आकाराचे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. याची किंमत  2,43,93,60,00,000  म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी इतकी आहे.

लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये सर्वसामान्यांदेखील प्रवेश दिला जातो. कारण पॅलेसच्या एका भागात गायकवाड राजघराने राहते. तर दुसरा भाग सामान्य जनतेसाठी खुला केला आहे. सर्वसामान्य लोक येथे जाऊन राजमहल पाहू शकतात. गायकवाड कुटुंबाने या भागात महाराज फतेह सिंह संग्रहालय देखील सुरु केले आहे. फक्त 150 रुपये इतके प्रवेश शुल्क देऊन हा राजमहल पाहता येतो. 





Source link

Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज राक्षे याची पंचांना मारहाण

0
Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज राक्षे याची पंचांना मारहाण


महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली.



Source link

घोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत फुर्रर्र

0
घोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत फुर्रर्र


पत्नीने आर्थिक कारणासाठी पतीला किडनी विकण्यासाठी भाग पाडले. तिच्या शब्दाखातर  नवऱ्यानं १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले, ते पैसे  घेऊन बायको प्रियकरासोबत पसार झाली आहे. मुलीच्या भविष्यासाठी पैसे बँकेत ठेवत असल्याचं सांगत तिने बॉयफ्रेंडसोबत पलायन केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.



Source link

भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य, देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती इथेच राहतात; दुसऱ्या क्रमाकांच्या राज्याचे नाव जाणून आश्चर्यचित व्हाल

0
भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य, देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती इथेच राहतात; दुसऱ्या क्रमाकांच्या राज्याचे नाव जाणून आश्चर्यचित व्हाल



हुरुन इंडिया रिच लिस्ट  2024 च्या यादीत भारतात 94 नविन अरबपति बनले आहेत. जाणून भारतातील पहिल्या क्रमाकांचे राज्य कोणते जिथे सर्वाधिक श्रीमंत राहतात. 



Source link

नेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

0
नेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा हवाला देत ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने लोकांच्या उत्पन्नावर भरमसाठ कर लादले, तर मोदी सरकारने करांचा बोजा कमी केला आणि मध्यमवर्गाला अधिक दिलासा दिला. दिल्ली निवडणुकीसाठी आरके पुरम मध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर तुम्ही नेहरूजींच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर सरकारने १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुमच्या पगारातील एक चतुर्थांश रक्कम कापली असती. 



Source link

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने संपवले जीवन

0
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने संपवले जीवन


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. 



Source link

Suraj Chavan : गळ्यात सोन्याची साखळी अन् डोळ्यांवर रंगीत गॉगल! ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाण पाहिलात का?

0
Suraj Chavan : गळ्यात सोन्याची साखळी अन् डोळ्यांवर रंगीत गॉगल! ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाण पाहिलात का?


Suraj Chavan Marathi Movie : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पर्वात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने विजेतेपदावर आपलं नाव कोरले. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर सूरजचं नाव कोरलं गेल्यावर निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यावर सूरज चव्हाण लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अखेर त्यांची घोषणा खरी ठरली असून, सूरज चव्हाण अभिनीत ‘झापूक झुपूक’ चित्रपटाचं पोस्टर आणि त्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.



Source link

16 वर्षीय मुलीने Boyfriend च्या मदतीने स्वत:च्याच घरात…; धक्कादायक CCTV Video समोर

0
16 वर्षीय मुलीने Boyfriend च्या मदतीने स्वत:च्याच घरात…; धक्कादायक CCTV Video समोर


VIDEO Of 16 year Old Girl With Boyfriend: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. मात्र अहमदाबादमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणणं कितीपत योग्य आहे असा यावर विचार करावा लागेल. येथील सेला परिसरामधील एका 16 वर्षीय तरुणीने तिच्याच घरातील तिजोरीवर डल्ला मारला आहे. आपल्या प्रिकयकराच्या प्रभावात येऊन या मुलीने स्वत:च्याच घरातील तिजोरी पळवल्याचं घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. हे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या प्रकरणामध्ये मुलीच्या घरच्यांना दोघांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर भोपाळ पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.

तिजोरीत काय काय होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार सेला परिसरातील एका इमारतीमध्ये घडला आहे. 29 सप्टेंबर 2024 रोजी या तरुणीच्या वडिलांनी घरामधील कपाटात एक तिजोरी ठेवली होती. या तिजोरीमध्ये 22 जिवंत काडतुसे (गोळ्या), 12 बोअर गन, बंदुकीचं लायसन्स, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर मौल्यवान वस्तू होत्या. एकूण 1.56 लाखांचा मुद्देमाल या तिजोरीत होता.

घरात तिजोरी नसल्याचं लक्षात आलं

आपल्या स्कुटरचे कागदपत्र शोधत असताना या व्यक्तीला तिच्या घरातील कपाटामध्ये तिजोरी नसल्याचं दिसून आलं. त्याने घरभर तिजोरी शोधली. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या व्यक्तीला धक्काच बसला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीची मुलगी आणि एक तरुण तिजोरी घराबाहेर घेऊन जात असल्याचं दिसलं.

वडिलांनाच मुलाची ओळख पटली

यासंदर्भात वडिलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने नीट उत्तरं दिली नाहीत. त्यानंतर त्या सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या मुलाची ओळख पटली. सीसीटीव्ही फुटेजमधील हा तरुण अहमदाबादमधील बोराडी मील येथे राहणारा ऋतुराज सिंह छावडा असल्याचं मुलीच्या वडिलांच्या लक्षात आलं. मात्र मुलगी वारंवार आपण तिजोरी चोरली नाही असं सांगत होती. आपण दुसरं खोकं घराबाहेर नेलं होतं असं मुलीने सांगितलं. चोरीचे हे सीसीटीव्ही फुटेज तुम्हीच पाहा…

अखेर दिली गुन्ह्याची कबुली

तिजोरीमध्ये गोळ्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं असल्याने वडिलांनी भोपाल पोलिसांकडे तक्रा दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ऋतुराजला अटक करुन त्याचा जबाब नोंदवण्यात आलं. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर ऋतुराजने गुन्हा कबुल केला. आपण 2 वर्षांपूर्वी नवरात्रीमध्ये या मुलीला भेटलो होतो असं ऋतुराजने पोलिसांना सांगितलं. कालांतराने दोघांमधील जवळीक वाढली. ऋतुराजला काही आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे त्याने आपल्या या कथित प्रेयसीला तिच्या घरातील तिजोरीतून चोरी करण्यास भाग पाडलं. 

कुठे टाकलं सामान?

या प्रकरणाचा पोलीस आता सखोल तपास करत असून पैसे वगळता तिजोरीतील इतर सामाना दोघांनी वासना येथील नदी किनाऱ्यावर टाकून दिल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे. 





Source link