Friday, July 31, 2026
Home Blog Page 544

5000 कोटींच्या भारतीय कंपनीचा मालक Ola ने घरी गेल्याने ट्रोल; तो म्हणाला, ‘मी EMI…’

0
5000 कोटींच्या भारतीय कंपनीचा मालक Ola ने घरी गेल्याने ट्रोल; तो म्हणाला, ‘मी EMI…’


Rs 5000 crore Owner Traveled By Ola: ‘थायरोकेअर’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए. वेल्लूमणी हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील मोठ्या कार्यक्रमानंतर ए. वेल्लूमणी या हॉटेलबाहेरुन चक्क टॅक्सीने घरी गेले. 5 हजार कोटींचा मालक असलेला हा व्यक्ती अशाप्रकारे टॅक्सीने घरी गेल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी असं का केलं असावं याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेकांनी यावरुन ए. वेल्लूमणी यांना यावरुन ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगनंतर आता स्वत: ए. वेल्लूमणी यांनी या साऱ्या प्रकरणावर मत व्यक्त केलं आहे.

रोज पाच किलोमीटरची पायपीट

ए. वेल्लूमणी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून आजचा यशस्वी उद्योजक हा प्रवास कसा केला हे सांगितलं आहे. 1965 ते 1982 दरम्यानचं आपलं संपूर्ण आयुष्य खेडेगावात गेलं. रोज शाळेत जाण्यासाठी आपल्याला पाच किलोमीटर पायपीट करावी लागायची. 1980 साली ए. वेल्लूमणी यांना पहिल्यांदा सेकेंड हॅण्ड सायकल मिळाली. मुंबईमध्ये आल्यानंतर 1982 ते 1992 दरम्यान अणुशक्ती नगर ते परळमधील टाटा मेमोरिअल रुग्णालयादरम्यानचं अंतर ए. वेल्लूमणी ये-जा करायचे. काही श्रीमंत सहकारी टॅक्सीने यायचे-जायचे तर मध्यमवर्गीय लोक बसने ये-जा करायचे. मात्र कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून ए. वेल्लूमणी आणि त्यांचे इतर तीन सहकारी रोज 2 किलोमीटरचं अंतर पायी चालत जायचे.

…म्हणून ओला, उबर लक्झरीच

1992 ते 2002 दरम्यान ए. वेल्लूमणी हे ठाणे आणि परळदरम्यानचा प्रवास एसटी बसने आणि लोकल ट्रेनच्या सेकेण्ड क्लासने प्रवास करायचे. त्यांनी 1993 साली पहिली स्कूटर विकत घेतली. 2002 ते 2022 मध्ये थायरोकेअरा नफा होत गेला त्याप्रमाणे ए. वेल्लूमणी टॅक्सी, रिक्षाने प्रवास करु लागले. त्यांनी 2004 साली त्यांची पहिली कार, टोयोटा क्वालिस विकत घेतली. त्यावेळी कंपनीचा टर्नओव्हर 50 कोटींच्या वर पोहोचला होता म्हणूनच त्यांनी कार घ्यायची हिंमत केली.

नक्की पाहा हे फोटो >> आधी महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी अन् आता डबल साइजचं घरं? शाहरुखला 2 आठवड्यात 2 लॉटरी

2021 पासून ए. वेल्लूमणी यांच्या कुटुंबाकडे एमजीची ईव्ही कार आहे. तसेच त्यांच्याकडे स्कोडा कंपनीचीही कार आहे. मात्र आजही ओला, उबर आपल्याला लक्झरी सेवाच वाटते कारण अजूनही 90 टक्के भारतीयांना ही सोय वापरता येत नाही, असं ए. वेल्लूमणी यांचं म्हणणं आहे. 

अनावश्यक कर्ज न घेण्याचा सल्ला

ए. वेल्लूमणी यांनी आपली काटकसर करण्याची सवयच यशस्वी होण्यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. ‘मी ईएमआय जनरेशनमधला आहे,’ असंही ए. वेल्लूमणी म्हणतात. सुरक्षित भविष्यासाठी गरज नसताना कर्ज घेऊ नका असा सल्ला ए. वेल्लूमणींनी दिला आहे. आपल्या कृतीचं कौतुक करणाऱ्यांचं आणि विरोध करणाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं आहे. काहींना यामध्ये व्यक्तीमधील गुणधर्म दिसतील तर काहीजण यावरुन ट्रोलिंग करतील असं ए. वेल्लूमणी म्हणालेत.

शेतजमीनही नावावर नसलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्म ते 5000 कोटींचा मालक

ए. वेल्लूमणी यांचा जन्म तामिळनाडूमधील छोट्याश्या गावात साधी शेतजमीनही नावावर नसलेल्या शेतकऱ्याच्या घरात झाला. गरीबीमधून बाहेर पडायचं असं मनाशी पक्क करुन ए. वेल्लूमणी यांनी मद्रास विद्यापिठामधील 1978 साली रसायनशास्रामध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांना 1982 साली मुंबईत भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये सहाय्यक वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. जीवशास्राचं ज्ञान नसतानाही ते जीवशास्र आणि बायोकेमिस्ट्रीसारखे विषय शिकले. 1995 साली त्यांनी थायरोकेअर कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीचं मूल्य 5000 कोटी रुपये इतकं आहे.





Source link

Bollywood Villains : ‘या’ कलाकारांनी नाकारल्या बॉलिवूडच्या ५ आयकॉनिक व्हिलनच्या भूमिका, नंतर झाला पश्चाताप!

0
Bollywood Villains : ‘या’ कलाकारांनी नाकारल्या बॉलिवूडच्या ५ आयकॉनिक व्हिलनच्या भूमिका, नंतर झाला पश्चाताप!


Bollywood Famous Villains : काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी हिंदी चित्रपटांतील ‘ही’ लोकप्रिय खलनायकांची पात्रे करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप झाला.



Source link

पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

0
पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश


Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ऐरवी जंगलात राहणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. आज सकाळी निगडी प्राधिकारणातील संत कबीर उद्यान व दुर्गा टेकडी परिसरात बिबट्या आढळून आला होता. येथील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला होता. ही बाब बंगल्याच्या केअर टेकरच्या लक्षात आल्याने त्याने ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आलं. तब्बल २ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशीत आहेत.



Source link

फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना

0
फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना


Mumbai News : शिक्षण हा कायद्याने हक्क असतांना केवळ १००० रुपयांची फी भरली नाही म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शाळेत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबई येथील एका शाळेत घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलाच्या पालकाने शाळेची फी पूर्ण भरल्याची माहिती आहे.



Source link

Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

0
Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या


Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. काही दिवसांपासून नक्षलवादी हे सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय ४६) यांची शनिवारी रात्री त्यांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना घरातून बाहेर फरफट आणले. तसेच त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.



Source link

शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना

0


सातारा : तब्बल 7 महिने शिवभक्तांच्या साक्षीने साताऱ्यात प्रदर्शित करण्यात आलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं अखेर नागपूरकडे रवाना झाली आहेत. 19 जुलै 2024 रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात परत आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी 4लाख 30हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे (Waghnakhe) दर्शन घेतले. आज सकाळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Nagpur)

हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही 16 व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं लंडनहून भारतात आगमन झालं. गेली सात महिने ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता साताऱ्यात होती. आता वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम संपला असून आता नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात येत आहेत. 

शिवप्रेमींनी घेतलं ऐतिहासिक दर्शन

गेल्या सात महिन्यांत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट देत या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या या वाघनखांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकांनी गर्दी केली होती. इतिहासाच्या सुवर्णपानाचा साक्षीदार बनण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.आता ही वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवभक्तांसाठी प्रदर्शित केली जाणार आहेत. नागपूरमधील नागरिक आणि पर्यटकांना लवकरच या ऐतिहासिक अस्त्राचे दर्शन घेता येणार आहे. 

या 4 शहरांमध्ये वाघनखांचा वारसा

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूरमुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टाेबर 2025पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

हेही वाचा-:

Pandharpur News: वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर सजलं, पाहा PHOTOS

 

अधिक पाहा..



Source link

Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील सापूतारा घाटात भीषण अपघात! खासगी बस २०० फूट दरीत कोसळली, ७ जण ठार, १५ गंभीर जखमी

0
Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील सापूतारा घाटात भीषण अपघात! खासगी बस २०० फूट दरीत कोसळली, ७ जण ठार, १५ गंभीर जखमी


Nashik Saputara Bus Accident : नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज पहाटे ५.३० च्या दरम्यान, हा अपघात झाला आहे. एक घासगी बस ही तब्बल २०० फुट खोल दरीत कोसळून बस मधील ७ जण ठार झाले आहेत. तर १५ जण हे गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकवरुण देवदर्शन करून काही भाविक हे गुजरात येथे जात होते. मात्र, वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.



Source link

Aamir Khan : आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या

0
Aamir Khan : आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या


Aamir Khan New Relationship : बॉलिवूड अभिनेता आमिर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. आमिर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो, पण यावेळी आमिर चर्चेत येण्याचे कारण त्याचे प्रोफेशनल लाईफ नसून, पर्सनल लाईफ आहे. होय, सध्या आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जाणून घेऊया आमिर का चर्चेत आहे?



Source link

रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?

0
रामदेव बाबा यांना केरळ कोर्टाचा दणका! जारी केले अजामीनपात्र वॉरंट; बाळकृष्ण यांच्यावरही होणार कारवाई, कारण काय ?


Ramdev Baba News : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. केरळमधील न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव बाबा यांच्यासह पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे. एका खटल्या प्रकरणी हे दोघे  अनुपस्थिती राहिल्यामुळे पलक्कड जिल्हा न्यायालयाने दोघांविरुद्ध वॉरंट जारी केले. केरळ ड्रग इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसीविरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात हे दोघेही गैर हजर होते.



Source link

Entertainment News in Marathi Live: त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या! ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?

0
Entertainment News in Marathi Live: त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या!  ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?


त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या!  ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?

त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या! ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 02 Feb 202504:25 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या! ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?

  • Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णी यांनी बागेश्वर धामच्या बाबांना ‘नॅपी धीरेंद्र शास्त्री’ म्हणत गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्रीने बाबा रामदेव यांच्यावरही भाष्य केले.


Read the full story here





Source link