Friday, July 31, 2026
Home Blog Page 545

त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या! ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?

0
त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या!  ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?


Mamta Kulkarni On Tv Show : बॉलिवूड अभिनेत्री ते महामंडलेश्वर ममता कुलकर्णी नुकतीच एका टीव्ही शोमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्रीआणि रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, रामदेव बाबांनी महाकाल आणि महाकालीची भीती बाळगावी. धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल बोलताना ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, ‘त्यांचे जितके वय आहे, तेवढीच तपश्चर्या मी केली आहे.’ नुकतीच ममता कुलकर्णीने अभिनयातून निवृत्ती घेऊन किन्नर आखाड्यात रुजू झाली होती. तिला महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली होती. या निर्णयावर अनेक धर्मगुरूंनी नाराजी व्यक्त केली. आता तिच्याकडून ही पदवी काढून देखील घेतली गेली आहे.



Source link

शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका

0
शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका


Sanjay Raut on Eknath shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून सरकारवर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून सरकारकडे मोठे बहुमत असतांना देखील राज्यात अस्थितरटा आहे असा दावा त्यांनी केला आहे. या बाबत शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांना माहिती दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित झाल्याचं समजत असून ते या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. दोघांमध्ये फारसे चांगले संबंध राहिले नाहीत असे राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी अजित पवार यांना हुशार म्हटलं आहे. त्यांना काहीच हवं नसल्यानं त्यांनी ईडीच्या चौकशी पासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.



Source link

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? IMD ने दिला अलर्ट

0
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? IMD ने दिला अलर्ट


Maharashtra IMD Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठा बदल झाला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सकाळी व रात्री गारवा जाणवत असला तरी त्यात घट झाली आहे. १० नंतर ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ होत आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



Source link

Nashik Accident : कुंभमेळ्यातून परत येतांना नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला! निर्वृत्त प्राध्यापकांसह तिघांचा मृत्यू

0
Nashik Accident : कुंभमेळ्यातून परत येतांना नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला! निर्वृत्त प्राध्यापकांसह तिघांचा मृत्यू



Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघा भाविकांच्या कारचा नाशिक जवळील सिन्नर येथे अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.



Source link

Maharashtra Election News LIVE February 2, 2025: Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

0
Maharashtra Election News LIVE February 2, 2025: Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी


Maharashtra Election 2024 News LIVE: Raj Thackeray : 'त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार'; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

Maharashtra Election 2024 News LIVE: Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 02 Feb 202502:58 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Raj Thackeray : ‘त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार’; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

  • Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी एक अभिनेत्यांना पुरस्कार मात्र आमच्या वाट्याला तिरस्कार असे मिश्किल वक्तव्य केल्यां उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला


Read the full story here

Sun, 02 Feb 202510:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, संभाजीनगरमध्ये चिठ्ठी लिहून तरुणाने संपवले जीवन

  • Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव दिला आहे. शेततळ्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली.


Read the full story here

Sun, 02 Feb 202507:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

  • Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यातील निगडी प्राधिकरणात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून एका बिबट्याला जेरबंद केलं आहे.


Read the full story here

Sun, 02 Feb 202506:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना

  • Mumbai News : नवी मुंबईत एका शाळेत मुलाने फी भरली नाही म्हणून शाळेने मुलाला तब्बल ५ तास डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Read the full story here

Sun, 02 Feb 202506:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

  • Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका माजी पंचायत समिती संभापतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.


Read the full story here

Sun, 02 Feb 202505:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील सापूतारा घाटात भीषण अपघात! खासगी बस २०० फूट दरीत कोसळली, ७ जण ठार, १५ गंभीर जखमी

  • Nashik Saputara Bus Accident : नाशिकमध्ये आज सकाळी ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. सापूतारा घाटात तब्बल २०० फुट खोल दरीत बस कोसळली असून ७ जण ठार झाले आहेत.


Read the full story here

Sun, 02 Feb 202504:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका

  • Sanjay Raut on Eknath shinde : खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोख ठोक सदरातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून यामुळे राज्य अस्थिर असल्याची टीका त्यांनी केली आहे.


Read the full story here

Sun, 02 Feb 202503:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? IMD ने दिला अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Read the full story here

Sun, 02 Feb 202502:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik Accident : कुंभमेळ्यातून परत येतांना नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला! निर्वृत्त प्राध्यापकांसह तिघांचा मृत्यू

  • Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघा भाविकांच्या कारचा नाशिक जवळील सिन्नर येथे अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.


Read the full story here

Sun, 02 Feb 202502:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी केली वाढ

  • Defence Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पांत  संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ३६ हजार ९५९ कोटींची वाढ केली आहे.


Read the full story here





Source link

रसिक स्पेशल: महाराष्ट्राचा विकास : नीती, नियत आणि तफावत

0
रसिक स्पेशल:  महाराष्ट्राचा विकास : नीती, नियत आणि तफावत


  • Marathi News
  • Opinion
  • Maharashtra’s Development: Policy, Destiny And Variation Rasik Article By Shrinivas Khandewale

श्रीनिवास खांदेवाले40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अन्य राज्यांच्या तुलनेत पुरोगामी आणि उद्योगप्रधान असलेला महाराष्ट्र चौथ्या स्थानावरुन पहिल्या स्थानाकडे न जाता दोन पायऱ्या खाली गेला असेल, तर राज्याच्या नेतृत्वाला आर्थिक धोरणाचे पुनर्मूल्यांकन आणि त्याच्या अंमलबजावणीचे फेरनियोजन करावे लागेल. अन्यथा, वित्तीय ‘नीती’ आणि विकासाची ‘नियत’ यातील ही तफावत राज्यासाठी घातक ठरेल.

देशाच्या नीती आयोगाचा वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक – २०२३ (Fiscal Health Index) हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केला गेला आहे. राज्य सरकारांच्या खर्चाची गुणवत्ता, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची महसूल देण्याची क्षमता, त्यांनी कोविडच्या काळात काढलेली अधिकची सार्वजनिक कर्जे, त्या कर्जांचे संबंधित राज्यांच्या सकल उत्पन्नाशी असलेले प्रमाण, कर्जांची दीर्घकालीन सक्षमता, या आणि अशा अन्य निकषांवर राज्यांचे क्रमांक ठरवण्यात आले आहेत. ही क्रमवारी निश्चित करताना, २०१४-१५ ते २०१८-१९, २०१४-१५ ते २०२१-२२ आणि २०२२-२३ असे तीन भाग पाडण्यात आले आहेत. या मापनानुसार जे गुण पडतात आणि त्यावर आधारित राज्यांचे जे क्रमांक ठरतात, त्यावरून त्या त्या राज्याच्या आर्थिक आघाडीवर काय घडत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. इथे प्रामुख्याने महाराष्ट्राला समोर ठेऊन त्या संदर्भातील काही मोजके आयाम आपण विचारात घेऊ.

कोणत्याही देशाच्या वा राज्याच्या आर्थिक विकास प्रक्रियेत, कायदे आणि धोरणे ठरवणारे राजकीय नेतृत्व आणि त्यांची अंमलबजावणी करणारी प्रशासन यंत्रणा असे दोन खांब असतात. त्यातही राजकीय नेतृत्व सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासाच्या बाबतीत चांगले घडल्याचे श्रेय जसे या नेतृत्वाला मिळते, तसे काही चूक घडल्याचा दोषही त्यावरच येतो.

वारसा, विशेषणे आणि वस्तुस्थिती वित्तीय स्वास्थ्य निर्देशांकातून दिसणाऱ्या स्थितीत २०२२ – २३ मध्ये ५०.३ गुण घेऊन १८ राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता. ओडिशा, छत्तीसगड, गोवा, झारखंड आणि गुजरात ही राज्ये आपल्यापुढे होती, तर उत्तर प्रदेश सातव्या क्रमांकावर होता. २०१४- २२ या पूर्ण काळातही ओडिशा पहिल्या क्रमांकावरच होता. तेव्हा महाराष्ट्र चौथ्या स्थानावर होता, २०२२-२३ मध्ये तो घसरून सहाव्या स्थानावर आला. छत्तीसगड पाचव्या स्थानावरून पुढे सरकत दुसऱ्या स्थानी पोहचला. झारखंडने मोठी झेप घेत दहाव्या स्थानावरून चौथे स्थान प्राप्त केले. तेलंगण आणि गुजरातने एक अंक पुढे जात अनुक्रमे नवव्यावरुन आठवे आणि सहाव्यावरून पाचवे स्थान मिळवले. अशा स्थितीत आपला महाराष्ट्र कसा खाली घसरला, याचे दु:ख मराठी माणसांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण तो देशातील भौगोलिकदृष्ट्या तिसऱ्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाज्वल्य इतिहासाचा, पुरोगामी विचारांचा आणि सर्व क्षेत्रांतील प्रागतिकतेचा वारसा आपल्या या राज्याला लाभला आहे. प्रत्यक्षात आपण ही विशेषणे केवळ आपलाच उत्साह वाढावा म्हणून वापरतो, कारण राज्याचे आर्थिक वास्तव काही वेगळेच आहे. २०१४-१५ पासून २०२२-२३ पर्यंतच्या या संपूर्ण काळात ओडिशाने दरवर्षी आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला. छत्तीसगड, तेलंगण, झारखंड या नवनिर्मित छोट्या राज्यांनी आपले स्थान उंचावले. पण, या बहुतांश काळात महाराष्ट्रामागे ‘डबल इंजिन’ची शक्ती असतानाही असे का घडले?

वित्तीय विवेकाची वानवा आपण या अहवालातून (पृ. १९) २०२२-२३ साठीची आकडेवारी घेतल्यास असे दिसते की, खर्चाच्या गुणवत्तेत १८ पैकी ९ राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. तर, महसूल संकलनामध्ये मुंबई-पुण्याच्या औद्योगिकरणामुळे तीनच राज्ये आपल्यापुढे आहेत आणि १४ राज्ये मागे आहेत. वित्तीय विवेकाच्या बाबतीत ८ राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत पुढे आणि ९ राज्ये आपल्या मागे होती. कर्ज निर्देशांकात (व्याजाचे महसुली उत्पन्नाशी प्रमाण) फक्त दोनच राज्यांचा व्याजाचा भार महाराष्ट्रापेक्षा जास्त आणि बाकी पंधरा राज्यांचा व्याजभार कमी होता. कर्जांच्या निरंतर सक्षमतेत (Sustainability) तीन राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आणि १४ राज्ये मागे आहेत. बाकीच्या घटकांच्या तुलनेत, खर्चाच्या गुणवत्तेत ९ राज्ये आणि वित्तीय विवेकाच्या बाबतीत ८ राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असणे मराठी मनाला पटणारे नाही. आणि हे मराठी मन शिकायला तयार नसते, म्हणून असे घडते! सतत सगळ्या निकषांवर ओडिशाला प्रथम क्रमांकावर ठेवणाऱ्या तिथल्या राजकीय नेतृत्वाची प्रशंसा आपण करणार की नाही?

वित्त व्यवस्थापनाचे अनुकरण हवे राज्यवार विश्लेषणात महाराष्ट्राविषयी असे म्हटले आहे की, (१) राज्याच्या सकल उत्पन्नाचा अंश म्हणून एकूण खर्च इतर प्रमुख राज्यांपेक्षा कमी आहे, (२) राज्याच्या एकूण खर्चांपैकी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रावरील खर्चाचे प्रमाण इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत कमी आहे, (३) राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील खर्चाची किंचितशी वाढ विचारात घेऊनही महाराष्ट्राचा खर्च इतर प्रमुख राज्यांपेक्षा कमी होता, (४) राज्य वस्तू आणि सेवाकरामुळे कर महसूल वाढला, पण करेतर महसूल कमी झाला आहे, (५) महसुली शिलकीऐवजी महसुली तूटच निर्माण झाली, (६) बांधील (Committed) खर्च वाढल्यामुळे इतर आवश्यक खर्चांनाही निधी मिळाला नाही. सार्वजनिक कर्ज वाढण्यामागचे एक कारण असे देण्यात आले आहे की, जुनी कर्जे फेडण्यासाठी (शिल्लक उत्पन्न नसल्यामुळे) सरकारला नवीन कर्जे काढावी लागली. सारांश, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आणि जनतेने कार्यक्षम वित्तीय व्यवस्थापनासाठी इतर राज्यांकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. २०२३ ते २५ या दोन वर्षांत निवडणुकीच्या निमित्ताने लाडकी बहीण, कर्जमाफी, व्याजमाफी, वीज बिलमाफी, मोफत प्रवास अशा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अव्यवहार्य आणि अविवेकी योजना लागू करण्यात आल्या. निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या पक्षांचा विवेक अचानक जागा झाल्याने आता या योजनांची छाटणी सुरू झाली आहे. त्याचा लेखाजोखा अर्थातच नीती आयोगाच्या पुढच्या अहवालात येईल.

विकासाचे अतिकेंद्रीकरण घातक केवळ काही मोठ्या शहरांमध्येच उद्योगांचे केंद्रीकरण करणे अविवेकी आहे. आता मुंबईतच तिसरी मुंबई विकसित होत आहे! पुण्यात सायकल आणि वाहने चालवणेच काय, पायी चालणेही अशक्य झाले आहे. या शहरांवरचे अतिविस्ताराचे ताण वाढत आहेत, तर दुसरीकडे अन्य शहरांचा, मागास प्रदेशांचा विकास अडला आहे. आधी तंत्रज्ञानशिक्षित मुलामुलींचे नोकरीसाठी आणि नंतर पालकांचे स्थलांतर होवून विदर्भ – मराठवाड्यात सामाजिक – मानसिक तणाव वाढत आहेत. ही प्रक्रिया दीर्घकाळापासून सुरू आहे. त्याकडे सरकारचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष आहे का?

दावोसमध्ये जाहीर झालेले लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आणि लाखो रोजगारांच्या निर्मितीचे दावे भविष्यात प्रत्यक्षात आलेच, तर तोपर्यंत राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचे आणि वाढत्या बेरोजगारीचे आकडे आणखी पुढे गेलेले असतील. नीती आयोगाच्या पुढच्या अहवालात त्याचाही हिशेब मांडला जाईल. पण, ‘प्रागतिक’ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला एरवी ‘मागास’ म्हटल्या जाणाऱ्या राज्यांच्या मागे नेणारी ही आपली कोणती आर्थिक नीती आहे? समन्यायी, समतोल प्रगती साध्य करण्याचे हे असे कोणते मॉडेल आहे? आणि एकूणच त्यातून कोणता विकसित महाराष्ट्र उभा राहणार आहे? अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत पुरोगामी आणि उद्योगप्रधान असलेला महाराष्ट्र चौथ्या स्थानावरुन पहिल्या स्थानाकडे न जाता दोन पायऱ्या खाली गेला असेल, तर राज्याच्या नेतृत्वाला आर्थिक धोरणाचे पुनर्मूल्यांकन आणि त्याच्या अंमलबजावणीचे फेरनियोजन करावे लागेल. अन्यथा, वित्तीय ‘नीती’ आणि विकासाची ‘नियत’ यातील ही तफावत राज्यासाठी घातक ठरेल.

(संपर्क – shreenivaskhandewale12@gmail.com )



Source link

रसिक स्पेशल: ‘विकसित’ होण्याच्या वाटेवरची आव्हाने…

0
रसिक स्पेशल:  ‘विकसित’ होण्याच्या वाटेवरची आव्हाने…




केवळ भौतिक प्रगती साधून ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि राजकीय विचारसरणीतील अंतर दूर केले पाहिजे. अन्यथा, विकसित राष्ट्र होण्यासाठी निश्चित केलेले २०४७ हे वर्ष केवळ आणखी एका संख्यात्मक ध्येयाचे प्रतीक ठरेल. आपण भारतीय लोक आता भौतिक विकासाला अग्रक्रम देत आहोत. परंतु, या विकासाच्या प्रक्रियेत प्रजासत्ताकीय संस्कृतीचा मात्र अभाव दिसत आहे. लोकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे शासनकर्ते नव्वदच्या दशकात मजबुरी म्हणून आर्थिक विकासाच्या अमेरिकन प्रारूपामध्ये उतरले. वर्तमानात देशाची तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण, आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचे हे एकमेव ध्येय असले पाहिजे का, हा प्रश्न पडतो. देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असताना, केवळ लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करुन काही साध्य होणार नाही. तर, संविधानाची मूलतत्त्वे साकार करताना येणारे यशापयश आणि आव्हाने यांबद्दल चिंतन करणे आवश्यक आहे. भौतिक प्रगती आणि आर्थिक विकास उल्लेखनीय असला, तरी समावेशक, न्याय्य आणि समृद्ध समाजाचे स्वप्न अजूनही अनेक अडथळ्यांना तोंड देत आहे. ही अडथळ्यांची शर्यत निदान “विकसित भारत @ २०४७’ म्हणजे स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत तरी संपवता येईल का, हा खरा प्रश्न आहे. भारताचे संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित आहे. ते अशा राष्ट्राची कल्पना करते, जिथे प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार असेल, जिथे प्रत्येकाला आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम केले जाईल. भेदभाव आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ही तत्त्वे निश्चित करण्यात आली होती. या संविधानाच्या आधारे आपले लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र अपेक्षित ध्येय साकार करण्याच्या प्रवासात किती पुढे आले आहे, हे समजून घेण्यासाठी जगातील इतर यशस्वी प्रजासत्ताक देशांकडे पाहणे आवश्यक आहे. लोकशाहीची तत्त्वे, प्रजासत्ताकाची मूल्ये आणि त्यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी अनुकरणीय असलेल्या पाच देशांचा त्या दृष्टीने विचार करू. अमेरिका : अमेरिकेने आपल्या संविधानाच्या आधारे स्वातंत्र्य, वैयक्तिक हक्क, नियंत्रण आणि संतुलनाची मजबूत व्यवस्था यशस्वी केली आहे. लोकांसाठी, लोकांचे सरकार, मतदानाचा अधिकार, मुक्त – पारदर्शक निवडणुका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पहिल्याच प्रार्थना सभेत बिशप मारियन बड्डे यांनी स्थलांतरितांविषयीच्या आणि लिंगभावाबद्दलच्या धोरणावर त्यांना खडे बोल सुनावले. हे अमेरिकेच्या परिपक्व गणतंत्राचे द्योतक म्हणावे लागेल. फ्रान्स : १७८९ मधील फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या लोकशाही मूल्यांना जन्म दिला. धर्मनिरपेक्षता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यांवर दिलेला भर फ्रान्सच्या प्रजासत्ताकाचे मोठे यश मानले जाते.
जर्मनी : कायद्याचे राज्य, वैयक्तिक हक्क आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही जर्मन प्रजासत्ताकाची मुख्य तत्त्वे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर या देशाने लोकशाही तत्त्वे स्वीकारली आणि त्याद्वारे सर्व नागरिकांना समान संधी आणि अधिकार मिळतील, अशी व्यवस्था सुनिश्चित केली. गेल्या आठ दशकांच्या प्रवासात जर्मनीने या सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. दक्षिण आफ्रिका : १९९४ मध्ये वर्णभेदाच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचे गणराज्यामध्ये रूपांतर झाले. तिथे मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि समानतेवर भर देणारी, लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन साधणारी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. वांशिक भेदभाव समूळ नष्ट करण्याच्या दिशेने या देशाने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. ब्राझील : भारताप्रमाणेच ब्राझील हा संघराज्य प्रणाली असलेला एक मोठा, वैविध्यपूर्ण देश आहे. या देशाचे संविधान मानवी हक्कांचे समर्थन करते आणि लोकशाही, सामाजिक न्याय आणि निष्पक्ष न्यायाच्या अधिकारांची हमी देते. सामाजिक न्याय आणि मूलभूत सेवांच्या तरतुदींवर या गणराज्य व्यवस्थेचा भार असल्यामुळे गरीब लोकसंख्येसाठी प्रगतीशील धोरणे आखून ती यशस्वी करण्यात हा देश अग्रेसर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत? आपल्यासमोरची आव्हाने काय आहेत? आणि त्यांचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे, याबाबतचे चिंतन आवश्यक ठरते. भारताची संसदीय व्यवस्था अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीपेक्षा वेगळी आहे. दोन्ही राष्ट्रे लोकशाही आदर्श मानतात. पण, भारताची विविधता आणि प्रादेशिक बारकाव्यांमुळे अधिक विकेंद्रित शासन व्यवस्था ही आपली गरज बनली आहे. संघराज्य व्यवस्था मजबूत करणे आणि उपेक्षित घटकांचे आवाज ऐकण्याला प्राधान्य देणे, ही या बाबतीतली भारतासमोरची मोठी आव्हाने आहेत. आपला देश बहुविधतेला प्राधान्य देतो. त्यामुळे इथे धार्मिक प्रथा आणि सांस्कृतिक ओळखी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. धार्मिक विविधतेसह धर्मनिरपेक्षता अबाधित राखणे हे आपल्यासमोरचे खडतर आव्हान आहे. आर्थिक स्थिरता, शिक्षण आणि सामाजिक कल्याणकारी व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक आहे. जातिभेद, गरिबी आणि असमानता या गोष्टीही आपल्यापुढचे एक मोठे आव्हान आहे. आपली समाजव्यवस्था आजही जातीआधारित भेदभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देते. अशा स्थितीत वर्णभेद नष्ट करण्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवलेले यश राष्ट्रनिर्माण आणि सलोख्याच्या दृष्टीने आपल्यासाठी एक धडा आहे. दुसरीकडे, भौतिक प्रगती होत असूनही दर्जेदार शिक्षण, सुलभ आरोग्यसेवा, व्यापक स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या मूलभूत समस्यांना आजही आपल्या देशाला तोंड द्यावे लागते. विशेषतः ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव दूर होणे आवश्यक आहे. देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीही रुंदावत आहे. आर्थिक असमानता सामाजिक स्थिरतेला धोका निर्माण करते. समतायुक्त विकास घडवून आणण्यात अपयश आल्याने सर्व नागरिकांना समानता आणि न्यायाचे आश्वासन देणारी संविधानाची उद्दिष्टे कमकुवत होत असल्याचे दिसते. आपल्या लोकशाही प्रजासत्ताकासमोरची ही आव्हाने लक्षात घेता, परिपूर्ण विकासासाठी भविष्यात समावेशकतेवर केंद्रित धोरणे आखली पाहिजेत, जेणेकरून सर्वांत दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आणि पीडित घटकांपर्यंत विकास पोहोचेल. त्याचवेळी पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक समता आणि हवामान बदल यांसारखे विषय अजेंड्यावर घेऊन आर्थिक विकासाचा संतुलित दृष्टिकोन साधणे आवश्यक आहे. केवळ भौतिक प्रगती साधून ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि राजकीय विचारसरणी यातील अंतर दूर केले पाहिजे. संविधान आणि प्रजासत्ताक पंचाहत्तरी पार करत असताना देशाने सर्वंकष मानवी विकासाच्या दिशेने किती पावले टाकली, हे महत्त्वाचे आहे. अन्यथा, विकसित राष्ट्र होण्यासाठी निश्चित केलेले २०४७ हे वर्ष केवळ आणखी एका संख्यात्मक ध्येयाचे प्रतीक ठरेल. (संपर्क : sukhadevsundare@gmail.com)



Source link

सन्मानाने मरण्याचा अधिकार; ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील पहिले राज्य

0
सन्मानाने मरण्याचा अधिकार; ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील पहिले राज्य


गंभीर आजारी रुग्णांच्या ‘सन्मानाने मरण्याच्या अधिकारा’बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. जर गंभीर आजारी रुग्णाला जीवनरक्षक औषधांचा लाभ मिळत नसेल आणि सुधारणा होण्याची आशा नसेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२३ मध्ये दिला होता.



Source link

Dhule News: धुळ्यात सोयाबीन तेल कारखान्यात टाकीचा भीषण स्फोट, एक ठार, एकजण गंभीर

0
Dhule News: धुळ्यात सोयाबीन तेल कारखान्यात टाकीचा भीषण स्फोट, एक ठार, एकजण गंभीर


धुळे एमआयडीसीमधील एका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा स्फोट सोयाबीन तेल कारखान्यातील टाकीचा झाला आहे. या घटनेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना गॅस निर्माण होऊन हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

अर्थसंकल्पात EVM साठीही भरीव तरतूद; किती कोटींना खेरदी केल्या जातात व्होटिंग मशीन्स अन् किती असते त्यांचे आयुष्य?

0
अर्थसंकल्पात EVM साठीही भरीव तरतूद;  किती कोटींना खेरदी केल्या जातात व्होटिंग मशीन्स अन् किती असते त्यांचे आयुष्य?


Budget 2025 : संसदीय निवडणुकांच्या बाबतीत संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते, तर विधानसभा निवडणुकीचा खर्चाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर असते. 



Source link