Friday, July 31, 2026
Home Blog Page 541

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! ‘या’ कारणामुळे जानेवारी 2026 पासून लागू होणार नाही आठवा वेतन आयोग

0
सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! ‘या’ कारणामुळे जानेवारी 2026 पासून लागू होणार नाही आठवा वेतन आयोग


8th pay Commission : आठवा वेतन लागू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्का देणारी अडटे समोर आली. आगामी वर्षात आर्थात 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र, 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकत नाही अशी शक्यता दिसत आहे. यामागे तांत्रिक कारण असल्याचे समोर आले आहे.  यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारने च 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. यासाठी दोन सदस्यीय पॅनेल आणि अध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाईल असे सांगितले होते. मात्र 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.

लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वेतन आणि पेन्शन सुधारणेसाठी एक रोडमॅप आणि अर्थसंकल्पीय वाटप जाहीर करावी अशी त्यांची अपेक्षा होती. पण असे झाले नाही.

सध्या सुरु असलेल्या ७व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु सरकारने या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळेच 2026-27 च्या अर्थसंकल्पातच त्यासाठी तरतूद केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी तयार आणि अंतिम करण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते.  2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित कोणत्याही खर्चाचा हिशेब नाही, कारण वेतन आयोगाचा अहवाल अंतिम होण्यासाठी आणि मंजूर होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. अर्थ मंत्रालयाने यासाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना मागवल्या आहेत. या विभागांकडून सूचना मिळाल्यानंतरच आयोगाचे काम औपचारिकपणे सुरू होईल.

ज्या वेळेस सातवा वेतन आयोग लागू होताना शिफारशी देण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागला होता. 7व्या वेतन आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्यांहून अधिक कालावधी लागला. अशा परिस्थितीत, 2025-26 या आर्थिक वर्षात 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 





Source link

Rahul Gandhi : शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार कसे वाढले? महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधी यांचं प्रश्नचिन्ह

0
Rahul Gandhi : शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार कसे वाढले? महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधी यांचं प्रश्नचिन्ह


गेल्या वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते, मात्र त्यानंतर पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जितकी लोकसंख्या आहे तितक्या नव्या मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केवळ पाच महिन्यात ७० लाख नवमतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शिर्डीतील एका इमारतीत ७ हजार मतदारांची नोंदणी केली गेली, असा दावा करत विरोधा पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.



Source link

Manoj Jarange Patil : अर्ध्या रात्री येऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटले होते; मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट

0
Manoj Jarange Patil : अर्ध्या रात्री येऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटले होते; मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट


Manoj jarange Meet Dhananjay Munde : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण अजूनही तापलेलंच आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मु्ंडे यांच्यावर सातत्याने टीका सुरू असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे हत्या व खंडणी प्रकरणात तुरुंगात आहेत. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, त्यांनी आपली मध्यरात्री भेट घेतल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.



Source link

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस मुंबईत सर्वसामान्य जनतेला भेटणार; जाणून घ्या कुठे आणि केव्हा?

0
शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस मुंबईत सर्वसामान्य जनतेला भेटणार; जाणून घ्या कुठे आणि केव्हा?


राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री जनतेच्या भेटीला येणार आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये मंत्री भेटीसाठी उपलब्ध असतील. या भेटीसाठी नागरिकांना अर्ज करावा लागणार असून बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे.



Source link

लाथ नाही शिवराजनं गोळ्या घालायला पाहिजेत, महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

0
लाथ नाही शिवराजनं गोळ्या घालायला पाहिजेत, महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया


महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना (२ फेब्रुवारी) अहिल्यानंतर येथे पार पडला. या सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. पृथ्वीराज मोहोळ हा ६७वा महाराष्ट्र केसरी ठरला.



Source link

Viral Video: एका हातात मेकअप पाउच, दुसऱ्या हातात आरसा; महाकुंभात पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल

0
Viral Video: एका हातात मेकअप पाउच, दुसऱ्या हातात आरसा; महाकुंभात पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल


या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी या दाम्पत्याचे कौतुक केले आहे. काही लोकांनी तर पतीला ‘हस्बैंड ऑफ द इयर’ ही उपाधीही दिली. एका युजरने लिहिले आहे की, ‘हेच खरे प्रेम आहे.’ काही मोठा दिखावा नाही, पण प्रत्येक दिवसातील छोटे-छोटे क्षणच प्रेमाला परिपूर्ण बनवतात. आणखी एकाने लिहिले की, जेव्हा तुमचा जीवनसाथी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साथ देतो, तेव्हा तीच खरी चॅम्पियनशिप असते. काहींनी तर आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत. एका महिलेने लिहिले की, ‘जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा माझा नवरा हँडबॅग आणि पाण्याची बाटली धरतो. ही छोटी शी गोष्ट आहे, पण त्याचा खूप अर्थ आहे.’ तर काही लोकांनी मजेशीर अंदाजात कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘एक व्यक्ती आपल्या पतीचे कर्तव्य पार पाडत आहे.’



Source link

शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह

0
शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह


Shirdi Murder: दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.



Source link

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं

0
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं


Mahendra Gaikwad Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी २०२५ मध्ये पंचांना मारहाण करणे पैलवान शिवराज राक्षे याला चांगलेच महागात पडले आहे. त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. महेंद्र गायकवाड यानेही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचांशी हुज्जत घातली होती. या दोन्ही पैलवानांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.



Source link

एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

0
एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक


Pune fake insurance call centre racket : एलआयसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार पुण्यात  उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी ‘फ्रॉड कॉल सेंटर’वर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. 



Source link

राज्यस्तरीय भव्य सभा आणि ‘आवाज शिक्षकांचा’ साप्ताहिकाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

0
राज्यस्तरीय भव्य सभा आणि ‘आवाज शिक्षकांचा’ साप्ताहिकाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

गोंदवले (ता. माण, जि. सातारा), 2 फेब्रुवारी 2025: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय भव्य महामंडळ सभा आणि ‘आवाज शिक्षकांचा’ या साप्ताहिकाचा भव्य शुभारंभ गोंदवले (ता. माण) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) उपस्थित होते.

कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार अतुल बाबा भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, तसेच माजी आमदार संभाजी थोरात, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, संजय (काका) गांधी, अरुण आबा गोरे (चेअरमन, श्री सिद्धनाथ पतसंस्था), हरिभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे (नाना), आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ, शिक्षण अधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा चेअरमन बलवंत पाटील सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा:
सभेत शिक्षण क्षेत्रासमोरील विविध आव्हाने, उपाययोजना आणि धोरणात्मक बदलांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे आणि या पायाला बळकट करण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिक्षकांचे हक्क आणि मागण्या, वेतनश्रेणीतील सुधारणा, नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षणाचा प्रसार, ग्रामीण भागातील शाळांचे सक्षमीकरण यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली.

‘आवाज शिक्षकांचा’ साप्ताहिकाचे महत्त्व:
‘आवाज शिक्षकांचा’ या साप्ताहिकामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे यशोगाथा, नवकल्पना आणि सुधारणा समाजापर्यंत पोहोचतील. हे साप्ताहिक शिक्षकांचे व्यासपीठ ठरेल, जिथे त्यांच्या समस्यांना आवाज मिळेल आणि प्रेरणादायी कहाण्या प्रकाशित होतील.

या कार्यक्रमाने शिक्षकांच्या एकजुटीचे प्रतीक दर्शवत शिक्षण क्षेत्रात नवीन आशावाद निर्माण केला आहे.